Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ बी, वरीची लापशी आपण गव्हाची
@ बी,
वरीची लापशी आपण गव्हाची लापशी करतो तशीच करतात.
वरी आधी धुवुन तुपावर परतायची. नंतर गरम पाणी घालून वाफ आणायची.
मग त्यात गूळ, काजु, मनुके घालुन परत एक वाफ आणायची...
ओले खोबरे घालुन पण मस्त चव येते.
दिनेशदा धन्यवाद! दिपु,
दिनेशदा धन्यवाद!
दिपु, धन्यवाद!
केळीच्या पानांचा वापर करुन ज्या काही कृती आहेत त्यांची आधी नावे द्या. कृती मिळाली तर अजून उत्तम. हल्ली मी केळीच्या पानाच्या प्रेमात पडलो आहे. देवळातून पाने आणायची. घरासमोरच आहे देऊळ त्यामुळे रोज आणता येतात आणि तीही अगदी ताजी. काल परवा पानावर भाकरी केल्यात. खंग्री झाल्यात.
दिनेश लिहा तर...
केळीच्या पानावर करायची सगळयात
केळीच्या पानावर करायची सगळयात सोप्पि कृती -
जे जेवण बनवले असेल ते सर्व त्यावर वाढुन घ्यायचे आणि मस्त ताव मारायचा! शेवटी ताट धुण्याचे पण कष्ट नकोत!
हाय दिनुमामा रस्स्गुल्ले कसे
हाय दिनुमामा
रस्स्गुल्ले कसे कराय्चे ते प्लिज सान्ग
तोंडाला पाणि सुटले.
तोंडाला पाणि सुटले.
हाय प्रिती , रसगुल्ल्यासाठी
हाय प्रिती ,
रसगुल्ल्यासाठी या लिन्क्स बघ.
http://www.maayboli.com/node/6197?page=8
http://www.maayboli.com/node/6197?page=5
मिनोती, केळीचे पान वापरले तर
मिनोती, केळीचे पान वापरले तर पिठ लावण्याचा प्रश्न राहत नाही. मग तेवढेच पिठ वाचते आणि आवरायचा वेळ वाचतो. मला केळीचे पान स्वच्छ असेल तरच आवडते. इथे सिंगापुरात केळीच्या पानांची वाण नाही.
मिनोती, केळीचे पान वापरले तर
मिनोती, केळीचे पान वापरले तर पिठ लावण्याचा प्रश्न राहत नाही. मग तेवढेच पिठ वाचते आणि आवरायचा वेळ वाचतो. मला केळीचे पान स्वच्छ असेल तरच आवडते. इथे सिंगापुरात केळीच्या पानांची वाण नाही.
प्लॅस्टिकच्या डब्यातून २५०
प्लॅस्टिकच्या डब्यातून २५० ग्रा. बटर मिळते.. ते फ्रीजशिवाय व्यवस्थीत राहू शकते का?
अमुलच्या बटर पासून कुणी तूप
अमुलच्या बटर पासून कुणी तूप करुन पाहिले आहे का? कसे होते? मिठ असल्यामुळे छान लागते का?
धन्यवाद दिनेशदा,
धन्यवाद दिनेशदा, सायोनारा..
घरी कधी कधी दुध नासते, त्याचे पनीर बनतील ?
खारीकची खिर कशी बनवतात ?
घरी नासलेल्या दूधाचे पण पनीर
घरी नासलेल्या दूधाचे पण पनीर बनते.
< घरी नासलेल्या दूधाचे पण
< घरी नासलेल्या दूधाचे पण पनीर बनते.> मग काय त्या दुधात लिंबू वगेरे टाकायच नाही ...
जागो, लोणी थंड पाण्यात ठेवले
जागो, लोणी थंड पाण्यात ठेवले तर साधारण आठवडाभर छान टिकते. पूर्वी जेव्हा फ्रीज नव्हते तेव्हा अशीच टिकवायची पद्धत होती. हे आवडत नसेल तर तूप कढवून ठेवले तर महिनाभर टिकेल फ्रीजशिवाय.
बी, मीठ घातलेल्या बटरचे तूप चांगले होत नाही. त्यासाठी स्पेशल unsalted बटर मिळते, ते लागेल.
मिनोती, आर्च धन्यवाद. खीर
मिनोती, आर्च धन्यवाद. खीर करुन बघते.
स्वाती, इथे कॉस्ट्कोमधे
स्वाती, इथे कॉस्ट्कोमधे मिळणार्या लोण्याचे तूप बरेच लोक करतात. खमंग लागते म्हणतात पण अमुल चे करता येईल की नाही माहिती नाही.
