निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,
जास्वंदींच्या फुलांचे फोटो मस्तच.
पण त्या पक्ष्यांच्या फोटोची ट्रिक काय - सांगा ना. कुठले पक्षी आहेत हे - नाव काय ?

मस्त आलेत फोटो.

माहेर हायजॅक केलाय माबोकरांनी Happy चिनूक्सने गुणी माबोकरांच्या गुणांना प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय.

ते पक्षीतरी खोटे आहेत नाहितर मागचा देखावा तरी Happy

खरच त्यामागचे श्रेय चिनुक्सलाच आहे अश्विनी.

दिनेशदा मला वाटत तो पाठचा पोस्टर आहे आणि ते पक्षी खरे आहेत.
किंवा
दोन्हीचा सेट आहे.

दिनेश ते घराचे चित्र एखाद्या बॅनरवरचे आहे का? ते त्या फांदीच्या मागे आहे ज्यावर पक्षी बसलेत.>>>>माधव, मलाही तेच वाटतंय Happy

दिनेशदा,
एका बॅनर समोर खर्‍या पक्ष्यांचा फोटो घेतला असेल किंवा अशा एका फोटोचा तुम्ही फोटो घेतला असेल..
काही असो, फोटो भन्नाट आलायं...जब मिल बैठेंगे असे दो पक्षी, तो फोटो निघेल लई भारी !
Happy

अनिल,माधव्,जिप्सीने बरोबर ओळखलं. ती रंगांची जाहिरात एका मोठ्या
बॅनरवर होती. आणि त्यासमोरच्या तोडलेल्या झाडावर ते पक्षी
बसले होते.

साधना. तेवढी फुले इथे एकेका बादलीत असतात. आणि दुकानात
अशा १५/२० बादल्या असतात.

अंबाडी वाळुत अशी डवरलीय..

[दुकानाच्या भिंतीच्या एका इंचभर कोनाड्यातुन]

चातक्_ती_अंबाडी_त्यांच्या_आवडीची,
भाजी_खातात्_का_ते_माहित्_नाही_पण्_तिच्या_बोंडाचे_सरबत्_मात्र_खुप्_आवडीने_पितात.
खास्_करुन्_या_महिन्यात्_नक्कीच.
करकाटे_नावाने_त्या_बोंडाच्या_पाकळ्या_मिळतात्_तिथे.

माधव्_नक्की_नक्की_!!

भाजी_खातात्_का_ते_माहित्_नाही_>>> मला सुध्दा माहीत नाही दिनेशदा.... पण अशा झाडांची/रोपांची फारच काळजी घेतली जाते.... जास्त देखरेखेची गरज भासत नाही तरी !

(आपल्याकडे असते तर कुरतडलेले आढळले असते हे रोप)

ही पहा गुलाबी करवंद. पुर्वी शाळेत जाताना वाटेत एक झाड लागायच ह्या करवंदांच. बायका खाण्यापेक्षा डोक्यात घालायलाच ह्याचे घड काढून घ्यायच्या.

लहानपणी आई हि गुलाबी करवंद आणून ग्लासात पाणी घालून ठेवायची. ३-४ दिवस टिकायची. मस्त दिसायची ही फळदाणी हल्ली बरेच वर्षात बघितली नव्हती. जागू फोटोबद्दल अनेक धन्यवाद Happy

अमि, आकर्षक रंग आणि टिकाऊपणासाठी माळतात हि करवंदे. तशीही हि करवंदे पिकत नाहित.
आपल्याकडे लालभड्क आणि हिरव्या चेरीज मिळतात त्या पण याच करवंदापासून करत असावेत अशी मला शंका आहे.
खर्‍या वेरीज इतक्या कडक नसतात, त्यातली बी पण मोठी असते. आणि त्यांना लांब देठ असतो.

