पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादा बद्दल धन्यवाद.!! Sgs

धिरडे करताना..कोण्-कोणती पिठे वापरायची?? मी मधे फक्त डाळिचे पीठ वापरुन केले होते आणि ते चांगले झाले...अजुन काही प्रकार आहेत काय ते करण्याचे??

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

कृपया मला, 'पानगी' कशी करायची ते सांगा... मला एवढच माहिती आहे की हा एक कोकणी पदार्थ आहे आणि त्यात हळदीचे पान वापरतात...!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
स्मितहास्याची ही गोलंदाजी
पेलवेल त्याने करावी फलंदाजी....
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

अल्पना,

ब्रोकोलीचे पराठे छान लागतात. कणिक आणि मैदा एकत्र करून त्यात ब्रॉकोली किसून घालायची मीठ, मीरपूड्/भरडलेले जीरे/खरडलेली हीरवी मिरची-लसूण घालून करायचे. किंवा मी पॅटीस करते त्यात पण घालते.

केदार,

धीरडी तांदूळाच्या पीठाची पण चांगली होतात. पीठात जीरे आणि मिरची-कोथिंबीर्-आलं भरड कुटून घालायचे, थोड दही/ताक आणि पाणी घालुन भीजवायच. वेळ असेल तर अर्धा तास भीजू द्यायच नाहीतर लगेच केली तरी छान होतात.

माझ्या लेकीसाठी मी मिश्र पीठांची धीरडी करते त्यात कणिक, मैदा, रवा, नाचणी पीठ, राजगीरा पीठ, तांदूळाच पीठ, बेसन, ज्वारी पीठ, बाजरी पीठ यांच काँबीनेशन घेते (कणिक व रवा कॉमन, इतर पीठ आलटून पालटून). त्यात किसलेल्या/उकडलेल्या भाज्या (गाजर, फ्लॉवर, कॅप्सिकम, पालक इ. इ.) किंवा शिजलेल्या डाळी (तूर, मूग, मसूर) घालते. चवीला मीठ, जीरे, हिंग, कोथिंबीर (आपल्यासाठी मिरची/लाल तिखट) घालून पीठ दही आणि पाणी घालुन भिजवायचे आणि मग वेळ असेल तर अर्धा तास भीजू द्यायच नाहीतर लगेच करायची.

मला अंजीर वापरून करता येतील अश्या रेसिपीज सांगा ना प्लीज..
मी जुन्या माबोवर पाहिल्या- अंजीर बर्फी आणि काजू-अंजीर रोल्स आहेत- पण ते सुक्या अंजीराचे आहेत. मला अंजीर हे फळ वापरून करायचे पदार्थ माहीत असतील तर सांगणार का?
(इथेच कोणीतरी अंजीर मिल्कशेक केला, तर कडू झाला (बहुधा त्याच्या बीयांमुळे) असे लिहीले होते.. त्यामुळे नवीन काही ट्राय करण्यापूर्वी कोणी काही सांगू शकले तर आभारी राहीन) धन्स Happy
-----------------------------------
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाच्या मनामध्ये एक तरी बेडी...

केदार
धिरड्याचा पॅनकेक हा एक जरा फिरंगी नाव असलेला प्रकार
अगदी एका माणसासाठी असल्याने चिमटीचे प्रमाण आहे.
धिरड्यासाठी = १ अंडे, १/२ कप दूध, १/२ चिमटी बेकिंग पावडर, १ चिमटी दालचिनी पावडर, (१ चिमटी जायफळ पावडर-ऑप्शनल) १/२ वाटी मैदा(याचं प्रमाण जरा अंदाज घेऊन कमी जास्ती करावे. पोरिन्ग कन्सिस्टन्सी हवी) , चवीपुरते मीठ.
आधी अंडे व दूध एग बीटरने मस्त फेटून घ्यावे. त्यात उरलेले जिन्नस घालून पुन्हा फेटावे.
पॅन छान गरम करून त्यात १/२ चमचा तेल घालून हे बॅटर ओतावे. पॅन गोल फिरवून घ्यावे . त्यावर २ मि. झाकण ठेवा. नंतर गॅस बारिक करून धिरडे उलटा. २ मि. नी गॅस बंद करा. हे धिरडे गरम असतानाच त्यावर थोडे बटर व मध घाला(चांगले पसरवा). यावर आता केळ्याचे काप घाला. रोल करून मटकावा.
करून पहा.

