पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर ईडली राईस वापरला तर ईडली आणि तांदळाचे प्रमाण कसे घ्यायचे? आम्ही ईडली आणि दोसे दोन्ही करतो. प्रमाण बदलायला हवे का? मेथीच्या सुक्या बीया भिजवून त्याही सारणात वाटल्यात तर काही खास फरक पडतो का? माझे दाक्षिणात्य मित्र नेहमी मेथीच्यी बीया ईडली दोश्यात वापरतात. धन्यवाद.

विदर्भात "भेंडोळ्या" म्हणून एक वाळवणाचा प्रकार करतात. माझे बाबा अधून मधून त्यांचे पाककृतीचे खास वैदर्भीय प्रकार घरात ट्राय करतात. त्यात हा प्रकार त्यांनी एक-दोनदा केला आहे. पण आमच्या विशेष पसंतीस कधी उतरला नाही. अ‍ॅक्च्युअल पाकृ काय आहे इथे कुणाला माहीत आहे का? माझे बाबा हा प्रकार अशा पद्धतीने करतात.
कोवळी भेंडी घेऊन बारीक चिरायची आणि बत्त्याने चेचून घ्यायची.
भाजीची कच्ची पपई घेऊन किसायची.
मग चेचलेली भेंडी + पपईचा कीस + मीठ + भाजलेले तीळ हे मिश्रण मिक्सर मधून जाडसर फिरवायचं. थोडंसं पाणे आपोआप सुटतं त्यामुळे स्वतःहून अजिबात पाणी घालायचं नाही. ह्या मिश्रणाच्या मग पातळ वड्या / पापड्या प्लास्टीकवर थापून उन्हात चांगल्या कडकडीत वाळवायच्या. वाळवणाच्या डब्यात भरून ठेवायच्या. जेवताना आयत्या वेळी तळून (डीप फ्राय) खायच्या.

यात अजून काही व्हेरीएशन्स माहीत आहेत का कुणाला?

निंबुडा, असा प्रकार कोहोळ्याचा किस/ तूकडे घेउन करतात. त्यात थोडे पोहे घालतात. बांइडींग साठी थोडी भेंडी घालतात. गवारी पण असते. मग त्यात थोडा चिंचेचा कोळ आणि पोहे घालतात.
त्याचे असेच सांडगे घालतात. कोल्हापूर, गोवा इथे बघितलाय हा प्रकार.

मी वाशी ला केरला हाऊस मधे कच्च्या केळ्याची भाजि खाल्लि. बटाटाच्या काचरया सारखी केली होती भाजी पण चव खूप छान होती. अप्रतिम . तशीच भाजी मी घरी करून बघितली पण सुकी झाली आणि चव पण तितकीशी नाही खास झाली.
कुणाला कृती माहिती आहे का?
south Indian जेवण आवडनार्यासाठी मस्त पर्याय आहे केरला हाउस.

सामी कच्ची केळी घेऊन त्याचे साल काढुन त्याच्या फोडी कर. तेलात नेहेमीप्रमाणे हिंग, हळद टाक, पण मोहरी न घालता उडदाची डाळ घाल. नंतर त्यावर चवीप्रमाणे तिखट, मीठ आणी सांबार मसाला भुरभुरवुन टाक, थोड्या वेळाने भाजी उतरव. एकदम सही लागते ही भाजी. माझ्या साऊथ इ. मैत्रिणीने दिली होती मला ही भाजी आणी रेसेपी.

तिखट घातलेच पाहिजे असे नाही. आणी केळी मात्र सोलाण्यानेच सोलता येतील अशी कच्ची हवीत. मात्र ही भाजी आमटी किंवा सांबार भाताबरोबरच छान लागते, पोळी वा तत्सम पदार्थांबरोबर अजीबात चांगली लागणार नाही.

Thanks टुनटुन.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. भाजी सांबर राईस बरोबरच छान लागते. आता तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने करून पाहीन.

आईने प्रेमाने नातवासाठी राजगिरा लाह्याची पाकिटे धाडली आहेत आणि नातवाने हे सिरियल मला आवडले नाहीत असं डिक्लेयर केलंय.... Proud थोडक्यात दूधात नाही खायचा...
आणखी काय करता येईल..प्लीज मी चिक्की कधी केली नाहीये त्यामुळेउगाच पाका-बिकाची टेंशन कामे सोडून काही सुचवता येईल का??? Happy

भडंग.
हळद, तिखट, मीठ फोडणी घाल. पॉपकॉर्न आवडत असतील तर पॉपकॉर्न म्हणून खाईल कदाचित.

