Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@dafodils23 लवकर बालूशाहि
@dafodils23
लवकर बालूशाहि खाजाची कॄती टाकाना...
१५ लोकांच्या बिर्याणीसाठी
१५ लोकांच्या बिर्याणीसाठी तांदूळ आणि चिकन किती घ्यायचे?
अंजली, नुसतीच बिर्याणी खाणार
अंजली,
नुसतीच बिर्याणी खाणार असाल तर खूपच लागेल, पण पॉटलक असेल तर नेहेमी चार लोकांकरता करत असशील तर त्याच्या दुप्पट बनव. साधारण अंदाज सहा माणसांना १पौंड चिकन आणि ३ कप तांदूळ लागेल, ही अमेरिकन मापे आहेत.
रवा-बेसन लाडु फार गोड झालेत.
रवा-बेसन लाडु फार गोड झालेत. त्यामुळे खायचे नाहियेत. तर त्याच्या पोळ्या (सारण म्हणुन वापरुन) कशा करता येतील?
स्वाती, | thnaks गं संगितल्या
स्वाती, |
thnaks गं संगितल्या बद्दल. पॉटलक आहे, बाकिचे पदार्थ काय आहेत ते माहित नाही. मला बिर्याणी सांगितली आहे. खाणारे सगळे पट्टीचे आहेत. ११ मोठे ४-५ मुलं.
रवा बेसनाचे लाडू लाटण्याने
रवा बेसनाचे लाडू लाटण्याने फोडून घ्यावेत. ते जर फार कोरडे असतील तर थोडे पाणी वा दूध शिंपडून जरा शिजवून घ्यायचे. * जर फारच गोड असतील तर थोडा रवा घालून शिजवावेत *
मग तेवढीच मऊ कणीक मळून त्यात सारण भरुन त्याच्या साटोर्या कराव्यात.
रवा-बेसनाचे लाडू थोडीशी साखर
रवा-बेसनाचे लाडू थोडीशी साखर , तूप घालून मिक्सरवर बारीक करुन घ्यायचे.रवा ,मेदा थोडेसे मोहन घालुन भिजवुन त्यात लाडवाचे सारण घालुन पोळ्या कराव्यात.
माझ्याकडे खुप रव्याचे लाडू
माझ्याकडे खुप रव्याचे लाडू आहेत, त्याला थोडा वास येतोय, मि ते फ्रिजमध्येच ठेवले आहेत.
त्याच्या अश्या पोळ्या केल्यातर चांगल्या होतील का की त्यालापण वास येईल ?
वर्षा, संपव लवकर.. रवा
वर्षा, संपव लवकर.. रवा खोब-याचे लाडु टिकत नाहीत आणि टाकवतही नाहित...
मी पाकिस्तानचा बासमती तांदूळ
मी पाकिस्तानचा बासमती तांदूळ आणला आहे. त्यावर लिहिलेली पद्धतः
१. भात आणि सहापट पाणी झाकण न लावता शिजायला ठेवा
२. पाच ते दहा मिनिटाने जास्तीचे सगळे पाणी टाकून द्या. ( ड्रेन करा, असे लिहिले आहे.)
३. नंतर थोडा वेळ झाकण लावून शिजवा.
अजून असे केले नाही. उद्या करून बघेन. अशा पद्धतीने भात चांगला होतो का?
अग साधना, त्यात नुसताच खोबरे
अग साधना, त्यात नुसताच खोबरे नाहितर माझ्या जावेने खवापण घालायला लावला आहे, आणि आता त्याला कोणी हात लावत नाही.
उद्या करून बघेन. अशा पद्धतीने
उद्या करून बघेन. अशा पद्धतीने भात चांगला होतो का?
<<
आता त्या पाकिटावर लिहीलंय ना ? करुन बघा आणि तुम्हीच सांगा इथे.
