गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.

(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)

मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.

हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.

गरोदरपणातील आहार

हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.

डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.

व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.

-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

maazi period chi cycle 45 days chi ahe..
3-4 Apr darmyan periods yena expected hota.. pan ale nahi mhanun kit warun test keliye ji +ve aliye.. gynae kade ata lagech jawa ki ajun 1-2 mahinyani?
plz kuni help karel ka ya baabteet?
aai n sa.ba bolatay ajun 1-2 months ni doc kade gelis tari chalel..
n tras wagere kahich hot nahiye.. thodi malmal janawate fakt diwasbhar..

अभिनंदन अवनी, तुम्ही लगेच गायनॅकची भेट घेतलेलं चांगलं. जरी त्रास होत नसला तरी बर्‍याचदा सुरवातीपासून आर्यन आणि कॅलशियम सप्लिमेंट्स दिल्या जातात. त्यादृष्टीने आणि एकंदरच सुरवातीच्या टेस्ट वैगरे करण्यासाठी लगेच भेट घेतलेली बरी. नंतरही डॉ.च्या सल्ल्याने दर महिन्या-दीड महिन्याला भेट घ्या.

अवनी, अभिनंदन!

१-२ महिन्यांनी नको, आत्ताच डॉक्टरांची अपॉईंटमेंट घ्या. त्यांनी प्रिस्क्राइब केलेले प्री-नेटल व्हिटॅमिन्स, फॉलिक अ‍ॅसिड सप्लिमेंट्स घ्यायला लागा.

कृपया ह्या धाग्याला मायबोलीच्या मुख्य पानावर आणायला मदत कराल का?
http://kanokani.maayboli.com/node/816 - हा कानोकानीमधला संयुक्ता आणि सुपंथतर्फे मदतीचा धागा आहे. जर तुम्ही '+' वापरुन धागा वर आणलात तर तो मुख्य पानावर दिसू शकेल. धन्यवाद.

सुरुचि आनोमोलि सोनोग्रफि रोपोट चाग्ले आलेत low lying plecenta अस सन्गित्ल डा. ने काय काल्जि घ्घावि लागेल?

अवनी अभिनंदन Happy
वरती म्हणतायत त्याप्रमाणे लगेच डॉक्टर कडे जाऊन या. आणी स्वतःच्या आहाराकडे आत्ता पासुन लक्ष द्या. म्हणजे बाळ छान गुटगुटीत आणि आरोग्यपुर्ण होईल Happy
तुम्हाला खुप शुभेच्छा.

फोलिक अ‍ॅसिड जितक्या लवकर घेता येइल तितके बाळाला चांगले पण डॉक्टरला विचारून घ्या. नारळाचे पाणी प्या बाळाची स्किन छान होइल. Happy

me 5 week pregnant ahe...me kay kalji gheu?ani kay khau karan mala diwasbhar malmal hoat aste...ani dr chi appointment lagech ghyvu ka?

रूहि, किती आठवड्यांचा स्कॅन आहे ? ( मागच्या पानावर लिहिलं असशील तर सॉरी. मी वाचलं नाहीये !)
पाचव्या महिन्याच्या स्कॅनमध्ये लो लाईंग प्लासेन्टा असेल तरी घाबरू नकोस. आठव्या महिन्यात पुन्हा स्कॅन करून घे. ( तुझे डॉक. सांगतीलच.) बहुतांशी केसेसमध्ये त्यावेळी प्लासेन्टा व्यवस्थित जागी असतो.
सध्या तू वजायनल ट्रॉमा होईल असं काही करू नकोस...उदा.- शारीरिक संबंध, जास्त ताण येईल असे व्यायाम.
थोडासा जरी रक्तस्त्राव झाला तरी लगेच डॉककडे जा.

एक मैत्रिण, डॉककडे लगेच गेलेलं केव्हाही चांगलं. गर्भावस्थेचा सुरूवातीचा काळ अतिशय महत्वाचा असतो. तू फोलिक अ‍ॅसिडचे सप्लीमेन्टस् लगेच चालू करायला हवेत.
मळमळण्याचा त्रास कमी करण्यासाठी -
१.उपाशी राहू नकोस. जे आवडेल ते थोड्या थोड्या प्रमाणात खात रहा. ( अर्थात फार तेलकट, तिखट सोडून. Happy )
२.फळं आणि भाज्या भरपूर खा.
३. सकाळी उठल्यावर लगेच चहा-कॉफी घेऊ नकोस. शक्य असेल तर बेडमध्ये असतानाच कोरडी बिस्कीटस्, टोस्ट वगैरे खा. १५-२० मिनिटे थांबून मग कामाला लाग. ( ह्यासाठी रात्री ब्रश केलेलं चांगलं !)
४.तरीही त्रास होत असेल तर डॉककडून गोळ्या घे. डॉक्सिलमाईन्+पायरिडॉक्सिन असलेल्या गोळ्या प्रेग्नन्सीमध्ये सुरक्षित असतात.

