कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !
सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.
या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )
सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना
The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.
ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos
तिच्या
तिच्या वजनापेक्षाही मला तिचा ड्रेसचा चॉइस खटकला. त्यामुळेच ती जाडी वाटत होती.
सलमानने खरंच मजा आणली.
मैत्रेयी, सलमान,हिमेश ड्रामा स्क्रीप्टेड वाटत नव्हता. अगदी ओरिजनल आहे. गेल्या वर्षीचं आठवत नाहीये? यावेळी सल्लू त्याला उगीचच भडकवत होता.
आणि हो,
आणि हो, वैशालीच्या 'कोंबडी पळाली' वर सल्लूला आणखीन काहीतरी बोलायचं होतं तर (चाफ्याच्या)कतरीनाने आगाऊपणाने तोंड कशाला खुपसलं मधेच?
अगदी अगदी
अगदी अगदी सायो! मला पण तोच वैताग आला. "तुझ्या बापाचं गाण फार आवडतं.." वगैरे, तेही मधेच (सलमानच्या हातातला माइक हिस्कून)
..............
भेळ, मिसळ, पाणीपुरी दाबून करा फस्त
नाड्या थोड्या सैल करा, आराम करा मस्त!!!
सायो,
ते "तेरी ओर" गाणं छान आहे ना? (श्रेया घोषाल आणि राहत फतेह) सकाळपासून पारायण करून झालं. प्रीतमकडून एवढ्या क्वालिटीची अपेक्षा नव्हती.
MT, मलापण ते वैर स्क्रीप्टेड नाही वाटलं. सलमानने शेवटी हिमेसभाईला गायला लावलंच. आणि त्यामानाने हिमेश शांत वाटत आहे या सीझनमधे. फक्त आशाताई आल्या की याला चेव चढतो बहुतेक.
हो चांगलंय
हो चांगलंय 'तेरी ओर' गाणं. एक गोष्ट मला अजिबात आवडत नाही आणि ती म्हणजे बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये काम करुनही ह्या लोकांना हिंदी घड येतही नाही. हेमा मालिनी,श्रीदेवी त्याच माळेच्या मणी.
हो, मलाही
हो, मलाही त्या कट्रिनाच्या माइक हिसकाउन घेण्याचा राग अला !
काल सर्वात चैन देबो ची झाली:))
कट्रिना इतर कुठल्या पोरां बरोबर नाही नाचली, फक्त देबो बरोबर नाचली !!
काल मी १५ मिनिट म्हंटले पण आस्मा २० मिन स्टेज वर होती:(
बघ की. कळत
बघ की. कळत नाही आपल्याला मराठी तर गप्प बसावं की नाही? पण नाही, विचका केला वैशालीच्या गाण्यात मधे मधे पडून.
आसमा सारखी
आसमा सारखी 'क' दर्जाची वागणूक सलमानला आजतागायत कोणी दिली नसेल. माशाअल्ला क्या बॉडी है... पण इतकी पुरणार नाही म्हणे.... अजून मेहनत घ्यावी लागेल.... तु इधर स्टेजपे आ, इसको खोल...
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
अजून मेहनत
अजून मेहनत घ्यावी लागेल.... तु इधर स्टेजपे आ, इसको खोल
<<< अजुन डबल मिनिंग म्हणा , मै पकडता हू, तू खोल वगैरे डॉयलॉग आस्मा चे !
हा
हा स्पॉटलाइट चा व्हिडिओ पहा .हसून हसून लोळायची वेळ आली.
वैशाली आणि याशिता ला भाजी विकायचं टास्क दिल होत....... नौवारी साडी नेसून कट्ट्यावर भाजी वाल्या बसल्या होत्या, खरीच भाजी वाली सारखी बोलतेय वैशाली आणि याशिता पण बर्या पैकी मराठी बोलते कि पहा!
आणि शौमेन्-जाहिर पहा सिनेमाची तिकिटं ब्लॅक करतायेत, शौमेन चा विग पहा... हाहाहा.. टू मच !!!!!
http://www.apnicommunity.com/media.html?http://www.desishare.org/zshare....
****************************
******************************
__"()"
\__/ शुभ दिपावली !!!!!!!!!!!
