मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक मुद्दा हा की आपण 'फॅन' झालो की तटस्थ विश्लेषण अवघड होते. 'अमुक एक लेखक मला फार आवडतो' या वाक्याचे रुपांतर 'तो सर्वश्रेष्ठ लेखक आहे' यात झाले की प्रॉब्लेम सुरु होतो. >>> हे आवडलं. (अरभाटनं त्याच्या लेखातल्या एका परिच्छेदात असंच काहीसं म्हटलेलं आहे.)

ज्ञानदाच्या ब्लॉगमधला सूर नाही आवडला. इथले काही मुद्दे पटले, काही नाही पटले. पण सकस चर्चा व्हायलाच हवी.
(कधीकधी निव्वळ श्रोता राहून चर्चा ऐकणं छान वाटतं. :))

कोणी इथे पोस्ट केले होते की 'चांदोबा'चे सर्व अंक नेटव्र त्याच्या साईटवर फ्री आहेत . म्हणून मुद्दाम जाऊन वाचून काढले. भलताच मजा आला. अजूनही मी 'बालबुद्धी'चाच आहे आणि माझी अजिबात ग्रोथ झालेली नाही. याची खात्री पटली. Proud

पी. एस. आय लव यु वाचले आवडले.. त्याचा पुढचा भाग घेउन वाचायचा आहे. Happy
सध्या लिस्टवर पी. एस. आय लव यु -२, द माँक हु सोल्ड फेरारी, हाउ टु टॉक एनीवन, ट्वायलाएटाचे सगळे भाग असे आहेत. बघुया कधी चान्स मिळतो ते.. Happy

अरे ते टोन डाऊन ठेवण्यासाठी. त्या ज्ञानदा किंवा इतरही कोणाला असे मत ठेवण्याच्या त्यांचा अधिकार आहे असे म्हणायचे आहे. आणि त्यांचे ते मत इथे बहुतेकांनी कसे चुकीचे आहे हे दाखवून दिले आहेच. Happy

कुठे आहे ती लिंक चांदोबाची??? लहानपणि दर महिन्याला येणारा "चांदोबा" एका तासात वाचुन काढुन मगच जेवायला बसत असे.. खुप नॉस्टॅलजिक वाटले नाव ऐकुन.. Happy

टिपकागदासारखे मन असले तर न वाचन करताही ग्रोथ होते. आणि कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीत पुस्तकापेक्षा असलेल्या वातावरणाचा प्रत्यक्ष प्रभाव असतो. नाहीतर थिन्क पॉझिटिव्ह नावाचे पुस्तक घेतले की झाले.>>>> केवळ पुस्तकेच हाच एकमेव 'ग्रोथ फॅक्टर' आहे असे मी कुठे म्हणतोय, तू म्हणतोस तसे वातावरणाचा प्रभाव असतोच. माझ्यापुरते सांगायचे तर पुस्तकेच माझ्या वातावरणाचा एवढा प्रचंड भाग व्यापून होती आणि आहेत की त्यांचा जडणघडणीवरचा प्रभाव जोरदार आहे.
बाकी 'थिंक पॉझिटीव्ह' वाचल्याने जीवन सुधारल्याचीही उदाहरणेही असतीलच की!!!

श्रद्धा, असा काही कोर्स आहे का ते माहिती नाही पण माझे वाचन तरी कधी अजाणतेपणी तर कधी अगदी ठरवून अशाच वाटेने गेले आहे. यात कसल्याही पात्रताश्रेणी अजिबात नाहीत. आपल्या वाचनाच्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडून वेगळी वाट चालून पहायला हरकत काय आहे? अर्थात इथे आपल्या वाचनापासून आणि एकंदरीतच साहित्य व्यवहारापासून अपेक्षा काय आहेत हा प्रश्न येतो. त्याच जर भिन्न असतील तर ते तसे मान्य करावे आणि एका गटाने दुसर्‍याला तुच्छ अथवा ग्रेट न मानता आपला रस्ता धरावा.

नाही तू तसे म्हणालेला नाहीस. मी फक्त ग्रोथ अन पुस्तके ह्यांची एकत्रीत सांगड घातली व माझ्या अनुभवाशी ताडून पाहिले.

प्रत्येकाच्याच ग्रोथमध्ये वाचनाचा वाटा कसा असेल?
प्रत्येकजण आपल्याला रुचणार्‍या गोष्टीच करतो. उद्या जर सचिन म्हणाला, फार झालं गल्लीत क्रिकेट खेळणं, आता वनडे खेळा, तर कसं व्हायचं? एखाद्याला फक्त गझला आवडत असतील, तर 'ग्रोथ व्हायला हवी', म्हणून त्यानं मुद्दाम शास्त्रीय का ऐकावं? गझला ऐकून त्याची ग्रोथ होऊ शकतेच.

