पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोले करतांना चहाचं पाणी घालुन का शिजवायचे.. आताच एका शो मध्ये बघितले.. मी असं कधी केलं नाही.. त्याने काय फरक पडतो?

किट्टु
छोले शिजायला एरवी जास्त वेळ लागतो पण चहाचे पाणी घातल्याने ते लवकर शिजतात. म्हणजे मी चहाच पाणी घालुन नाही पाहीले पण मी छोले शिजवताना एका छोट्या रुमालात एक चमचा चहापावडर घालुन त्याची पुरचुंडी त्या छोल्यांमधे ठेऊन देते. यामुळे ते लवकर शिजतात. काहीजण चहाऐवजी नारळाची करवंटीही ठेवतात.

टिनमधील प्रि कुक्ड राजमा, इतर बीन्स कसे वापरायचे? त्यातले पाणी टाकून द्यायचे की ते पाणीही वापरायचे? टोमॅटो सूप असेल तर काही प्रोब्लेम नाही.... पण राजमामध्ये लालभडक पाणी असते.. पॅकवर कलर प्रेजर्वेटिव लिहिले आहे.........

मित्रहो. इथे बर्‍याच कृती टाकण्यात येतात .पण त्यावरून नक्की मार्गदर्शन होत नाही. मिसळपाव वर एक चांगला प्रकार मी पाहिला . तशा स्वरूपात स्टेप बाय स्टेप फोटो टाकून कृती देता येईल का?

उदाहरणार्थ....
http://www.misalpav.com/node/9660
असे झाल्यास खूप्च सोपे होईल

टिन्स मधले पाणी शक्यतो वापरू नये कारण त्यात preservaties बर्याच प्रमाणात असतात. राजमा वगैरे सरळ स्वच्छ धुवून वापरलेले बरे.

कोक, थम्स अप वा तत्सम पेये वापरून केक करतात त्याची पाकृ कोणाकडे असल्यास इथे यो. जा. टा. ना प्लिज्

रॉबिनहुडा, तुमची सज्जेशन चांगली आहे. आपल्या मा बो वर सुद्धा काही पाककृती अश्या फोटो स्वरुपात टाकलेल्या आहेत. ही मिच टाकलेली एक पाककृती....

http://www.maayboli.com/node/10559

प्रत्येक वेळेस पाकृ टाकताना फोटो असतातच अस नाही आणि एखादा पदार्थ बनवताना प्रत्येक स्टेप चे फोटो काढले जात नाहित (वेळ नसतो, फोडणी जळण्याची शक्यता इ इ) आणि बर्‍याच पाकृ मधे काही नेहमी केल्या जणार्‍या स्टेप्स असतात, जसे तेल गरम करणे त्यात जीरे, मोहरी टाकणे, कांदा परतणे इ इ.

परंतु एखादी वेगळी, कठीण, इंटरेस्टिंग रेसिपी असेल तर मा बो मंडळी त्या स्टेप्स चे फोटो टाकतातच की रे...

ही बघ अजुन एक....

http://www.maayboli.com/node/10599

त्यातुन ज्याना जमत असेल, वेळ असेल त्यांनी जरुर क्रमवार फोटो सहित पाकृ टाकावी.... आम्हा उभरते हुए स्वयंपाकी लोकांना त्याचा नक्कीच फायदा होईल Happy

कृती मराठीत नाही त्याबद्दल क्षमस्व. कृती खालीलप्रमाणे -

Eggless Vanilla Cake

Ingredients -

200 grams Maida
1 level tsp Baking powder
2 pinches Baking soda
1/2 tsp vanilla essence
Butter- 100 grams or Ghee- ¾ cup
400 grams Condensed Milk
200-300 ml Soft drink

- Melt the butter in a microwave safe bowl for around 30 seconds on micro high. Now add the condensed milk and beat well.
- Sieve the mix of maida, baking powder and baking soda around 3 to 4 times.
- Add it to the butter and condensed milk mix little by little and blend it well.
- Add the soft drink to get the required consistency and finally add the essence.
- Grease a microwave safe bowl and pour the batter.
- Microwave on high without covering it for 6 to 7 minutes.
- Decorate the cake as desired using cream and icing sugar or strawberry or cherries.

मंजु तुम्हाला eggless केक ची क्रुती हवी आहे का? कि ती पेय वापरुनच केक करायचा आहे ?:)
नाहीतर मी लिहिते.

मृणाल गद्रे,
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

.

बेसन लाडु बरेच उरलेत जरा जास्तच गोड नी थोडे कोरडे (तुप कमी) झालेत काय करता येईल?
बटाटे जास्त आण्ले गेलेत (wholesale म्ध्ये ) , पण त्याना आता कोंब येत आहेत काही खराब पण होत आहेत, फ्रीज मध्ये राहतील का चांगले (पण एवढे सगळे ठेवणे पण कठीण आहे). काय करता येईल? कींवा कसे जास्त दिवस टीकवता येतील?

शिल्पा, बेसनाचे लाडू चुरा करून कणकेत भरून पुरणपोळीसारख्या गोड पोळ्या कर. बटाट्याचा किस किंवा वेफर्स कर.

बटाट्याचे चिप्स कापुन फ्रिझ कर, हवे तेव्हा पोटॅटो चिप्स.... Happy
मॅश्ड पोटॅटो करुन पोर्शन्स बनवुन फ्रीझ कर... क्रीम आयत्या वेळेला घाल... Happy
कोंब आलेले बटाटे जमिनीत पुर.... थोड्याच दिवसात भरपूर घरचे बटाटे येतिल... मग परत इथे ये विचारायला.... अभी इन बटाटोंका मै क्या करु????? Proud

लाजो Lol

जामोप्या, कॅनमधले पाणी टाकायचे असते. खुपश्या पाककृतीमधे "ड्रेन्ड," असे लिहिलेले असते.
टोंमॅटो प्युरीमधला जिन्नस असेल तर ते मात्र वापरायचे.
बेसनाचे लाडू, भरल्या वांग्याच्या मसाल्यात मिसळता येतात. भरली कारली करताना, उपयोगाला येतात.

वरीतले खडे नसे निवडावे कुणाला काही माहिती आहे का? माझा हा नेहमीचा प्रश्न आहे की वरीतले खडे दिसत नाहीत कारण ते त्याच रंगाचे असतात जशी वरी.

बी, वरी चा उपमा कर,
कुसकुस सारखे वाफवुन त्यात कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर, मीठ, मिरेपुड, लिंबु, भाजलेले शेण्गदाणे (नाही घातलेस तरी चालेल) घालुन सॅलॅड करुन खा :),
रव्याच्या वड्या करतात तश्या गोड वड्या कर. आवडत असेल तर केळं घाल.

वरी पाण्यात भिजवलीस की बरेचदा खडे वर येतात. नाहीतर डोळ्यात तेल घालुन निवडायचे अगदीच नाहीतर खाताना तोंडात आले की काढुन टाकायचे Proud

Pages