सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेस्ट ऑफ लक वैशाली !!
जय माता दि लेट्स रॉक !!
f1.jpg

वैशाली जिंकेल अशी मला खात्री आहे..बेस्ट ऑफ लक वैशाली !!

डिजे,
वैशालीला बेस्ट ऑफ लक चा इमेल पाठवायचा आहे, कोणत्या इमेल आयडीवर पाठवू शकतो, सांगू शकशील का?

छान आहे लेख. सलाम तिच्या नी नवर्‍याच्या स्ट्रगलला.

बाप रे केवढया अवघड परिस्थितीतून आलेत हे दोघे! ते खारतळे गाव मला माहित आहे, इतके लहान दुष्काळी, अन दरिद्री गाव आहे की कल्पनाच येणार नाही तिथल्या लोकांच्या हलाखीची.

थँक्स झेलम, छान आहे लेख.

बेस्ट ऑफ लक वैशाली.
आज तिचा ठाण्यात लाईव कार्यक्रम आहे ना, कोण कोण जाणार आहे?

याशिताचा कार्यक्रम कसला रटाळ होता. सगळं फॉरवर्ड केलं मी! सुषमा स्वराज नि अलका याज्ञिक नक्की कशाला आल्या होत्या तिथे?

आणि फायनलला "चॅलेंज टू टेररिझम" अशी थीम केलीये! गेटवे ऑफ इंडियाहून दाखवणार आहेत!

मला हरप्रीत पुत्तर नेहेमी प्रमाणे आवडला:), झक्कास गायला ' ओय लकी लकी ओय'!

मी नुसता ऐकत होते, बघितला नाहीच. हरप्रितने गायलं का ते 'लकी ओय?' चांगलं गायला. एकंदरीतच रटाळ वाटत होता. वोटींग काउंटमध्ये अजूनतरी वैशाली आघाडीवर आहे. बघायचं काय होतंय ते..

वैशालीचा लाईव्ह परफॉर्मन्स कधी आहे? पुढच्या आठवड्यात का? मग फार उशीर नाही होणार का व्होट्स मिळवायला? काय Deeps, तुझ काय मत आहे ह्यावर?

आर्च,
तसा काही फार फरक पडणार नाही कारण फायनल मधे कोण जिंकणार आधीच ठरलेल असणार झी च Happy
या शुक्रवारचा एपिसोड मिस करु नका, वैशाली-हिमेश ची कॉनसर्ट एपिसोड आहे, राजा, अनिल कपुर, मौली, कुणाल गान्जावाला वैशालीला सपोर्ट करायला आले होते:).

उद्या फिनाले आहे. ९.३० सकाळी (EST)
विनर आधीच ठरलेला असणारे तेव्हा जे जे होईल ते ते (जमल्यास) पहावे!

हो हो! ऑल दी बेस्ट वैशाली! Happy

यावेळेस काही स्पॉईलर्स दे की DJ. Proud

उद्या टाकेल की चाफ्या, धीर धर जरा Proud

मी गेले दीड महिना सारेगम पाहिलेच नव्हते. काही ना काही कारणानी राहून गेले. पण शास्त्रीय गाण्यांवरचा भाग पाहिला. त्यात जे काही झाले त्या नंतर झी वाले कदाचीत याशिता ला जिंकवणार नाहीत असे वाटते. वैशाली चा विजय होवो!! शोमेन ला केवळ ठेवायचे म्हणुन ठेवले असे वाटते.. असो.. आज आहे ना अंतीम.. कळेलच..

हो खरी काँम्पिटिशन वैशाली नी याशिताच आहे माझ्या मते.

हिमेश घाबरलाय की काय गेटवे ला जायला? म्हणून घरी बसूनच सपोर्ट करायचं ठरवलंय त्याने वैशालीला? Wink

हिमेश रुसला की काय म्हणत होते तेवढ्यात आला!! हा काय स्टन्ट वाटते लेट एन्ट्री वगैरे!

अच्छा, आला का. चांगलंय. म्हणे प्रार्थना करायला गेला होता..... काय पण...

स्पॉयलर ऐकायचा असेल पहा तो बीबी ..
:):):):)

भिकार फिनाले कार्य़क्रम, छान शेवट!

फिनाले नेहमीच भिक्कार असतं.
असो, वैशालीचं अभिनंदन.

Pages