पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोषवी, व्हेज? नॉनव्हेज?? दोन्ही?

डेली सेक्शनमधे मिळणारे कोल्ड कट्स, चीज, स्पायशी मेयो, रीफ्राईड बीन्स, साल्सा (आटवून), कच्च्या किंवा इटालियन सीझनिंगसह परतलेल्या भाज्या, पीनटबटर-जेली, क्रीमचीज्+बारिक चिरलेला कांदा-ढोबळीमिर्ची असं आणि बरंच काही करता येईल.

तोषवी, ह्यातील तुला कोणते प्रकार सोयीचे वाटतात ते बघ :

१.चीज स्लाईसेस/क्यूब्ज किंवा किसलेले चीज, त्यावर रंगीत सिमला मिरची उभी चिरून. मिरपूड.
२.मेयॉनीज व त्यावर किसलेले गाजर/ कोबी / स्वीट कॉर्न, मिरपूड, कोथिंबीर.
३. चीज, केचप, कोथिंबीर.
४. लोणी, टोमॅटो - कांदा चिरून, कोथिंबीर.
५. केचप, तिखट शेव, कांदा, कोथिंबीर.
६. काकडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर.
७. चीज, कॅनमधील पायनॅपल, पाकवलेली चेरी / टूटीफ्रूटी / जॅम/ फ्रूट प्रिझर्व्ह.
८. पनीर भुर्जी + कोथिंबीर.

हो दिनेशदा... पण हे तुप अन्सॉल्टेडपेक्षा खुप छान लागतं... मी हेवी व्हींपींग क्रीमला विरजण लावून ठेवलं आणि मग रवीने घुसळून लोणी काढलं आणि त्याचं तुप कढवलं, . माझ्या मुलीला द्यायला म्हणून मला सायीचं तुप बनवायचं होतं पण अमेरिकेतल्या दुधाला साय नावाचा प्रकार माहीतच नाहीये. Lol मग मी ट्रेडर जो मधलं सायचं दुध वापरून पाहीलं पण ते १/२ गॅलनच मिळतं म्हणजे बर्‍यापैकी साय जमायला बरेच दिवस जातात.
मग म्हटलं क्रीम म्हणजे सायच आहे की ट्राय तर करून बघूया... मस्त तूप आणि खुप सारं ताकही बनलं. मला तरी भारतातल्या तुपासारखंच छान वाटलं, अनसॉल्टेड बटरच्या तुपाला मला एक कसला तरी वास येतो, सायकॉलॉजीकल असेल कारण बर्‍याच लोकांना तेही तुप आवडतं...
क्रीमला विरजण न लावता नुसतंच फेटलं तर व्हीप्ड क्रीम बनतं आणि त्यानंतरही फेटत राहीलं की घट्ट लोणी बनतं पण आईच्या म्हणण्याप्रमाणे खरं तुप म्हणजे सायीला विरजण लावून, लोणी काढून मग कढवलेलं म्हणून मी या पध्द्तीने बनवून पाहीलं.
कॉस्टको होलसेल्च्या दुकानातून दोन डब्बे क्रीम आणलं की १ कि. पर्यंत तूप निघतं... पण गेल्यावेळेस कमी बेरी निघालेली, या वेळेस जास्त, कारण काय असावं बरं?

मनी

मनी, कारण तेच. मिल्क सॉलिड्स राहिले. घुसळून त्यातले लोणी काढले कि
पांढरे व्हे बाजूला झाले पाहिजे.

रच्याकने, बेरीची चव आणण्यासाठी नाचणीचे पिठ भाजून त्यात कोको आणि थोडे
मसाले (दालचिनी, लवंग, वेलची) मिसळले तर चालू शकेल.

तोषवी,
१. पुदिना चटणी, कांदा, टोमौटो, सिमला मिर्ची, बारिक चिरुन, टोमेटो सोस, घालावा,
२. उकड्लेला बटाटा, बारिक चिरलेला कांदा, तिखट, गोड चटनी, बारिक शेव
३. चिज, मिरिपूड

मनी, तुम्ही हेवी व्हिपींग क्रिमला विऱजण लावले म्हणजे कसे ते लिहा ना पाकृचा वेगळा धागा काढून. ( खूपच बेसिक वाटेल हा प्रश्ण पण मी कधीच केले नाहीये असे म्हणून उत्सुकता.):)

माझ्याकडुन इड्लीच पीठ करताना पाणि जास्त पडलं .. अजून आंबायला अवकाश आहे. तोवर काही इतर घालुन ते जाड करता येईल का?

वेका, पातळ पोहे चालतील. पण नुसते घालु नकोस. इडलीच्या थोड्या पातळ पिठात १०-१५ मिनीटे घालुन ठेव. नंतर मिक्सर मधुन काढ.

