Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
flying Jatt मूवी लहान
flying Jatt मूवी लहान मुलांसाठी आहे. पूर्वी छोटा चेतन नामक मूवी कमी किमतीची तिकीट लावून शाळेत दाखवली जायची तशीच योग्य ते बदल करून (बिट पे बुटी गाणं वैगरे ) हि मूवी लहान मुलांना दाखवता येऊ शकते.
flying Jatt मूवी बघणेबल
flying Jatt मूवी बघणेबल नक्किच आहे. बूटीवाल्या गाण्याची तशी काही गरज नव्हती.
जोक्स तसे चांगले आहेत.
कुणी आपल्या मुलाचं नाव
कुणी आपल्या मुलाचं नाव "टाईगर" कसं ठेवू शकतो?
टोपण नाव असेल. जॅकी तरी कोठे
टोपण नाव असेल. जॅकी तरी कोठे मूळ नाव आहे.
हो 'टायगर' श्रॉफ चं खरं नाव
हो 'टायगर' श्रॉफ चं खरं नाव जय श्रॉफ आहे. लहानपणी तो म्हणे लोकांना चावायचा आणि ओरबडायचा म्हणून त्याला जग्गू दादा कौतुकाने टायगर म्हणू लागले
लहानपणी तो म्हणे लोकांना
लहानपणी तो म्हणे लोकांना चावायचा आणि ओरबडायचा म्हणून त्याला जग्गू दादा कौतुकाने टायगर म्हणू लागले >>>
लहानपणी त्याने हलकटपणा केला असता तर अशोक म्हणू लागले असते कदाचित
लोल मंदार, पायस. त्याला
लोल मंदार, पायस. त्याला "धनंजय माने" नावाने लॉन्च केले आहे असे डोळ्यासमोर आले.
जय श्रॉफ? जॅकी सुद्धा जयकिशन का असे काहीतरी आहे ना?
मंदार ७० रुपये फिक्स सायनिंग
मंदार
७० रुपये फिक्स सायनिंग अमाऊंट का मग? 
फा - बरोबर, जयकिशन श्रॉफ
लहानपणी त्याने हलकटपणा केला
लहानपणी त्याने हलकटपणा केला असता तर अशोक म्हणू लागले असते कदाचित ....हे समजलं नाही!
कोण अशोक?
जॅकी चं "हीरो" तलं नाव जैकिशनच तर होतं.. त्याचा पहिला सिनेमा.... नाजूक, देखण्या मीनाक्षी शेषाद्री सोबतचा !! काय सुंदर गाणी, आणि किती सुंदर मीनाक्षी!
काय सुंदर गाणी, आणि किती
काय सुंदर गाणी, आणि किती सुंदर मीनाक्षी!>> जॅकी पण छानच दिसतोय त्यात.
Tiger cha real naav Jay
Tiger cha real naav Jay hemant shrof ahe
हेमंत का? जय जयकिशन श्रॉफ हवे
हेमंत का? जय जयकिशन श्रॉफ हवे ना?
की हे विदेशी 'मेरी अॅना' वगैरे सारखे डबल नाव आहे?
त्या फ्लाईंग जाट film मध्ये
त्या फ्लाईंग जाट film मध्ये मला त्याचा भाऊच आवडला फक्त, त्याने छान काम केलं आणि त्यालाच मारलं
.
Jai kishan mala vatata jacky
Jai kishan mala vatata jacky cha ahe
Jai kishan mala vatata jacky
Jai kishan mala vatata jacky cha ahe
रफीचे 'गुलाबी आँखे जो तेरी
रफीचे 'गुलाबी आँखे जो तेरी देखी' हे सदाबहार गाणे मी खूप वेळा पाहिलंय. गाण्याची नशा अशी आहे की पडद्यावर काय चाललंय तिकडे लक्ष असूनही लक्ष नसते. काल परत एकदा कितव्यांदा तरी गाणे पाहात असताना सुरवातीच्या राजेशच्या उड्या जाम विनोदी वाटल्या. मग गण्यावरचे लक्ष थोडे कमी करून फक्त आणि फक्त पडद्यावर लक्ष दिले. भयानक हहपुवा लागली. त्या अगम्य धावाधावीतही प्रसंगावधान राखून अधून मधून त्याला येणाऱ्या त्या तीनच जगप्रसिद्ध स्टेप्स करायची राजेशची धडपड बघून अजून हसायला येते.
इच्छूकानी लाभ घ्यावा हि विनंती.
गुलाबी आखे काय पण? व्हिस्की
गुलाबी आखे काय पण?
व्हिस्की प्यायलीय का नायिका? की चुलीच्या धुरात काम करुन आलीय?
दोघेही भांग प्यायलेत हे
दोघेही भांग प्यायलेत हे नक्की. भांगेच्या तारेत माणसे म्हणे एकच action सतत करत राहतात.
