निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीकांत सगळ्याच झाडांनी नुकसान होणार नाही. अनंत काय एवढा मोठा वाढत नाही. पण काही लोकांना झाडे ही पण सजीव आहेत, त्यांना सजीवासारखे वागवले पाहिजे हे समजत नाही. एवढ्या सहजपणे झाडे तोडतात.. मला भयाण राग येतो अशा वेळी.

मेधा, किती मस्त गं.. फुल फुलण्याची क्रिया मुलांच्या डोळ्यांसमोर घडली..

अनंताच्या नाही पण बाकिच्या झाडांनी, खास करुन फायकस कूळ (वड, पिंपळ, उंबर ) आंबा वगैरेनी इमारतीचा पाया, ड्रेनेजचे पाईप यांचे नुकसान होऊ शकते.

इथे मला एक छान होर्डींग बघायला मिळाले.
इव्हरीथिंग दॅट गोज डाऊन, मस्ट गो अप.... एका तोडलेल्या झाडासाठी निदान एक तरी झाड लावा, असा संदेश आहे.

निकिता अग सुरंगी आता नाही येत. फेब्रुवारी मार्च पासुन चालु होते. मे मध्ये पण नाही सापडत. आता मोगरा मिळेल तुला.

ही ही....

कठिण आहे माझं :-(.. असो शिकेन हळु हळु.

सगळ्यांसाठी बातमी. मी काकडी समजत असलेल्या वेलाला फळ आलय. माझ्याकडे काम करणार्‍या बाई म्हणतात ते टर्बुज आहे. इतक लहान आहे की ठरवण कठीण आहे. ठरलं कि सांगेनच सगळ्यानां. Happy

निकिता, गोल वाढतंय की लांबट त्यावरुन आत्ताच कळेल की ! कित्ती ती घाई बाळाचं रुपडं नक्की कसं आहे ते बघायची ! Lol

अगं,
आता उरलेली गोष्ट पण लिहिते. ती वेल अगदिच अनपेक्षीत कुंडीत आली आहे. ज्या कुंड्यांमध्ये बिया टाकल्या तिथे आल्याच नाहीत. एक टर्बुजाची वेल आली त्याल टर्बुज पण आलं पण पुर्ण वाढायच्या आधी नालायक उंदरानी खाउन टाकली. मग मी बिया टाकयच सोडुन दिलं. मग एके दिवशी ही छोटुकली अवतरली. ती पण अशा जागी गर्दित की विचारु नको. मला उपटायला अगदिच जीवावर आलं म्हणुन वाढु दिली. तिच्यात आधीच एक चायनीज गुलाब आणि दोन तुळशी होत्या(ह्या पण शेजारच्या तुळशीच्या कुंडीतुन बिया पडुन उगवल्या, गुलाब फक्त मी लावलेला). अगदि लहान कुंडी आहे. त्यामुळे वेलीचा जीव अगदी छोटा आहे. एक फळ पण तिला झेपत नाही. बिचारी हल्ली थकलेली दिसते. पण फळ छान गोड गोडुल आहे. पण आकार असा की बेटिंग घेउ शकेन. मला उंदरांची चिंता आहे. परत मगच्या वेळी सारख नको व्हायला.

गोल वाढतंय की लांबट..सध्या ते छोटे दुधी मिळतात ना बुटके आणि जाडे त्यांच छोट रुप वाटत आहे..

मी किती बोलते नं Wink

सध्या लेकीकडे आहे. (वॉशिंग्टन डीसी) सध्या समर असल्याने टेंपरेचर २७/२८ आहे. खूप गरमी आहे. पण डीसी कायमच हिरवंगार असतं. खूप घनदाट झाडी आहे सगळीकडे. सध्या विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले फुलली आहेत.
इथल्या खारी आकाराने खूपच मोठ्या आहेत. आणि त्या खूप अ‍ॅग्रेसिव्ह असतात. अगदी खोडकर बाळं असतात ना तश्या वाटतात. इकडे तिकडे मस्त बागडत असतात. मागील पायांवर बसून पुढील हातात धरून काहीकाही खात असतात.
पण गंमत म्हणजे आपण जर जरा जवळून पहायला गेलो (निसर्गप्रेमी आणि प्राणी प्रेमी ना!)...तर त्या आपल्याकडे मान पुढे काढून स्टेअर करतात आणि आपण जर पहात बसलो तर चक्क अंगावर येतात......हातातलं खायला घेतलेलं टाकून देऊन! करत काही नाहीत पण भीति दाखवल्यासारखं करतात.

