Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोडं ८. संजीवकपूरचं लग्न झालं
कोडं ८. संजीवकपूरचं लग्न झालं पण दुर्दैवानं बायकोला साधा चहासुद्धा करता येत नव्हता. संजीवकपुर बिचारा घरातलं सगळं जेवण बिवण करून कामालाही जायचा. एकदा खुपच घाई झाली म्हणून त्याने बायकोला काही बनवायला सांगितले. तर तिनं त्याला टोमणा मारला. कसा
गैरों पे करम, अपनों पे सितम?
व्वा व्वा व्वा ..... क्या बात
व्वा व्वा व्वा ..... क्या बात है !!!
दुसरा धागा सुरू होऊन सेंच्युरीच्या मार्गावर !!!
मामी आणि सर्व सक्रीय मित्रांचं अभिनंदन !!!!
--------------------------------------------------------------------------
मामी एक विनंती आहे .....
जुन्या धाग्याच्या अखेरीस
"धागा क्र. २ सुरू केला आहे..... "
अशा आशयाची सूचना देऊन या धाग्याची तिथे लिंक द्यावी.
कोडं ८. संजीवकपूरचं लग्न झालं
कोडं ८. संजीवकपूरचं लग्न झालं पण दुर्दैवानं बायकोला साधा चहासुद्धा करता येत नव्हता. संजीवकपुर बिचारा घरातलं सगळं जेवण बिवण करून कामालाही जायचा. एकदा खुपच घाई झाली म्हणून त्याने बायकोला काही बनवायला सांगितले. तर तिनं त्याला टोमणा मारला. कसा?
>>>उत्तर :
दफ्तर को देर हो गयी, तुम जल्दी से कॉफी बनाना
बिवी हुं मै, बावर्ची नही, मुझे आता नही कॉफी बनाना
हे आद्य जंपिंग जॅक जितेंद्र (यापुढे याचा उल्लेख जंजॅजि असा करण्याचे करावे.) आणि कायमचा लहान मुलीचा आवाज लाभलेली श्रीदेवी यांचे गाणे आहे.
उल्हास भिडे, छान सुचना.
उल्हास भिडे, छान सुचना. धन्यवाद.
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आताच हाती आलेल्या बातमीनुसार, अॅडमीनने पहिला भाग बंद केला आहे. आता मी त्यावर प्रतिसाद देऊन दुसर्या भागाची लिंक देऊ शकत नाही. माझा प्रतिसादही संपादन करू शकत नाही. त्यामुळे दुसर्या भागाची लिंक इंड्रोडक्शन मध्ये दिली आहे.
कोडं क्र. १२ हे गाणे ओळखा
कोडं क्र. १२
हे गाणे ओळखा
मस्ती नजर में कल के खुमार की मुखडे पे लाली है पिया तेरे प्यार की
जिप्सी हा प्रश्न आहे की
जिप्सी हा प्रश्न आहे की उत्तर? आणि निळा चेहरा का?
प्रश्नच आहे निळ्या
प्रश्नच आहे
निळ्या चेहर्याचे उत्तर नंतर सांगतो. 
आँखोमे मस्ती शराब कि और
आँखोमे मस्ती शराब कि
और होठोंपे लाली गुलाब की
ये आयी कहासे झुंमके
मेरे आँगनमे पंखुडी गुलाब कि
असे तलतचे सुंदर गाणे आहे. हे असू शकेल काय उत्तर ?
नाही, दिनेशदा, (उत्तर
नाही, दिनेशदा,
(उत्तर सांगितल्यावर प्लीज कुणी मारू नका :().
कोडे क्रमांक १३. आपल्या
कोडे क्रमांक १३.
आपल्या बॉलिवुडच्या हिरोंना वाटते कि ते हॉलिवूडच्या स्टार्स मधे पण लोकप्रिय आहेत. तर अनिल कपूर, स्लमडॉगच्या वेळी फार आशा लावून बसला होता. ते अवार्ड आपल्याला मिळावे, यासाठी फार आशा लावून बसला होता. निदान स्टेजवरती तरी जायला मिळावी.... तर तो मनात कुठले गाणे म्हणाला असेल ?
दिल है छोटासा, छोटीसी
दिल है छोटासा, छोटीसी आशा
मस्ती भरे मन कि.....
