सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैशाली नाही जाणार फिनाले आधी !
आणि या आठवड्यात एलिमिनेशन नाहीये बहुतेक.

>>आणि या आठवड्यात एलिमिनेशन नाहीये बहुतेक.>> ते का?

फिनाले मधे तिघांनाही ठेवायच ठरल म्हणून नाही एलिमिनेशन !
याशिता ला हाकलायला हव होत !

असो, हे पहा उद्याच्या एपिसोड च ट्रेलरः), हिमेश -आदेश चा प्रेमळ संवाद :):):)
http://www.bollywoodhungama.com/broadband/video/Television/LeN8Qf95/2/Hi...

वैशाली रॉक्स! 'जिया ले गयो जी मोरा साँवरिया' काय सुरेख गायली! मजा आली. "दिल चीझ क्या है" ची सुरुवात पण अतिसुंदर! जियो! शौमेन ठीक-ठीक पण याशिताबाईंच्या गाण्यातल्या केवढ्या मर्यादा उघड्या पडल्या!!! Happy जगजीतसिंगांनी हातचं न राखता स्पष्ट आणि रोखठोक शब्दात सांगितलं! वैशालीसाठी पण एक पट्टी खाली गाण्याचा सल्ला योग्य होता.

आणि आदेशच्या वहावण्याला काही मर्यादाच राहिली नाहिये. एके ठिकाणी "लता मंगेशकर तो कोईभी बन सकती है" अशा टाईपची बकवास करत होता ती ऐकलीत का? दिवस भरलेत त्याचे! Lol

जय मातादी लेट्स रॉक! Proud

"लता मंगेशकर तो कोईभी बन सकती है" >> असे कुठे म्हणाला तो. तो म्हणाला की 'लता मंगेशकर तो कोई नही बन सकता ..... ' (इथे पहा ..९व्या मिनीटावर हे वाक्य आहे)
आदेश पेक्षा हिमेसभाय आजकाल फार गोंधळ करत आहेत. शंकर महादेवन होते तो पर्यंत जरा थंड बसले होते आता परत मागच्या वर्षी सारखा आरडाओरड चालु केली.

चाफा,
मला तर असं ऐकु आलं " लता मंगेशकर तो कोई नही बन सकती, लेकिन इस मंच ने श्रेया जैसी सिंगर दि है".
लता कोई भी बन सकती है म्हंटला असता तर अजुन धुमश्चक्री झाली असती, एवढ डेरिंग कोणाकडे नसाव !

मंगेशकर घराण्याचा संगीत क्षेत्रातील योगदान आणि चित्रपट संगीतामधील एकंदर दबदबा आणि पुर्वीचा इतिहास पाहिला तर आदेश स्वप्नात पण असे विधान नाही करणार. चुकुन केले तर त्याला त्याचा ड्रम घेवुन दिल्लीला कायमचे परत जावे लागेल.

बरोबर डिजे. असंच म्हणाला आदेश.
वैशाली चांगली गायली. शौमेनही वाईट नव्हता पण याशिताने अगदी मंद मंद गाऊन पकवलं. प्रतिभा असती तर तिने ही ह्या एपिसोडमध्ये बहार आणली असती. याशिताचं गझल राऊंडचं गाणं मितिकाही छान गायली असती असं राहून राहून वाटलं.
हिमेश जसा १००% फेक आहे तसाच आदेशही.....सो नो कमेंटस

बायदवे, ही ग्रँड फिनाले कधी आहे नक्की? त्यात आस्माचा तमाशा असेलच अशी आशा आहे. मिस करतेय मी तिचा उंट नी त्याचा डंडा. कित्ती कित्ती दिवस झाले तिला बघून Proud

हिमेश यावेळी मला अजिबात फेक नाही वाटते, बरोबरच वागतोय तो, वैशालीला जर शंकर सारखा परफेक्ट आणि संयमी किंवा प्रीतम सारखा माठ मेंटर मिळाला असता तर ती पण प्रतिभा-मितिका सारखी कधीच आउट झाली असती !
प्रीतम ने तर मितिका ला अजिबात सपोर्ट केल नाही:(
सायो,

ग्रॅड फिनाले २४ ला आहे.
पण आस्मा ची आठवण काढलीस तर मीच येते डंडा घेउन Happy

वैशाली रॉक्स !!
z1.jpgz2.jpg

जय माता दी लेट्स रॉक...!!!
रॉक द वर्ल्ड !!!

