पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिषा, त्या कोंड्याचे गोळे करुन आमटीत किंवा कढीत सोडता येतील.
कोंड्यात बारीक चिरुन कांदा, गरम मसाला, धनेजिरे पावडर, तिखट आणि मीठ घालुन मळायचे. आणि तळुन घ्यायचे आणि आयत्या वेळेस आमटीत अथवा कढीत सोडायचे. माझ्याकडचा कोंडा मी असाच संपवला होता.

मनिषा! तिखट्-मिठाच्या किंवा पालक घालुन पुर्‍या करता येतिल,डाळ्-बाटिच्या बाट्या मस्त होतिल.आवडत असेल कणकेचा शिरा/गूळ्-पापडी करता येईल.

मला विचारायचे आहे कि maggie शिजवताना २-३ वेळा strain करुन मग मसाला घालावा का?
मी वाचले आहे कि त्यामधे toxic असतात.
http://www.lazydesis.com/beauty-health/20072-maggi-real-culprit.html
http://www.ifood.tv/blog/health_tips_noodles
कोणाला माहिती आहे का याबद्दल?

मनिषा, मी गेल्या वेळेस गुळपापडीच्या वड्यांमधे कणकेऐवजी हा कोंडाच घातला होता मस्त झाल्या होत्या वड्या. किंवा तु थालीपीठात सुद्धा घालु शकतेस.

मॅगी बद्दल इथे बरिच चर्चा झालीय. शक्यतो वापरु नयेच. तो प्रकार घरीच कसा करता येईल, ते मि लिहिलेय हल्लीच.

बेसनाचे लाडू खूप उरले आहेत. काय करता येईल?
त्यात गूळ घालून गुळपोळ्यांसारख्या पोळ्या कराव्यात असा एक विचार आहे. होतील का बर्‍या?

सॉल्टीनचे क्रॅकर्स चुकून अनसॉल्टेड आणले गेलेत. त्याचही काही करता येईल का?

Proud

अश्विनी, ब्लड प्रेशर असणार्‍यांना देऊन टाक ते क्रॅकर्स.

आणि हो, ते बेसनाचे लाडू उरलेच कसे? वाटून नाही का टाकायचे? - एक फुकटचा सल्ला. Happy

एखादा आमटीत, भाजीत घालून संपेल. शीरा करताना एखादा घाल. शंकरपाळ्या करताना त्यात घाल.

>>>>सॉल्टीनचे क्रॅकर्स चुकून अनसॉल्टेड आणले गेलेत. त्याचही काही करता येईल का?
त्याची पापडीचाट कर. वर बटाटे, छोले, चटण्या, दही, शेव वगैरे पडल्यावर कळणार नाही मिठाचं.

मित्रानो... वाघानो....
पनीर मसाला कसा बनवायचा? मला एकदम तिखट हवाय... मिळमीळीत नको...

नमस्कार,

Micowave oven किंवा baking oven मध्ये बटाटेवडे कसे बनवायचे ? मला ते तळायला आवडत नाही. आयते तळलेले चालतात. Happy

राजगिर्र्याच्या पिठाचा शिरा किंवा खिर कशी करावी.

मी आज केलेली पण ती अगदी , पेस्ट सारखी झालेली, मुलाने अजिबात खाल्ली नाही, मग मी त्याच्यात जरा जास्त दूध टाकून थोडी पातळ करून पाजली.

मला बार्बेक्यू सॉसची आणि माईल्ड टोबॅस्को सॉस अश्या बाटल्या भेट मिळाली आहे. कशात कशात वापरता येतील?

ज्वारीचं पिठ आणलय. विरी गेलेली आहेच (त्यामुळे भाकरी न करता घावनच करणारे) पण किंचित चव कडवट वाटतेय, तर असं पिठ खाल्याने काही अपाय होत नाही ना?....दिनेशदा किंवा बाकीचे तज्ञ प्लीज सांगा.

ब्रोकोली रेब हि पालेभाजी कशी बनवावी ? चव कशी लागते ?
शेपू समजुन 'डील' नाव असलेल्या आइल मधुन नवरोबानी चुकुन आणली आहे.
धन्यवाद

>>> शेपू समजुन 'डील' नाव असलेल्या आइल मधुन नवरोबानी चुकुन आणली आहे.
नक्की काय ते समजलं नाही. dill म्हणजेच शेपू.

ब्रोकोली रेब भाजी सरसोंका सागच्या रेसिपीने करता येते. छान लागते.
नाहीतर ऑऑ वर लसूण परतून घ्यायचा अन त्यात ब्रो़कॉलीची रेब बारिक चिरून परतायची. त्यावर स्ट्यूड टॉमेटो घालायचे अन चिकन स्टॉक / व्हेज स्टॉक घालून सूप करायचं. गार्लिक क्रूटॉन्स घालून मस्त लागतं सूप.

मॄ -डिल लिहिलेल्या पाटी खालून चुकून ब्रॉकोली आणलीय ( फ्रॉईडियन चूक तर नव्हे ना Happy )

थॅन्क्स मेधा !! मी बघेन करून.. पण हि भाजी चवीला बिटर नसते ना?

ही मोठी मजाच झाली .. "शेपू बी बी " वरच्या पोश्टी वाचुन मला शेपूच (डिल) आणायचा होता , नेमक ग्रोसरीसाठी मी गेले नाही आज ... 'डिल' लिहिलेल्या पाटीत म्हणे फक्त हि एकच पेन्डी होती (चुकुन राहिलेली ) नवरोबानी कसलाही विचार न करता पटकन घेतली व लगेच मला फोन करुन म्हणतो , शेपू एकच मिळालाय!! चालेल ना ?
घरी आल्यावर म्हट्ले चला आज शेपूची भाजी खायची , बघते तर हि वेगळीच पालेभाजी ...त्या पेन्डीचे लेबल वाचुन समजले कि हि ब्रोकोली रेब आहे ..
असो पण एक नविन पालेभाजी कळली

ग्रीक योगर्ट वापरुन श्रीखंड कसे करावे? एक मोठे कार्टन मिळालेय. त्यात सावर क्रीम घालावे लागेल का? साधे दही घालून करायचे? साखरेचा अंदाज सांगाल का? मंगळवारी संध्याकाळी तयार करून हवेय.

अमी

Pages