मी येवल्याला गेले होते तिथुन आठ \ दहा बेलफळे आणली आहेत. त्यांच काय काय करता येईल?
आणि सध्या बरक्या फणसाचे १५० गरे आहेत घरात आणि सांदणं करुन कंटाळा आलाय, फणसपोळ्या करायच्या तर पाऊसच सुरु झालाय , कळतच नाहीये काय करु , काहीतरी छान करावं वाटतय, जरा गाईड [रेशीपीसह] करा की लोक्स
बेलफळांच काय करु तेही रेश्पीसह सांगा

आगाऊ धन्यवाद हं

मी येवल्याला गेले होते तिथुन आठ \ दहा बेलफळे आणली आहेत. त्यांच काय काय करता येईल?
आणि सध्या बरक्या फणसाचे १५० गरे आहेत घरात आणि सांदणं करुन कंटाळा आलाय, फणसपोळ्या करायच्या तर पाऊसच सुरु झालाय , कळतच नाहीये काय करु , काहीतरी छान करावं वाटतय, जरा गाईड [रेशीपीसह] करा की लोक्स
बेलफळांच काय करु तेही रेश्पीसह सांगा

आगाऊ धन्यवाद हं

बेलफळाचे सरबत = फळातला गर + साखर + मीठ + पाणी + लिंबाचा रस (आवश्यकतेनुसार)
बेलफळाचा मोरांबाही करतात, पण त्याची कृती ठाऊक नाही.

फणसाचा टिकाऊ हलवा

मामी,
अगदी वरीजीनल रेसिपी म्हणजे मैदा, अंडी, गोव्याचा गूळ आणि नारळाचे दूध असे सगळे एकत्र सरसरीत भिजवायचे.
मग एक मोठे पातेले घ्यायचे व त्यावर बसेल असे झाकण घ्यायचे. त्यात पातळ तूप टाकायचे. मग त्यावर अगदी पातळ थर बसेल, असे हे मिश्रण टाकायचे. मग झाकणावर नारळाची सोडणे पेटवून ठेवायची. तो थर ब्राऊन झाला कि दुसरा थर द्यायचा, असे थरावर थर शिजवत जायचे. (भांडे आचेवर ठेवायचे नाहि)
घरी करायचे तर ग्रिल वापरुन करता येईल.

अरे वा, दिनेशदा. लग्गेच मिळालीही. एकेक थर रचत जायचं? ह्म्म.... तरीच ते लेअर्स दिसतात. किचकट काम आहे.

दिनेशदा, बिबिन्का मुंबईत माहिमला फ्रेश कॅचमध्ये मिळते. पण ते पार्सल देतात की नाही माहित नाही. मुंबईत आणखी कुठे मिळतं का? (पाकृ जर्रा कॉम्प्लिकेटेड दिसली की आमचा निश्चय लगेच ढेपाळतो.)

मामी, वांद्र्याला जिथे गोवन लोकांची वस्ती आहे तिथे नक्कीच मिळत असणार, अर्थात गोव्यात सुंदर पॅकमधे आणि घरगुति रुपात पण, मिळते.

हेका, माझी आई बेलफळाचा मुरंबा करते. तिला विचारून लिहीन. खूप पौष्टिक असतो.
घरी कोणाचे पोट बिघडले/ पोट दुखत असेल तर हमखास औषध.

दिनेशदा , तुम्ही सांगितल्या प्रमाणे फणसाची भाजी केली , छान झाली. आभारी आहे.

सामी, माझी खुप आवडती भाजी आहे ती !

बंगालात आणि पूर्वाचलात, बेलफळे नुसतीच न्याहारीला खातात. तिथे बेलफळे आकाराने मोठी असतात.

ठाण्यात, रेल्वेलाईनजवळच (कळव्याच्या दिशेने, डाव्या बाजूला ) मोठ्या बेलफळाचे झाड होते. अजून आहे का ?

मागच्या वेळी भारतातून येताना बाजरीचे सान्डगे आणले आहेत. कसे वापरता येतिल? आमटी मध्ये घाल असे आई म्हणाली. आजुन काही करता येइल का?

बाजरीचे सांडगे, दाणे, बारीक चिरलेला कांदा, वरून लिंबू.... ओहोहोहो...
हवेतर ते सांडगे जरा परतून फुलवून घे.

हा प्रश्न अस्थाई आहे माहिती आहे तरीही विचारते,
पुण्यात ब्लु बेरी / क्रॅन्बेरी (ड्राईड पण चालेल) कुठे मिळेल.

Proud

Pages