सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाहिर पाकिस्तान चा आहे हेच कारण, आस्मा काही पाकिस्तानी नाहीये.
शिव सेनेनी मधे अवाहन केलाय ना कि पाकि कलाकारांना गाउ देउ नका, गुलाम अलींचा दौरा पण रद्द झाला .
नक्की बातमी दिली नाही कारण काय पण बहुतेक पाकिस्तान नी पण त्याला न पाठवायचा निर्णय घेतलाय अस काही तरी वाचलं.आस्मा ला काही धोका नाही,उलट अता तिची टॉप ३ ची जागा फिक्स झाली, कारन एक इंटरनॅशनल गायल असणारच टॉप मधे हे नक्की होतं !
अता जाहिर नाही तर १००% आस्मा च, कारण तसाही हिमेश मुलींना सपोर्ट करतोय , आस्मा मुलगी आणि ओमानी दोन्ही, तेंव्हा तिची जागा नक्की:(:(!
असो, काही आशा ठेउ नका, आयडॉल पहायला सुरवात करा:).

च्याXXX ते दहशतवादी आले होते, त्यांच्या अंगावर या आस्माँ ला सोडायला हवं होतं. एका दगडात दोन पक्षी मारले गेले असते. Proud

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथले पोस्ट वाचून ज्या ज्या वेळी सारेगमा पाहयला बसलोय तेंव्हा मला कायम एकतर ती भयंकर आस्मा (पुण्यातल्या 'सुप्रसिद्ध' पेठेतुन आली आहे असं वाटतं!) किंवा तो धृतराष्ट्र हेच पहायला मिळतं,वैताग,वैताग. Sad
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

>>'सुप्रसिद्ध' पेठेतुन>> आगाऊ, अरे बाबा कशाला त्या 'सुप्रसिद्ध पेठे'चा अपमान करतोस? Proud

ह्या कार्यक्रमाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. राहिलेले भाग पाहण्यात काही अर्थ नाही.
पुढच्या आठवड्यात वैशाली किंवा याशिता जाईल बहुतेक.

त्या याशिताच्या आईने आमिर खान समोर बळंच येऊन काय विचित्र ड्रामा करायचा प्रयत्न केला ना? Uhoh मला वाटतं झी टिव्ही वाले मूर्ख प्रोड्युसर्स हे सगळं स्टेज करत असावेत. कायच्या काय!

वैशाली-देबोजित साहचं वर DJ नी दिलेलं ड्युएट मस्त झालं. देबोजित दत्ताचं "माँ" गाणं छान झालं. वैशाली, प्रतिभा आणि देबो सोडून बाकी सगळे ताबडतोब बाहेर काढून लवकर संपवा एकदाचा शो. बेक्कार होत चाललाय एकदम महागुरु म्हणाले तसा.

(यापेक्षा मराठी लिटल चँप्स सारेगमपचा दर्जा खरचंच खूप चांगला आहे. पण तरी तिथे तो अवधूत गुप्ते माझ्या डोक्यात प्रचंड जातोच. Angry असो.)

गुलाम अलींचा दौरा पण रद्द झाला >>> डिजे गुलाम अलिंना पाकनेच येउ दिले नाही. शिवसेनेचा काही संबंध नाही. त्याची लिंक मे आंतरराष्ट्रीय घडामोडी बाफ वर तेंव्हाच दिली होती. त्यांनीच फोन करुन हमे सियासती लोग रोक रहे है अशी बातमी भारतात सांगीतली.

राहिलेले भाग पाहण्यात काही अर्थ नाही. >> गुरु मी य आठवड्यांपुर्वीच पाहने सोडले. Happy

चाफ्या, खरे आहे. अत्यन्त सन्तापदायक ड्रामा चालू आहे आता. गाणे, कार्य्क्रमाचा दर्जा याबद्दल ची उरली सुरली चाड या लोकांनी पार घालवून टाकली. मी हल्ली अधून मधून बघते, तीही ठराविक लोकांची गाणी फक्त. आदित्य, आस्मा, उंट असले आचरत चाळे आता सहन करणे अशक्य झालेत!! Sad

मी ही. पूर्वीसारखं आता आवर्जून बघावासा वाटत नाही. गाण्याच्या टॅलंटपेक्षा बाकीच्या गोष्टींना जर जास्त महत्व आहे तर मग तमाशाच करा ना चालू. सारेगमप नाव कशाला?

