Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला पार्टीसाठी दहीवडे करायचे
मला पार्टीसाठी दहीवडे करायचे आहेत. एक किलो उडीद डाळीचे किती वडे होतील? कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.
प्रिया
तसेच त्या पनीर ची डेट
तसेच त्या पनीर ची डेट संपल्यावर किती दिवस पर्यंत ते वापरु शकतो.
मुळात दुधाचे पदार्थ जेवढ्या लवकर संपवता येतील तेवढे बरे. आणि डेट संपल्यावर तर मुळीच वापरु नका. पैसे वाया जाताहेत असे वाटत असेल तर खराब अन्नाचा आरोग्यावर नकळत किती परिणाम होत असेल याचा विचार करा. शिळे/थोडे खराब झालेले पदार्थ खाल्ल्याने नेहमीच पोट बिघडेल असे नाही, पण कुठेतरी त्याचा आपल्या सिस्टिमवर परिणाम होत असतो, तो लगेच दिसत नाही.
एक वाटी (नेहमीच्या स्वयंपाकात
एक वाटी (नेहमीच्या स्वयंपाकात वापरतो ती) उडदाच्या डाळीचे, एक मोठा चमचा पीठ तेलात तळून घेतले तर १२ ते १५ वडे होतात.
मला आतड्यान्ची भाजी आणी
मला आतड्यान्ची भाजी आणी पोट्टा फ्राय ची पाककृती हवी आहे.....क्रुपा करणे...
ईथे लहान मुलाचे खाण्याचा
ईथे लहान मुलाचे खाण्याचा समस्या कुठे विचारायची? धागा आहे का ?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2600 इथे आधीचे बरेच धागे आहेत. त्यात योग्य वाटेल त्या धाग्यावर प्रश्न विचारा.
दहीभेंडी कशी बनवतात? मध्यंतरी
दहीभेंडी कशी बनवतात? मध्यंतरी एका पार्टीत खाल्ली. छान लागत होती. पण कशी बनवलीय ते कळले नाही.
प्रिन्सेस, खूप सोपी आहे कृती.
प्रिन्सेस, खूप सोपी आहे कृती. ती खरे तर सिंधी बेसन करी सारखीच बनवतात. भेंडी बरोबर तू बटाटे पण टाकू शकतेस. मी लिहिते...
हि आहे दही भेंडी.
हि आहे दही भेंडी.
अमेरीकेत मिळणार्या whole milk
अमेरीकेत मिळणार्या whole milk पसुन घरी लोणी बनवता येते का?कारण कधीच साय धरताना पाहीली नाही त्यवर. मला मुलीला औषधाबरोबर अनुपान ( औषधासह )म्हणून द्यायचय.( व्हीपिन्ग क्रीम, सोअर क्रीम आदि पर्याय चालणार नाहीयेत).
इथे क्रीम टोप मील्क
इथे क्रीम टोप मील्क मीळते..त्याला छान जाड सायीचा थर येतो. ते वापरुन लोणी करता येईल कदाचीत.
एका मैत्रिणीने केलेला प्रयोग
एका मैत्रिणीने केलेला प्रयोग -
व्हिपिंग/हेव्ही क्रीमला दही लावून त्याचे लोणी केले होते असे ती म्हणाली. प्रयोग करुन पहायला हरकत.
मी फ्रेश क्रिमला दहि लावुन
मी फ्रेश क्रिमला दहि लावुन लोणी काढुन पाहिलं आहे. एकतर ते दही काहि केल्या आंबट होत नाही. लोणी काढायला पण तास भर लागला. ते ही आपल्याकडे लोण्याचा गोळा होतो तसं झालं नाही. मग ते कढवायला १ तास भर लागला. इतकं करुन जेमतेम ७-८ चमचे तुप निघालं.
मी एक पॅक फ्रेश क्रिम वापरलं होतं. सो आय थिंक इट्स नॉट वर्थ द एफर्ट.
अनसॉल्टेड बटर म्हणजे बहुतेक
अनसॉल्टेड बटर म्हणजे बहुतेक लोणीच असते. त्याच्यापासुन तुप कढवता येते. मि अजुन केले नाहीये. पण कुठेतरी वाचले आहे. ते वापरुन बघता येईल का लोणी म्हणुन?
अनसॉल्टेड बटर पासुन मी नेहमी
अनसॉल्टेड बटर पासुन मी नेहमी तुप कढवते, खुप छान कणीदार तुप होते पण ते लोणी औषधाबरोबर द्यायला योग्य आहे की नाही माहित नाही.