जमोप्या, अशा पद्धतीने भात
जमोप्या, अशा पद्धतीने भात चांगला होतो का? >>> हो, चांगला म्हणजे फडफडीत होतो, बरेच लोकं बिर्याणी, पुलाव किंवा फ्राईड राईस ला असाच भात करुन घेतात, म्हणजे पास्ता जसा शिजवुन घेतात तसा. मीठ मात्र घालायला विसरु नका.
डायबिटीस साठी चालेल असा एखादा
डायबिटीस साठी चालेल असा एखादा अगदी कमी गोड पदार्थ/ साखर न वापरता करता येइल असे कहीतरि सुचवा..जेवायला बोलावलेय वीकन्ताला. मला काय करु सुचतच नाहिये
खजुराच्या पोळ्या करता
खजुराच्या पोळ्या करता येतील.
रताळ्याच्या घार्या पण करता येतील न गुळ घालता.
मी एका मैत्रिणीसाठी मसाला दूध केले होते तिला डायबिटीस आहे म्हणुन.
खजुराच्या पोळ्या कश्या
खजुराच्या पोळ्या कश्या करयच्या?
खजुराच्या बिया काढुन तुपावर
खजुराच्या बिया काढुन तुपावर अगदी किंचीत परतायचा. फूड प्रोसेसर मधे बारीक करायचा. चपातीच्या कणाकेत हा खजुर भरुन पुरणपोळीसारखी पोळी करायची. भाजताना अगदी किंचीत तुप सोडायचे.
खजुराचे रोल करता येतील.
रताळी बेक करुन त्याचा लगदा करुन ते पुरण म्हणुन वापरता येते. त्या पोळ्या देखील छान लागतात.
फ्रुट क्रिस्प ला साखर न घालता देखील क्रिस्प छान लागते ते करता येईल.
स्वाती, तुझा पाकृ वरील
स्वाती,
तुझा पाकृ वरील डायबीटिस लोकांना हवे असलेले गोड पदार्थ वाचले. खरे तर रताळे व खजूर देणे चांगले नाहीच.
वयाने (म्हातारी व्यक्ती) ज्यास्त असेल व्यक्ती तर तू रताळे देवु नकोस. त्यात गोड पेक्षा त्याचा स्टार्च प्रमाण हाय असल्याने खूप वेळ शुगर वाढलेली रहाते/राहु शकते. वयामूळे व्यायाम हा कमीच होतो तसा ह्या वयातील लोकांना त्यामूळे तो चार पाच तास त्या दिवशी त्यांना असे पदार्थ खल्ले तर जरा त्रास जाणवतो गोळ्या वगैरे घेवून सुद्धा. शुगर फ्कच्युएअशन असते ज्यास्त.
मुळतः रताळे व खजूर पदार्थ तसे गोड असतातच.
खजूर सुद्धा मूळात गोड आहे पण फायबर पण आहे. त्यामूळे ग्लायसेमीक इन्डेक्स( in short,how fast it increases the sugar in blood) कमी असतो.
हवेच असेल तर तू खजूर रोल बनव. पाहिजे तर अंजीर टाक. आणखी फायबर. पण कॅलरीज हाय आहेत.
हे मुद्दम इथे लिहायचे कारण एका मैत्रीणीच्या आईने डायबीटीस असताना कोणाच्या तरी घरी असेच खावून नंतर चक्कर आली दोन तासाच्या प्रवासात.
(no intention to scare you or point any mistake here.):)
लापशी बनव स्टेविया वापरून(
लापशी बनव स्टेविया वापरून( बर्याच लोकांना पण स्टीवीयाची चव नाही आवडत).
मला तरी वाटते, कि मधुमेही
मला तरी वाटते, कि मधुमेही पाहुण्याना, गोड खाता का ? काय करु असे सरळ विचारावे. त्याना जर गोड खायचेच नसेल, तर मुद्दाम गोड पदार्थ समोर ठेवू नये ( अनेकाना मोह आवरत नाही ).
स्वीटनर्स वापरून अनेक प्रकार करता येतात. गोड पदार्थ प्रमाणात खाण्यास हरकत नसते, पण मधुमेह कुठल्या टाईपचा आहे व किती तीव्र आहे यावर सर्व अवलंबून आहे.