'गुलाबी आँखे जो तेरी देखी' >>
'गुलाबी आँखे जो तेरी देखी' >> हो तो आणि ती जे काय उड्या मारत करतात त्याला काय म्हणावे असा प्रश्न पडला होता. "मी सुपरमॅन मी सुपरमॅन" अशी अॅक्शन करतो आहे काका बहुतेक
याला "इया उवा तुळ तुळ " च्या
याला "इया उवा तुळ तुळ " च्या वरचा रँक मिळेल की खालचा?
तुळ तुळ फारच उच्च आहे. तुलनाच
तुळ तुळ फारच उच्च आहे. तुलनाच नको कारण हे गाणे तरी ऐकायला खुप सुंदर आहे
गुलाबी आखे हे गाणं श्रवणीय
गुलाबी आखे हे गाणं श्रवणीय आहे, पण जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा तेव्हा नंदा बाईंचे डोळे आले आहेत असं वाटत रहातं.
तसच ते हिमालय की गोद में मधलं, 'चाँद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैने सोचा था, हा तुम बिल्कूल वैसी हो, जैसा मैने सोचा था' हे एक गाणं. म्हणजे, माझ्या काही फार मोठ्या महत्वाकांक्षा नव्हत्या, त्यामुळे माझ्या लो / मिड बजेट अपेक्षांमधे तू जशी आहेस, तशी बसलीस, अशा काहीतरी अर्थाचं वाटतं.
तसच ते हिमालय की गोद में
तसच ते हिमालय की गोद में मधलं, 'चाँद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैने सोचा था, हा तुम बिल्कूल वैसी हो, जैसा मैने सोचा था' हे एक गाणं. म्हणजे, माझ्या काही फार मोठ्या महत्वाकांक्षा नव्हत्या, त्यामुळे माझ्या लो / मिड बजेट अपेक्षांमधे तू जशी आहेस, तशी बसलीस, अशा काहीतरी अर्थाचं वाटतं. >>>
हो पण त्या गाण्याचा अर्थ तसाच आहे की मी चंद्रासारखी सुंदर प्रेयसी मागितलीच नव्हती आणि मला जशी हवी होती तशी तू आहेस, म्हणजे साधी सोज्वळ वगैरे. कडव्यांमधून तो अर्थ जास्त स्पष्ट होतो.
"हो पण त्या गाण्याचा अर्थ
"हो पण त्या गाण्याचा अर्थ तसाच आहे" - मग ठीक आहे. भलतच रिअॅलिस्टीक गाणं आहे.
तो डॉक्टर realisticच आहे हो.
तो डॉक्टर realisticच आहे हो. शहरातून खेड्यात येतो, शिबिर चालवायला, मग तिथेच थोडे दिवस मुक्काम करतो. शेवटी कंदिलाच्या उजेडात ऑपरेशन पण करतो.
त्यामुळे माझ्या लो / मिड बजेट
त्यामुळे माझ्या लो / मिड बजेट अपेक्षांमधे तू जशी आहेस, तशी बसलीस, अशा काहीतरी अर्थाचं वाटतं. >>>
फेमिनिस्ट लोकांनी यात एक कडवे अॅड करायची सक्ती केली पाहिजे माला सिन्हाच्या तोंडी - "तू तरी कोठे एवढा भारी लागून गेला आहेस. आधी तोंडावरचा हात काढ..." वगैरे
फारएण्ड, एकदा मनावर घ्याच आणी
फारएण्ड, एकदा मनावर घ्याच आणी सार्थ करा तुमचं ब्रीदः 'आमच्या ईथे पिच्चर चा तर्कार्क काढून मिळेल'
फेमिनिस्ट लोकांनी यात एक कडवे
फेमिनिस्ट लोकांनी यात एक कडवे अॅड करायची सक्ती केली पाहिजे माला सिन्हाच्या तोंडी - "तू तरी कोठे एवढा भारी लागून गेला आहेस. आधी तोंडावरचा हात काढ..." वगैरे

पण मनोजकुमार त्याच्या सुरवातीच्या काही चित्रपटांमधे खरंच देखणा दिसायचा बरं का

भारत भूषणही घुंघट चित्रपटात सुटाबुटात देखणा दिसला होता
आता हे नियम सिद्ध करणारे अपवाद म्हणायचे!
फेरफटका, नक्की हो मनोज कुमार
फेरफटका, नक्की
हो मनोज कुमार दिसायला काही वाईट नव्हता, निदान तरूण असताना. पण हे कडवे म्हणजे केवळ प्रत्युत्तर म्हणून.
मनोज कुमारने सुरवातीला फक्त
मनोज कुमारने सुरवातीला फक्त दिसण्याच्या बळावर चांगले आणि नंतर पैशांच्या बळावर वाईट अत्याचार केलेत लोकांवर त्याच्या सिनेमाकरवी हेमावैम. अत्याचाराला तितकाच सार्थ सकारात्मक शब्द सापडत असेल तर तो वर चांगले शब्दानंतर घाला.
भाभु आणि प्रदीपकुमारही तरुणपणी देखणे होते. त्यांचे केवळ तेवढेच बळ होते. लोकांना अशोककुमारहि देखणा वाटायची शक्यता आहे, पण मला त्याचा लूक कायम चरित्र अभिनेत्यासारखा वाटला.
Pages