Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वरीची लापशी पण छान होते.....
वरीची लापशी पण छान होते.....
वरी साफ करायची एक प्री
वरी साफ करायची एक प्री हिस्टॉरिक क्रुती आहे. माझी आइ करत असे व तिला बघण्यात माझा वेळ जात असे.
त्याला रोळणे म्हणतात. वरी एका मोठ्या पातेल्यात घ्यायची. त्यात खूप पाणी टाकायचे. मग त्यातील खडे वर येतात ते पातेले हळू हळू हलवून पाणी बाहेर दुसर्या पातेल्यात घ्यायचे. व गाळून टाकून द्यायचे. तसेच टाकले तर
सिन्कच्या पाइपात खडे जातात. असे ३ ४- दा करायचे. हे खराब पाणी टाकायची डूटी माझी असायची.
मामी, ही इतिहास पुर्व रोळणी
मामी, ही इतिहास पुर्व रोळणी पद्धत छान आहे. एक सांगा, पाणी जर गाळून घेतले तर खडे हे गाळणीत बसतील ना? तुम्ही सिंकच्या पायपात बसतील असे म्हणालात म्हणून मला वाटतं आहे की माझी काही चुक होते आहे. ही पद्धत इतिहास पुर्व आहे हे कशावरुन?????
माझी आई, उडदाच्या डाळीचे वडे करताना, साल असलेली वापरते आणि डाळ भिजली की त्यावरची सालं अशीच काढते.
दिपु_३०, लापशीची कृती मिळेल
दिपु_३०, लापशीची कृती मिळेल का?
इतिहास पुर्व आहे हे
इतिहास पुर्व आहे हे कशावरुन?????>> अहो ते मी फक्त एक वैयक्तिक विनोद केला होता. मी लहान कधी तर प्री हिस्टोरिक काळात असे.१९७१-७२ बाकी काही नाही. अर्थात सोन्याच्या खाणीत उत्तर अमेरिकेत किन्वा आफ्रिकेत अजुनही ही पद्धत वापरून सोन्याचे बारिक कण मिळविले जातात.
साल काढ्लेली उडीद डाळ वापरूनच वडे केलेत इत्के दिवस. सालीच्या डाळीचे आणिक छान होतात का?
हो खूपच छान होतात! चवीत फार
हो खूपच छान होतात! चवीत फार फरक पडतो. भिजवलेल्या डाळीचा अर्क वाया जातो म्हणून असावे तसे बहुदा.
तुम्ही सन ७१-७२ मधल्या अहात असे मला न वाटता ७१-७२ वर्षाच्य असाव्यात असे वाटले होते. मग कसली आलीस तू मामी आणि कसला तो तुम्ही आम्ही पणा.. उगाच आपली काहीतरी.
पाणीपुरी च्या पुर्यान्करता
पाणीपुरी च्या पुर्यान्करता काल बरिक रवा (त्यावर समोलीना फ्लोअर्/पानीपुरी फ्लोअर् लिहिलय)आणलय.
कस भिजवाय्च त्यच पीठ्?म्हन्जे खूप घट्ट का?कोणाला प्रमण माहीत असेल तर सन्गा न प्लिज.
इथल्या देसी दुकानात अनेकदा सादळलेल्या पुर्यान्मधे पैसे वाया घालव्ल्याने यावेळी घरीच करायच म्हणतेय!
.........कधी टाकतेय पाणी पुरी तोन्डात् अस होतय...म्म्म्म्म्म्म्म्म्म!
मला मझ्या १ मैत्रीणीने
मला मझ्या १ मैत्रीणीने सन्गितलेली उपासाच्या डोश्याची क्रुती ,भगर ३ वट्या आणि सबुदाणा १ वाटी रात्री भिजत घालून सकाळी आले मिरचि कोथीम्बीर मीठ घालून वाटून ३ तासानी नोन्स्टीक वर डोसे घालावेत.
मी तरी पुर्या करायला आपला
मी तरी पुर्या करायला आपला साधा रवाच वापरते. एकदा लाडवाचा बारीक रवा ट्राय केलेला तेव्हा ते जाम चिकट आणि ओल राहिलेल.