पूर्वी फार पूर्वी, लग्नाच्या रीसेप्शनला आलेल्या पाहुण्यांचं स्वागत हे एक करवंद छोट्याश्या काठीला गुंडाळून पानासकट देत असत. का कुणास ठाऊक? आम्ही हॉलभर हिंडून मग ती गोळा करायचो आणि खायचो. Proud

जागु, बकुळी सुरेख. भावना तर त्याहूनही सुरेख. Happy
दिनेशदा, गुलाब काय सही आहेत. त्यादिवशी घरी पार्टी होती म्हणून सकाळी दादर स्टेशनजवळच्या फूलबाजारात गेले. तिथे फुलं विकत घेताना तुमची आणि जिप्सीची आठवण आली. तुम्ही लोकं असता तर कित्ती फोटो काढले असते.

जिप्सी एकदा सकाळी ये की. जाऊया फुलबाजारात आणि फ्लायओव्हर ओलांडून भाजीबाजारात. ती एक वेगळीच दुनिया आहे. मी जर लेकीला शाळेत सोडायला गेले तर नेहमी म्हणते एकदा जिप्सीला सांगूयात.

जिप्सी, तसंच परळ आणि लोअर परळ भागात अनेक जुन्या इमारती, चाळी, वास्तु आहेत. त्यांची कधीकधी खास वैशिष्ट्य दिसतात. तेव्हाही वाटतं तुझ्यासारखे दर्दी या सगळ्यांना छान टिपू शकतील.

तिथे फुलं विकत घेताना तुमची आणि जिप्सीची आठवण आली. तुम्ही लोकं असता तर कित्ती फोटो काढले असते.

मला का ग वाळीत टाकलस ? माझी नाही आठवण आली ? मेरे बोंबिल, हलवा, कोलंबी का कर्ज भुल गई ?

पूर्वी फार पूर्वी, लग्नाच्या रीसेप्शनला आलेल्या पाहुण्यांचं स्वागत हे एक करवंद छोट्याश्या काठीला गुंडाळून पानासकट देत असत.> >मला पण आठवतेय हे.

जागु तुझी आठवण आणि स्तुती ऐकून तर माझ्या घरचे एव्हाना वैतागले असणार. तु काय बाजारात येऊन फोटू काढणार? तुझी घरची इतकी सुंदर बाग आहे की. येंजॉय! Happy

जागु तुझी आठवण आणि स्तुती ऐकून तर माझ्या घरचे एव्हाना वैतागले असणार.
तुझ्यावर की माझ्यावर ? Lol
मामे तुला मेल केलाय ग कधीचा उत्तर दे. माझ्या बागेचे मी रोजच काढते फोटो.

खरंच, मुंबैत फोटो काढायची आठवणच रहात नाही.

------------
नदी म्हणालो कि आपल्याला झुळूझुळु वाहणारी, क्वचित पूर आलेली तर कधी कोरडी पडलेली नदीच आठवते. तिच्या काठाने राहणारी माणसं क्वचितच आठवतात.
पण अनोख्या नद्या आणि विलक्षण माणसे, बीबीसी ने ह्यूमन प्लॅनेटच्या तिसर्‍या भागात टिपली आहे. (या सर्व मालिकेचे चित्रीकरण ३ वर्षे चालले होते.)

पाच देशातून वाहणारी मेकाँग नदी. तिला पूर आला कि जगातील कुठल्याही धबधब्यापेक्षा जास्त पाणी तिच्यातून वाहते. तिच्या काठावर राहणारा एक माणूस. मूलांना त्या दिवसात मासे मिळावेत म्हणून जिवावर उदार होऊन, केवळ एका केबलच्या आधाराने ती नदी पार करतो. ती केबलपण त्यानेच नदीला पाणी कमी असताना बांधली आहे.

झिंबाब्वे मधला रौद्र व्हिक्टोरिया फॉल्स. उभाच नाही तर आडवाही विस्तार प्रचंड असलेला. पाणघोडे आणि मगरी देखील त्या धबधब्याच्या काठाशी जायचे धाडस करत नाहीत, पण ते नसल्यामुळे तिथे मोठे मासे मिळतात. आणि त्यासाठी काही माणसे तिथपर्यंत जातात.