पीएसजी
अंजीर व अननस या दोन्ही गोष्टी कशातही कच्च्या वापरल्या तर पदार्थ कडू होण्याची शक्यता असते. तर अननस आणून त्याच्या फोडी करून त्यात थोडी साखर घालून १/२ तास ठेवायचे. नंतर पाणी सुटेल . मग गॅसवर ठेऊन एक उकळी काढायची . मग हा अननस फ्रूट सॅलडमध्ये घालण्याजोगा होतो. मी रव्याच्या केकची रेसिपी दिली होती त्यातही हा अननस त्याला सुटलेल्या पाण्यासकट घालता येतो.
अननस - वरीलप्रमाणेच करून मग त्याचा मिल्क शेक करता येतो.

सॉरी
अंजीर - सुद्धा वरीलप्रमाणेच करून मग त्याचा मिल्क शेक करता येतो.

@mmm333

प्रतिसादा बद्द्ल धन्स..:)...फक्त या मधे अंडे न वापरता करायचे असेल तर आणखी काही option आहे का??

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

धन्यवाद दिनेश, लाजो... सुप अन पराठे करुन बघते आज अन उद्या. अजुनकाही सजेशन्स? मला भाजी करायची जरा भिती वाटतेय. इथे आमच्या घरी सगळ्यांना पंजाबी पद्धतीप्रमाणे गाळ शिजलेली भाजी हवी असते. आणि मला तरी ब्रोकोली गाळ शिजल्यावर (आलु-गोबीप्रमाणे) आलेली उग्र चव आवडली नाही.

माझ्याकडे ८-९ गड्डे आहेत. कसे संपवायचे कळत नाही. खाणारे आम्ही ३-४ जण असतो. अन सासरे दर वेळि शेतातली म्हणुन पोते-पोते भरुन भाजी पाठवतात, ती पण गोबी, शलगम, मुळा, पालक, कड्म (म्हणजे आपला नवलकोल... आईकडे मी ही भाजी कधीच बघितली नव्हती)..२-३ बरण्याभरुन मुळ्याचे, नवलकोलाचे, गोबीचे लोणचे... कुणाला या सगळ्या भाज्या खायची आवड असेल तर माझ्या घरी येवुन मला जरा मदत करा... आता तर शेजारी-पाजारी पण ह्या भाज्या घेत नाहीत.

पंजाबात शलजम चे लोणचे लेकीला पाठवायची पद्धत आहे. अगदी दहा दहा किलोच्या प्रमाणात करतात.
पण तरीही ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी चांगले.
याचा आणखी एक सोपा प्रकार ( मी मागे लिहिला होता ) लोण्यावर ब्रोकोली थोडी परतून घ्यायची. ती काढून मग बारिक केलेला कांदा परतायचा. तो मऊ झाला कि टोमॅटो घालुन परतायचे. यात अगदी थोडे मसाले म्हणजे हळद व लाल तिखट एवढेच घालायचे. मीठ घालून त्यात दूधाची साय वा क्रीम घालायचे. मग उकळायचे मात्र नाही. मग गॅस बंद करुन बारिक चिरलेली हिरवी मिरची घालायची. हे सगळे प्लेटमधे काढून बर ब्रोकोलीचे तूकडे पेरायचे. दिसतेही छान आणि लागतेही छान.
पण सिनेमातली पंजाबी ढंगाची गाणी जशी असह्य होतात, तश्याच या भाज्याहि, हे मात्र खरे.

अगदी अगदी दिनेश... कधीतरी ठिक आहे पण रोज सकाळी ह्याचपैकी एखादी भाजी म्हणजे खरच त्रासदायक वाटते.. रोज रोज काय मुलीचे परोठे, अन शलगम-गाजर, गोबी खायचे? पण आमच्या घरचे सगळे अगदी आवडीने खातात..
तुमची पद्ध्त चांगली वाटतेय ब्रोकोलीची, नक्की करुन बघेन.