वाचन स्वानंदासाठी असतं. बौद्धिक, मानसिक भूक भागवण्यासाठी असतं. हे हेतू साध्य झाल्याशी मतलब. कोण काय वाचतं, याची काळजी उगाच कोणी का करावी? आणि त्यावरून वाचकाची लायकी तर अजिबात ठरवू नये. अमुक एक लेखक वाचल्यानंच ग्रोथ होते, हे अजिबातच पटत नाही.

.

अ‍ॅडमिन,
प्लीज बाजो चिनूक्स भरत श्रद्धा आगाऊ आणि सर्वांच्याच पोस्टी हलवायच्या राहिल्या आहेत. त्या प्लीज हलवता का?

अरे वा, छान चर्चा चालली आहे! आगाऊ, चिनूक्सची मतं पटली.. (काही काही ठिकाणी ती कॉन्ट्राडिक्ट होतात तरीही)
पूर्वी अवचट (लेखक म्हणून) आवडायचे.. आता 'दिसले ते' वगैरे वाचताना 'दिसेल ते' लिहलय असं वाटतं कधीकधी..
सरसकट सगळे पुस्तकं नाहीच आवडत हल्ली.. (म्हणूनच आगाऊला अनुमोदन दिलं :D)
पण त्यांच्यातली वेगवेगळ्या गोष्टी करण्याची उर्मी जबरदस्त भावली मला.. साधेपणाही..असो, पण लेखक-अवचट हा चर्चेचा विषय असल्यानं त्याबद्दलच बोलू!

लेखिकेला जे अवचटांच्या लिखाणाबद्दल म्हणायचय त्यावरच्या रैनाच्या भाष्याला अनुमोदन..
पण एकूणच लेखनाचा सूर आताताई वाटला (बायो, ज्यांना ट्विट करायचय त्यांना करूदेत की.. तू कशाला त्यांच्या आयुष्याचा ताळेबंद मांडायला बसलीयेस. जसं तू हा ब्लॉग लिहिलीतीयेस, तसंच तिनंही ट्विट्स टाकलेले.. तू १००% तुझ्या मतांशी प्रामाणिक आहेस तर तू कशाला ब्लॉगद्वारे कंठशोष करतीयेस? हे 'मध्यमवर्गीय' नाहीये का मग? असं काहीस वाटलं)
असो..

धन्यवाद बाळुजी.. अधाश्य्सारख्या २-३ गोष्टी वाचुन काढल्या अणि मगच कामाला लागले.. Proud

साधना
चि. वि. जोशींची ब्राह्मण विधवेवरील कथा - रहाटगाडगे. खूप वर्षांपूर्वी वाचली होती. त्यात नायिकेचा जीवनाकडे बघण्याचा मजेशीर दृष्टीकोन आवडला होता.

गिरिश कुबेरांचे 'युध्द जीवांचे' हे जैविक अस्त्रांवर आधारित पुस्तक वाचले. जैविक अस्त्रांचा वापर अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे हे त्यातील प्रसंग वाचून क्लिक झालं. अमेरिका, फ्रास्न, इस्रायल, जपान, पाकडे, रशिया इराक सारख्या देशांनी या अस्त्रात केवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा ओतला होता व ओतत आहेत हे वाचून चक्रावण्याची वेळ आली. जगाला शांततेचे पाठ पढवणारी राष्ट्रेही या प्रकारात गुंतली आहेत. अशा अस्त्रांची चाचणी व प्रत्यक्ष वापराने मनुष्यावर झालेले अत्याचार वाचूनच अशी अस्त्रे वापरणार्‍यांची क्रूरता दिसून येते. तुम्ही जीवास्त्रे तयार करणार नसाल तर आम्हीतर नकीच करू आणि वापरूही अशी अकथित धमकी जगात अस्तित्वात असल्यासारखी अनेक राष्ट्रे यात गुंतली आहेत. सध्याच्या घडीला आण्विक अस्त्राइतकीच धोकादायक अशा जैवास्त्रांबदल जाणून घायचे असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचा.

आर.के. नारायणन् यांचे 'द गाइड' वाचले, बर्‍याच वर्षांपूर्वी गोल्डी-देवानंदचा गाइड हा चित्रपट पहिला होता. तो चित्रपट या पुस्तकावरून घेतलाय हे कळाल्यापासून हे पुस्तक वाचायची उत्सुकता होती. पुस्तकातील कथानक राजूच्या स्वगतातून फ्लॅशबॅक पध्दतीने जाते. बाकी कथा सगळ्यांनाच महिती आहे. पुस्तक चांगले आहे आणि चित्रपटात दाखवलेल्या पात्रांपेक्षा पुस्तकातील पात्रे सौम्य आहेत.

