Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(तूपाच्या) बेरीचे लाडू
(तूपाच्या) बेरीचे लाडू
प्राची खूप धन्यवाद गं तुला
प्राची खूप धन्यवाद गं तुला आणी पौर्णिमाला ( कृतीबद्दल )
चिकन खिमा बरा जमायला लागला
चिकन खिमा बरा जमायला लागला म्हणुन मटन खिमा घेऊन आले पण त्याची एकही सोपी रेसिपी सापडत नाही आहे. प्लीज एखादी सोपी व चविष्ट रेसिपी सुचवा? मटन खिमा चिकन खिम्यासारखाच पटकन शिजतो का? की त्याला शिजवण्यासाठी काही एक्स्ट्रा करावे लागते?
(मी स्वतः शाकाहारी असल्याने मला मांसाहारातलं जास्त समजत नाही , माबोवरच्या रेसिपी वाचुनच लेकीसाठी व नवर्यासाठी बनवायला सुरवात केली आहे त्यामुळे कृपया माझ्या बालिश प्रश्नांना हसु नये)
़खिमा पाव ही कशी
़खिमा पाव ही कशी वाट्ते...माबोवर आहे का माहित नाही पण इथे नॉण वेज रेसिपी डिटेलवार असतात...Enjoy
धनस मेधा!!छान आहेत प्रकार..मी
धनस मेधा!!छान आहेत प्रकार..मी sprouts मधून आणला होता..वेका तुझी लिंक पण छान आहे ग..चला खूप प्रकार मिळाले..
वेका धन्यवाद! जवळपास ह्याच
वेका धन्यवाद! जवळपास ह्याच रेसिपीने मी चिकन खिमा करते पण मटन खिमा चिकनच्या खिम्या इतकाच पटकन शिजतो का? की त्याच्या वेगळ्या रेसिपीज असतात ते कळत नाही आहे. याबाबतीत मार्गदर्शन कराल का?
विनार्च - मटण खिम्याचे पण
विनार्च - मटण खिम्याचे पण चिकन खिम्यासारखेच प्रकार करता येतात. 'Mince' असल्यामुळे फार जास्त वेळ नाही लागत.
दिपक, धन्यवाद! बॅन्ड्राच्या
दिपक, धन्यवाद!
)
बॅन्ड्राच्या बार्बेक्यु नेशनमधे बटाट्याची एक डिश सर्व्ह करतात "कॅजुन पोटॅटो".(लेकीला फार आवडते म्हणुन नाव विचारुन घेतले). त्यात बर्बेक्यु केलेले बेबी पोटॅटो वर गुलाबीसर सॉस असतो व बारिक चिरलेला कांदा असतो. कुणाला माहित आहे का त्याची रेसिपी ??? (मला ते बटाटे तळलेले वाटतात व सॉसमधे मेयो+मस्टर्ड्+ हॉट न स्वीट च कॉम्बीनेशन वाटल. मी तस बनवुन पाहिलं चव जवळपास जाणारी होती. जर कुणाला ऑथन्टीक रेसिपी माहित असेल तर शेयर कराल का? प्लीज
कुणाला कोकणस्थांमधे
कुणाला कोकणस्थांमधे दिव्याच्या आमावस्येला कणकेचे गुळ घालून दिवे करून उकडवतात त्याचे प्रमाण / कॄती माहीती आहे का?ह्यात पाक करायचा असतो का नुसत गुळ पाण्यात भिजवायची कणिक?
तोषवी, कणीक आणि गूळ जेवढ्यास
तोषवी, कणीक आणि गूळ जेवढ्यास तेवढा. अर्थात तुमच्या गोडाच्या आवडीनुसार प्रमाण कमीजास्त करू शकता. गूळ आधी गरम पाण्यात विरघळवून घ्या आणि त्यात तेल, आवडत असल्यास चिमूटभर मीठ आणि आणखी लागेल तसं पाणी घालून पोळ्यांसाठी भिजवतो तशीच कणीक भिजवा. मग दिवे करून चाळणीवर साधारण १० मिनिटं उकडा. तूप घालून खा.
धन्यवाद.उद्याच करून
धन्यवाद.उद्याच करून पाहते.उद्या दिव्यांची आवस आहे.
तोषवी वर स्वातीने लिहीले
तोषवी वर स्वातीने लिहीले आहेच, तसेच प्रमाण घेऊन मग त्यातला गुळातच भिजवलेला भाग वेगळा काढुन त्यात थोडी बेकींग पावडर किंवा खायचा सोडा चिमुटभर टाकुन वाफव/ उकडवुन घे. ते पण छान फुलतात.
हे दिवे आमच्या देशस्थात पण करतातच, दिवे घे.:दिवा::फिदी:
(No subject)
@ विनार्च, काजुन / काझुन सॉस
@ विनार्च,
काजुन / काझुन सॉस साठी:
2 tsp जीरे, 2 tsp धणे, 2 tsp बडीशेप एकत्र तव्यावर कोरडे भाजुन घे. थंड झाले की त्यात 2 tsp पाप्रिका/लाल तिखट्/कश्मिरी लाल तिखट + 2 tsp मोहरीची पावडर + 2 tsp ओरेगानो चुरडुन घालुन
बारिक कुटुन घे. 1/2 tsp लसूण पेस्ट आणि 2 tsp कांद्याची पेस्ट तव्यावर थोडी परतुन त्यात हा कुटलेला मसाला घाल आणि गॅस बंद कर. थंड झाले की त्यात मेयो / चिज सॉस घालुन सॉस बनव. आनि रोस्टेड बटाटे किंवा कुठल्याही भाज्यांवर घालुन खा
Cajun
Cajun Potato
http://www.youtube.com/watch?v=iQD7mk400i8
अळूवडीचे आपले मराठी पद्धतीचे
अळूवडीचे आपले मराठी पद्धतीचे फिलिन्ग काय आहे? मी बेसन, दाण्याचे कूट, तिखट मीठ, काळा मसाला व चिंचेचा कोळ हे एकत्र करून पानाला लावते. बरोबर आहे का?