बिन शेंगदाणे,तीळ,नारळ वापरता रस्सा भाजी करायची असेल तर ती चांगली आळून येण्यासाठी काय करता येइल ? म्हणजे रस्सा एकदम पाणी नको वाटायला म्हणून
-----------------------------------------
सह्हीच !

पंजाबी लोक करतात त्याप्रमाणे करता येईल रस्साभाजी. कांदा अन टॉमेटो ची ग्रेव्ही. कांदा, टॉमेटो, अद्रक किसुन, त्यात जरा जास्त धण्याची पावडर घालुन.
किंवा डाळवं- खसखस वाटुन पण करता येईल

कांदा, टॉमेटो, अद्रक > सध्या त्याच पध्दतीने करतोय पण सगळ्या भाज्यांना मग सेमच चव अस्ते Sad

-----------------------------------------
सह्हीच !

ते मात्र आहे... जर मसाले थोडेसे बदलता आले तर थोडीशी चव बदलता येते म्हणजे कधी गरम मसाला, कधी पावभाजी मसाला कधी कच्चा मसाला कधी काळा मसाला असे. पण तरी ह्या पद्धतीच्या भाज्यांच्या चवीत सारखेपणा येतोच. डाळवं जमले तर बघा वापरुन. आई कधी कधी घालायची मसाल्याच्या रस्सा भाजीत डाळवं

भाज्या आळून येण्यासाठी खमंग परतलेली कणीक वापरता येते. ओट्स वापरता येतात. अळशीची पावडर वापरता येते. मी चक्क हॉर्लिक्स हि वापरतो. आणि हे सर्व प्रकार आरोग्यदायी आहेत.
ही कांदा टोमेटो ची गेव्ही आहे ना ती, राणी नूरजहा ने शोधली असे म्हणतात.

अळशीची पावडर ?? हे नाही कळ्ळ दिनेशदा
हॉर्लिक्स नी चव कशी लागते साधारण ?
-----------------------------------------
सह्हीच !

अळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स. दुकानात मिळतात. हॉर्लिक्सने फार गोड चव नाही होत, पण रस्सा दाट होतो. साधारणपणे इंग्लिश स्ट्यू प्रकारात, कणीक भाजून वापरतात.
रस्सा दाट होण्यासाठी उकडलेला बटाटा कुस्करून पण घालता येतो.
पातळ पालेभाज्यात बेसन वा मक्याचे पिठ वापरता येते.
मुगाची वा उडदाची डाळ भाजून तिचे भरड वापरता येते.
कडधान्याच्या उसळीत, शिजलेले कडधान्य वाटुन घालतात.
साधारण पणे कांदा टोमेटोच्या ग्रेव्हीत मी दूध पावडर पण वापरतो. त्याने क्रीमची चव येते आणि ग्रेव्ही दाटही होते. ज्या प्रकारात गरम मसाले जास्त पडले आहेत त्यात मी दूध पावडर आणि हॉर्लिक्स वापरतो. त्याने मसाले घश्याशी येणे टळते.
दया पवारांच्या लेखात, मटणाच्या मसाल्याच्या वाटणात बाजरी घेतल्याचा उल्लेख वाचला होता. त्यानेही रस्सा दाट होईल.

दिनेश ओट आणि अळशी रस्सा दाट करायला कशाप्रकारे वापरायच्या हे जरा सविस्तर लिहाल का प्लीज?
मी अळशी पावडर साधी वरुन घातली तरी सीरीयल चिकट होतात मग भाज्यांमध्ये त्यांच गणित कसा जुळवायचे?
आणि अळशीचा विषय निघालाच आहे तर तुम्हाला फार दिवसापासुन विचारायच होतं अळशीच्या खोकल्यावरच्या कढ्याच ते ही लिहाल का प्लीज?