thank you Runuzunu......me reply chi vatach baghat hote. aata 22 weeks chalu aahe.
folic asid sathi Sysfol tablets chalu aahet facta khup kalji watte karan gharat doghanshivay karnara ajun konihi nahi aahe.pan Dr.ne bedrest pan karu nako asa sangitala aahe kama shakyato haluhalu karnyacha salla dila aahe.
Tras mhanje kadhitari baby khupach khali aalyasarkha watta aani bhiti watte.pay pan khup sujtat,tyasathi payakhali load gheun zopte.Ajun kay precautions ghave lagtil?

thanks avani...
@runuzunu-ho me dr chi appoitment ghetali ahe udaychi.......me sarkhi kahi na kahi khat ahe pan khoopch bhook lagat ahe.......ani mala far back pain hoat ahe....ani ajun ek home pregnacy test accurate result dete na?me khoop prashan vicharat ahe na....pan pahili vel aslyamule kahich samjat nahiye

रुही,
पायांवर सूज येत असेल तर प्रोटीन सप्लीमेंटस् चालू कर. त्याने सूज उतरणार नाही, पण तुझ्या शरीरातून नाहीसे होणारे प्रोटीन्स काही प्रमाणात भरून निघतील.....आणि बीपीवर लक्ष ठेव.

एक मैत्रिण,
होम टेस्टस् कधीकधी फॉल्स पॉझिटिव किंवा फॉल्स निगेटीव असू शकतात. शंका असेल तर पुन्हा करून बघ.
प्रेग्नन्सीमध्ये शरीरात अनेक हॉर्मोनल बदल होत असतात. त्यामुळे शरीरातील सांधे सैल होतात. ( प्रसूतीसाठी निसर्गाने चालू केलेली तयारी असते ती.) त्यामुळे अगदी पहिल्या महिन्यापासूनच ताठ आणि टेकून बसण्याची सवय जाणीवपूर्वक लावून घ्यायची. तरीही पाठ दुखत असेल तर वोलिनी जेल किंवा मूव्ह सारखं मलम लावायला हरकत नाही.

@runuzunu-me ale dr kade jaun....pregnancy positive ahe.....golya dilya ahet....pan mala kahich khavas vatat nahiye....me pranayam kele tar chalel ka?kesar ghalun dudh kadhi pasun gheta yeil.....tula je je mahit asel te sang
thanks for your support

नमस्कार,

मी मनी, माबोवर नविन आहे. इथे हा धागा पाहीला आणि काही प्रश्न विचाराय्चा मोह आवरला नाही. तसेच हा संपूर्ण धागा वाचल्याने बरिच माहीती मिळालीये...

मी ७ आठवडे प्रेग्नंट आहे पण आधीच माझं वजन ओबीज कॅटेगरित, (आयडीयल वजनाच्या जवळपास १५ कि जास्त) आहे पण मला राहून राहून फार टेंन्शन येतं की पुढे काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार!! इथे कुणाला माहीती असल्यास नक्की सांगा...

डॉक्टर म्हणतात की मी संपूर्ण प्रेग्नंसीमध्ये १५ पाउंड्सच वजन वाढू द्यावं, पण हे अगदीच शक्य कसं होइल?? मी न्युट्रिशनिस्ट्ची अपॉइन्टमेंन्ट घेतलीये पण ती अजून दोन महीन्यांनी मिळालीये.

सध्या मी अमेरिकेत आहे. मी बाहेर खाणं फार-फार कमी केलंय तसेच रोज घरीच बनवलेलं खातेय आणि संपूर्ण दिवसातून १ १/२ तासांचा वॉकपण घेते पण काही महीन्यांनी वजन अजून वाढल्यास काय इश्यूज येऊ शकतात? पहीलीच वेळ असल्याने जरा जास्त टेन्शन येतंय आणि माझं वयही २८ असल्याने आधीच उशीर झाल्यासारखा वाटतोय म्हणून काय उपाय करावेत? आणि कुठली आसनं करावीत माहीत असल्यास कृपया सांगा?

