सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन वैशाली...

हिमेसभाय परत टोपी घालून...?
केस कापले की काय...?
_______
एकदम झकास !

शेवटचे सहीये डिजे. Happy

वैशाली 'first woman winner' कशी काय? ह्या अगोदर एकही मुलगी नाही जिंकली? मला नक्की आठवत नाही पण मला वाटले संजिवनी भेलांदे , बेला शेंडे, श्रेया घोशाल ह्यांनी पण विजेतेपद मिळवले होते.

च्च महागुरू सारेगम नै कै . सारेगम बद्दल म्हणतेय ती. संगीत का विश्व युद्ध! ते कुठे जिंकलय कुठल्या मुलीने Happy
बाकी कस्काय! LTNS !

ओह ..म्हणजे इथे आपण फक्त हिमेस पर्वाबद्दल बोलतोय होय.
पण सारेगमप हे सारेगमचेच नामकरण आहे ना? पुर्वी विश्वयुद्ध आयोजित करायला आस्मा आणि मौली सापडल्या नसाव्यात. Happy

असो, ती(वैशाली माडे) मराठी सिनेमात गाणे म्हणते आहे असे कळाले.

बाकी कस्काय! LTNS ! >> असतो इथेच ..पण जास्ती संचार उदगीर आणि बे एरीयावर असतो.

हो मग काय, हिमेस, आस्मा, मौली, पाक, ओमान, समस इतकं सगळं सामावलं आहे त्या 'प' मधे Happy

महागुरु,
सारेगमप चॅलेंज विश्वयुध्द ची पहिली विनर रे Happy
वैशाली मराठी मधे निलेश मोहरिर या संगीतकारां कडे ऑलरेडी २ गाणी गायली आहे, झी मराठीच्या 'कुलवधु' चे टायटल ट्रॅ़क पण गायली आहे , सिरीयल माहित नाही पण टायटल ट्रॅक चांगलच गाजलय..आणि हींदी मधे पण एका मोठ्या बॅनर साठी विद्या बालन ला प्ले बॅक देत आही, बाकी डिटेल्स टू अर्ली टू से:).

बाकी त्या आस्माला पाहिलं की मला केली पिकलर आठवते! अमेरिकन आयडॉल पाहणार्‍यांना माहिती असेल केली पिकलर. त्यामुळे यापुढेही आस्माला स्क्रीन प्रेझेंस मिळाले तर नवल वाटायला नको. Happy

चार एक वर्षापूर्वी होती ना रे आयडॉलमध्ये?मला आठवतेय.

वैशालीच अभिनन्दन.
केलि २००६ मधे होती वाटते. तुम्ही आय्डॉल पाहाता का?

मला तर आस्मा ला पाहून फक्त संजया मालाकर च आठवतो, अता मी समजु शकते कि बेसुर बेताल परदेशी ओरिजिन चा माणुस फक्त कार्टुन सारखा वागून इतका पुढे जाताना पाहून अमेरिकन पब्लिक ला किती राग येत असेल Biggrin

बाकी चाफ्या तू म्हंटलास ते खर आहे, आस्मा दर्शन भरपूर होणार नक्कीच, लिट्ल चॅम्प्स, एक से बढकर एक, पुढच्या सारेगमप मधे सगळी कडे बोलावणर हिला होस्ट म्हणून !

मित्रहो, वैशाली आणि हिमेसभाय चा शो मला कुठे पाहायला मिळेल, ते कुणी सांगु शकेल का?

LOL
मी ते वरचं सुरण की कली असं वाचलं Happy

हे पहा,
पूनम यादव बद्दल शॉकिंग अर्टिकलः
इस्माइल दरबार शी अफेअर आणि सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अ‍ॅबॉर्शन मुळे पूनम यादव चा आत्महत्येचा प्रयत्नः
http://www.mumbaimirror.com/index.aspx?page=article&sectid=30&contentid=...

बाप रे! Sad
इस्माईल दरबार शी अफेअर ? ईऊ Uhoh

अरेरे !!!
छान गायिका आहे ती Sad

गायिका छान असून काय उपयोग? पुढे जायची घाईच नडली असावी तिला. नाहीतर तिच्या वयाची त्या इस्माईलची मुलगी आहे. स्वतःच सगळं सोडून काय तो पूनमच्या मागे येणार होता? कायतरीच.

प्रसिद्धी साठी लोक हल्ली कुठल्याही थराला जाउ शकतात... पण जर हे खरे असेल तर खचितच धक्कादायक बातमी Sad

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

Pages