केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेग्युलर एकच शांपू वापरू नये.
ज्यादिवशी तेल लावलेले असते त्या दिवशी गार्नियर, डव्ह, पॅन्टीन, लॉरिअल, सनसिल्क असे रेग्युलर ब्रॅण्डस मधले शाम्पू वापरावेत तेल निघायला. पण डबल वॉश करू नये.
एरवी फॅब इंडीया, लश किंवा तत्सम हर्बल शाम्पू वापरावेत.
आठवड्यातून ३ वेळा केस धुवत असाल तर अल्टरनेट तरी तेल लावावेच.

ज्यादिवशी तेल लावलेले असते त्या दिवशी गार्नियर, डव्ह, पॅन्टीन, लॉरिअल, सनसिल्क असे रेग्युलर ब्रॅण्डस मधले शाम्पू वापरावेत तेल निघायला. पण डबल वॉश करू नये.
>> अनुमोदन. हे शाम्पू तिप्पट प्रमाणात (केस पातळ असल्यास चौपट) साध्या पाण्यात डायल्यूट करुन वापरावेत. थेट बाटलीतून डोक्यावर कधीही वापरु नयेत. वेगळ्या मगमधे मिक्स्चर करुन घ्यावे आणि मग केसावर घ्यावे. पाण्यात मिसळल्याने केसामधे शाम्पू नीट पसरुन लागतो हे एक आणि दुसरं शाम्पूमधल्या तीव्र रासायनिक घटकांचा परिणाम सौम्य होतो (शाम्पू कमी लागतो हे तिसरं).

इथे बॉम्बे स्टोअरमधे मिळणारा 'खादी'चा शॅम्पु-कंडिशनर कोणी वापरतं का? ही हर्बल प्रॉडक्टस आहेत. त्यावर लिहिलेली माहिती वाचुन आणि बॉम्बे स्टोअरमधली वस्तु म्हणुन मी आणलं आहे. वापरण्याआधीच जर फिडबॅक मिळाला तर चांगलं. नाही तर मी कौतुक/तक्रार करायला येइनच नंतर. Happy

खादीचा साबण वापरला. चांगला आहे.

खादी ब्रॅण्डचा शांपू कोणे एके काळी वापरला होता. ठिकच वाटला होता. एक कंडीशनर होतं ते तर पार अविकलेल्या फणसाच्या वासाचं होतं.
पण या शांपूंनी तेल अजिबात निघत नाही.
जेव्हा केस आपले आपण तेलकट होतात तेवढ्यापुरते ठिक आहेत हे शांपू.

अरे देवा, अशा वासाचा शॅम्पु लावुन माझंच डोकं दुखेल. घरी जावुन ताबडतोब वास चेक करायला लागेल नाही तर लगेच परत देता येइल.

खादीचा किंवा कोणत्याही ग्रामोद्योगातला शाम्पू, फॅब इंडियाचा शाम्पू वगैरेची तुलना सनसिल्क, पॅन्टिन तत्सम शाम्पूच्या फेस येण्याशी, पसरण्याच्या क्षमतेशी, केस स्वच्छ, तेलविरहीत, सुळसुळीत होण्याशी, सुगंधाच्या घमघमाटाशी केली तर उत्तर नाही येतं. पण हे शाम्पू सौम्य असणे हेच त्यांचे यूएसपी आहे हे समजूनच वापरावे. वर नीरजाने लिहिलेय तसे तेल लावल्यावर हे शाम्पू लावू नये. उपयोग होत नाही फारसा. पण हे शाम्पू दीर्घकाळ, कोणत्याही दुष्परिणामांशिवाय बिनधास्त वापरता येतात. केसांचा पोत कमी होत नाही.

कोणत्याही शाम्पूने केसांची गुणवत्ता कधीही वाढत नसते उदा. केस वाढणे, दाट होणे, काळे होणे इत्यादी. कोंडाही कायमचा कधीही जात नाही कोणत्याही शाम्पूने तसा दावा केला तरी. मग शाम्पू चांगला, वाईट याचे परिमाण कोणते असा प्रश्न येतो. शाम्पूची गुणवत्ता त्याचा नकारात्मक परिणाम किती कमी यावर ठरते. शाम्पूचा वापर केल्यावर केस गळायला लागले, वाजवीपेक्षा कोरडे झाले, पोत गेला तर तो आपल्याला सूट होत नाही, आपल्या केसांकरता तो अयोग्य असे समजून बदलावा.

अ‍ॅक्च्युअली शक्य असेल तर किमान महिन्यातून एकदा तरी शिकेकाई आणि बाकीच्या पावडरी एकत्र करून उकळून गाळून त्या पाण्याने केस धुवावेत. आणि धुवून झाल्यावर जास्वंद जेल मुळापासून टोकापर्यंत २० मिनिटे चोपडून बसावे, मग धुवून टाकावे.
खूप उपयोग होतो.
हे करण्याआधी तेल लावायचं नाही मात्र.