खरे तर मला गोड करावे कि नाही
खरे तर मला गोड करावे कि नाही हा प्रश्नच पडलाय. जास्त वयाचे नाहिए..४०च्या आसपास आहे येणारे. घरी छोटेसे गेट टुगेदर करतेय... फ्रुट पुडिण्ग कसे वाटतेय?
तू सरळ त्यांना विचारत का
तू सरळ त्यांना विचारत का नाही. वयापेक्षा त्यांचा डायबेटीस किती सिरियस आहे ह्याची आपल्याला पुर्ण कल्पना कोणी व्यक्ती देवू शकत नाही म्हणून सरळ विचार गोड केले तर खावू शकता का? आता त्या व्यक्तीला डायबीटीस आहे हे सांगितलेच आहे तिने जर तुम्हाला तर तुम्ही ही स्पष्ट विचारलेलेच बरे. मी तुमच्या जागी असते तर, I wont risk my guest's life by offering something not so good to their health.
no offense to you but its better to be upfront.
फ्रूट कस्टर्ड चांगले आहे मेनू. केळ नका टाका. पेर्,पीचेस वगैरे ठिक.
सगळ्यांना एक सारखेच गोड पदार्थ बनवा. ज्यांना डायबीटीस आहे त्यांना वेगळ फ्रूट कस्टर्ड काढून त्यात स्टेविया तत्सम टाका.
धन्यवाद मनु, विचारुन बघते
धन्यवाद मनु, विचारुन बघते
स्वाती... सरळ फ्रुट प्लॅटर
स्वाती... सरळ फ्रुट प्लॅटर ठेव... त्यात वेगवेगळी फळ कापुन ठेव. सोबत कस्टर्ड/जेली/आईस्क्रिम यातल काहीतरी किंवा सगळ ठेव. ज्याला जे हव ते खातिल. डायबेटिस ज्यांना आहे ते फक्त फळ खातिल...
मी त्या पाकिस्तानी पद्धतीने
मी त्या पाकिस्तानी पद्धतीने काल भात केला होता... भात छान मोकळा झाला होता. पाणी काढल्यावर तीन चार मिनिटातच मस्त फुलला..
जास्तीचे पाणी काढले , पण ते टाकणे जिवावर आले.. ते पिऊन पाहिले तर अगदी मस्त भाताची पेज होती..
पेजेमध्ये भातामधील बी जीवनसत्वे जात असणार ( जी मज्जासंस्थेला चांगली असतात.) कारण ही असली पेज टाकून देऊन उरलेला भात खातात, म्हणून तर पाकडे बथ्थड आणि बधिर डोक्याचे झाले असणार !

फळातही पपया उत्तम ( तसे चिकू,
फळातही पपया उत्तम ( तसे चिकू, केळी, आंबा हे त्यांनी जपूनच खायचे असते ) संत्रा लिंबू वर्गातली फळे छान, पण फळेच, ज्यूसेस नको.
मी धीर करुन शेवटी विचारुन्च
मी धीर करुन शेवटी विचारुन्च घेतले.. लाइट गोड चालेल. लाजो तु सुचवलेल फायनल झालय.
माझ्याकडे मेथी पावडर बरीच
माझ्याकडे मेथी पावडर बरीच शिल्लक आहे.लाडू सोडून त्याचे काय करता येईल?
१-१ टेबल्स्पून ज्वारी किंवा
१-१ टेबल्स्पून ज्वारी किंवा भाकरीच्या पिठात घालून संपवता येईल.
ती तेलात परतून त्यात मीठ व
ती तेलात परतून त्यात मीठ व लाल तिखट, हिंग घालून तोडी लावणे करता येईल. हे फ्रिजमधे टिकेल. यात कांदा, काकडी, कैरी वगैरे मिसळून लोणचे करता येईल. फार कडू नाही लागत हे, पण हवा तर थोडा गूळ घालता येईल. हे थोडे आंबट वरण वा भाजीत पण वापरता येईल.
Pages