चांद तारोंको छुनेकी आशा
दिल है छोटासा, छोटीसी
दिल है छोटासा, छोटीसी आशा
मस्ती भरे मन कि.....
चांद तारोंको छुनेकी आशा
अंजली, माझ्या मनातल्या
अंजली, माझ्या मनातल्या गाण्यापेक्षा हे जास्त जूळतेय.
माझ्या मनात होते, तेरी मेहफिल मे किस्मत आजमाकर हम भी देखेंगे.
पण तरी.. अँड द ऑस्कर गोज टू.... अंजली _ १२
चला मीच उत्तर देतो कोडं क्र.
चला मीच उत्तर देतो
कोडं क्र. १२
हे गाणे ओळखा
मस्ती नजर में कल के खुमार की मुखडे पे लाली है पिया तेरे प्यार की >>>>>
मेरे जीवन साथी कली थी मै तो प्यासी
तुने देखा हुई खिलके बहार
मस्ती नजर में कल के खुमार की मुखडे पे लाली है पिया तेरे प्यार की
खुशबू को तेरे तन में बसा के लहराऊ डाली सी तेरे गुलजार की
मेरे जीवन साथी .......
(आज ऑफिसात चिक्कार काम होते त्यामुळे या बाफवर जास्त वेळ येता नाही आले. कामामुळे कोडं सुचतच नव्हतं. पण आज नवीन बाफवर "कोडं" टाकायचेच होते, म्हणुन सकाळी जे गाणं गुणगुणत होतो त्याच गाण्याचा अंतरा कोडं म्हणुन टाकला :फिदी:.
वरती मी लिहिले होते "हे गाणे ओळखा" (ते अंतर्यावरून ओळखायचे होते. :-))
भरत, या पीजे साठी ती निळी स्मायली टाकली होती.
क्षमस्व
आधी मनात कोण होती ते सांग,
आधी मनात कोण होती ते सांग, तरच क्षमा करु.... नाहीतर !!
कोडे क्र. १४ : एक गोरापान
कोडे क्र. १४ :
एक गोरापान दहशतवादी नाव बदलून (श्री शर्मा) अमेरीकेत पोचतो. पण विमानतळावर उतरल्यावर सिक्युरीटीच्या वेळी तो आपली अंगतपासणी करून देण्यास तयार होत नाही. तिथल्या सिक्युरीटीला त्याचा डाउट येतो. म्हणून तो त्याला बाजू घेऊन व्यवस्थित चाचपून तपासणी करायचं ठरवतो. तर तो सिक्युरिटी दहशतवाद्याला खडसावून कोणतं गाणं म्हणेल?
आधी मनात कोण होती ते
आधी मनात कोण होती ते सांग>>>>>>>>ऑफिसातले काम काम आणि फक्त काम
आधी मनात कोण होती ते सांग,
आधी मनात कोण होती ते सांग, तरच क्षमा करु.... नाहीतर !!
बरोबर पकडलयत जिप्सीला दिनेशदा. माझ्या एका कोड्यानंतर प्रेमाची गुरुकिल्ली बनवणारा चावीवाला कुठे मिळेल असंही विचारत होता. जिप्सी, मामला गडबड है! 
>>>
मामी मला या शर्मा वरुन एक
मामी मला या शर्मा वरुन एक गाणे आठवले...
शर्मा ना छोड डाल, आजुबाजु मत देख आय लव्ह यु बोल डाल.. डोळ्या समोर ते चित्र आणुन बघा..शर्मा ला तो सिक्युरिटी वाला 'दोस्ताना स्टाईल' हे गाणे बोलला तर तो शर्मा बेशुद्ध पडेल..
राम ... हे राम! हरे राम!! राम
राम ... हे राम! हरे राम!! राम नाम सत्य है!!!
राम, मामी >>>>>
राम, मामी >>>>>:हहगलो:
मामी, आता उत्तर देऊच नकोस.
मामी, आता उत्तर देऊच नकोस. हेच उत्तर समज.
सुबह और शाम, काम हि काम
क्यू नही लेते पिया, प्यार का नाम
कामसे जिसको मिले ना छुट्टी
ऐसे सजनासे मेरी बुट्टी बुट्टी बुट्टी
कोण कोणास म्हणाले ?
उलझन / लता / सुलक्षणा पंडीत संजीव कुमारला म्हणाली !