केसांच्या मेंटेनन्ससाठी फारच कष्ट आहेत राव. आपण शबाना आझमी आणि मल्लिका साराभाईंसारखी हेडशेवची फॅशन आणुयात का परत. किती चिंतांपासुन आणि कामापासुन सुटका. मेंटेनन्स एकदम सोपा. Proud

नंदिनी, खरंच गं. मी इथे मैत्रिणींना सारखी कन्विन्स करत असते, म्हणजे मला कंपनी मिळेल. तिथे आले तर सगळी जनताच टकली. कोण कोणाला हसणार? बरं तुझ्याकडे रहाण्याची सोय फुकट. Proud

पाणी न घालता मला भृंगराज वनस्पतीच्या पानाचा रस काढायचा आहे मिक्सरमधून. असे मिक्सर मिळते का बाजारात? मला अर्धा वाटी तरी पाणी घालावच लागत. मी पुर्वी दीड महिन्यातून एकदा केस कर्तनालयात जायचो. भृंगराज लावत असल्यापासून तीन आठवड्यातून एकदा जावे लावे लागत आहे. केस कापणारी व्यक्ती म्हणाली तुमचे केस आता जास्त काळेशार वाटत आहेत. एक दोन केस असे निघालेत की मुळातून काळे दिसत आहेत आणि शेंडे पांढरे अर्थात काही केस काळे व्हायला सुरवात झाली आहे.

वर सर्वांना सल्ला -- शाम्पू हा केसांसाठी खास हाणीकारक आहे. खास करुन आपल्यासारख्या शाकाहारी लोकांकरिता कारण जी लोक मासेबिसे नारळबिरळ खूप खातात त्यांचे केस एकूणच चांगले असतात. शाम्पूमुळे आपले केस लवकर खराब होतात. केसांच्या समस्या असणार्‍या व्यक्तिंनी आधी केस कमीतकमी करावे. शबाना किंवा मल्लिका सारखे दिसत असाला तर टकले वगैरे ठिक आहे पण नसाल तर कमीतकमी ठेवावे.

अंकुताई, आधी तू गुगलवरुन भृंगराज कशी दिसते ते बघ. तुला लगेच कळेल की ही वनस्पती आपण अनेकदा पाहिली आहे. कुठल्याही पाणथळी जागी जा आणि जिथे रानगवत वगैरे माजले आहे तिथे शोधून बघ. मला ही वनस्पती इथे सिंगापोरात अशाच ठिकाणी मिळाली जिथला निसर्ग मला ओबडधोबड वाटला. इतकी गुणकारी आहे ही वनस्पती की तुला काय सांगू! दोन तीनदा लावल्यानंतर लगेच तुला तुझ्या केसांच्या रुपारंगापोतात बदल घडलेला जाणवेल. गुगल कर.

वर नीरजा, शर्मिला आणि नंदीनी ह्यांनी शाम्पूबद्दल खूप हाणीकारक माहिती दिली आहे. खरचं ती माहिती विचारात घेऊ नका!!!!! सॉरी टू से!!!!!!!

ताई Uhoh बरं मी गुगलुन पाहिल होत आधीच.मी तरी नाही पाहिलच कुठे... त्यापेक्षा वैद्य खडीवाले च विकत आणलेल परवडेल.. पण मला ही तुमच्यासारखा प्रयोग करुन पाहायचा होता.. म्ह्णुन विचारले Happy

वर नीरजा, शर्मिला आणि नंदीनी ह्यांनी शाम्पूबद्दल खूप हाणीकारक माहिती दिली आहे. खरचं ती माहिती विचारात घेऊ नका!!!!! सॉरी टू से!!!!!!! >>>>

अरेच्चा Happy तुम्हाला ती माहिती विचारात घ्या म्हणायचं असणार नक्की. तुमच्या वाक्याचा चुकीचा अर्थ होतो आहे. Happy

नाही मनिमाऊ त्याला विचारात घेऊ नका असंच म्हणायचंय. Happy

कुठलेही शांपू वापरण्याच्या विरोधात आहे तो. आणि तो विरोधात आहे म्हणजे सगळ्या जगाने विरोधच करायला हवा असं आहे.

मी असं ऐकलंय, की केसाचा पोत कोरडा अस्ल्यास क्रीम बेस्ड व तेलकट असल्यास वॉटर बेस्ड (पाण्यासारखे पारदर्शी) शांपूज वापरावेत... हर्बल शाम्पूज मध्ये असे (क्रीम/ वॉटर बेस्ड) पर्याय उपलब्ध आहेत का?

जनरली हे असे पर्याय, लॉरियल, पँटीन, सन्सिल्क इ प्रकारात आहेतच.. पण वर म्हटल्याप्रमाणे, आठवड्यात तीनदा केस धूणे हा कार्यक्रम असल्यास एखाद्या व आदल्यादिवशी तेल न लावताच वॉश घ्यायचा तर हर्बल शाम्पूच योग्य...

सजेशन्स प्लीज!