..

या आठवड्यात आचरटपणाला नुस्ता ऊत आला होता! हॉरर शो हा त्यावर कळस!!
या आठवड्यातली वैशालीची सगळी गाणी सर्वांपेक्षा छान झाली.एवढं होऊनही जर पुढच्या वेळी ते बाहेर गेली तर धन्य म्हणावं लागेल या लोकांना!!

शौमेनचे उच्चार मला अजूनही खटकतात. Sad देबो ऐवजी खरंच शौमेन जायला हवा होता.
जय मातादी लेट्स रॉक!

देबो काय अन सौमेन काय दोघेही तसलेच, खूप अशुद्ध उच्चार करतात दोघेही. वोट्स मागताना पण आप मुझे 'भोट' देन्गे ना असं म्हणतो सौमेन!! Happy

पण काही असो, देबोजीत च्या गाण्या पुढे त्याचे उच्चार, ड्रामा सगळं माफ त्याला, छान गायचा..
जहिर पण मुलां मधे स्ट्राँग होता, ड्रामा न करता चांगला गायचा पण त्याला घालवल ते बरोबर च केलं..एक तरी उत्तम काम केलं झी ने आणि प्रेक्षकांनी :)!

काल फालतु ड्रामा भरपूर होता , पण शंकर च्या वेडेपणा च मला खरच खूप हसु येत होतं !:)

इम्रान हाश्मी आला होता तो एपिसोड नॉनसेन्स होता... सारेगम चा दर्जा इतका खालावेल असा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.... आणि त्या आस्माँ ला इतकं फुटेज द्यायची झी ला काय गरज पडलेय? झाली ना आऊट? जा की म्हणावं उंटाला डंडा मारायला... इथे राहून आमचं डोकं कशाला पिकवतेय Sad

बरी वाचले त्या हॉरर एपिसोडमधून.
मलाबर्‍याचदा वैशालीपेक्षा प्रतिभाच्या गाण्यांचा चॉईस जास्त चांगला वाटतो.

पण प्रतिभा या आठवड्यात अगदीच फ्लॉप गायली, आणि चॉइस पण.. वोह लम्हे गाणं मुली च्या अवाजाला तर अजिबत सुट नाहीये !
फक्त गेल्या आठवड्याच्या परर्फॉर्मन्स वर पाहिल् तर प्रतिभा च जायला हवी मग.. याशिता मला आवडत नाही मुळीच पण प्रतिभा पेक्शा सगळेच चांगले गायले !

सायो,
स्पॉयलर पहा, अत्ताच मिळाले !

वैशाली चा अजुन एक रॉकिंग Performance !!
हिमेश फायनली वैशाली ला घेउन योग्य ट्रॅक वर अलाय्..जय माता दि, जय हिमेश :).
हा व्हिडीओ पहा आणि हिमेश वैशाली बद्दल चॅलेंज देताना याशिता चा चेहरा पहा कसा झाला!!
Go vaishali.. chak de !!
[video:http://www.youtube.com/watch?v=BXMJl13C_jc&eurl=http://www.orkut.com/Fav...

स्पोयलर कसे बघायचे? आणि कसे लिहायचे? Happy

ह्म्म, पाहिले याशिताच्या चेहर्‍यावरचे हावभाव.
मग दिपाली, तुझं काय मत? कोण दोघं जातील फिनालेला? सौमेन-याशिता/ याशिता-वैशाली की वैशाली-सौमेन?

वैशाली नक्की असेल , दुसर कोण .. Who cares :)!

माझ्या मते वैशाली आणि याशिता जातील फायनलला...
खुद्द सौमेनला पण आश्चर्य वाटत असेल की आपण अजूनपर्यंत इथे टिकलो कसं काय म्हणून.. Lol
त्यामूळे पुढच्या वेळी तो आऊट होणार हे नक्की..

आणि जर का याशिता आऊट झाली तर तो एक सुखद धक्का असेल....

आणि वैशाली आउट झालि तर??
_________________________
-Impossible is often untried.

खूप वाईट वाटेल. पण तशी शक्यता कमी वाटतेय.

Pages