दिसलीस तू, फुलले ॠतू
शौमेन आणि
शौमेन आणि झहिरचं सोंग मस्त जमलं होतं. ओळखणं कठीण होतं त्या अवतारात. वैशाली आणि याशिताची पेअर पण छान जमून गेली. याशिताला थोडं फार मराठी येतं हे बघून मी तिला १०% माफ केलं आहे आगाऊपणाबद्दल.
सौमेन अन
सौमेन अन झहीर सहीच्!!:खोखो:
झहीर तर 'त्यातलाच' वाटत होता अगदी!!
ह्म्म, मी
ह्म्म, मी काही पाहिले नाही ह्या वेळी बाहेरगावी जाणे झाल्यामुळे, पण वैशाली नी दुसर्या दिवशी चांगले म्हटले हे वाचुन बरे वाटले

आता वरच्या लिंक्स पाहीन आणि यु-ट्युब वर काही मिळते का पहावे लागेल
मी तर ऐकले होते की सलमान ने हिमेश ला पहिला हात दिला आणि वर आणले, आणि आता हिमेश त्याच्यावर उलटला? आणि ह्या वेळी साराच गेली ना?
सुनिधी,
सुनिधी, हिमेश-सलमानचं जे ऐकलं आहेस तेच मीही ऐकलंय. असो, चालणारच...
माझा मित्र
माझा मित्र आणि हिमेश च्या कम्युनिटी चा मॉडरेटर, अर्का याने खास वैशाली साठी बनवलेली इमेजः)

आज काही
आज काही दाखवायला नव्हतं तर अख्खाच्या अख्खा एपिसोड आस्माला डेडीकेट केला!!!!!
आस्माला
आस्माला फायनल ३ मधे पहायची तयारी ठेव, सायो:(
मी अता इंडियन आयडॉल मधे जास्त इंटरेस्ट घेतेय, तिथे जास्त चांगले गायक आहेत सारेगमप पेक्षा.
प्रसन्नजीत्-भाव्या-शिनि-राजदीप-अनन्या-भानु सगळे चांगले गातात.
सारेगमप मधे एक वैशाली , कधी तरी देबो सोडून कोणाच्या गाण्याची वाट पहावीशी वाटत नाही!:(:(
तो
तो प्रसन्नजीत अभिजित कोसंबीचा भाऊ आहे ना? पण तो तर मध्ये आऊट झाला होता ना? तो आणि अजून एक मराठी मुलगा होता...मी काही एपिसोड्स मिस केले..त्यामुळे कळलं नाही मधे काय झालं.
हया बीबी
हया बीबी वर इतके पोस्ट येतात म्हणून एक भाग पाहिला ह्याचा.. खूपच टुकार होता प्रकार एकूण..
मराठी srgmp lil champs चा दर्जा फार म्हणजे फार वर आहे ह्या कार्यक्रमापेक्षा.. !!
>हया.. बीबी
>हया.. बीबी वर इतके पोस्ट येतात म्हणून एक भाग पाहिला ह्याचा.. खूपच टुकार होता प्रकार एकूण..
अगदी! इतके दिवस फक्त इथला "तमाशा" पाहिला.. कार्यक्रम पहाणे याना कसे काय जमते देव जाणे. मला तर वाटत, पुढील खेपेस कोणत्याही प्रांत वा राज्याची महागायक वा महागायिका यान्नी किती टुकार गावं यालाही मर्यादा ठेवाव्यात्.. (त्यासाठी "समस" करता येतात का..?:)). अर्थात सर्व "समस" च गणीत आणि धंदा असल्याने जिथे असमा, देबो सारखे फटिचर गातात तिथे वैशाली पण चालून जाईल. पण इथे जे कुणी तिचे "जिवलग" पंखे आहेत (अजूनही?) त्यान्नी आमची कळकळीची विनंती तिच्यापर्यंत पोचवावी: "आता बास" म्हणाव. महाराष्ट्राची आणखी लाज काढू नका...
प्रत्त्येक गाण्यात बेसूर, चिरकणारा फाटणारा आवाज, च्यामारी सूर, शब्द, भाव सर्वाचीच बोंब... (अगदी संगीतातील थोड फार कळत तेही हेच म्हणतील) आणि त्यावर मा.बो. ची फुकटात उपलब्ध असलेली सर्वर स्पेस वाया..! भारी आहे..