तुपाचे लोणी बरेच लोक करतात
तुपाचे लोणी बरेच लोक करतात
खमंग लागते.. ह्म्म..
माझ्या नवर्याने मी भारतात
माझ्या नवर्याने मी भारतात असताना एकदा हा प्रयोग केला होता आणि त्या तूपाचा शिरा करून तिखटमीठाचा म्हणून खाल्ला होता :-). मग काही सुगरण मैत्रिणींना विचारून unsalted butterचे नवीन तूप सुद्धा कढवले. वर मला फोन करून सांगितले की मला आता शिरा करता येतो. मी परत येईपर्यंत बाकीचे तूप जसेच्या तसे. मी मग पुलाव वगैरे कशाकशात वापरून संपवले.:-)
भारतात ब्रॅण्डेड अनसॉल्टेड
भारतात ब्रॅण्डेड अनसॉल्टेड बटर मिळते का ? ते मिळत असेल तर त्याचे तूप करता येते.
घरी नासलेल्या दूधाचे पनीर करताना, ते नेमके कश्यामूळे नासले ते बघणे आवश्यक आहे. जर ते एखाद्या
नको त्या कारणामूळे नासले असेल ( जसे एखादा किटक पडून वगैरे ) तर ते वापरु नये. अन्न विषबाधा व्हायची शक्यता असते. सराईत नाकाला वासावरून सहज कळते.
जर आपल्याला माहीत असलेल्या कारणामूळे ( उदा उन्हाळा, न तापवल्यामूळे ) दूध नासले तरच त्याचे पनीर करुन वापरावे.
उरलेल्या शंकरपाळ्यांचे काय
उरलेल्या शंकरपाळ्यांचे काय करता येईल?
चहात बुडवून खाता येतील?
चहात बुडवून खाता येतील?
बीट हलवा कसा करावा ?
बीट हलवा कसा करावा ?
शंकरपाळ्या गोड असतील आणि मऊ
शंकरपाळ्या गोड असतील आणि मऊ पडलेल्या नसतील तर त्याचा चुरा करुन, चीजकेक च्या लाईनिंग साठी वापरता येतील. सफरचंदाच्या लेयर्ड पुडीगसाठीदेखील हा चुरा वापरता येईल.
बीट्चा हलवा गाजराच्या हलव्याप्रमाणेच करता येतो. फक्त बीट सालीसकट उकडून, सोलून त्याचा किस वापरायचा.
तांदळाच्या घावण्यांची
तांदळाच्या घावण्यांची पाकक्रुती कुठे मिळेल? किंवा कोणि सांगेल का?
मला कोणीतरी रशियन सलाड ची
मला कोणीतरी रशियन सलाड ची क्रूती सागेल का?
अशब्द हे पहा :
अशब्द हे पहा : www.maayboli.com/node/2613
मला कुनीतरी pinaple rayata ची
मला कुनीतरी pinaple rayata ची रेसीपी सांगा ना..... अननस वापरुन सांगा.. टिन मधले नाही
अननसाचे तुकडे वाफवून घेऊन
अननसाचे तुकडे वाफवून घेऊन वापरायचे.
मी ब्राझिल मधे आहे. येथल्या
मी ब्राझिल मधे आहे.
येथल्या एका वर्तमानपत्रातील बातमी घेऊन माझा एक कलिग आला. त्यात हळदीमुळे कॅन्सर सेल मरतात व भारतात त्याचा औषधात उपयोग करतात असे लिहिले होते. त्याच्या आईला पोटाचा कॅन्सर झाला आहे. माझ्या कडे त्याला देण्यासाठी १ किलो हळद आहे. त्याचे काही करता येइल का. चाटण, औषध वगैरे.
कुणी लवकर कृती सांगू शकेल का?.
मी त्याला सांगितले की हळद प्रिव्हेंटिव असते, क्युरेटेव नाही, तरी पण त्याच्या समाधानासाठी काही सांगता येइल का. अर्थात इतर उपचार चालूच आहेत.
या प्रश्नासाठी वेगळा बाफ आहे का?
धन्यवाद.
हळद खाल्ली तरी प्रमाणातच
हळद खाल्ली तरी प्रमाणातच खायला पाहिजे. रोजच्या जेवणात आपण फोडणीसाठी वापरतो तशीच वापरायला हवी. ओली हळद असती तर तिचे लोणचे वहैरे करता आले असते.
Pages