चार मध्यम हिरव्या टोमॅटोची
चार मध्यम हिरव्या टोमॅटोची चटणी करायला इतर घटकांचं पर्र्फेक्ट प्रमाण सांगा. माझी चटणी कधीच मनासारखी होत नाही
मावे मधे पापड भाजता येतात का?
मावे मधे पापड भाजता येतात का? त्याची चव कशी लागते? म्हणजे तळल्यासारखेच होतात का?
उपासाचे पापड पण भाजता येतील का? माझ्या नवर्याला पापड खुप आवडतात म्हणुन हा प्रयोग करुन बघायचा आहे.
तर कुठलेही पापड कसे भाजायचे कृती सांगाल का?
चार पापड सुटे करून मावेत हाय
चार पापड सुटे करून मावेत हाय पॉवरवर 30 सेकंद ठेवायचे. मस्त भाजले जातात. उडदाचे पापड खूपच छान एकसारखे भाजले जातात. इतर म्हणजे पोह्याचे, बटाट्याचे, साबुदाण्याचे पापड किंचीत तेल लावून ठेवायचे. हेही पापड छान होतात पण तळताना जसे फुलतात तसे फुलत नाहीत.
कधी कधी पापड थेट त्या
कधी कधी पापड थेट त्या काचेच्या प्लेटवर ठेवला तर चिकटून बसतो. म्हणून पापडाखाली पेपर नॅपकीन ठेवला तर चांगले. ग्रील करायचा स्टँड असेल, तर त्याचा चांगला उपयोग होतो.
अनसोल्टेड बटरचे कणीदार तुप
अनसोल्टेड बटरचे कणीदार तुप तयार होते ..हे तुप औषधासाठी बिनधास्त वापरता येते...मी वापरले आहे..
अनसोल्टेड बटरचे कणीदार तुप
अनसोल्टेड बटरचे कणीदार तुप तयार होते ..हे तुप औषधासाठी बिनधास्त वापरता येते...मी वापरले आहे..
धन्यवाद दिनेशदा आणि मंजुडी
धन्यवाद दिनेशदा आणि मंजुडी
धन्स लोण्याबद्दल च्या
धन्स लोण्याबद्दल च्या प्रतिसादाबद्दल,
सुलेखा अनसोल्टेड बटरचे तुप मी पण करते घरी, पण मला लोणी हवय औषध कालवून द्यायला (अनुपान ) म्हणून
हेच बटर लोणी म्हणून वापरावे काय? का ते केमीकली प्रोसेस्स्ड असेल??
ऑर्गॅनिक बटर वापर. किंवा औषध
ऑर्गॅनिक बटर वापर. किंवा औषध म्हणून जास्त लागणार नसेल तर वर दिलेल्या पद्धतीने करुन बघ.
इथे मागे दुधी भोपळा डोसा कसा
इथे मागे दुधी भोपळा डोसा कसा करायचा ही कृती होती आता सापडत नाही.मदत कराल का?
ईथे बघ :
ईथे बघ : http://www.esakal.com/esakal/20100829/4981927483866039342.htm
धन्यवाद आस.
धन्यवाद आस.
नमस्कार मंडळी..नविनच मावे
नमस्कार मंडळी..नविनच मावे घेतलाय्...उदघाटनासाठी केक च्या रेसिपीज शोधतेय. मला कोणी सांगु शकेल का की ओव्हन आणि मावे च्या पाकक्रुती वेगवेगळ्या असतात का? म्हणजे काही रेसिपीज मी पहिल्यात त्यात ओव्हन गरम करण्याचे प्रमाण दिले आहे. ते तसेच्या तसे मावे साठी वापरु शकतो का?
श्रद्धा, मावेतल्या आणि
श्रद्धा, मावेतल्या आणि ओव्हनमधल्या केकच्या पाककृती वेगळ्या असतात. तसेच टेंपरेचर सेटींग्जही वेगळे असतात.
इथे मावेबद्दल अधिक माहिती आहे
http://www.maayboli.com/node/11154
इथे मावेमधल्या केकची रेसेपी आहे.
http://www.maayboli.com/node/12186
श्रद्धा, मायक्रोवेवबद्दल
श्रद्धा, मायक्रोवेवबद्दल मायबोलीवरील चर्चा इथे आहेः http://www.maayboli.com/node/11154
Pages