१५ : इतरांच्या विबासंच्या
१५ : इतरांच्या विबासंच्या सुरस चमत्कारिक कथा ऐकून मामीना एकदम न्यूनगंड आअला. मेल्याहून मेल्यासारखे वाटू लागले. मन तळमळू लागले. छातीत धडधड व असह्य वेदना जाणवू लागली. यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे, असं आपल्या यजमानांना त्या गाण्यातून कसं सांगतील?
ऐसे सजनासे मेरी बुट्टी बुट्टी
ऐसे सजनासे मेरी बुट्टी बुट्टी बुट्टी
>>>> कुट्टी कुट्टी कुट्टी आहे. कट्टीचं हिंदीकरण.
मला या गाण्यात जया आहे असं वाटलेलं.
जयाचं पण आहे असंच गाणं कोरा
जयाचं पण आहे असंच गाणं कोरा कागज मधलं :
रूठे रूठे पिया मनाऊं कैसे
क्या इतनी हंसी हैं किताबें पिया प्यार से जिनको थामें
मैं नैन मिलाना चाहूं पर नैन मिला ना पाऊं
सौतन चश्मा बीच में आए नैन मिले कैसे
आधी मनात कोण होती ते सांग,
आधी मनात कोण होती ते सांग, तरच क्षमा करु.... नाहीतर !!
>>> बरोबर पकडलयत जिप्सीला दिनेशदा. >>>>>>दिनेशदा, मामी, काश ते माझ्या कोड्यातलं गाणं माझ्यासाठीच कुणी गायलं असतं तर.....
माझं गाणं ओळखता येतय का नाही?
माझं गाणं ओळखता येतय का नाही? उत्तर सांगू? सांगू?
मामी.... दहशतवादी
मामी....
दहशतवादी श्री.शर्माला पाहून सिक्युरिटीवाला हे गाणे म्हणेल ???
"शर्मा"ओ ना, घबराओ ना...
तुम्हे ही ढूंढे मेरे नैना, है ये है ये दीवानापन, मस्ती में झूमे मेरा बदन..."
~ लोक्स....सॉरी, मी दिवसभर प्रवासात (अन्य मित्रांसमवेत) असल्याने ना मिस लॅपटॉप ना मिस पीसी यांच्या सहवासात राहिलो. शिवाय क्वॉलिसनेही पावसात काही काळ दगा दिल्याने तिची नाराजी दूर करण्यात तीनचार तास गेले. त्यामुळे इथे धागा क्रमांक २ किती वेगाने धावला हे पाहता आले नाही. मात्र जाणीव होत होती की दुसर्या धाग्यावरही पाऊस पडत असणारच....आणि तो आत्ताच वाचून पूर्ण झाला....मज्ज्जाच मज्जा आली.
आता भारतीय प्रमाणवेळेनुसार जवळपास मध्यरात्र होत आली असल्याने बहुतांशी सदस्य आपापल्या दुलया घेऊन निद्रादेवीची आराधना करीत असणारच. तरीही सकाळच्या नाष्ट्यासोबत डोके खाजविण्यासाठी एक कोडे :
कोडे क्रमांक १६ :
जॉन केनेडीनी जरी जॅकेलिनबरोबर लग्न केले असले तरी मेरिलिन मॅन्रो त्याना विसरू शकत नसे. एकदा जॅकेलिन नसताना पार्टीच्यावेळी केनेडी आल्याचे मेरिलीनने पाहिले. त्यावेळी ती त्याना उद्देश्यून कोणते हिंदी गाणे म्हणेल ?
(या गाण्यातील कडवे फार अपीलिंग आहे....ही एक क्ल्यू समजा)
दिनेशदा... जॉन केनेडीनी जरी
दिनेशदा...
जॉन केनेडीनी जरी जॅकेलिनबरोबर लग्न केले असले तरी मेरिलिन मॅन्रो त्याना विसरू शकत नसे. एकदा जॅकेलिन नसताना पार्टीच्यावेळी केनेडी आल्याचे मेरिलीनने पाहिले. त्यावेळी ती त्याना उद्देश्यून कोणते हिंदी गाणे म्हणेल ?
आईये मेहेरबां...बैठीये जाने जां .... हे नसेलच कारण आधीच येऊन गेलंय ना? पण या सिच्युएशन ला हेच आठवलं एक्दम !
Pages