..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रध्दा, आपका जवाब सही है Happy

कोडं १:
सुमित धावत धावत पोलिस स्टेशनमधे घुसतो. 'साहेब, साहेब, माझी मैत्रिण हरवली आहे. प्लीज तिला लवकर शोधा'.
ड्युटीवरचा इन्स्पेक्टर शांतपणे त्याच्याकडे बघतो 'काय नाव?'.
सुमित आपलं नाव सांगतो. 'अहो, तुमचं नाही हो, तुमच्या मैत्रिणीचं'
सुमित गोंधळतो. 'तिचं नाव कसं घेऊ साहेब?'.
'का? लाजताय काय? इथे काय उखाणा घ्यायला सांगितला मी?'
'नाही तसं नाही.....पण....'
'बरं, फोटो आणलाय का?'
'फोटो? नाही, तसाच निघालो घरातून...'
'काय राव तुम्ही? शिकले सवरलेले दिसता आणि मैत्रिणीचं नाव सांगायला तयार होत नाही. तिचा फोटो आणलेला नाही. आता निदान वर्णन तरी सांगता का?"

उत्तरः
आने से उसके आये बहार
जाने से उसके जाये बहार
बडी मस्तानी है, मेरी मेहबूबा
मेरी जिंदगानी है मेरी मेहबूबा..

(तो तिचं नाव का घेत नाही ह्याचं कारण गाण्यात आहे - सामने मैं सब के नाम उसका नही ले सकूंगा,
वो शरम के मारे रुठ जाए तो मैं क्या करुंगा)

कोडं ५:
करिश्मा कपूरला गंगर ऑप्टिशियनच्या दुकानाबाहेर पडताना पाहून बाहेर उभं असलेलं रोडरोमियोंचं टोळकं काय गाणं म्हणेल?

स्वप्ना कोडं ५:
गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा..
तौबा खुदा खैर करे... खूब है करिश्मा.. Happy

स्वप्ना, इतके सोपे कोडे देणे तुला शो ना हो. Happy

श्रध्दा, जिप्सी बरोबर.

>>स्वप्ना, इतके सोपे कोडे देणे तुला शो ना हो.

ये वॉर्मअप है जानी.....:-)

कोडं ५:
करिश्मा कपूरला गंगर ऑप्टिशियनच्या दुकानाबाहेर पडताना पाहून बाहेर उभं असलेलं रोडरोमियोंचं टोळकं काय गाणं म्हणेल?

उत्तरः
गोरे गोरे मुखडे पे काला काला काला चश्मा
तौबा खुदा खैर करे खुब है करीश्मा

कोडे ४: संजीवकपूर प्रेमात पडला तेंव्हा कुठले गाणे म्हणायचा?
>>>>
धीरे धीरे प्यार की जो आग जल गई
इतनी मस्ती दो दिलों मे भी उबल गई
इसका मजा चख तो लूं मै जरा,
फिर कहूंगा मै कि दाल गल गई..
वा जी वा.. वा जी वा.. वा जी वा वा वा..
डुप्लिकेट सिनेम्यात एक शाहरूख शेफच असतो, तो हे गाणं म्हणतो. पण तुमचं गाणं कदाचित हे नसणार. Happy

कोडं ६:
एक दिवस सलमानच्या आईने आमिर आणि शाहरूखला घरी बोलावलं. चहा वगैरे झाल्यावर तिने दोघांकडे विषय काढला तो सलमानच्या लग्नाचा. काहीही करा पण त्याला निकाहला तयार करा असा तिने धोशा लावला. वर 'माके प्यारका वास्ता' वगैरे फिल्मी ड्वायलॉग मारून त्यांना इमोशनली ब्लॅकमेलही केलं. बिच्चारे आमिर आणि शाहरूख! बाहेर पडून विचार करायला लागले. 'यार शहारूख, मुझे लगता है हमे सलमानसे पहले ये पुछ लेना चाहिए के उसे शादी करनेमे ऐतराज क्या है?' आमिर म्हणाला. 'हा भई, ये सही है. चलो'. आमिर आणि शाहरूख गेले जिममध्ये. सलमान वजनं उचलत बसला होता. त्यांनी जेव्हा त्याला त्याच्या अम्मीची इच्छा सांगितली तेव्हा सलमानने 'ये कतईही संभव नही' असा ड्वायलॉग मारला. 'लेकिन क्यो?' आमिर आणि शाहरूखने एकसाथ विचारलं. सल्लूबाबाने गाण्यात काय बरं कारण सांगितलं असेल?

क्लू - गाणं गोल्डन एरामधलं नाहिये आणि आत्ताच्या काळातलंही नाही. उत्तर कोड्यात दडलं आहे. ह्याव्यतिरिक्त क्लू मिळणार नाही Happy

स्वप्ना, जर या कोड्याचं उत्तर "सैय्या मगन पहलवानी में" टाईप्सच्या भोजपुरी सिनेमातलं असलं तर मला येणार नाहीच. Proud

क्ल्यु: भोजपुरी? ब्लॅकमेल? मां का समथिंग? ....... Uhoh

कोडे क्र. ६:
उत्तरः
१) जमाना तो है नौकर बिवी का

किंवा

२) दुनिया पागल है या फिर मैं दीवाना
मुझको चाहती है झुल्फो में उलझाना
दुनिया पागल है ...

