Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राईसब्रान तेलावर मागे
राईसब्रान तेलावर मागे लोकसत्ता मध्ये माहिती आली होती, चतुरंग च्या खाद्यविभागात बघा, किंवा लोकरंगच्या आहारचर्या यात वाचा. तसेच श्री आणी सौ च्या भाताचे प्रकार या विशेषांकात सुद्धा माहिती होती. यात कोलेरेस्टॉल नाही. स्वयंपाकात वापरु शकता.
टुनटुन, थँक्स गं. शोधते.
टुनटुन, थँक्स गं. शोधते. मलापण ते जुनं साहित्य किंवा समोर लिखाण नाहीत अशी लोक शोधणं अवघडच जातं.
टेट्रा पॅकचे दूध उकळले तर
टेट्रा पॅकचे दूध उकळले तर चालते. पॅकवर जे वाक्य असते त्याचा अर्थ 'दूध उकळणे गरजेचे नाही. न उकळता फ्रीजमध्ये ठेवले तरी दूध टिकू शकते' असा होतो. मध्यंतरी जवळजवळ अडीच वर्षे टेट्रा पॅकचे दूध वापरले आहे. फ्रीज नसल्याने रोज उकळत होते.
पॅक उघडल्यावर एकतर उकळून ठेवावे किंवा पॅक फ्रीजमध्येच ठेवावा. न उघडता पॅक बाहेर आरामात तीन महिने राहू शकतो. >>> +१
अगदी. मी पण कधी अचानक गरज पडली जास्त दुधाची / मिळाले नाही तर म्हणुन १-२ टेट्रा पॅक ठेवते घरात. फ्रिजमधे वा बाहेर पण ते टिकतात. काहीजण प्रवासात पण नेतात. पण एकदा फोडले की फ्रिज मस्ट नाहितर संपवायचे. २-४ लहान मुले असतील प्रवासात तर खुपच उपयोगी आहे ते. मला नेहेमी प्रश्ण पडतो की ते कमी क्वांटीटी मधे का नाही मिळत. उपयुक्त प्रकार आहे तो.
राईसब्रान तेल नॉर्मल
राईसब्रान तेल नॉर्मल तेलासारखे वापरु शकता. गुणवत्तेबाबत माहिती नाही पण काही. जे लोक ग्राहक चा सामान घेतात त्यांना विचारा. त्यात असते राईसब्रान तेल.
टेट्रापॅकमध्ये अमुल ताझा आणि
टेट्रापॅकमध्ये अमुल ताझा आणि इतरही कंपन्यांचे दुध येते, त्य पॅकवर ते दुध उकळू नये असे लिहिलेले असते. मला कोणीतरी सांगितले की ते दुध उकळले की फाटते.म्हणून आम्ही आजपर्यंत कधीच आणले नाही.
मी जे ऐकलय ते खरं आहे का? या दुधाचा चहा नाही बनू शकत का?
>>
हे दूध उकळले तरी चालते पण उकळण्याची गरज नसते. डायरेक्ट पिता येते. चहात वापरता येते. साधे दूध ज्या पदार्थात वापरतात, त्या सगळ्यात वापरता येते. पण माझ्या हातून तरी त्याचं दही नीट लागत नाही. आणि बासुंदी वगैरे प्रकारासाठी ते फारसे आटत नाही. म्हणजे साय वगैरे येत नाही. मी मागचे ३-४ वर्ष रोज हेच दूध वापरतेय.
अमुल ताझा जरा जास्त घट्ट आणि क्रिमी आहे. तसं नको असेल तर इतर बरेच ऑप्शन्स आहेत. उदा.नेस्ले चं ०.३ % फॅट असलेलं स्लिम मिल्क.
मला नेहेमी प्रश्ण पडतो की ते
मला नेहेमी प्रश्ण पडतो की ते कमी क्वांटीटी मधे का नाही मिळत. उपयुक्त प्रकार आहे तो.
