पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसरी, साखर नसणार ते प्रवाळभस्म असते. उन्हाळ्यात सगळ्यांनी अवश्य खावा तो.

आईने भरपुर मक्याची कोवळी कणसं आणुन टाकलीयेत!
काय करावं काही सुचत नाहीये. काही रेसिपी सांगा लोक्स!
मला फक्त मक्याचा सांजा माहितीये.

आर्या, आरतीने कणसांच्या धिरड्यांची कृती लिहीली आहे बघ इथेच माबोवर.
झालंच तर कणसाचे दाणे काढून मीठ घालून उकडून वरून कांदा टोमॅटो, लिंबू कोथिंबीर, हवा असल्यास चाट मसाला घालून संध्याकाळी चहाबरोबर खाता येईल.
कणसाचे तुकडे करून मीठ, तिखट घालून उकडूनही छान लागतात खायला. Happy

नयना, मक्याची कोवळी कणसं म्हणजे बेबी कॉर्न आहेत का? ( मज्जाच आहे मग.) कि नेहमीचेच मोठे कॉर्न पण कोवळे आहेत. ( फार वैताग असतो साफ करणं. )

बेबी कॉर्नची भाजी मी दर आठवड्याला करते. त्याचे क्रिस्पी बेबी कॉर्नही छान होतात.
कोवळी कणसं मात्र फार वाया जातात. काढतानाच तुटुन जातात दाणे.

धन्स प्राची. Happy धीरडे करुनच बघते. धीरडे म्हणजे माझा आवडता पदार्थ.

<<झालंच तर कणसाचे दाणे काढून मीठ घालून उकडून वरून कांदा टोमॅटो, लिंबू कोथिंबीर, हवा असल्यास चाट मसाला घालून संध्याकाळी चहाबरोबर खाता येईल.,<<
हो हो...ते लक्ष्मी रोडवर कोपर्‍यावर कोपर्‍यावर विकतात तसे ना! तेही मस्त चटपटीत लागतं!

बेबी कॉर्न नाहीयेत गं मने! नेहमीचे मोठे कॉर्न पण कोवळे आहेत अजुन.

अगदी कोवळे आहेत तर लवकर संपवावे लागतील, नाहीतर सुकत जातात.
त्याचा रस काढून, गाळून, दूधात मिसळून बासुंदी करता येते. छान क्रिमी लागते पण साय येत नाही. त्यामूळे ज्यांना लच्छेदार रबडी / बासुंदी आवडत नाही, त्यांना आवडते.

आर्या, स्वीट कॉर्न सूप कर Happy जास्त करुन ठेवलस तर फ्रिझ देखिल करता येइल Happy त्यात हवे तर चिकन पणघालु शकतेस.

पराठ्यांसाठी स्टफिंग म्हणुन पण वापरता येइल. हवा तो मसाला/कांदा वगैरे घालुन सारण बनवायच आणि पराठ्यात स्टफ करायचं.

कॉर्न समोसे करायचे Happy

कोरडी डाळ कशी करायची?
एकदा मैत्रिणीच्या आईने डब्यात दिली होती, ती खाल्ली होती. फक्त डाळ आणि तिखट, मीठ होतं.
डाळ अगदी जस्ट शिजलेली , एक कणी कमीच.
मस्त चव होती झणझणीत. कोणाला माहित असल्यास प्लिज कृती सांगा.
मला हा प्रश्न पडलाय, की कुकरला डाळ लावली तर अगदीच गिर्र शिजते, मग ती या रेसिपीत वपरू नाही शकणार. कशी शिजवायची मग? आणि डायरेक्ट तव्यात टाकली तर शिजायला खूप वेळ लागेल ना?

कुठली डाळ होती ?
मुगाची असेल तर अर्धा तास आणि तूर किंवा चणा डाळ असेल तर तासभर भिजवावी लागेल. मग फोडणीवर टाकून, झाकण ठेवून पाण्याचा हबका मारत शिजवायची.

मूगाच्या डाळीसाठी आणखी एक पद्धत म्हणजे, जास्त पाणी घेऊन ते ऊकळायचे
आणि मग त्यात भिजवलेली डाळ टाकायची. आपल्याला हवी तेवढी शिजली, कि
चाळणीत उपसायची. पाणी पूर्ण निथळले कि फोडणीवर परतायची. अशी डाळ कमी
तेलात होते आणि मधला वेळचा पदार्थ, म्हणूनही खाता येते.

मुगाची, मसुराची डाळ १५-२० मिनीट पाण्यात भिजवून नंतर फोडणीत घालायची. (आम्ही अश्या डाळींच्या फोडणीत लसूण आणि कांदा घालतो) आणि पाण्याचा शिपका मारून, झाकून शिजवायची. १०-१२ मिनीटात शिजते.

दिनेशदा आणि अल्पना, अशी डाळ पोळीबरोबर वा नुसतीच खाताना कोरडी नाही का लागत? तोठरा नाही का बसत तिचा?

मंजू माझ्या आईला बसतो तोठरा अशी डाळ खाताना. मी खाऊ शकते. Happy किंचीतशी सरसरीत पण करता येते हवं तर. भाज्या नसल्या तर डब्यात घेवून जायला सोप्पा ऑप्शन असायचा शाळेत असताना. किंवा रात्री पिठल्याऐवजी कोरडी मसुराची /मुगाची डाळ.

हम्म्.. डब्यात नेण्यासाठीच विचारत होते. Happy
दुष्काळातील कांदा बटाटा रस्सा, बटाट्याच्या काचर्‍या इत्यादी भाज्यांना पर्याय म्हणून Wink

माझ्या आईने एकदा केलं होतं . ़की लाइम्स (ट्रेडर जो मध्ये हमखास असतात) च्या फोडि करुन कुकरमध्ये शिटी न लावता वाफवून घेणे...मग एका वाटीत अंदाजे हळ्द , लाल तिखट, मीठ आणि साखर ( ऐच्चिक) एकत्र करुन ते वाफवलेल्या लिंबांमध्ये घालणे.. लिंबामध्ये पाण्याचा अंश राहू देउ नये असं काहीतरी ती म्हण्ते... मी आळ्स करुन स्वतः केलच नाहीए..कधीतरी केल पाहिजे Wink

धन्स...सर्वांना! एकेक प्रयोग चालु आहेत. Proud

<<आर्या कणस किसुन त्यात उकडलेले बटाटे, भाज्या, गाजर टाकुन कटलेट बनव. छान लागतात.<<

हेच सर्वप्रथम केले अनु! मस्त झाले होते. Happy

लाजो...वॉव! मस्त सुचवलस! कॉर्न समोसे करुन बघते आज! Happy

मी_चिऊ, कणकेचे/बेसनाचे लाडू करतात तसेच मुगाचे लाडू करतात. मुगाचे रवाळ पीठ तुपात खमंग भाजून त्यात पिठीसाखर मिसळून लाडू वळतात.

ओक्के.
धन्स मंजुडी.

पण डाय्रेक्ट पिठीसाखर मिसळायची का? कारण रव्याच्या किंवा बेसनाच्या लाडु साठी आम्ही पाक करतो, पिठीसाखर नाही घालत.
पिठीसाखर घालुन वळता येतात ना?

बेसनाचे लाडू तुम्ही जसे करता तसेच हे मुगाचे लाडू करा. तेच प्रमाण, तीच कृती फक्त बेसनाऐवजी मुगाचं पीठ.

Pages