मला प्रवासासाठी मेथीचे ठेपले करुन न्यायचेत बरोबर. माझ्याकडे बादशहा ची भरपुर कसुरी मेथी आहे. मग मला नेहमीची ताज्या मेथीची पानं वापरण्याऐवजी कसुरी मेथी घालून ठेपले करता येतील का/ म्हणजे त्याची काही वेगळी पध्दत आहे का? कारण मी ताज्या चिरलेल्या पानांना आलं- लसुण- मिरची बारीक करुन लावुन मग त्यात थोड दही [प्रमाणच आठवत नाहीये आता Sad ] घालुन त्यात धने जीरे पुड थोडसं बेसन व कणीक तेल घालून भिजवते. पण कसुरी मेथीचे कधीच केले नाहीयेत.
आणि हे ठेपले गॅस मोठ्ठा करुन भाजायचे की मंद गॅसवर भाजायचे तेही आठवत नाहीये.

आगाऊ धन्यवाद हं Happy

मनिषा, टिकाऊ ठेपल्यांसाठी आलं-लसूण-मिरची नको. कसूरी मेथी गरम तव्यावर शेकवून घे. म्हणजे त्यात काही दमटपणा असलाच तर निघून जाईल. कणकेत मीठ, हळद, हिंग, लाल तिखट चवीप्रमाणे मिसळून ओवा हातावर चुरडून घाल. शेकवलेली क.मे. चुरून त्या कणकेत मिसळ. तेल आणि हवं असल्यास बेसन मिसळून घे. मग नेहमीसारखी पराठ्याची कणिक भिजव. पराठा लाटून दोन्ही बाजू जरा शेकवून तेल सोडून व्यवस्थित मध्यम गॅसवर भाज. एकेक तयार झालेला पराठा सुट्टा सुट्टा पेपरवर किंवा कापडावर ठेव. पराठे एकावर एक ठेवू नकोस. पंखा न लावता सगळे पराठे पूर्ण थंड झाले की पॅक करून घे. साधारण गुजराथी दुकानात जिराळू नावाचा एक मसाला मिळतो, चवीसाठी म्हणून वाटल्यास तयार पराठ्यांवर जरा जरा शिंपडता येईल.

मंजुडी धन्स ग.
हे जिराळु ठाण्यात कुठे मिळु शकेल ?
आणि दही नाही का घालायचं? दह्यानी मऊपणा येतो ना?

जिराळूचा तू शोध घे.
प्रवासासाठी टिकाऊ करायचे असतील तर मी दही घालत नाही.

घंटाळी समोरच खाऊ/लोणची/मसाले इ. मिळणारे एक दुकान आहे तिथे मिळेल जिराळु. त्याच दुकानात रुखवतासाठी लोणची, मिठाया इ. चे पॅकिंग करुन मिळते. ठाणेकरांनी दुकानाचे नाव सांगावे कृपया. श्रद्धा ?

मोनॅको टॉपिन्ग्ज हिट ठरली पार्टीत.
मी वेजी क्रॅकर्स आणले होते.त्यावर २ प्रकाराने टॉपिंग्ज केले
१)उकडलेला बटाटा स्वीट कोर्न,कांदा,पुदिना आणि गोड चटणी वरतून बारीक शेव आणि कोथिंबीर.
२)चिज स्लाईस त्रिकोणी कापून त्यावर काकडी चा काप वर मेयो आणि सोअर क्रीम फेटून त्यात \थोडी मिरपूड्,आणि त्यात लाल आणि पिवळी सिमला मिर्ची बारीक कापून.
धन्यवाद आयडीया दिल्याबद्दल!

साधी तांदळाची खिचडी बनवण्यासाठी कोणते तांदुळ वापरावेत. बासमती तर वापरु नये अस कुठेतरी वाचलेल. आंबेमोहोर , सुरती की अजुन दुसरे कोणते.

यंदाच्या समर मधे जरा ईंडियन फ्लेवर्सचे आईसक्रीम्स घरी बनवुन बघावे म्हणत आहे. आहेत का काही रेसिपीज, आयडियाज? किंवा बेसिक आईसक्रीमची रेसिपी पण चालेल, त्यात व्हेरीएशन्स करता येतिल. मध्यंतरी कोणीतरी सिताफळ आईसक्रीम सांगितलेलं, पण त्यात कुठ्ल्यातरी powders होत्या, त्या अमेरिकेत कुठे मिळवाव्या कळलं नाही. इथे मिळणारे half n half, heavy cream etc वापरुन होणार्‍या असतील तर बरं Happy

नमस्कार लोक्स,

मी १कि राजगिर्याच्या आणल्या आहेत.त्याचे काय करता येइल

सानुली,
इथे आहेत बहुतेक, बेसिक आईस्क्रीमच्या कृती.

अनुराधा, राजगिर्‍यांच्या लाह्याची चिक्की, लाडू करता येतात. नूसत्या दूधात भिजवून
नाश्याला खाता येतात किंवा जरा शिजवून खीर करता येते.

हसरी,
गुलकंद तसाच खाता येतो कि. पण दूधात घालून मिल्कशेक, बर्फी, आईसक्रीम, करंज्या करता येतात. खायच्या पानात घालून छान लागतो. जेवणात चपातीबरोबर, किंवा जेवल्यानंतर दूधाबरोबर खाता येतो.

तो असाच खायला आणला होता. राणिबागेत भरलेल्या प्रदर्शनामध्ये घेतला होता पण त्यातली साखर कणीदार आहे. त्यामुळे खाताना कचकच लागतयं म्हणून विचारलं.

Pages