साधा रवा आपण नॉर्मल कणिक भिजवतो तसा भिजवायचा आणि मग ओल्या रुमालात गुंडाळुन २ तास ठेवुन द्यायचा. २ तासांनंतर गोळा घट्ट झालेला आढळेल. मग फारच घट्ट वाटत असेल तर थोड पाणी घेउन मळायच आणि पाटळ लाटुन अगदी गरम तेलात पुर्या तळुन घ्यायच्या.
वरील प्रकारे करुन पहा. पाणीपुरी फ्लोअर लिहिलय तर होइल पण छान.
तोशावी विपू बघ.
तोशावी विपू बघ.
फ्रोजन पोळ्या कश्या
फ्रोजन पोळ्या कश्या करायच्या(नेहमीसारखी पोळी भाजुन की अर्धवट भाजुन फ्रीज करायच्या)? किती दिवस टिकतील??
स्वाती, माझी एक मैत्रीण फुलके
स्वाती, माझी एक मैत्रीण फुलके करून थंड झाल्यावर १०-१० एका झिपलॉकमधे भरून फ्रीज करते. भारतात जाताना अशा १००-१५० करून ठेवते. म्हणजे नवर्याची महिन्याभराची सोय होते.
आई गं
आई गं
बी, ऐतिहासिक नाही, पण केनयात
बी, ऐतिहासिक नाही, पण केनयात तीळ निवडायला आम्ही असेच करायचो. तीळ मोठ्या बोलमधे घेऊन पाणी घालायचे. मग घोळवायचे. त्यातले फोलकट वर तरंगायचे आणि गारेचे खडे खाली बसायचे, वरचे पाणी अलगद ओतायचे (तरंगणारे तीळ घ्यायचे नसतातच ) मग ते तीळ अलगद हाताने काढून घ्यायचे. बोल काचेचा पारदर्शक असला तर खालून, गारेचे खडे दिसतात. वरचे तीळ काढून ते परत २ ते ३ वेळा असे पाण्यात घोळवायचे. पण जर फारच खडे असतील, तर वापरु नकोस. (दुकानदाराच्या नावे खडे फोड )
पाणीपुरीचा रवा सोडा वॉटर घालून घट्ट भिजवला, तरी पुर्या छान होतात.
कोणी मला रगडा पॅटीस ची रेसीपी
कोणी मला रगडा पॅटीस ची रेसीपी सन्गु शकेल का?
इथे माझी आहे -
इथे माझी आहे - http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/09/ragada-patties.html
जुन्या मायबोलीतील इथे आहेत - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/79976.html?1078514770
पंजाबी लोक वरीच्या तांदूळाची
पंजाबी लोक वरीच्या तांदूळाची १ खीर करतात..फार छान लागते.कुणाला रेसिपी माहित असेल तर लिहा.
मलाहि नवरोबाचीच सोय
मलाहि नवरोबाचीच सोय करायचिए.. पोळ्या अश्या कधी ठेवल्या नाहित पण सध्या त्याला भरपुर काम आहे, जेवायला बाहेर जाणे कदाचीत रोज जमणार नाही, तब्येतीलाही चान्गले नाहिच.
सुक्या मच्छीचा खारटपणा कमी
सुक्या मच्छीचा खारटपणा कमी कसा करता येईल? गॅसवर भाजण्याव्यतिरिक्त अजुन काय करता येईल सुक्या सुरमईचे?
१५० पोळ्या करायच्या? तेवढ्या
१५० पोळ्या करायच्या? तेवढ्या वेळात राजमाचा टिन आणून राजमा भात करायला नवर्याला शिकवा की!
दिनेशदा नमस्कार.. मी ईथेच
दिनेशदा नमस्कार..
मी ईथेच कुठेतरी वाचले होते.. केळ्याचे काप तुपावर भाजावे वगेरे... मला सांगाल का परत.
लहान मुलासाठी नाचणीचे डोसा ,
लहान मुलासाठी नाचणीचे डोसा , किंवा भजी वगेरे कसे बनवावे ?
मी त्याला भाकरी बनवून दुधातुन देते कुस्कुरुन. कंटाळला असेल ...