_______
कुणासाठीतरी शिजवण्यात
एक वेगळीच मजा येते
स्वतःसाठी बनवलं तर
ती निव्वळ गरज असते...

ओह ओके, असं म्हणाला का तो? तेच म्हटलं की लताला नावं ठेवतोय म्हणजे खूपच वहावला. Proud
मला यावेळेस हिमेशबद्दल तक्रार नाही Wink कारण वैशाली deserving आहे.

डिजे, बरोबर. प्रितमने मितिकाला अजिबातच सपोर्ट केलं नाही. तीही डिझर्व्हिंग होती.
हिमेशचा प्रॉब्लेम हा असतो की जोवर सारेगम चालू असतं त्यावेळी तो कंटेस्टंटसना कामं देण्याच्या मोठमोठ्या बाता मारतो(ज्या त्यावेळी ही खोट्याच वाटत असतात) आणि शो संपला की रात गयी बात गयी हा नियम लागू होतो त्याला. सलमानने त्याला' हिमेश, तुने किसीको गवॉया है?' हा प्रश्न विचारल्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हतं.

तरी हिमेश नी बर्‍याच जणांना चान्स दिला...

पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत ला 'मर जाँवा निट जाँवा' मधे...
विनीत ला 'रॉकी-द रिबेल' मधे
हेमचंद्र, हिमानी आणि परत विनीत ला 'दिल दिया है' मधे

तसा तो जास्ती लोकांना गायचा चान्स देत नाही कारण जास्ती चान्स तो स्वतःच घेतो...
_______
कुणासाठीतरी शिजवण्यात
एक वेगळीच मजा येते
स्वतःसाठी बनवलं तर
ती निव्वळ गरज असते...

मेंटर कडून किती ओव्हर आपेक्षा करणार?
हिमेश शो मधे साथ देतोय, मिडिया पुढे प्रमोट करतोय हे काय कमी आहे ?
नंतर म्युझिक इंडस्ट्री मधे ब्रेक दिला तर ठिक च आहे पण खर तर इतका मोठा प्लॅटफॉर्म मिळाल्या वर पुढचा स्ट्र्गल गायकानी आपला आपण करावा इतकी पब्लिसिटी निदान फायनलिस्ट ला तरी देतच कि चॅनल , नाही तर इतर गायकांना इतकी सुध्दा नशीबाची साथ मिळत नाही !
सध्या च्या जमान्यात कुठल्याही प्रकारची पब्लिसिटी, चर्चा होणं महत्त्वाचं आहे!
वैशाली कडे टि आर पी वाढवणार्‍या चर्चां बरोबर गायकी मधले पण गुण ही आहेत, मग हिमेश ने थोडा अजुन मिडिया साठी तडका दिला तर मला काही चूक वाटत नाहीये !
आस्मा सारख्या मूर्ख मुलीचा बोलबाला करण्या पेक्षा हिमेश जे करतोय त्याने वैशाली सलग दोन दा टॉपर झाली, न्युज मधे आली, हे सुध्दा महत्त्वाच च आहे सध्या !

नाही तर मितिका, नैना, कौशिक कधी एलिमिनेट झाले कळलेही नाही !
आणि हिमेश नी अभिजीत सावन्त, अमित साना, विनित, हिमानी यांना दिलं काम, अता फेमस झाली नाहीत हा भाग वेगळा !:)

XXला हिमेशने एलिमिनेशन कशाला रद्द करायला लावलं? Angry
याशिता अशक्य टुकार गायली, जगजीतने तिचा किमान शब्दात कमाल अपमान करत शक्यतो पुन्हा गाण्याचा प्रयत्न करू नकोस असंच थोडक्यात सांगितलं. आता त्या माठीच्या डोक्यात कितपत प्रकाश पडलाय देव जाणे. शास्त्रिय संगितात तिला शून्य मार्क आहेत.

वैशाली जरी डिझर्व्हींग असली तरी हिमेश जरा अतीच करतोय. शनीवारच्या एपिसोडमध्ये वैशाली एकदम इनसिक्यूअर वाटली हिमेशच्या वागण्यामुळे.

