..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरतचा नाही पण माझा क्लू:
कोडे ४: संजीवकपूर प्रेमात पडला तेंव्हा कुठले गाणे म्हणायचा?
संजीवकपूर खानापुजारी आहे

कोडं ७ : वामन हरी पेठे(किंवा त्यांच्या गादीवर बसणारे सध्याचे मालक) प्रेयसीची तारीफ कशी करतील?
क्लु : प्रेमाच्या जगप्रसिद्ध प्रतीकाशी या गाण्याचा संबंध आहे.

मामी
प्रचंड धक्का!!!!
तेरे लिये चांदीका पिंजरा बनाउंगा

तुला हे गाण कस माहीत? मी हा चित्रपट पाहीलाय लहानपणी तेव्हा (आणि अजुनही) चित्रपटाच्या नावाखाली काहीही चालायच.
हे गाण रती अग्निहोत्री आणि भिष्म पितामह शक्तीमान (नाव नाही आठवत आता)वर चित्रीत आहे. वक्त के शहजादे. यात पराशरबाई हिरो आहेत रतीचे खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!

चाँदी का बदन सोने की नजर
उस पर ये नजाकत क्या कहिये
एजी क्या कहिये
किस किस पे तुम्हारे जल्वों ने
तोडी है कयामत क्या कहिये
एजी क्या कहिये
चाँदी का बदन सोने की नजर

कोडं ७ : वामन हरी पेठे(किंवा त्यांच्या गादीवर बसणारे सध्याचे मालक) प्रेयसीची तारीफ कशी करतील?

चांदी का बदन सोने की नजर
ताजमहल मधल गाण

मी आर्या आनि माधव बरोबर.
कोडं ७ : वामन हरी पेठे(किंवा त्यांच्या गादीवर बसणारे सध्याचे मालक) प्रेयसीची तारीफ कशी करतील?
चाँदी का बदन सोने की नजर उस पर ये नजाकत क्या कहिये
किस किस पे तुम्हारे जल्वों ने तोडी है कयामत क्या कहिये

चित्रपट : ताजमहाल साहिर- रोशन- मन्ना-रफी-आशा------मीना कपूर(?)

कोडं ९ : न. (कै. च्या चालीवर वाचावे) विरप्पन त्याच्या प्रेयसीची तारीफ कशी करत असे?>>>>
चंदन सा बदन???

कोडं ८. संजीवकपूरचं लग्न झालं पण दुर्दैवानं बायकोला साधा चहासुद्धा करता येत नव्हता. संजीवकपुर बिचारा घरातलं सगळं जेवण बिवण करून कामालाही जायचा. एकदा खुपच घाई झाली म्हणून त्याने बायकोला काही बनवायला सांगितले. तर तिनं त्याला टोमणा मारला. कसा?

हे सोडवा ना.

स्वप्ना, कोड्यांना नंबर देण्याची आयडिया भारीये. खुपच सोपं पडतय. धन्स.

>>स्वप्ना, कोड्यांना नंबर देण्याची आयडिया भारीये. खुपच सोपं पडतय. धन्स.

मामी, धन्स काय त्यात?

माधव, तुम्हाला 'आर्या' म्हणायचंय का?

कोडं १०
प्रतीक पूर्ण मंगळवार बीबीकडे फिरकला नाही म्हणून बुधवारी त्याची सगळ्यांनी हजेरी घेतली. तर तो म्हणतो कसा 'मी आलो नाही असं नाहिये काही. मी उशिरा आलो. तोपर्यंत तुम्ही सगळे निघून गेला होतात".
"हो का?मग उशीरा का आलास ते सांग" सगळे ओरडले.
बिच्चार्‍या प्रतीकने काय बरं कारण दिलं असेल?

सोप्पं आहे हे पण.

कधी वाचून होणार माझे है ?
त्या ताजमहाल मधल्या कव्वालीतले सगळेच शेर छान आहेत. मिनु मुमताज आहे, पण बाकीचे कलाकार ओळखता येत नाहीत.

ते हीना मधलं गाणं का? मैं देर करता नही देर हो जाती है
माधवनी आवडती विद्यार्थिनी आर्याना म्हटलंय की जिप्सीला? जिप्सी विद्यार्थी आहे Happy

कोडं ११: जानकीबाईंच्या मुलाचे नुकतेच लग्न झालेले असते. नविन सून गायिका असते. एकदा ऑफिसमधून जानकीबाई घरी फोन करतात. मोलकरीण फोन उचलते. सूनबाईं मिरेचे भजन म्हणत असतात. फोनवर ती प्रेमाची आळवणी ऐकताना जानकीबाई तल्लीन होतात. इतक्यात बॉस येतात पण जानकीबाईंचे त्यांच्याकडे लक्षच नसते. ते चिडून विचारतात की काय चाललय? जानकीबाई काय उत्तर देतील?

भरत बरोबर.

कोडं १०
प्रतीक पूर्ण मंगळवार बीबीकडे फिरकला नाही म्हणून बुधवारी त्याची सगळ्यांनी हजेरी घेतली. तर तो म्हणतो कसा 'मी आलो नाही असं नाहिये काही. मी उशिरा आलो. तोपर्यंत तुम्ही सगळे निघून गेला होतात".
"हो का?मग उशीरा का आलास ते सांग" सगळे ओरडले.
बिच्चार्‍या प्रतीकने काय बरं कारण दिलं असेल?

उत्तरः
सारे वादे इरादे बरसात आके धो जाती है
मै देर करता नही देर हो जाती है

हा गाण्याचा मुखडा नाही त्याबद्दल क्षमस्व. पण प्रतीकला काय शिक्षा करायची असं मामीने विचारलं होतं. ही शिक्षा माझ्याकडून Happy

कोडे ४: संजीवकपूर प्रेमात पडला तेंव्हा कुठले गाणे म्हणायचा?>>>>>
शोखियोंमे घोला जाए फुलो का शबाब???

कोडे ४: संजीवकपूर प्रेमात पडला तेंव्हा कुठले गाणे म्हणायचा?
उत्तरः शोखियोंमे घोला जाए फुलो का शबाब
उसमे फिर मिलाइ जाए थोडीसी शराब

Pages