थेट बाटलीतून डोक्यावर कधीही वापरु नयेत

मी आधी हेच करायचे. माझ्या डोक्यावरचे जिथे आपण नॉर्मली शांपु चोळतो तिथले केश ९५% शुभ्र पांढरे आहेत आणि डोक्याच्या मागच्या बाजुचे जेमतेम १०-२०%च पांढरे आहेत. हे थेट डोक्यावर बाटली ओतल्यामुळे झाले असणार हा शोध मला केस पांढरे व्हायला लागल्यावर झाला. Sad अर्थात जेनेटिक फॅक्टर आहेच माझ्या बाबतीत पण मीही तेवढाच हातभार लावला हे निश्चितच.

बी, पानांचा रस काढायचा तर पाणी घालावे लागणारच. मी निंबाच्या पानाचा रस काढते त्यातही पाणी घालावे लागतेच. पाणी न घातलाच रस निघायला हवा असेल तर मूळ घटकात तितके पाणी पाहिजे.


शबाना किंवा मल्लिका सारखे दिसत असाला तर टकले वगैरे ठिक आहे पण नसाल तर कमीतकमी ठेवावे.

टकले डोके सुंदर दिसायला ते आधी चेंडूसारखे गोल पाहिजे. माझे डोके एका बाजुने पार चेपलेय, त्याला टकले केले तर माझा अवतार आता दिसतोय त्याहीपेक्षा भयाण दिसेल.. Happy

मला कोणि शिकेकाईच्या प्रमाणाबद्ल आणि कुठ्ल्या वस्तू किती घालायच्या त्याबद्ल सांगेल का?

>>केसांच्या मेंटेनन्ससाठी फारच कष्ट आहेत राव. आपण शबाना आझमी आणि मल्लिका साराभाईंसारखी हेडशेवची फॅशन आणुयात का परत. किती चिंतांपासुन आणि कामापासुन सुटका. मेंटेनन्स एकदम सो>><<

मलाही कधी कधी अगदी असेच वाटते. पण हिंमत नाहीये ना...

बी ह्यांनी शिकेकाईबद्ल लिहलेले वाचले होते पण काल शोधताना सापडले नाही.
नीधप गवला,कचूला,नागरमोथा,रिठा,आवळापावडर एवढया वस्तु माझी आई घालायची अजून अ‍ॅड करायच्या असतील तर सांगा.मला मुलीसाठी शिकेकाईच हवी आहे.(प्रमाणात सांगीतलेत तर फार बरे होईल)

नीधप मी आत्ताच परत एकदा मागची काही पानं वाचली त्यात तुम्ही अस लिहले आहे की तुम्ही शिकेकाईचे प्रमाण टाकालं (एक दोन आठवड्यात) पण पुढच्या पानांवर दिसले नाही. तुम्ही ते प्रमाण टाकले आहे का असेल तर मी शोधेन
माझी आई सध्या पुण्यात आहे तिला तिथे सगळे सामान मिळेल्.मी इकडे दुबईत असते हो मला इथे काही मिळणार नाही.
पुढ्च्या महिन्यात मी देशात जाणार आहे म्हणजे मला तेव्हा आयती तयार शिकेकाई मिळेल म्हणून माझी धडपड.प्प्लीज कळवा.

मागे पान २१ वर बी ने प्रमाण दिलंय

"
आवळ्याची पावडर विकत आण. रोज संध्याकाळी किंवा सकाळी अर्धा तास अगोदर भिजवून ती केसांना लाव. फार जलद गतीने केस काळे होतात. वर जुई म्हणते तशी एकचं गोष्ट तू सातत्यांनी कर. बदामाची काहीचं गरज नाही.

केस धुताना आधी तेल जाव म्हणून शांपू लाव व मग शेवटी पावडर भिजवलेली असते ती डोक्यावर लावून त्यातले पाणी डोक्यावर घ्यायचे. असे केले के शांपूचे वाईट परिमाण कमी होतात. आधी पावडरीची पाणी डोक्यावर नको घेऊस.

पावडर तयार करताना शिकेकाई सगळ्या वस्तूंच्या १० पट जास्त घ्यायची. एकून प्रमाण हे १०:१:१:१:१:१ असे असायला हवे. अर्थात रिठा, नागरमोथा, माका, ब्राम्ही, आवळाकंठी हे सर्व फक्त १ असायला हवे.

आवळ्याची पावडर स्वस्त मिळते. ती एक दोन किलो विकत आण. मला अकोल्याला ह्या सर्व वस्तू छान मिळाल्यात. आवळ्याची पावडर पातळसर भिजवून तिचा लेप केसांना लावून तो लेप अर्धा तास ठेवून मग केस धुवून टाकायचे. हे असे रोज केले तर उत्तम.

"

@मनिमाउ शी पूर्ण सहमत.
टक्कल करुन फक्त बाहेर जाताना विग वापरायचा विचार खूप दिवसापासून मनात आहे. पुण्यात चांगले, स्वस्त विग कुठे मिळतील कोणी सांगेल का?

Pages