युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुंटे, डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्कमेड वापरुन लाडू कर. सोप्पे आणि मस्त. प्रमाण देते पाहिजे तर. Happy

नारळाचा पांढराशुभ्र चव घेऊन तो मेजरींग कपमध्ये दाबून दाबून भरून मोजायचा आणि त्याच्या निम्मी साखर घेऊन ते दोन्ही कढईत गोळा फिरेस्तोवर परतायचे, वासाला फक्त वेलची, केशर नाही आणि लाडू वळून झाले की ते पिस्त्याची पूड करून त्यात थोडे घोळवायचे.

वरती पूनमने 'इथे रेस्पी लिहू नये' असे लिहीलेले नाही त्यामुळे माझ्याकडे डोळे वटारून पाहू नये ~ हुक्मावर्न

प्रिन्सेस, गणपतीत मी लिहिलेले नारळ व रव्याचे लाडू खरेच सोपे आहेत. करून पहा.

सिंडी, प्राची, मंजुडी, मनु , प्रॅडी धन्यवाद. आता रोज रंगीत तालीम करुन एक एक पदार्थ करुन बघावे लागतील. बरेच ऑप्शन्स मिळालेत.

मला कुणी सांगेल का की भारतात व्हीट पास्ता आणि पास्ता सॉस (इथल्या प्रेगो, क्लासिको,रागू ब्रँडचे असतात तसले रेडीमेड) मिळतो का?

मला कुणी सांगेल का की भारतात व्हीट पास्ता आणि पास्ता सॉस (इथल्या प्रेगो, क्लासिको,रागू ब्रँडचे असतात तसले रेडीमेड) मिळतो का?>>>> हो, मिळतात. बॉम्बीनो, एम्टीआर ब्रॅण्डचे पास्ता मिळतात सगळीकडे. पास्ता सॉस मोठ्या स्टोअर्समध्ये मिळतात. Happy

पास्ता सॉस, हर्बज मिळतात पण जर इंपोर्टेड घेतला तर बाट्लीवर एक्स्पायरीडेट लिहीलेली असेल ती नीट वाचून मग घे. अगदी बारीक लिहीलेली असते. घरी बनविणे खूप स्वस्त व ताजे चांगले पड्ते. हर्बचे पाकिट आणायचे, नाहीतर पिझा हट्चे इटालियन सीजनिंग एक पाकीट व चमचा भर ओवा घालायचा म्हणजे मस्त सॉस होतो. इंपोर्टेड पास्ता सर्व शेप व साइज चा मिळेल. पण तो लिसीया बांबिनो पेक्षा दुप्पट महाग असतो.
पण वर्थ इट. चव जास्त चांगली असते. रंगीत - पिंक व ग्रीन पण मिळतो . बाट्लीबंद सॉस मध्ये सोडियम व प्रीजर्वेटिव्स जास्त असतात त्याची गरज नाही.

पीहू, सुलेखाने पराठे लिहिले आहेत तसेच.
प्रिंन्सेस चिवडा जमतो ना, मग गोड चिवडा आणि तिखट शंकरपाळ्या करता येतील.
गोद चिवड्यासाठी पोहे भाजून वा तळून घेतले कि साधारण गरम असतानाच वरुन पिठिसाखर आणि वेलचीपुड टाकायची. दाणे, काजू, बेदाणे आवडीप्रमाणे.
तिखट शंकरपाळ्या आहेत इथे.

धन्यवाद दिनेशदा Happy अहो चिवडा अन शंकरपाळ्यापर्यंतच धाव आहे माझी Proud
चिवडा (गोड आणि तिखट), शंकरपाळे (गोड आणि तिखट), बेसनाचे लाडु... झालेत की पाच पदार्थ Happy

पण यावेळी नेहमीच्या फराळाशिवाय काहीतरी वेगळे करुन पहायचे आहे. बर्फीचा कुठला तरी प्रकार करायचाय. म्हणुन जरा सोपे ऑप्शन्स शोधते आहे.

नवशिक्याला करंजी कठीण होईल का? आईकडे करंजीनेच सुरुवात होते फराळ बनवायला.