अमेरिका, फ्रास्न, इस्रायल, जपान, पाकडे, रशिया इराक सारख्या देशांनी या अस्त्रात केवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा ओतला होता व ओतत आहेत हे वाचून चक्रावण्याची वेळ आली.
रंगासेठ,
धन्यवाद !
यात आपला भारत कुठे आहे, या अस्त्रांला काही पर्याय आहे आपल्याकडे ?
Happy

हिंदू वाचली.. आवडली नाही. नेमाडे व्यक्तीरेखा उभे करायला कमी पडले असं वाटत राहतं.

अनिल यात भारताने पैसा ओतलायच, इराकला मदत केलीय असा उल्लेख आहे पुस्तकात.

सिंडरेला, कुबेरांची पुस्तके वाचली गेली वेगळ्या विषयांमुळे Happy

चिनूक्सने 'अक्षरवार्ता' मध्ये सांगितलेली 'सुंदर ती दुसरी दुनिया' व 'एका दिशेचा शोध' वाचली. दोन्ही पुस्तके चांगली आहेत.

मी पण 'सुंदर ती दुसरी दुनिया' माबो वरुन मागवुन वाचले. बरे आहे. बरेच ठिकाणी लेखकाची भाषा अगदी रसभंग करते. उदाहरण 'वैजयंती मालाचे ढुंगण', हे नक्कीच इंग्रजी वाक्याचे भाषांतर आहे, पण मराठीत ते कसेतरीच वाटते वाचताना.
शमशाद बेगम यांची मुलाखत तर वाया घालवली आहे. प्रश्ण अगदीच फुटकळ वाटले मला. त्यामानाने विजय आनंद यांची मुलाखत वाचायला बरी वाटली. खुप अपेक्षा न ठेवता एकदा वाचायला बरे आहे पुस्तक.

इथे कुणी 'चाळेगत' हे प्रवीण दशरथ बांदेकर यांचे पुस्तक वाचले आहे का? या पुस्तकाविषयी खूप चांगले वाचले आहे मी.

नर्मदा परिक्रमा: एक अंतर्यात्रा (भारती ठाकुर)
वाचनीय. अध्यात्मिक प्रवास आहेच पण तरीही बर्‍यापैकी वस्तुनिष्ठ पद्धतीने वर्णन आहे...त्यामुळेच believable वाटते. भारतीताई आणि त्यांच्या एका मैत्रिणीने नर्मदा परिक्रिमा केली त्याचे वर्णन आहे.
गोनीदांने केलेल्या चित्तथरारक परिक्रमेचे वर्णन आठवत होते. पण ही परिक्रमा मात्र बरीच शक्य व्हावी, अगदीच त्यांच्यासारखी चालत नाहीतरी निदान बसने.
आता त्यांनी वर्णिलेला किती भूभाग सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत पाण्याखाली गेला आहे कोण जाणे.
वाचल्यावर बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात, उद्भवतात ते एक असो. लेखनशैली ठिक, पण अनुभव म्हणून फार फार प्रभावी वाटले. त्यातला प्रांजळपणा आवडला.

धाकट्या नजरेतून : अलका गोडे
राजहंस प्रकाशन, 'माणूस' आणि माजगावकरांची/ पुरंदरेंची कौटुंबिक आणि व्यावसायिक गाथा अलकाताईंच्या नजरेतून. साधे. सोपे. प्रस्तावनाही छान. कसलाही बुद्धीवादी आव आणलेला नाही. खरमरीत, प्रखर, जीव खाऊन, अस्वस्थ करणारे काही नाही. अशी साधी पुस्तकं आणि अशी माणसं कुठे गेली? कित्ती तो सहज प्रामाणिक झेपेलसा लेखाजोखा. काहीसा भावूक मागोवा असला तरीही जमिनीवर आहे. मोजका आहे. तिथेच थांबण्यात हशील आहे.

आई समजून घेताना- उत्तम कांबळे
लेखन म्हणून ठिक. अनुभव म्हणून फार मोठे अर्थातच.

रैना, एकापाठोपाठ एक पुस्तकांचा फडशा पाडणं सुरु केलंस ना? Happy

चिं.वि.जोशींचं "आपला पण गाव" नावचं एक छोटं पुस्तक वाचलं. आवडलं. मस्त हलके फुलके विनोदी आहे चिवि स्टाईल.

आई समजून घेताना- उत्तम कांबळे
रैना अनुमोदन!

पर्व- एस.एल.भैरप्पा.
भारीच!

तुकोबाचे निवडक अभंग- नेमाडे
अप्रतिम!

पर्व- एस.एल.भैरप्पा.
भारीच!

सहमत

Pages