ये बाहें जिनको तुम गले का हार समझे हो
गेसु कि जिनको तुम महकता प्यार समझे हो
हार है फन्दा, प्यार है खंजर
तुम हो निशाना
जियो मेरे शागिदर्
Thank You
दुनिया पागल है ...

आजादी है तो तुम हो शहजादे मेरे प्यारों
शादी हुई तो समझो भिखारी बन गये यारों
जो है अकेला, वो अलबेला
उसका जमाना

स्व्प्ना,
कोडं ६ - शायद मेरी शादी का खयाल दिलमे आया है इसीलिये मम्मीने मेरी तुम्हे चायपे बुलाया है ?

त्यात पुढे अशी काहीतरी ओळ आहे ना - प्यार तो ठीक है शादी से डरते है

कोडं ६:
एक दिवस सलमानच्या आईने आमिर आणि शाहरूखला घरी बोलावलं. चहा वगैरे झाल्यावर तिने दोघांकडे विषय काढला तो सलमानच्या लग्नाचा. काहीही करा पण त्याला निकाहला तयार करा असा तिने धोशा लावला. वर 'माके प्यारका वास्ता' वगैरे फिल्मी ड्वायलॉग मारून त्यांना इमोशनली ब्लॅकमेलही केलं. बिच्चारे आमिर आणि शाहरूख! बाहेर पडून विचार करायला लागले. 'यार शहारूख, मुझे लगता है हमे सलमानसे पहले ये पुछ लेना चाहिए के उसे शादी करनेमे ऐतराज क्या है?' आमिर म्हणाला. 'हा भई, ये सही है. चलो'. आमिर आणि शाहरूख गेले जिममध्ये. सलमान वजनं उचलत बसला होता. त्यांनी जेव्हा त्याला त्याच्या अम्मीची इच्छा सांगितली तेव्हा सलमानने 'ये कतईही संभव नही' असा ड्वायलॉग मारला. 'लेकिन क्यो?' आमिर आणि शाहरूखने एकसाथ विचारलं. सल्लूबाबाने गाण्यात काय बरं कारण सांगितलं असेल?

उत्तरः
हो नही सकता, हो नही सकता
किसीके इश्कमे खुदको मिटा दू, हो नही सकता
किसीकी यादमे निंदे उडा लू, हो नही सकता
मेरे ख्वाबोमे जो लडकी है सचमुच हो नही सकती

क्लू - ये कतईही संभव नही = हो नही सकता Proud

मामी, पण आता माहित झाली ना Happy सॉरी, उठाबश्या काढल्या मी इथे. आता ह्यापुढची कोडी जुन्या गाण्यांवर घालायचा यत्न करेन.

माझं कोड सोडवा -
कोडे ४: संजीवकपूर प्रेमात पडला तेंव्हा कुठले गाणे म्हणायचा?

मामी तुम्हाला माहिती आहे हे गाणं Happy

माधव यांचं संजीव कपूर प्रेमात पडला तर कोणतं गाणं म्हणेल हे पेंडिंग आहे ना ?
त्याला धरून माझं अगदी सोप्प कोडं.
कोडं ७ : वामन हरी पेठे(किंवा त्यांच्या गादीवर बसणारे सध्याचे मालक) प्रेयसीची तारीफ कशी करतील?

माधव, संजीव कपुर म्हणजे तो फेमस कुक ना??
जरुरत है जरुरत है जरुरत है एक कलावती की श्रीमती की सेवा करे जो पती की... हे आहे का??

राम ... Rofl

स्वप्ना. घाल ग सगळ्या प्रकारची गाणी. माहिती तरी होतील. कोडं ४ शोधते. तोवर ...

कोडं ८. संजीवकपूरचं लग्न झालं पण दुर्दैवानं बायकोला साधा चहासुद्धा करता येत नव्हता. संजीवकपुर बिचारा घरातलं सगळं जेवण बिवण करून कामालाही जायचा. एकदा खुपच घाई झाली म्हणून त्याने बायकोला काही बनवायला सांगितले. तर तिनं त्याला टोमणा मारला. कसा?

कोडं क्र. ७ चं उत्तर हे का भरतजी?

चांदी जैसा रंग है तेरा
सोने जैसे बाल
इक तु ही धनवान है गोरी
बाकी सब कंगाल

आर्या, मी पण हेच लिवणार होते.

किंवा कोडं क्र. ७ :

तेरे लिये चांदीका पिंजरा बनाउंगा
पिंजरे मे सोने का ताला लगाउंगा
ताले में हीरे की चाबी लगाउंगा, ताले में हीरे की चाबी लगाउंगा .......

Pages