नवशिक्याला करंजी कठीण होईल का?>>> थोड्या प्रमाणात करून बघ ग. सोप्या असतात. 'रुचिरा' आहे का तुझ्याकडे?? त्यातले प्रमाण वापर डोळे झाकून (म्हणजे प्रमाण पाहताना डोळे उघडे असू देत हं :डोमा:)
जमेल सगळं. Happy

प्राचे तुला लाडू विचारलेत (विपु मध्ये) त्याचे प्रमाण अजुन लिहिले नाहीयेस. किती मस्का मारावा लागेल? Happy

रुचिरा नाहीये ग Sad सगळी भिस्त माबोवर आहे Happy

प्रिंन्सेस, रात्री करंज्या लिहितो डिटेलवार (रात्री गरब्याला जायचेय. यायला पहाट होणार. बघूया जमवतोच.)

दिनेश जमल्या तर बेक्ड करंज्या पण लिहा, परत साठे वापरुन् केलेल्या खुस्स्खुशित करंज्या.. त्याही लिहा..

प्रिन्सेस, शॉर्ट्क्रस्ट पेस्ट्री/ पफ पेस्ट्री शीट्स वापरुन करंज्या कर.. सोप्या आणि हमखास जमणार्‍या.. चुकायचे चान्सेस कमी Proud शिवाय त्या बेक करुन करायच्या त्यामुळे तळण्याची भानगड पण नाही Happy इथे थोडक्यात रेसिपी टाकलिये .... http://www.maayboli.com/node/20472

साधना, मी लिहील्यात बेक्ड करंज्या, पण त्या पेस्ट्री शीट्स वापरुन केल्या आहेत. भारतात पेस्ट्री शीट्स मिळतात का ते माहित नाही.

दिनेशदा, तुमच्याकडे 'फ्रॉम स्क्रॅच' बेक्ड करंज्यांची रेसिपी असेल तर नक्की टाका प्लिज Happy

मी इथे लिहिलीय नी रुपालीने चित्रे टाकलीत.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/134239.html?1194549607
इथे बेक्ड आहेत खाजाच्या करंज्या
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/64893.html
प्रमाण तेच आहे. पण बेपॉ नाही टाकायची.

इथे लाजोनी लिंक दिली ना, म्हणून लिहायचा आळस केला.

नवीन पदार्थात गोड चिवड्याबरोबर मला मूगडाळीच्या कचोर्‍या सूचल्या. या कचोरीच्या सारणासाठी तयार तळलेली मूगडाळ वापरायची. त्यापैकी थोडीशी वाटून घ्यायची, मग त्यात जिरे, मिरे, लवंग ओवा वगैरे वाटून टाकायचा. थोडी डाळ पण वाटून घ्यायची. चवीप्रमाणे तिखट, साखर व लिंबूफूल घालून सारण करायचे. मग नेहमीच्या मैद्याच्या कचोरीप्रमाणे करायचे.

तांबिटाचे (तांदूळ भाजून त्याचे पिठ करुन) लाडू पण करता येतील. गोव्यामधे पेरुच्या वड्या करतात. (पिकलेले पेरु, उकडून ते कपड्यावर गाळून बिया वेगळ्या करायच्या, मग तो गर गूळ घालून घट्ट करायचा. स्वादिष्ट लागतात.) नाचणीचे दोदोल (मी कृति लिहिलीय), साबुदाण्याचे लाडू वगैरे अनेक पदार्थ करता येतील.

कोजागिरी पौर्णिमा आलीय जवळ आणि दरवेळी करतो तसा 'एवरेस्ट - दूध मसाला' वापरुन मसाला दूध तयार करायचा कंटाळा आलाय. एखादी दुसरी पध्दत आहे काय रेडिमेड मसाल्याशिवाय? कंडेन्सड मिल्क चा वापर करता येइल काय?

कोशर फूड्स चा "गोया" म्हणून जो ब्रँड मिळतो त्यांची ग्वावा पेस्ट मिळते. ती वापरता येईल बहुदा ह्या पेरूच्या वड्यांसाठी. ह्या पेस्टची चाट साठी पण छान चटणी बनवता येते. अगदी चिंच खजुराच्या चटणी सारखी.

Pages