धन्यवाद,
मनी

मनी आणि इतर मैत्रिणिंनो,

पहिली गोष्ट म्हणजे चिंता करु नका. विनाकारण काळजी/टेन्शन घेण्याने नसती दुखणी उदभवतात.
माझे पण वजन जास्त आहे आणि मी आता तिशीत आलीय. मी आयुष्यात खाल्ल नाही इतकं गोड खाते आणि त्यातुन गेले ३ महिने बेड-रेस्टवर आहे तरीही माझं वजन (जे एरवी हवेनी पण वाढतं) ते ८ महिन्यात ६ किलोच वाढलं आहे. पण ते सगळं माझ्या बाळानी gain केल्याने त्याची growth normal आहे.
माझे cervix short असल्याने साधारण दर महिन्याला एक सोनोग्राफी होते. ६व्या महिन्यातच डिलीव्हरी होतीय काय अशी भीती होती तरी व्यवस्थीत बेड-रेस्ट, थोडीफार औषधं आणि डॉक्टरवर विश्वास ठेवुन अतिचिंता न करणं हे केल्यामुळं मला आता ८वा पुर्ण होइल आणि पहिली सगळी रिस्क क्रॉस झालीय.
आणखीन एक महत्वाची गोष्ट - हे सगळ्यांना पटेल असं नाही पण १०० जणांना सल्ले विचारु नये (हा मी सल्लाच देतीय). कोणी चुकीचं सांगत असं नाही पण प्रत्येकाची केस वेगळी असते. जेवढ्या जास्त लोकांशी चर्चा कराल तेवढे आपले confusion वाढते.

Runuzunu,
Dr.ne Protin sathi suliments na deta Protine power dili aahe HYMUL navachi ti saddhya ghet aahe.problem tar tasa kahich nahi aahe pan baby chya movments kupach khali janavtat.tyamule kalji wattey.baby weight 380Gms aahe 22 weeks pregnancy.
tasach sadhya me mumbai madhye aahe aani 7th month la aai kade jayacha plan aahe goa
2tyre A/c ne travel confirtable hoil ka?Dr.ne suggest kelay ki either train or Plan ne travel kar.pan travel 7th month madhye travel kela tar chalel ka?Distance 12Hrs aahe.

pregnacy मध्ये सुरवातीला पोटात खुप दुखत का? माझी date ७ दिवस पुढे गेली आहे. आणि मला दोन तीन दिवस खुप पोटात दुखतय. अजुन मी कोनतीहि test केली नाही.

मला खुप भीती वाटतेय....

दर्शना,
pregnancy madhye suruvatila 7 -8 weeks paryant cramp yetat,jase periods chya veles yetat tase,confirmation sathi होम टेस्ट karun ghe,home pregnancy test tula kontyahi medical stors madhye available hotil.
Ghabru naka.kahi veles perioda puthe delyane pan tasa hou shakta.

ईथे कोनि मला maternity cloths baddal mahiti deu shakta ka?sadharan kontya mahinyat purchase karavet?
konihi hasu naka pan mala size madhye confusion hotay.................

दर्शना,
तारीख पुढे गेलेली असताना खूप ( पाळीत दुखतं त्याच्यापेक्षा खूप जास्त ) पोटात दुखत असेल तर लगेच होम टेस्ट करून घे. पॉझिटिव असेल तर लग्गेच डॉक्टरकडे जा.
कॉम्प्लिकेशन्स असतातच असे नाही, पण असू शकतात.

मला pregnacy मध्ये करायचा व्यायामान्ची माहिती देउ शकेल का? किंवा अशी माहिती असलेला एखाद पुस्तक वगेरे..

अवनी बालाजी तांबेचं गर्भसंस्कार नावाचं पुस्तक आहे खूप उपयोगी पडलं मला माझ्या प्रेग्नंसीत Happy
त्यात आहार, व्यायाम सगळंच आहे अगदी बाळ १ वर्षांचं होईपर्यंत होणारे आजार आणि उपचार देखील आहेत. तुला सकाळच्या वेबसाईतवर ऑनलाईन मिळेल किंवा भारतात असशील तर पुण्यात नक्कीच मिळेल Happy

बालाजी तांबेच्या 'गर्भसंस्कार' बद्दल अनुमोदन. माझ्यासाठी ते गाईड आहे. सगळ्या सुचना पाळणं शक्य नसलं तरी जमेल तेवढं करावं. मला तर वाटत सुरुवातीची १-२ प्रकरण जनरल तब्येतीसाठी आणि दर महिन्याला कसा कमी त्रास होईल ह्याच्यासाठी पण उपयोगी आहे. बाळ होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आधीपासुन वाचलं तर अजुन उत्तम.

Pages