दाण्याचे कूट नाही, बाकी सगळे
दाण्याचे कूट नाही, बाकी सगळे बरोबर आहे. अणि चिंचेच्या कोळाबरोबर थोडा गूळ हवा.
धन्यवाद
धन्यवाद
.
.
अश्विनी, यात शिराळे किसून,
अश्विनी,
यात शिराळे किसून, आले मिरचीची वाटण, बेसनाबरोबर थोडे तांदळाचे पिठ, (चालत असेल तर कांदा, लसूण आणि करंदी पण !) वापरता येते. कोळाच्या ऐवजी आंबट दही वापरले तर आणखी वेगळी चव येते.
शिराळे, व करंदी माहीत नाही.
शिराळे, व करंदी माहीत नाही. बाकी समजले. दही पण अस्तेच घरी.
आश्विनीमामी मध्यंतरी टीव्हीवर
आश्विनीमामी मध्यंतरी टीव्हीवर एका सुप्रसिद्ध पाककृती लेखिकेने सल्ला दिला होता की अळुच्या वड्या वळायच्या अगदी ५ मिनिटे आधी त्या सारणात गुळ घालायचा, म्हणजे वड्या कुरकुरीत होतात. सारण तयार करतांना गुळ घालु नये, नाहीतर वड्या मऊ होतात. अर्थात हा त्यांचा अनूभव होता. मी अजून तसे करुन पाहिले नाही, कारण घरी अळु वड्या खाणारे कमी. लेखिकेचे नाव आठवत नाही, बहुतेक धुरु असावे.
आणी बेसनाऐवजी तुम्ही भाजणीचे पीठ घालुन बघा, खमंग होतात.
शिराळे म्हणजे दोडका आणि करंदी
शिराळे म्हणजे दोडका आणि करंदी म्हणजे अगदी लहान प्रॉन्स / कोलंबी.
इथे कुणाला विमानात मिळतो तसा
इथे कुणाला विमानात मिळतो तसा टॉमेटो ज्युस कसा करतात ते माहीत आहे का ? असल्यास प्लीज रेसेपी शेअर करावी ही विनंती.
मला कोबीची भाजी >>>>फक्त भजी
मला कोबीची भाजी >>>>फक्त भजी ह्या फॉर्म मधे जाते
म्ह्णुन मी बारीक चिरलेली कोबी,,बेसन पीठ,गुळ ,चिंचेचा कोळ,मीठ्,हळ्द्,तिखट अस सारन अळुच्या पानांना लावुन मग त्याच्या वड्या करते... अस पण छान लागत
विमानात कसा असतो वेगळा? ताजे
विमानात कसा असतो वेगळा? ताजे लाल टोमाटो घेऊन मिक्क्षर मधून काढायचे. काढताना जरुरीपुरते गार फ्रिज मधले पाणी घालायचे, मीठ मिरेपूड किंचित साखर. पण. मग गाळून घ्यायचे. खरे तर घरचा जास्त छान लागेल कारण प्रिझर्वेटिव्ह नाही जे विमानातील रसात नक्की असेल. रस करण्यात एकच तोटा आहे. सर्व फायबर निघून जाते. काही फूड प्रोसेसर मध्ये आपसूकच गाळून निघते.
नाही आश्विनीमामी. विमानातील
नाही आश्विनीमामी. विमानातील रस चवीला खरेच चवदार असतो. घरी तसा प्रयत्न केला पण नाही जमला तितका. टॉमेटो तर काय रोज खाल्ले जातातच. पण तुम्ही म्हणता तसे प्रिझर्वेटिव्हज असले तरी चव मात्र इतर फळांच्या ज्युसपेक्षाही सरस होती. इथे वर्णन करता येत नाहीये, पण कुणी तो प्यायला असेल तर त्याला / तिला फरक नक्कीच जाणवेल.
टुनटुन, अगं विमानातले ज्युसेस
टुनटुन, अगं विमानातले ज्युसेस काही कोणी बनवले असण्याची शक्यता कमीच. तेसुद्धा ब्रॅन्डेड ज्युसेसच सर्व करतात. मार्केटमधे चेक कर ना, टोमॅटो ज्युस कोणकोणत्या कंपनीचे मिळतात. मी या रविवारीच बॉक्स पाहिला होता, पण नको म्हणुन नाव पाहिलं नाही. गेस, ट्रॉपिकाना किंवा रिअल चा होता. पुढच्या रविवारी परत बघुन सांगु का?
चालेल गं मनीमाऊ. ते विमानात
चालेल गं मनीमाऊ. ते विमानात बनवत नाहीतच, पण कुठल्या कंपनीचा होता ते पण आठवत नाही. मी बाहेरचे ज्युस एवढे ट्राय नाही केले ( म्हणजे अननस, लिची आणी डाळिंब सोडले तर ). पण तुला मिळाला तर जरुर सांग. धन्यवाद गं.
अगं विमानात बनवतात असं नाही
अगं विमानात बनवतात असं नाही म्हणायचं होतं मला. जनरली ते ब्रॅन्डेड ज्युसेस देतात कारण ते टेट्रा पॅकमधे असं म्हणायचं होतं मला.
बघुन नक्की सांगेन.
Pages