ब्राझिलमधे नदीच्या काठावर राहणारी एक महिला. ज्यावेळी अमेझॉन शांत असते त्यावेळी अगदी नदीतल्या
डॉल्फिन्सना देखील ती भरवते. पण तिला माहित आहे कि तिला पूर आला कि पाण्याची पातळी ७ मीटर्सने वाढेल. त्यासाठी तिला भरपूर पूर्वतयारी करावी लागते. ती शोधून कासवांची अंडी आणते. एरवी निसर्गात ती टिकलीच नसती. त्यांची जोपासना करते. पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना नदीत सोडते, आणि पूर आल्यावर त्यापैकी काही पकडून आपल्या कुटुंबाच्या पोटाची सोय करते. पण यासाठी तिला भर पूरात होडी घेऊन जावे लागते.

केनयातील उत्तर भागातील वाळवंट. तिथे भूमिगत नद्या आहेत पण माणसांना त्या सापडण्यासारख्या नाहीत.
उंटाना चरायला तिथे घेऊन गेलेल्या लोकांना पाणी सापडत नाही. मग ते रानटी हत्तींच्या मागावर राहतात.
हत्तीना दिवसाला किमान १०० लिटर्स पाणी प्यावे लागते. त्यांच्या सोंडेमूळे त्यांना पाण्याचा सुगावा लावता येतो. त्यांनी खोदलेल्या खड्ड्यातून माणसांना व ऊंटाना पाणी मिळते. पण हे उपकार विसरले जात नाहीत. वस्तीवर परत आल्यावर खोल विहिरीतले पाणी काढून, रात्री भटकणार्‍या हत्तींसाठी ठेवले जाते.

अशीच एक कोरडी पडत लागलेली, माले देशातील नदी. आता तर तिचे पाणी काही डबक्यात्च उरलेय. त्यात भाताची तुसे मूरत ठेवलीत. वर्षभराचा पाऊस येण्याआधी संपुर्ण गावाला एक महत्वाचे काम करायचेय. त्या गावात निव्वळ मातीने आणि लाकडांनी बांधलेली एक अनेकमजली मशिद आहे. (जगातील अशी बांधलेली आणि इतकी मोठी अशी ती एकमेव इमारत आहे.) उनामूळे तिला तडे जातात आणि ते पावसापुर्वी बूजवणे आवश्यक आहे. भाताची तूसे पुरेशी कुजली कि सर्व गाव तो चिखल घेऊन त्या मशिदीचे हाताने लिंपण करतो.

भारतातल्या मेघालयात विक्रमी पाऊस होतो. सर्व वस्ती डोंगरांवर. नद्याही भरपूर. त्यांच्यावर बांधलेले पूल टिकणे अशक्यच. मग गावाने एक शक्कल लढवली. वडाच्या झाडाची मूळे एकमेकात विणून पूल बांधले, जशी मूळे वाढत गेली, तसे हे पूल भक्कम झाले आणि आता तोच त्यांचा आधार आहे. पण हे काम एका पिढीचे नाही. अनेक शतके असे पूल विणले जात आहेत. आणि हि कला छोट्या मुलांनाही शिकवली जाते.

हे सर्व बघताना मला इथल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण येत होती. काही दृष्ये तर इतकी अप्रतिम टिपलीत कि मला स्क्रीनशॉट्स घेऊन इथे दाखवावेसे वाटत होते. पण ते बेकायदेशीर असल्याने तो मोह टाळतोय.

दिनेशदा,
गुलाबी करवंदे पहिल्यांदाच पहायला मिळाली...

तुम्ही इथे मांडत असलेल्या ह्यूमन प्लॅनेटच्या या अशा एकापेक्षा एक विलक्षण कथा,घटना नेहमी अगदी श्वास रोखुन वाचत असतो. वाचताना खरं पाहिल नसलं तरी, वाचुन तयार झालेलं/कल्पनेतलं चित्र डोळ्यांसमोर उभदेखील राहतं.
बीबीसीवर काही क्लिप्स पहायला मिळाल्या ...
Happy

दिनेशदा काय छान लिहिता तुम्ही! सगळ्याच विषयांवर सारखंच प्रभुत्व! अगदी डिस्कवरी चॅनल/ट्रॅव्हल & लिव्हिंग चॅनल पाहिल्यासारखं वाटतं!

Pages