पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे पिकलेली ईडलिंबु बरीच आली आहेत. त्यांचे लेमोनेड करायचे आहे. कृती मिळेल काय?? अजुन काय करता येईल?

जुयी आज दुपारपर्यंत टाकते रेसिपी. दोन वर्षाच्या मुलाला चालेल. आमच्या कडे आजारपणातून उठल्यावर ताकद भरून यायला मुद्दाम करतात.

साधना लेमोनेड ताजे करायचे आहे का ? एक लिंबू सालासकट कापून त्यावर कोमट पाणी ओतायचे. मग ते पाणी थंड झाले कि फ्रीजमधे तीन चार तास ठेवायचे. मग त्यात चव बघून आणखी लिंबूरस, कमी साखर व मीठ घालायचे. स्वाद आणखी वाढवायचा असेल तर त्या पाण्यात थोडी पुदिन्याची पाने कुस्करुन टाकायची.
मसाला इडलीसाठी इडलीच्या पिठात मिरच्या, चणाडाळ, कढीपत्ता, मिरीदाणे, जिरे व हिंग घातलेली फोडणी ओतायची. यात ओले खोबरे, गाजराचा किस, काजू, कोथिंबीर वगैरे घालता येते. पण हे घटक थेट पिठात न घालता, साच्यात पिठ घातले कि वर टाकावेत आणि मग इडल्या वाफवून घ्याव्यात.

ताजे नको.. टिकावू पाहिजे Happy

फळे खुप आहेत आणि खुप आंबट आहेत. पुर्ण पिकलीत, अगदी मोसंबीसारखी सोलता येतात. प्लीज आज सांगा म्हणजे रात्री करता येईल.

.

स्वाती२ मला मेल मिळाला पण मला पोस्ट कुठे दिसत नाही

सुरळीच्या वड्याची लींक द्याल प्लीज

चिकन , मटण खिमा कसा करायचा ह्यावर प्लीज उत्तर द्या की कोणीतरी .... Happy ( माझा प्रश्न मागच्या पानावर गेलाय . Sad )

धन्यवाद सान्ची.
राजगीर्याचे पीठ लहान मुलांना चालेल का? ( कॅल्शियम असते म्हणून )
चालल्यास काय करता येइल आणि कसे ?

हो चालते राजगिर्‍याचे पिठ. अगदि बाळाला द्यायचे असेल तर कपभर दुधात दोन तिन चमचे पिठ आणि अवडिप्रमाणे साखर वेलचि मिक्स करून खीर देता येते.
रजगिर्‍याच्या पिठाचा शिरा बनवता येतो साजूक तुपावर खमंग पिठ भाजून दुध साखर घालून.
किंवा मोठ्यांना खायला तिखट मिठाच्या पुर्‍याही करता येतात. Happy

धन्यवाद..
अजुन एक प्रश्न.. साखरेशिवाय अजुन काही पर्याय आहे का मोरावळा करायला ?

साधना, मला विचारपूस इथे निट दिसत नाही, म्हणून उत्तरे द्यायची राहिलीत. सोलता येतात म्हणजे ईडलिंबू नसावीत. ईडलिंबू ची साल खडबडीत असते. आणि ती खूपच जाड असते. हा लिंबाचा एक वेगळा प्रकार आहे. पाक करायचा तो अगदी पक्का हवा. त्यासाठी पाकात साखर भिजण्यापूरतेच पाणी घालून तो उकळायचा. उकळता उकळता, वाटितल्या पाण्यात त्याचा थेंब टाकला तर त्याची पटकन गोळी व्हायला हवी आणि ती गोळी वरुन ताटात टाकली तर त्याचा टणकन आवाज यायला हवा. पण पाकाची भिती वाटत असेल तर त्यात थोडे सॉडियम बेंझॉईट सारखे प्रिझरव्हेटिव्ह घालणे चांगले. हे अगदी चिमूटभर् घालायचे असते. त्या पाकिटावर तश्या सूचना असतात. जर सालीला चांगला स्वाद असेल, तर त्याचे लोणचे घातले तरी छान लागेल. फळे कापून त्यात चवीप्रमाणे मीठ व साखर घालून ठेवायची. जरा वेळाने पाणी सुटले कि थोडेसे व्हीनीगर घालून मावे मधे दहा मिनिटे शिजवायचे. हे लोणचे ताजे कडू लागते, पण मग चवदार होते. नंतर लाल तिखट आवडीप्रमाणे घालायचे. यातल्या मीठासाखरेच्या प्रमाणाची काळजी करयाचे कारण नाही. चवीप्रमाणे नंतरही घातले तरी चालते.

किट्टू साखर नको असेल तर आवळा सुपारी करता येईल. लोणचेही घालता येईल. आवळ्याचे गुणधर्म त्यातही टिकून राहतात.

मलाही इडलिंबु की काय ती माहित नाहीत. आधी पाहिलीत तेव्हा मोसंबी वाटली, पण माझ्याबरोबरच्या बंगाल्याने ती लिंबेच आहेत म्हटले आणि चक्क मोसंब्यासारखे सोलले. खाउन बघितले तेव्हा कळले की लिंबुच. बागेच्या मालकिणीने ती फळे लोक लोणच्यासाठी घेऊन जातात म्हणुन सांगितले, पण तिने कधी लोणचे केले नाही. सालीलाही चांगला स्वाद आहे. आता अर्धे लोणचे करते आणि अर्धे लेमोनेड.

कांदे नसले तर tomato, काकडी, मेथी, काहीपन घातले तर चालते..त्यातल्यात्यात tomato चे मला आवडते.. Happy

किट्टू साखर नको असेल तर आवळा सुपारी>>>> दिनेशदा बाकी तर माहिते.. पन मोरावळाच करायचा आहे..पण मला साखरेला दुसरा पर्याय हवा होता Happy

साधना आमचे एक कुर्गी शेजारी होते. ते साधारण अश्या फळांची कढी करायचे. हे फळ (बहुदा हेच) गॅसवर भाजून मग त्यात दही वगैरे घालून एक प्रकार करायचे. मस्त चव असायची त्याला.
मोरावळा साखरेशिवाय नाही व्हायचा.

तोषवी तु पु्र्‍या केल्यास का पाणीपूरी च्या पिठाच्या? कशा केल्या? कशा झाल्या? मला पण करायच्या आहेत.

साधना, ते passion fruit तर नाही ना?
असे दिसते का ते? असेल तर त्याचे सरबत करतात.
ह्याचे झाड लिंबाच्या झाडासारखेच असते. हल्ल्याळला बाबांच्या आजोळी याची झाडे होती. तिथे सरबत प्यालेले आठवते. नंतर खूप वर्षांनी नारिया(J&K) ला पाहिले झाड.

Paasion.jpg

प्राची, मुंबईत पॅशन फ्रूट सहज मिळत नाही. ( विकायला क्वचितच असते ) त्याचा वेल असतो (माझ्या घरी आहे ) ते पॅसिफ्लोरा कूळ, त्याची फूले कृष्णकमळाच्या फूलासारखीच पण हिरवट पांढरी असतात.
वरच्या फोटोत आहे त्यापेक्षा आणखी एक वेगळा प्रकार असतो, त्या फळाची साल किरमीजी असते आणि शिवाय एक वेगळा प्रकार त्याची साल केशरी आणि गर पांढरा असतो, अनेकांकडे त्याचे वेल बघितले आहेत. पण खुप लोकाना हे फळ माहित नसते.

Pages