हिमेशने कुणाला चान्स दिला नाही दिला ह्यापेक्षा शो मध्ये तो ज्या तावातावाने बाता मारतो त्या डोक्यात जातात माझ्या.
हो दक्षिणा सगळा बालिशपणाच चालू होता शनिवारच्या एपिसोडमध्ये.

वैशालीच्या बाबतीत अगदीच काही अनएक्सपेक्टेड घडलं तर त्याची सर्व जबाबदारी निव्वळ हिमेशवर राहील. त्याच्या ऍग्रेशन वर थोडं काम केलं पाहीजे त्याने.

वैशालीचे "जिय ले गयो" चा व्हिडीओ कुठे आहे का?

मनःपुर्वक आभार दिपांजली. सही गायली आहे. वैशली नेहमीच लताच्या गाण्याना टच करते. बाकी कोणी सहसा त्यावाटेला जात नाहीत. नविन म्हणताना देखील तिने "जिया जले" निवडले होते.

एक अंदाजः चॅम्पियन मात्र याशिता होणार. वैशाली is too good परत उत्तम क्लासिकल बेस आहे. त्यामुळे even though she deserves; ती common singers मधे मोडत नसल्याने तिला चान्स कमी आहे. आणि या पुर्वी बरेच पुरुष गायक ही स्पर्धा जिकले आहेत. त्यामुळे शोमेनला चान्स कमीच आहे.

मला वाटत कि अत्ता पर्यंत लावले असतील रिझ्ल्ट्स व्होटिंग प्रमाणे पण मेगा विनर जो/जी असेल ती कधीच ठरवली /ठरवला असणार झी ने!!
कोण जिंकेल ते झी च्या काय प्रॉयॉरिटिज आहेत त्यावर अवलंबून आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे प्लस, मायनस पॉइंट्स आहेत झी च्या फायद्याच्या दृष्टीनी.
माझा अंदाजः

शौमेन :
बंगाल च्या लोकांना पुन्हा एकदा खुश ठेवण्या साठी, बाकी काही प्लस पॉइंट्स मला तरी दिसत नाहीयेत शौमेन कडे, जिंकण्याचे चान्सेस सर्वात कमी !!
प्लस पॉइंट्सः बंगाल व्होट बँक
निगेटिवः बाकी सगळे, सर्वात मोठा पॉइंटः गेल्या झी बंगाली चा रिजनल विनर जिंकला, या वेळी कदाचित पुन्हा एकदा रेजनल विनर आणि मुलगा जिंकायला नको असेल झी ला. !

याशिता:
बरेचदा वाटतं कि याशिताला विनर बनवायच कधीच ठरलय, जेंव्हा सर्वात प्रथम संगीत चक्र याशिताला मिळालं तेंव्हा ती म्हंटली होती कि " फिनाले मे भी ये मेरे पास हि आयेगा"..
प्लस पॉइंट्सः
झी च्या दृष्टिने सर्वात फायद्याची कारण भरपूर शो ऑफ करते, बोल्ड आहे, शिवाय वर्ल्ड टुर च्या दृष्टिने वैशाली पेक्षा जास्त फायद्याची !
गेल्या रिजनल विनर जिंकला, या वेळी कदाचित पुन्हा एकदा रेजनल विनर नको असेल झी ला, त्यामुळॅ शौमेन्-वैशाली पेक्षा जिंकण्याचे चान्सेस सर्वात जास्त याशिताचे!
निगेटिव पॉइंट्सः
ओव्हर कॉन्फिडन्स , फक्त आयटेम साँग्ज सोडून बाकी काही गाता येत नाही..आणि प्रीतम चक्रवर्ती, तिचा मेंटर काही फारसा स्वतः च अस्तित्व दाखवत नाही शो मधे.


