बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिकडे मावे आहे का नी?
मिसळपाववर सानिकाने मस्त बेक्ड ब्रेडरोलची पाकृ दिली आहे. एकदम सही आहे ती.

रगडा पॅटीस,मिसळपाव,मटार करंजी,कॉर्न पॅटीस,छोले समोसा,आलू टिक्की छोले,खमंग सान्जा शेव खोबरे कोथिम्बीर घालून! हे सगळे आधी करून ठेवता येते! आयत्यावेळी गडबड होत नाही!

मी आजवर कधी इडल्या केल्या नाहीत. बाबांच्या मित्रांसमोर पचका नको ना?
माझ्या मित्रमैत्रिणींच्यात, नातेवाइकांच्यात, आईबाबांच्या जुन्या मित्रमंडळींच्यात मी नॉन-सुगरण म्हणून प्रसिद्ध असल्याने काही प्रॉब्लेम नाही. बाबांचे हे मित्रमंडळ नवीनच आहे. तिथे नको पोपट उगाच.
आप्पेपात्र नाहीये.
मावे आहे.

इडलीचा बेत पसंत असेल तर ग्राहक पेठेत तयार इडली पीठ मिळतं. ते वापरून कोणीही इडल्या करू शकतं. तू बरी आहेस तशी Proud Light 1

मिसळच्या जमातीतले काही किंवा आलू टिक्कीच्या जमातीतले काही करावे असा विचार करतेय.
बाबा आता म्हणतायत तळण नकोच.. साधी कांदेपोहे कर.. (माझ्यावर फारच विश्वास आहे त्यांचा! Wink )

बेक्ड ब्रेडरोल बघते गं मजू.

ते वापरून कोणीही इडल्या करू शकतं.<<<
हे खरंय का? कारण सांबार आणि चटणी मेरे बाये हाथ का खेल है.

तू बरी आहेस तशी << किती गैरसमज.. मी पिठलंही बिघडवलेलं आहे पूनम.. Wink

मिसळच्या जमातीतले काही किंवा आलू टिक्कीच्या जमातीतले काही करावे असा विचार करतेय.
<< मग छोले समोसा किंवा रगडा पॅटिस. समोसा विकतचे आणता येतील. छोले अथवा रगडा बनवायला जास्त वेळ लागत नाही.

ब.वडे/आलू टिक्की/मिक्स भाज्यांचे कटलेट्स हे प्रकार पुण्याच्या सध्याच्या पावसाळी हवेत मस्त वाटतील.
उडीद-वडेही करायला सोप्पे आहेत. सोबत खोबर्‍याची/ हिरवी चटणी.

मिसळपाववर सानिकाने मस्त बेक्ड ब्रेडरोलची पाकृ दिली आहे. एकदम सही आहे ती. >>> लिंक द्या ना इथे. मी एक चक्कर टाकून आले पण सापडली नाही. सदस्यांनाच दिसते का फक्त ?

मिपा चालू झालं माझ्याकडे. रेस्पी सापडली नाही.
दडपे पोहे फारच्च सोप्पेत. बाये वगैरे हाथ का खेल. घरात काय आहे ते बघायला हवं. इथलं किचन आता तेवढं फंक्शनल नाहीये ना.
दडपे पोहे आणि अश्याच चवीला म्हणून आलू टिक्क्या टाइपचं काहीतरी करते.

मिपाची साईट चालू झाली आहे, पण तिथला २ जूननंतरचा डेटा उडालाय. त्यामुळे त्यांनी २ जूननंतर टाकलेले लेख पुन्हा टाका असं आवाहन केलं आहे.

नीधप राणाप्रताप बागेच्या मागे आपटे स्नॅक्सची गाडी आहे.त्याच्याकडे ऑर्डर दिली तर उत्त्म ईडली,वडा,चटणी साम्बार मिळते,छान असते.

ते माहितीये. य वर्षांपासून त्यांच्या इडल्या खाल्ल्यात मी. आणायचं तर काय बरंच काही आणता येईल की. पण मलाच करायचंय म्हणून चाललंय सगळं Happy

नीधप इथे अंजलि चि एक रेसिपि आहे व्हेज कबाबची, शॅलोफ्राय करुन कबाब मस्त होतिल त्याचे. किंवा ग्रिल सुद्धा करता येतिल.

Pages