सफरचंदाचे झटपट लोणचे

Submitted by नलिनी on 23 August, 2011 - 04:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सफरचंद २
जिरे
मोहरी
हळद
मिठ
लाल तिखट
हिंग
तेल

क्रमवार पाककृती: 

सफरचंद धुवून कोरडे करुन घ्यायचे.
एका भांड्यात चवीप्रमाणे (अंदाजे पाव चमचा) मिठ घ्यायचे. त्यात सफरचंदाच्या हव्या त्या आकाराच्या फोडी करुन टाकायच्या. भांडे हलवून घ्यायचे. सगळ्या फोडींना मिठ लागले की सफरचंदाचा रंग बदलत नाही.
त्यावर तेलात केलेली, जिरे, मिहरी, हळद, तिखट, हिंगाची फोडणी घालयची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
५ मि. खायला तयार.

loncha.jpg

अधिक टिपा: 

आवडीप्रमाणे फोडणीचे साहित्य बदलू शकता.
सफरचंद कच्चे, आंबट असेल तर चांगलेच. नसेल तर नेहमीचे सफरचंद पण छान लागते.
फ्रिजमध्ये २-४ दिवस टिकायला हवे. माझ्याकडे एका दिवसातच संपते.

माहितीचा स्रोत: 
आस्मादिक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू पण फिरवी सफर्चंदे जास्त आंबट असतात त्यामुळे त्यांचच छान लागेल बहुतेक Happy
तसही आप्ल्या कडची लाल सफरचंद बरेचदा रवाळ निघतात

हं आणि एक म्हणजे जर घरात मेथीची पूड असेल तर तीही चिमूटभर फोडणीतच घालायला हरकत नाही.
खमंग लागेल.

नलिनी, हे लोणच आत्ताच केल! granny smith apple वापरून. अतिशय जबरा रेसिपी. मस्त टेस्ट आली आहे. मी फक्त एक टेबलस्पून किसलेला गूळ घातला. बाकी मानुषीची टीप पण अमलात आणाली.

लोणचं दिसतंयपण मस्त :).
फार पूर्वी एका गुजराथी काकूंकडे खाल्लं होतं. त्यांनी गूळ जरा अंमळ सढळ हस्ते वापरला होता. फोडणीत मेथ्या आणि हिंग जरा जास्त होतं. मस्त आंबट, गोड, किंचीत कडू अशी मस्त चव आली होती.

थोडे लिंबु पिळलेले चालेल बहुदा>>> आरती, नक्कीच चालेल.

घरात मेथीची पूड असेल तर तीही चिमूटभर फोडणीतच घालायला हरकत नाही.>> मानुषी, ज्यांना मेथी आवडते त्यांच्यासाठी नक्कीच चालेल. मीपण घालून पहाणार.

एक टेबलस्पून किसलेला गूळ घातला. >>> कल्पू, ज्यांना गूळ आवडतोय त्यांच्यासाठी नक्की चालेल.
सफरचंद जर गोड असेल तर मग गुळाची गरज नाही भासणार.

आडो, लिंकसाठी धन्यवाद.

छान फोटो. मी नेहमीचं कैरीचं लोणचं करतो त्याच पद्धतीने( केप्र /बेडेकर) लोणचं मसाला घालून करते. फक्त कैरीच्या फोडींऐवजी हिरव्या सफरचंदाच्या फोडी.
कैरीची तहान हिरव्या सफरचंदांवर Proud

मस्त रेसिपी. आज करून पाहिली. लिंबाच्या रसाऐवजी मी बुंदीच्या पाकिटासोबत येतो तो आंबटगोड मसाला घातला होता थोडासा भुरभुरून. (चाट मसालाही चालेल बहुतेक!) पुरेसा होता तेवढाच. छान चव आहे ह्या लोणच्याची. तिखटाचा व सफरचंदाच्या गोडीचा एकत्रित स्वाद छान वाटतो.