मी मिक्स पिठ बनवले आहे.. जसे ( नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदुळ, थोडे सोयाबीन )
लहान मुलासाठी मॉगी ( लिहिता
लहान मुलासाठी मॉगी ( लिहिता आले नाही बरोबर , पण समजले असेलच ) बनवायच आहे कसे बनवु..
विकत मिळत ते पाकिट नाही आणायचे आहे. त्यातल्या शेवया घरी बनवता येतील का ?
पनीर कसे बनवतात ? दिनेश्दा मदत कराल का ..
सुकी मोरी ३०-१५ मिनिटे, सुके
सुकी मोरी ३०-१५ मिनिटे, सुके बांगडे( १५-२० ) कोमट पाण्यात भिजवून ठेवून काढले तर त्याचा खारटपणा कमी होतो.
बांगडे निखार्यावर किंवा गॅसवर भाजायचे असेल तर मात्र आधी भिजवू नयेत.
भिजवलेल्या बांगड्याची, मोरीची आमटी करता येते. ताज्या माशाच्या आमटीसारखीच करायची.
सुकट, सोडे वगैरे सुद्धा काही जण पाण्यात भिजवून ठेवतात थोडा वेळ. तसे केल्याने त्याचा कुरकुरीतपणा कमी होतो.
पोळ्या किंवा फुलके पूर्ण गार झाल्यावर ८-१० पेपर टावेल , मग फॉइल असे गुंडाळून , झिपलॉकमधे घालून फ्रीझ करता येतात. एक पाकीट सकाळी फ्रीझरमधून काढून फ्रीज मधे ठेवलं तर संध्याकाळ पर्यंत मस्त थॉ होतात. पेपर टावेल वर थोडे पाणी शिंपडून तो दोन्-तीन पोळ्यांवर ठेवून २०-३० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यास मस्त गरम होतात.
माझी आई पूर्वी भारतात परत जायच्या आधी पूर्ण फ्रिझर अशा पोळ्यांनी भरून ठेवत असे! ( आता मला फुलके यायला लागले , त्यामुळे बंद आहे हे प्रकरण )
केळ्याचे, साध्या किंवा राजेळी
केळ्याचे, साध्या किंवा राजेळी केळ्याचे काप मंद आचेवर तूपावर परतता येतात. गॅस मंद हवा नाहीतर करपतात. सोनेरी रंग यायला हवा. मग त्यावर साखर व ओले खोबरे हवे तर घालायचे. राजेळी केळ्याचे काप, साखर न घालताही चांगले लागतात ( आफ्रिकेत बालाहार म्हणून हेच वापरतात )
फार पुर्वी मी नाचणीच्या सुकवलेल्या शेवया लिहिल्या होत्या. असतील त्या अजून.
मॅगी सारखा प्रकार करण्यासाठी. बारिक चाळलेली कणीक घेऊन त्यात थोडे मीठ व तेल घालून मऊसर भिजवायची. भिजवायला पाण्याच्या जागी अंडे वापरले तर उत्तम. मग त्याची पातळ पोळी लाटायची. त्याची जपानी पंख्याप्रमाणे घडी घालायची पण वरुन लाटणे न फिरवता पोकळच ठेवायची. मग धारदार सुरीने त्याच्या पातळ पट्ट्या कापायच्या. ( असे करण्यासाठी एक हातयंत्र पण मिळते ) या पट्ट्या जरा वार्यावर सुकवायच्या, मग पट्ट्याच्या तिप्पट पाणी उकळत ठेवायचे. पाण्याला उकळी आली कि त्यात थोडे मीठ व तेल घालायचे आणि या नूडल्स सोडायच्या, वर तरंगल्या कि झार्याने काढायच्या, हवा तो सॉस करुन त्यात मिसळायच्या. या पिठात भिजवतानाच, पालकाचा रस, टोमॅटोचा रस वगैरे घालता येतो.
पनीरबद्दल वेगळे लिहितो.
