पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

मौनात माझ्या सापडतील तुला
शब्दांची..आठवांची काही हळुवार पावलं...
आणि माझे अस्फुटसे हुंकार....

पिलु, तुला एक दाद म्हणुन

शब्दांचा बाजार पाहीलेला,
तुला म्हणुन खुप काही होते खरेदीला...
पण माझ्यात कुवत फक्त मौनाची !

चारोळ्या सुचाव्या म्हणुन
एकांती जावुन बसले
डु नॉट डिस्टर्ब बघुन
शब्दही खुदकन हसले Happy

कुंडीतल्या फुलांना नेहमीच,
रानफुलांचा हेवा वाटतो,
लिमिटेड एडिशनपेक्षा,
अनलिमिटेडचा आनंद मोजकाच असतो..

अगं तुही ये ना.....>>>>> पिलु, यावरुन एक काहीच्या काही चारोळी (काकाचा) सुचलीये

आमंत्रण द्यायला
हा काय खेळ आहे
चारोळी रचायला
इथे कुणाला वेळ आहे Happy

तुझ्या आठवणीची एक सर मला
वेडेपिसे करून जाते
अन साठलेल्या भावनांचा
बांध तोडून जाते...

Pages