मानुषी खारी तशा रागीटच असतात, कावळेसुद्धा त्यांना वचकून असतात.
आपल्याकडच्या खारी चिडल्या म्हणजे शेपटी आणखी फ़ुगवतात.

आता रस्त्याने येताना फर छान वाटत. आजुबाजुला हिरवळ पसरलेय आणि आता रानफुले डोकावु लागली आहेत. तेरडा फुलला आहे. कोंबड्याचे तुरे सगळीकडे मिरवत आहेत. भेंडीची पिवळी फुलेही उमलायला सुरुवात झाली आहे. थोड्याच दिवसांत रानफुलांनी रस्ते भरुन जातील.

त्यामुळे वेलीचा जीव अगदी छोटा आहे. एक फळ पण तिला झेपत नाही. बिचारी हल्ली थकलेली दिसते. पण फळ छान गोड गोडुल आहे. पण आकार असा की बेटिंग घेउ शकेन. मला उंदरांची चिंता आहे. परत मगच्या वेळी सारख नको व्हायला.

>>> अरेरे. वेल लहान आहे की. १८ वर्षांआधी मूल नको माहिते ना? Proud

निकिता काल माहेर च्या अंकांची ऑर्डर द्यायला गेले तिथुन लोकप्रभा घेतला आणि वाचुन काढल खुप चांगली माहीती आहे.

साधना अग तुमच्या पेपरवाल्यांना सांग आणायला देतील ते आणुन. माझ्याकडे सगळे अंक मागताहेत म्हणुन मी काल १० अंकांची ऑर्डर दिली. आज येतील. त्यांना सांगितल अजुन जास्त आणुन ठेवा. कोणाला हवे असतील तर मी पाठवेन.

अगं दिनेशदांचा पण काहीतरी लेख आलाय माहेर मध्ये. आज घरी जाताना बघायला पाहिजे.

माहेर अंक म्हणजे मायबोलीकरांचे माहेर झालेय वाटतेय.. थँक्स टू चिनुक्स.. Happy

हो खरच चिनुक्सला धन्स.
साधना दिनेशदांच्या स्पेशल रेसिपीज म्हणजे पालक मकई, गुपचुप बटाटा, द्राक्ष बटाटा भाजी, सात घडीची पोळी आणि शेव नजाकती छापल्या आहेत.

माझ्या रानभाज्या आणि माश्यांच्या रेसिपीज छापल्या आहेत.

धन्यवाद दिनेशदा.

आपली निसर्गमैत्री अशिच राहो बकुळ फुलासारखी. वर्षोनुवर्षे मैत्रीच्या पुस्तकांच्या पानांत सुगंध दरवळणारी. मैत्रीदिनाच्या सर्व निसर्गप्रेमिंना हार्दिक शुभेच्छा.

माझ्याकडून हा गुच्छच. सर्व मायबोलीकरांना, मैत्रीदिनानिमित्त...
खरीखुरी फ़ुले..

या फ़ोटोसाठी मी कुठलेही प्रोसेसिंग केलेले नाही. क्रॉपसुद्धा केलेला नाही.
काही ट्रिकही नाही. सर्व खरेच आहे....ओळखा पाहू !!!

जास्वंदीमधे आता अनोखे प्रकार दिसायला लागले आहेत. रंग तर सोडाच
पण पाकळ्यांचा आकार, त्यांची रचना, पुंकेसरावरची रचना---सगळेच वेगळे.
शिवाय कळ्यांवर आणि फ़ुलातही अनेक किटक सुखाने वावरताना दिसतात.
असेच काही हे प्रकार.

Pages