वैशाली:
जेंव्हा वैशालीची पहिल्यांदा एंट्री झाली तेंव्हा सर्व प्रथम हिमेश नी प्रेडिक्शन करायला सुरवात केली कि या वेळी मुलगीच जिंकणार आणि हे पण कि या वेळी आम्हाला परफेक्ट प्ले बॅक व्हॉइस हवाय, सिंगिंग्-पेर्फॉर्मिंग एकत्र सापडणं अवघड आहे , गील दोन सिझन पण आम्ही ते काँबिनेशन शोधु शकलो नाही, म्हणून या वर्षी फक्त प्ले बॅक व्हॉइस ला महत्त्व..
तेंव्हा च बहुदा झी ने फायनलिस्ट म्हणून वैशाली असणार ठरवलं असणार !
जिंकण्याचे चान्सेस यशिता नंतर नक्कीच वैशालीचे !
प्लस पॉइंट्सः
बेस्ट सिंगर, व्हर्साटाइल, हिमेश ने सांगितलेल्या विनर च्या सगळ्या क्वालिटिज मधे फिट बसणारी, शिवाय आदर्श भारतीय नारी इमेज जी हिमेश ने हजार वेळा हायलाइट केलीये, जर महाराष्ट्राचे जे राजकीय नेते वैशालीच्या फेवर मधे बोलले त्यांनी काही मनावर घेतल तर तो पण स्ट्राँग पॉइंट आणि झी चा लाडका हिमेश रेशामिया हा तिचा मेंटर.. मोठा प्लस पॉइंट!
आणि सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे झी च्या टी आर पी वाढवण्याच्या दृष्टिनी वैशाली आणि हिमेश दोन लोक भरपूर फायद्याचे ठरले झी ला, आस्मा नंतर सर्वात जास्त चर्चा या शो ची झाली ते गेले २-३ आठवडे हिमेश्-वैशाली ची आणि व्होट्स पेक्षा झी साठी महत्त्वाच आहे ते मिडिया अटेन्शन( पॉझिटिव किंवा निगेटिव कुठलीही चर्चा चालते चॅनल ला, मेन पॉइंट, त्यांचा शो चर्चे मधे रहायला हवा), टी आर पी!
निगेटिव्ह पॉइंट्सः
मॅरिड असल्यामुळे किंवा ४ महिन्याची मुलगी असल्यामुळॅ झी च्या दृष्टिने वर्ल्ड टुर साठी फार फायद्याची नाही, शिवाय याशिता सारखा शो ऑफ , बोल्ड वागत नाही.
गेल्या रिजनल विनर जिंकला, या वेळी कदाचित पुन्हा एकदा रेजनल विनर नको असेल झी ला.

चांगला पॉईंट ऑफ व्ह्यु आहे डिजे. माझ्या मते शौमेन बाद झालाय. खरी कॉम्पिटिशन आहे ती वैशाली- याशितात.
गेल्या वेळच्या क्लासिकल राऊंडला याशिताचं बिंग फुटलेलं आहेच. या शुक्रवारी नी शनिवारी काय असणार आहे?

मला मात्र वाटतंय की वैशालीच जिंकेल. Happy

चाफ्या,
तेरे मुह मे घी शक्कार, रस मलाइ , शाही टुकडा किंवा जे काही गोड आवडतं ते !

सायो,
मला तर वाटत कि शौमेन च एलिमिनेट झाला असेल परवा पण एक मुलगा फायनल मधे हवा म्हणून ठेवले ३ फायनलिस्ट्स.
म्हणूनच आदेश -हिमेश खुन्नस वाढली असणार!:)

चाफ्याच्या तोंडात मोदक पडोत साजुक तुपासकट , असं म्हण डीजे!! Proud
आता २४ पर्यन्त काय करणार आहेत हे लोक? काहीच सेन्सेशनल नाही मग टीआरपी खाली जाईल की आता ?! Happy

या आठवड्यात बहुतेक याशिता-शौमेन्-वैशाली चे जे लाइव्ह पेर्फॉर्मन्सेस झाले ते दाखवतील.
मुंबाई मधे वैशाली आणि हिमेश एकत्र परफॉर्म करणारेत :), बहुतेक १७ ला आहे हा प्रोग्रॅम.
हिमेश च्या डिमांड नुसार वैशाली मुंगळा पण म्हणाणार आहे लाइव्ह प्रोग्रॅम मधे :).
याशिता, शौमेन चे ऑलरेडी झाले प्रोग्रॅम्स, याशिता चा दिल्ली ला झाला, तितेह तरुण, आणि आस्मा मॅडम पण होत्या.
शौमेन ला सपोर्ट करण्या साठी कलकत्त्याला ममता बॅनर्जी आली होती:(, आदेश ला ममता, मनेका गांधी दिसत नाहीत, फक्त वैशालीला सपोर्ट करणारे पॉलिटिकल लिडर्स दिसतात, डबल स्टँडर्ड्स !

Pages