..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ मीरा२४२७ ~ येस्स. राजेश खन्नाचाच 'राघू' माझ्या मनी होता. ग्रेट !

@स्वप्नाराज ~ कॉलेजमध्ये आमच्या ग्रुपमध्ये एक बर्‍यापैकी 'मुकेश' होता. त्याला कधीही गाणे म्हणण्याचा आग्रह केला की तो लागलीच सुरू करायचा "मैने...तेरे लिये ही सात रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने..." पुढे पुढे तर वर्गात त्याचे असे टोपणनाव पडून गेले की, तो जर पिरीअडला हजर नसला तर मित्रच काय पण प्रोफेसरही गंमतीने म्हणत, "अरे, आज मैना कुठे गेली ?"

नायिकेला आपल्या आईला आपल्याकडे बोलवायचे असते आणि सोबत वडलांनाही. ते आल्यावर आपले घरच माहेर होऊन जाईल असे तिला म्हणायचे असते पण ती अमराठी असल्याने तिला 'माहेर' नीट नाही म्हणता येत. पण पार्श्वगायिका तर मराठीच आहे ना तिने नको का नीट म्हणायला?

प्रतीक Proud

आता माझा एक प्रयत्न. एक चोराने शहरात धुमाकूळ घातलेला असतो. पब्लिक आणि पोलिस दोघेही हैराण झालेले असतात. शेवटी एके रात्री चोरी करताना तो पकडला जातो. लोक त्याला छताला उलटं लटकावून फटके देतात आणि मग पोलिसांना पाचारण केलं जातं. पोलिस येतात तो काय - चोर आपली सुटका करून घेऊन पळत असतो. मग पोलिस आणि नागरिक त्याचा पाठलाग सुरु करतात. तेव्हा पळताना तो चोर कोणतं गाणं म्हणेल? सोप्पं आहे.

ही भर माझ्याकडून,

एका बाईला स्वयंपाक नीट जमत नसतो. पण एक दिवस ती दिवसभर खपून छान पोळ्या गवारीची भाजी चा स्वयंपाक करते, आणि भाजी खुप चांगली झाली म्हणून तिचा नवरा भरपूर भाजी खावून जेवतो, तर ती कुठलं गाणं म्हणेल?

एका माणसाला ह्युंडाई ची एक गाडी फारच आवडत असते; एवढी की तो त्या गाडीसाठी गाणे म्हणत असतो. पण तरिही त्याला जगायचं नसतं. मग तो कोणतं गाणं म्हणेल ?

एका बाईला स्वयंपाक नीट जमत नसतो. पण एक दिवस ती दिवसभर खपून छान पोळ्या गवारीची भाजी चा स्वयंपाक करते, आणि भाजी खुप चांगली झाली म्हणून तिचा नवरा भरपूर भाजी खावून जेवतो, तर ती कुठलं गाणं म्हणेल? >>>
रामा रामा गजब हुई गवारी... आहे का ? Happy

स्वप्नाराज : तेव्हा पळताना तो चोर कोणतं गाणं म्हणेल? सोप्पं आहे....

~ सोप्प आहे असे तुम्ही म्हणता, पण त्या चोराला जेवढा झाला नसेल तेवढा त्रास गाणे आठवताना मला होत आहे हे नक्की. जे नजरेसमोर येत आहे, ते तेच असेल याचीही खात्री नाही, तरीदेखील देत आहे :

"जाता हूं मै अब मुझे ना बुलाना, मेरी याद को अपने दिल में ना लाना, मेरा है क्या मेरी मंझील ना कोई ठिकाणा |"

एका माणसाला ह्युंडाई ची एक गाडी फारच आवडत असते; एवढी की तो त्या गाडीसाठी गाणे म्हणत असतो. पण तरिही त्याला जगायचं नसतं. मग तो कोणतं गाणं म्हणेल ?

कह दो के तुम हो मेरी वरना
जीना नही मुझे है मरना

एकदा समु आणि मामी भेटायचं ठरवतात. समुकडे मामीची एक वस्तू असते त्याला त्यांनी 'नाम' हा कोडवर्ड दिलेला असतो, जी समुला मामीकडे सोपवायची असते. मामी आणि समु ठरलेल्या वेळी भेटतात पण समु नेहमी प्रमाणे वेंधळेपणा करून ती वस्तू आणायचीच विसरते. समु हे मामीला कसे सांगेल?

लोक मधुबालाला विसरले का?

नायिकेला आपल्या आईला आपल्याकडे बोलवायचे असते आणि सोबत वडलांनाही. ते आल्यावर आपले घरच माहेर होऊन जाईल असे तिला म्हणायचे असते पण ती अमराठी असल्याने तिला 'माहेर' नीट नाही म्हणता येत. पण पार्श्वगायिका तर मराठीच आहे ना तिने नको का नीट म्हणायला?

एकदा समु आणि मामी भेटायचं ठरवतात. समुकडे मामीची एक वस्तू असते त्याला त्यांनी 'नाम' हा कोडवर्ड दिलेला असतो, जी समुला मामीकडे सोपवायची असते. मामी आणि समु ठरलेल्या वेळी भेटतात पण समु नेहमी प्रमाणे वेंधळेपणा करून ती वस्तू आणायचीच विसरते. समु हे मामीला कसे सांगेल?

आय अ‍ॅम व्हेरी व्हेरी सॉरी तेरा नाम भूल गयी

.

गवारी ...... फारच उच्च.

वरना ही ग्रेट.

एक होती उ. तिला झाली तू. ही तू एकदा आईवर रागावून लपून बसते. तर उ तिला शोधत कोणतं गाणं म्हणेल?

तू छुपी है कहा. मै तडपता यहा..

नाही जूळत, पण खडा टाकून बघतोय. मामीने अलिकडेच नवरंग बघितलेला वाटतोय.

तू छुपी है कहा. मै तडपता यहा.. ~ हे असेल असे वाटत नाही, कारण कॉलमध्ये 'तडपन' नसून शोध आहे असे दिसते.

तेव्हा 'तू कहाँ ये बता इस नशीली रात में...' असेल काय ?

दिनेशदा, फक्त पहिला अर्धच गाणं बोलायच हो. "तू छुपी है कहा ... " असं. (अ‍ॅक्च्युअली पुढच्या गाण्याचा मी विचारच केला नाही. नाहीतर उ ला बाप बनवला असता. Happy )

नवरंग सध्या बघितला नाहीये पण त्याची सगळी गाणी डोक्यात घोळतायत.

दोन मित्र बेकार होते. पण फक्त एकाला इंटरव्यू चा कॉल आला. पण त्याला ते कॉल लेटर दुसर्‍याला दाखवायचे नव्हते. जाम टेन्शन आले त्याला. ... पहिल्या चार ओळी फिट्ट बसताहेत, गाण्याच्या.

मग !

उईमा उईमा ये क्या हो गया, हे गाणे लिहिले असते मी.

क्लू द्यावेत काय ?

मी जरी मित्र म्हणालो असलो, तरी गाणे लताचे आहे. अगदीच अनोळखी नाही. ज्या अभिनेत्रीवर ते चित्रीत झालेय तिने अनेक मल्टी स्टारर चित्रपटांची निर्मिती केली.

आताही नाही ओळखलत तर !!!!

मी लिहिन !

Pages