>> मोनाली अमुल चे माझा वगैरे सारखे छोटे पॅक ही मिळतात ...काही कंपन्याचे तर त्यात फ्लेवरस ही असतात ..स्पेन्सर वगैरे सारख्या दुकानात शोध.नक्की मिळेल..
मृनिश, मला वाटतं तुम्ही
मृनिश, मला वाटतं तुम्ही म्हणताय ते पॅक्स अमुल फ्रेश क्रीम चे असतात. किंवा फ्लेवर्ड मिल्क चे असतात. माझ्या माहितीप्रमाणे अमुल ताझाचे छोटे टेट्रापॅक्स नाही मिळत.
अरे नाही मृनिश्..तुमचं बरोबर
अरे नाही मृनिश्..तुमचं बरोबर आहे. ५०० आणि २०० मिली चे टेट्रापॅक्स आहेत. धन्यवाद माहितीबद्द्ल.
http://toi.amul.com/fresh-tazza.html
इतके दिवस निव्वळ गैरसमजातून
इतके दिवस निव्वळ गैरसमजातून आम्ही टेट्रा पॅ़क आणत नव्हतो. धन्स सर्वांना माझा गैरसमज दूर केल्याबद्दल.
(No subject)
अरे नाही मृनिश्..तुमचं बरोबर
अरे नाही मृनिश्..तुमचं बरोबर आहे. ५०० आणि २०० मिली चे टेट्रापॅक्स आहेत. धन्यवाद माहितीबद्द्ल.
http://toi.amul.com/fresh-tazza.html>>>> अरे वा आता दुकाने शोधली पाहिजेत मग. पण सगळीकडे १ लि. चेच पॅक असतात
रच्याकने - ते अमुल ताक तब्येतीला कितपत चांगलेय? माझा मुलगा ऑप्शन मिळाला तर तोज २ टेट्रा पॅक पण पितो. मी शक्यतो ते लपवुन ठेवते पण तो फ्रिजमधे घुसुन शोधतो.
त्यावर लिहिलेय प्रिझर्वेटिव्ह नाही म्हणुन पण तरी ते रोज पिणे चांगले का?
मी राजमा भिजवलाय आणि आता
मी राजमा भिजवलाय आणि आता रात्री करायचाय. पण अगदी टिपिकल पंजाबी राजमा चावल वाली रेसिपी हवी आहे.
दिनेशदा तुमची रेसिपी पाह्यली पण दुधवाली रेसिपी नको आहे , टिपिकल पम्जाबी हवी आहे. आज सम्ध्याकाळपर्यन्त मिळाली तर बरं होईल.
अपल्ना तू मदत करु शकतेस का?
ध्न्यवाद लोक्स
मोनालीपी हे छोटे चोटे
मोनालीपी हे छोटे चोटे टेट्रापॅक मलाही हवे आहेत. पुर्वी नेस्लेचे मिळायचे पण हल्ली बाजारात तरी कोणाचेच नाही मिळत.
मिळाले तर इकडे जरुर कळवणे.
मनीषा, बित्तुबंगाने लिहीलेली
मनीषा, बित्तुबंगाने लिहीलेली आहे बघ रेसिपी. मोती चावल का काहीसं नाव आहे.
मिळाले तर इकडे जरुर कळवणे.>>
मिळाले तर इकडे जरुर कळवणे.>> नक्की ग.
रचाकने - ते कांदा- टोमॅटो तडकाचा पॅक वापरला आहेस का कधी पंजाबी डिशेससाठी? त्यानेही चांगली चव येते छोले / राजमा ला.
राजम्यासाठी मी 'एमडीएच'चा
राजम्यासाठी मी 'एमडीएच'चा राजमा मसाला वापरते नेहमी. एक्दम मस्त होतो राजमा.
मोती चावल मिळाले ग प्राची,
मोती चावल मिळाले ग प्राची, धन्स.
मोनाली कांदा- टोमॅटो तडकाचा पॅक काय असतं , कोणता ब्रॅन्ड , कुठे मिळेल?