अळशीचा चिकटपणा जवळपास अंड्यासारखा असतो. म्हणून ती पावडर वापरुन केक्सारखे प्रकार करता येतात. अळशी तडतड उडेपर्यंत भाजली आणि मग तिची पावडर केली तर चालते. त्याची पावडर फोडणीत परतून घेतली तरी चालते. या भाज्या चिकट होत नाहीत.
अर्धा कप अळशी कोरडीच भाजून त्यात पाणी घालायचे. त्यात अर्धा कांदा, शक्यतो पांढरा उभा चिरुन घालायचा. आणि मूठभर तुळशीची पाने घालायची. त्यात खडीसाखर घालुन काढा करायचा. मधासारखा दाट झाला की गाळुन मुलाना चमचा चमचा देत रहायचा. लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावरचे माझ्या आईचे औषध आहे हे.

नाहीतर दही घालावे सगळ्यात शेवटी.
आता पुन्हा दही घालणे चांगले का वाईट ह्याच्यावर चर्चा होइलच नी तज्ञ सांगितलच.
पण मी दही घालते. वर मसाले आळून पाळून वेगवेगळे घालायचे.:)

वरचे उपाय एकत्र करून,
बेसन किंचीत भाजून घाल.
डाळ्या वाटून घाल.
कणीक घाल.
दही,
भरपूर कांदा, लसून, आले ची पेस्ट,
दूध(ह्याच्यावर चर्चा झालीय किती चांगले का नाही. ती बघा आधी),

फ्लॅक्स सीड हे मिश्रण बुळ्बुळीत करते तेव्हा मी नाही वापरणार. ते एगलेस केकसाठी ठीक आहे.

दिनेश, इथे ज्या आळ्शीचा उल्लेख केलाय ती म्हण्अजेच जवस का?
एग्अलेस केक ची रेसिपी पण देणार का?

धन्यवाद मनुस्वीनी , दिनेशदा Happy
-----------------------------------------
सह्हीच !

माझ्या कडे अळशी नेहमी असते. मुलीला खोकला झाला की नेहमी पाण्यात टाकुन, काढा करुन देते. पण मी कधिच तिचा उपयोग जेवणात केला नाही. दिनेशजी तुम्ही चांगला सल्ला दिलात. आता मी ही ट्राय करुन बघेन अळशीची पावडर जेवणात.

बाजारात ओसोजनाकु असे छोटेसे पुस्तक उपलब्ध आहे. त्यात ओट, सोयाबीन, जवस, नाचणी आणि कुळीथ यांच्या बर्‍याच पाककृति आहेत. बाकी डिटेल्स मी लिहीन मग. या सर्व पाककृति ( बर्‍याच मी करुन बघितल्या ) रुचकर तर आहेतच पण अत्यंत आरोग्यपूर्ण देखील आहेत.

जवसाची चटणी कच्चे तेल घालुन ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते.

पुस्तकाचे नाव ओसोजनाकु
लेखिका, वैशाली विनय हिंगे,
हिंगे प्रकाशन, ठाणे, मूल्य ६० रुपये.

जवस पूड किंवा तेल गरम करु नये म्हणतात. त्यातली पोषकमूल्ये कमी होतात किंवा ते toxic होते असे वाचल्याचे आठवते. इथे जे flaxseed meal मिळते त्याच्या बॉक्सवरही असे लिहिले आहे की ब्रेकफास्ट्ला ओटमीलमध्ये घालून खायचे असेल तर ओटमील आधी तयार करुन घेऊन कोमट झाल्यावर वरुन नुसतेच ते मिसळावे. चटणी करताना मी तेच वापरते. बाकी गोष्टी भाजून वाटते आणि वरुन नुसतेच हे मील मिसळते.
पुस्तकाचे नाव छान आहे. Happy

धन्यवाद दिनेश, पावडर तेलात परतुन मग घालुन बघते. ओट पण असच वापरायच का?
सिंड्रेला आम्हि पण अशिच चटणी करतो जवसाची. अजुन एक प्रकार म्हणजे त्यात वाटताना सुकं खोबर आणि लसुण, लाल तिखट घालायच आणि वरुन तेल.

flaxseed meal आणि पावडर वेगळे प्रकार आहेत का? मी आणते तो "flaxseed powder" चा बॉक्स. त्यावर तर चक्क flaxseed मफिनची क्रुती असते बरेचदा.

Pages