कालाय तस्मै नम:!
प्रतिक्रीया तिखट, जळजळीत, कुचकट वगैरे असे कुणाला वाटत असेल तर वाटू दे.. जे वाईट ते वाईटच!
srgmp काय idol काय या अशा "समस" स्पर्धा अजूनही टिकून आहेत याच आश्चर्य वाटत्...एक चांगला गायक वा गायिका ऐकण्यासाठी हा बाकीचा कचरा कानात पाडून घ्यायचा..? अरारा.. करोडोंच्या देशात यापेक्षा जराही चांगले गायक मिळत नाहीत हे दुर्दैवच म्हणायच!
(No subject)
वैशाली
वैशाली रॉक्स
अरे वा!
अरे वा! दिपांजली, छान पोस्टर आहे.
वैशाली दिसतेय ही एकदम ग्रेसफुल..
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
हे काय?
हे काय? शुक्रवार गेला,शनिवार गेला तरी कुणी ताज्या एपिसोड्सबद्दल बोलतच नाहीये.
शुक्रवारी आस्माने कहर केला,हैराण व्हायला झालं तिची तीच तीच बकबक ऐकून आणि हिंदी ऐकून. प्रतिभाचं,याशिताचं गाणं मस्त झालं. बर्याच प्रतिभाची गाणी ऐकून वैशालीने ते गायला हवं होतं असं वाटतं. वैशाली, देबो, झहिर,शौमेन सो सो होते.
शनिवारच्या एपिसोडमध्ये वैशाली,देबो मस्त गायले.आणि बाकीच्यांची गाणी आठवत नाहीयेत आत्ता.आमिरला बघून मस्त वाटलं.
२६/११ नंतर पाकिस्तानी,ओमानी गायकांवर माझा बहिष्कार असणार आहे. समस कधीच केले नाहीत पण यापुढे ते आपल्या स्टेजवर आलेलेही खपायचे नाहीत मला.
मला देबोचं
मला देबोचं 'माँ' खूप आवडलं. आत्तापर्यंतचा त्याचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स होता तो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आस्म बद्दल
आस्म बद्दल काही न बोललेच बरं, चॅनल चेंज करत होते मी ,ती आली कि.
शुक्रवारी मला ही याशिता आवडली, मौली पेक्शा 'माइया' खूप वेगळ्या स्टाईल मधे गायली.
प्रतिभाही छान.
शनिवारी आमिर असल्या मुळे जजेस पण कडक मार्क्स देत होते:), ऊठ सूट हिस्टरी वाटत नव्हते!
माझे आवडते टॉप २ गायक, वैशाली आणि डेबु आवडले , डेबु ची फीलिंग्स एक्दम सुरेख, नेक्स्ट वीक तो टॉपर असायला हरकत नाही !
वैशालीने
वैशालीने कोणतं बरं म्हट्लं शनिवारी? आठवत नाहीये.
मला वाटलं आमिर समोर तरी आस्माच्या पांचटपणाला थोडी खीळ बसेल पण कसलं काय? आता जरा अति व्हायला लागलंय. या आठवड्यात तिचा नंबर काही केल्या लागयलाच हवाय.
नाही
नाही सायो,
आस्मा टॉप ३ मधे नक्की जाणार, अता ऍक्सेप्ट केलय मी:(, देबो आणि वैशाली आहेत तोवर बघणार मी सारेगमप !
मला वाटत कि पुढच्या वीक मधे पण कदाचित एलिमिनेशन होणार नाही कारण असं वाचलं कि जाहिर परत गेला होता स्ट्राइक मुळे, आणि अता परत येणे त्याला ऑल मोस्ट अशक्य आहे, पाक पण त्याला पाठवत नाहीये आणि इथे आला तरी मला नाही वाटत त्याला गाउ देतील भारतात कोणी..सो जाहिर गेल्या त जमा आहे !
वैशालीनी 'रंगीला रे' गायल शनिवारी.
जहिरला जर
जहिरला जर भारतात गाऊ दिलं नाही तर आस्माला का गाऊ द्यावं? जर पाहिस्तानने त्याला परत पाठवायचं नाही असं ठरवलं तर गोष्ट ठीक आहे.
Pages