तुला नागपुरला पाठवायाच्या
तुला नागपुरला पाठवायाच्या कुरियरच्या खर्चात, लोकली अजुन ५ जार्स विकत घेता येतील पुण्यात असतीस तर लगेच दिले असते. >>>> मनीमाऊ, मी आहे पुण्यात
अग कुठेही मिळतो. जस आले-लसुण
अग कुठेही मिळतो. जस आले-लसुण पेस्ट मिळते तसे. तुझ्या घराच्या बाजुला रिलायन्स मधे ट्राय कर. पिवळ्या रंगाचे पॅक असते. बहुदा क्नॉर वा मॅगी. नक्की नाही आठवते.
स्निग्धा, कधीपण. तु
स्निग्धा, कधीपण. तु 'बाजुवाली गलीमें' तर रहातेस. घरी यावं लागेल ही शर्त आहे.
मोनालीप, नॉर नाही गं. मॅगीचा 'वेज भुना' असं काहीसं आहे बहुतेक. कांदा-टोमॅटोची ग्रेवी पेस्ट आहे तीच ना?
मॅगीचा 'वेज भुना' असं काहीसं
मॅगीचा 'वेज भुना' असं काहीसं आहे बहुतेक. कांदा-टोमॅटोची ग्रेवी पेस्ट आहे तीच ना?>>> तेच ग तेच.
मनीषाचा राजमा तर पचला पण असेल आतापर्यंत.
स्निग्धा, कधीपण. तु 'बाजुवाली
स्निग्धा, कधीपण. तु 'बाजुवाली गलीमें' तर रहातेस. घरी यावं लागेल ही शर्त आहे. >>> येस नक्की. By the way, परवा (सोमवारी) आपण क्रॉस झालो, सोलापुर रोडवरुन तुम्ही Camp च्या दिशेने जात होतात आणि मी त्या चौकातल्या पेट्रोल पंप जवळ रोड क्रॉस करण्यासाठी (गाडीवर) थांबले होते.
स्निग्धा, तो तर माझा ऑफिसचा
स्निग्धा, तो तर माझा ऑफिसचा रस्ता. माझा सेल नंबर संपर्कातुन टाकते. तुझा मला समसमधे पाठव.
मध्ये दिनेशदांनी वेगवेगळ्या
मध्ये दिनेशदांनी वेगवेगळ्या डाळींची क्रुती एकाच नोड मध्ये दिलेली.
कोणी इथे लिंक देउ शकता का?
रीमा, दिनेशदांच्या 'लेखन'
रीमा, दिनेशदांच्या 'लेखन' मध्ये शोधता येईल तुला ती कृती.
मागच्याच पानावर त्यांचा प्रतिसाद आहे, तिथे त्यांच्या आयडीवर क्लिक केलंस की तुला त्यांच्या सदस्यत्त्वाचा 'लेखन' टॅब दिसेल.
वरणाचे प्रकार, असे नाव होते.
वरणाचे प्रकार, असे नाव होते. मी पण बघतो.
१४८७२ हा नोड आहे तो. (माधवने शोधून दिला होता.)
मॅगीचा 'वेज भुना' असं काहीसं
मॅगीचा 'वेज भुना' असं काहीसं आहे बहुतेक. कांदा-टोमॅटोची ग्रेवी पेस्ट आहे तीच ना..... तो मॅगीचा भुना मसाला. कोणत्याही वाणसामानाच्या दुकानात मिळेल. भाज्या, ग्रेवि साठि मस्त.....
ओके मंजुडी
ओके मंजुडी
दिनेश्दा तो नोड सार्वजनिक करु
दिनेश्दा तो नोड सार्वजनिक करु शकाल का? सध्या फक्त ग्रुप साठी आहे.
मिळाला. निवडक १० मध्येच ठेवते
मिळाला. निवडक १० मध्येच ठेवते आता.
http://www.maayboli.com/node/14872
Pages