पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राशनवर आलेले कन्डेन्स्ड मिल्कचे तीन-चार टीन्स आहेत. कसे संपवता येतील??? दिवाळीला कोणत्या मिठाईत वापरता येतील?

सायोच्या रेसेपीने मलई बर्फी, लाजोच्या रेसेपीने नारळ बर्फी.
आमच्याकडे या दोन्ही रीपी हिट आहेत. Happy

कन्डेन्स्ड मिल्क घालून रव्याचे लाडू, सायोची मलई बर्फी, सीमाची की लाजोची कुल्फी, बहुतेक सीमाचे गुलाबजाम. झाले चार डबे Wink

सायोची मलई बर्फी, सीमाची की लाजोची कुल्फी, बहुतेक सीमाचे गुलाबजाम. >>>> त्यासाठी सायो, सीमा, लाजो कुठे मिळतील??? Wink
सॉरी, फारच फाको होती ही.

धन्स अल्पना, सिंडरेला. Happy
सायोच्या मलई बर्फीबद्दल खूप ऐकलेय. बघतेच आता. Happy

मला कणकेच्या शिर्याची पाक. हवी आहे.
२ प्रकारे करता येतो ना गुळ घालुन आणि साखर घालुन? मला ते २न्ही प्रकार हवे आहेत. प्रमाण पण सांगा प्लिज....

कुळीथ थंड की उष्ण???

प्लिज कोणीतरी उत्तर द्या. हा प्रश्न कुठे विचारावा हे कळत नव्हत म्हणुन इथेच टाकला

उष्ण!!

वा रोचिन!! Happy

त्वरीत उत्तराबद्दल खुप खुप धन्यवाद!! Happy

मनूने ह्याच बाफवर आठव्या पानावर ही पाककृती लिहिली आहे
http://www.maayboli.com/node/2549?page=8

तिने स्वतंत्र पाकृ लिहिली होती, पण डिलीट केलेली दिसतेय कारण तिच्या पाऊलखुणात सापडली नाही.

जवसाच्या चटणीची रेसिपी आणि जवसापासुन तयार होणार्‍या इतर रेसिपीं हव्या आहेत.
कोणाला माहीत असल्यास प्लिज सांगा

मला तळणीच्या ओल्या नारळाच्या करन्ज्या करायच्यात , त्याच्या पारी साठी मैद्या बरोबर रवा न घेता कॉर्न्फ्लोअर वापरावे का? (बारीक रवा नाहीये माझ्याकडे ) का नुसत्या मैद्याच्या पण करता येतील? पारी मउ नको पडायला म्हणून विचारतेय.
मी नेट वर एका ठिकाणी मायक्रोवेव्ह मधील क्रुती पाहीली त्यात कॉर्न्फ्लोअर (म्हणजेच कॉर्न स्टार्च का??) घालायच अस दिलय.... हे फक्त मायक्रोवेव्ह करन्जी साठी असेल का?

माझ्याकडे १ किलो फ्रोझन पनीर आहे. ते मला लवकरात लवकर संपवायचे आहे.
त्याचे काय काय करता येउ शकते. तसेच त्या पनीर ची डेट संपल्यावर किती दिवस पर्यंत ते वापरु शकतो.

निर्मयी, पनीर पकौडे, पनीर पराठे, पनीर भुर्जी/ भाजी, पनीर घालून पुलाव/ राईस/ बिर्याणी चे प्रकार, पनीर कोफ्ते, पनीर पिझ्झा, पनीर व विविध भाज्यांचे सॅलड असे अ नं त प्रकार करता येण्यासारखे आहेत पनीरचे. तरी या यादीत गोड पदार्थ मुद्दाम नाही दिलेत. चार- सहा दिवसात थोडे थोडे वापरून संपवता येईल ते. पनीर दिवाळी मुबारक! Happy

निर्मयी, मित्रमैत्रीणींना बोलावून पनीर संपवायला हवे. ते जास्त दिवस ठेवू नये.
मराठी कूडी, शिर्‍याच्या बर्‍याच पाककृती आहेत इथे.

मराठी कुडी, http://www.maayboli.com/node/3461 ह्या धाग्यावर शिर्‍याची कृती आहे. तिथे प्रतिसादांमध्ये पण बर्‍याच जणींनी आपापली व्हेरिएशन्स दिलीत.

निर्मयी, एक भाजी मोठ्या प्रमाणावर करून मैत्रिणींकडे एक एक कॅसेरोल पाठवता येइल. सम गुडविल कॅन बी अर्नड.

माझी नणंद तुकडे करून तळून ते फ्रिज मध्ये ठेवते. कोणी अचानक आले कि टोमॅटो/पालक ग्रेवी करून भाजी तयार.

हो तेच आता कोणाकोणाला देउन संपवायला लागेल.
माझा अजुन १ प्रश्न...
रोज पनीर खाल्ले तर चालेल का? कि त्याचा काही त्रास होइल.
मि प्रेग्नंट आहे तर मला आणि तसेच घरतल्या सगळ्यांनाच लहान मुलगी धरुन.

पनीर तसे वाईट नाही, पण ते ताजे असावे. शिवाय ते न तळता खावे.
आपल्याला सवय नसल्याने, काहिजणांना पनीरचा त्रास होतो.
दूध आणि दूधाचे ताजे पदार्थ आपल्याला मानवतात.

निर्मयी>>प्रेग्नंट असल्यास पहिल्यांदी शिळे खाणे बाहेरचे खाणे बंद. ताजे घरी बनविलेले खावे. फ्रोजन पण एका लिमिट परेन्तच ठीक. बेस्ट लक.

रच्याकने माझ्याकडे चार फ्रोजन चिकन लेगपीसेस आहेत. मला त्याच्यातून स्कूल मधून परत आल्यावर खाण्यासाठी स्नॅक बनवायचा आहे काय करता येइल? शक्यतो उद्या सकाळी बनविला आणि मावशी
दुपारी चार वाजता मावे तून गरम करून देतील असा.

अश्विनी, नीट मुरण्यासाठी तो रात्रीच मॅरिनेट करुन (फ्रीजमधेच पण फ्रिझरच्या बाहेर) ठेवावा लागेल. उद्या सकाळी तो अर्धवट ग्रील करुन वा परतून ठेवता येईल. मग दुपारी पूर्ण गरम करता येईल

Pages