पनीर करण्यासाठी तूरटी,
पनीर करण्यासाठी तूरटी, लिंबूफूल, लिंबाचा रस, दही वा व्हिनीगर यापैकी एक काहीतरी लागेल. ( आणि अर्थातच दूध वा दूधाची पावडर ) यापैकी काहीही वापरले तरी त्याचा वास पनीरला येतोच, तो नको असेल तर यापैकी काहीतरी एक वापरुन पनीर करायचे ( कसे ते लिहितोच ) आणि त्यावेळी वेगळे झालेले पाणी, बाटलीत भरुन फ्रीजमधे ठेवायचे. हे पाणी वापरुन केलेले पनीर उत्तम होते/
साधारण एक लिटर दूधाला अर्धा चमचा तूरटीपूड वा अर्धा चमचा लिंबूफूल, एका मोठ्या लिंबाचा रस वा अर्धी वाटी व्हीनीगर लागेल, दूध यू एच टी प्रक्रिया केलेले असेल, तर हे प्रमाण बरेच वाढते,
पनीरची मिठाई करायची असेल, तर साय काढलेले दूध हवे पण भाजी करायची असेल तर साय काढू नये.
दूध तापत ठेवावे, आणि पुर्ण गरम झाले कि वरीलपैकी एक पदार्थ घालून ढवळावे. दोन मिनिटात दूध चोथापाणी झाले पाहिजे, न झाले तर आणखी थोडा आंबट पदार्थ घालावा. ( पण असे दोनदा करुनही जर दूध फाटले नाही, तर त्या दूधाचे पनीर होत नाही ) या वेगळ्या झालेल्या पाण्याचा रंग निळसर हिरवा हवा.
असे चोथापाणी झालेले दूध चाळणीत रुमाल टाकून त्यावर ओतावे, ( खाली पडलेले पाणी, परत पनीर करायचे असेल तर वापरता येते. हेच पाणी सूप करण्यासाठी, भात शिजवण्यासाठी वा चपातीचे पिठ भिजवण्यासाठी वापरावे )
हा चोथा परत थंड पाण्यात घालावा आणि परत रुमालावर ओतावा. हे भांडे फ्रीजमधे ठेवावे, दोन तासात बहुतेक पाणी निघून जाते. हा छाना मिठाई वा भूर्जीसाठी वापरता येतो, पनीरच्या घट्ट वड्या हव्या असतील तर, हा छाना रुमालावर चौकोनी पसरावा, व रुमालाची घडी घालावी. हि घडी एका उतरत्या पाटावर ठेवावी, त्यावर दुसरे सपाट काहीतरी ठेवावे. मग त्यावर वजन ठेवावे ( पाण्याने भरलेला कूकर वगैरे ) तासाभराने पनीरमधले पाणी जाते व घट्ट वड्या कापता येतात.
एक लिटर दूधाचे साधारण २०० ते २५० ग्रॅम पनीर होते.
जुई, तू फक्त दिनेशना विचारलं
जुई, तू फक्त दिनेशना विचारलं आहेस पनीर बद्दल. पण तरी माझी कृती अशी:
शक्य तितकं हाय फॅट दूध घेऊन उकळवत ठेवायचं. साधारण अर्धा लिटर. उकळी आल्यावर १ लिंबू पिळायचं त्या दुधात. आणि परत जरा उकळू द्यायचं. म्हणजे पाणी वेगळं होऊन येईल वर. मग एका पंचात ते सगळं चोथापाणी घेऊन पाणी काढून टाकायचं. जे पनीर राहील ते पंचात पसरुन त्यावर जड काहीतरी ठेवायचं म्हणजे घट्ट वड्या पडतील. साधारण पाऊण तास तरी ठेवावं लागेल.
माझ्याकडे डबाभर स्टील कट ओट्स
माझ्याकडे डबाभर स्टील कट ओट्स पडुन आहेत. त्याचं काय करता येइल ?
सिंडे, ते दलियासारखे असतील
सिंडे, ते दलियासारखे असतील ना? तर गव्ह्याच्या खिरीसारखी खीर किंवा उपमा सांजा करुन पहा.
सिंडी, cholesterol साठी स्टील
सिंडी, cholesterol साठी स्टील कट ओट्स चांगले. शिजवून दुधात घालून सिरिअल म्हणून खा. किंवा मिनोतीने सांगितल्याप्रमाणे. त्याला स्वतःची काही चव नसते. मी केवळ औषधी म्हणून खाते.
Pages