Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जख्मी कुंकू! नावच अचाट आहे.
जख्मी कुंकू! नावच अचाट आहे.
जख्मी कुंकू >> अरारारा पायस
जख्मी कुंकू >> अरारारा पायस
मला वाटतं पायस व फारेंड यांनी
मला वाटतं पायस व फारेंड यांनी "सिनेमाबद्दल बोलु काही" नावाचा कार्यक्रम करावा.
पायस अलका कुबलला
पायस
अलका कुबलला अंडरएस्टिमेट करू नकोस. ती हे पण करू शकते -
इवाउवा तुळतुळ >> गाणं कहर
इवाउवा तुळतुळ >>
गाणं कहर आहेच पण ते युट्युबवर शोधणार्या धनिची मात्र कमाल आहे, रिस्पेक्ट!
त्यांचा मोबाईल हॅक करून त्यांना कॉल आला की कॉलर रिंगटोन म्हणून यातल्या ओळी वाजतील असे करा >>>
असा प्रकार पुर्वी केला आहे.
एकदा आम्ही स्टुडंट लोक 'एक रात्र मंतरलेली' पिक्चर बघत होतो. त्यात सारखं एक भूत की आत्मा येउन 'तुझ्यामुळे मी फिरतो आहे होउन वनवासी' असं काहीतरी गाणं म्हणायचा. आमच्यातला एकजण पहील्यापासूनच त्या गाण्याला प्रचंड वैतागला होता. पुढेपुढे तर ते गाणं आलं की तो (इथे लिहीता न येण्यासारख्या) शिव्याच द्यायला सुरु करायचा.
मग मी त्या गाण्याची mp3 त्याच्या लॅपटॉपच्या startup sound मधे टाकून दिली. प्रत्येक वेळी लॅपटॉप बूट होताना गाणं सुरु व्हायचं आणी त्याला ते disable कसं करायचं ते माहीत नव्हतं. बिचार रडकुंडीला आला होता अक्षरशः
अंडरएस्टिमेट >> बाप्रे!!
अंडरएस्टिमेट >> बाप्रे!! काहीही हा र्म्द!! अखिल भारतीय सोशिक सून संघटनेच्या अध्यक्षा आहेत त्या. असलं काही करण्याची हिंमत तर केकतेत पण नाहीये. मी तर फक्त त्यांचा अभिनय किती विविधांगी आहे याच्या विषयी जनजागृती करतोय.
इया उवा तुळतुळ हा एक अप्रतिम
इया उवा तुळतुळ हा एक अप्रतिम कलाविष्कार आहे.मला पूर्ण चित्रपट बरेच वेळा मागेपुढे केल्यावर गाणं मिळालं.साधारण ५६ व्या मिनिटाला आहे.
या गाण्याचे शब्द,दीपक देऊळकर ची त्या बाईला आळीपाळीने खांदा आणि पोटाला गुदगुली करत असल्यासारखी डान्स स्टेप, नंतर वेगवेगळ्या पायरयांवर या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया सारखे हात करत केलेली स्टेप या गोष्टी अमूल्य आहेत, सगळे झोपल्याने जाम आवाज न करता हसावे लागले.कृतकृत्य झाले, आता झोपते.☺☺☺☺
तो सगळा पिक्चरच मला एक महान
तो सगळा पिक्चरच मला एक महान कलाविष्कार वाटतोय. त्यात सुनील शेंडे त्या तुळतुळ बाईचा बाप असावा बहुधा. आणि या गाण्याच्या जस्ट आधी त्याचा डायलॉग आहे दीपक देउलकर साठी - 'मूर्ख साला, पंचपक्वान्नाचं जेवण लाथाडून उकीरडा फुंकायला आलाय'. दीपक त्याच्या मुलीला भेटायला आलेला असतो. कुठला बाप आपल्या मुलीचा असा उल्लेख करेल?
इतकाच सीन पाहिल्यामुळे तो शेंडे तिचा बाप नसावाच अशी मला शंका येते आहे. आता पिक्चर पाहणं आलं!
अरे काय एकेक कहर आहात कुबल
अरे काय एकेक कहर आहात
कुबल कमांडो कुंकू, कहरात कहर.
तो चित्रपट पाहिलेला मी एक
तो चित्रपट पाहिलेला मी एक धाडसी मनुष्य आहे,
शेंडे त्या तुळतुळ बाईचा बाप नसतो,
त्याला चित्रपटभर सरदार नावाने हाक मारत असतात,
शेवटी, मृणाल त्या सरदार आणि तुळतुळ यांना नको त्या गोष्टी करताना रंगे हाथ पकडते.
उगीच पिक्चर पाहून आपलं बॅड
उगीच पिक्चर पाहून आपलं बॅड कर्मा वाढवू नका, यु ट्युबवर पिक्चरखाली त्याची थोडक्यात कहाणी दिलीय ती वाचा. त्यात लिहिलेय तो बाप नसल्याचा.
इथे गाणे पाहील्यापासून मी
इथे गाणे पाहील्यापासून मी घरात येता-जाता जोरजोरात गाते आहे.
आत्ताच ' हॅपी भाग जायेगी "
आत्ताच ' हॅपी भाग जायेगी " सिनेमा पाहुन आलो. हिन्दी सिनेमात " असं कसं ? " असा प्रश्न विचारावयाचा नसतो, असा अलिखित नियम आहे की कोण जाणे ? फुलांच्या ट्रकमध्ये , फुलेच नसतांना , केवळ भेटीसाठी आणलेल्या बांबुच्या , रिकाम्या कणगीमध्ये , वरच्या मजल्यावरुन , उडी मारल्यानंतर, हिरवणीस काहीच कसे लागत नाही? शिवाय अम्रुतसर येथुन निघुन, थेट लाहोर ला पोहोचेपर्यंत, ती गप्प कशी काय बसुन असते ? पाकिस्तान ची बॉर्डर अशी सहज पास करता येते काय ? लाहोर च्या भर रस्त्यात हिरवणीचे धावणे काय ? शेवटी शेवटी तर खलनायकाने अशी काही कोलांट उडी मारली की पटकथाकाराला काही सुचेनासे झाले असेच वाटत रहाते. कै च्या कै दाखवायचे , पण त्याला काही मर्यादा ?
अनू... :: अगं गरजच काय पण
अनू...
::खोखो::
अगं गरजच काय पण एव्हढे प्रयत्न करुन त्या गाण्याचं एक्झॅक्ट लोकेशन शोधण्याची?
या गाण्याचे शब्द,दीपक देऊळकर ची त्या बाईला आळीपाळीने खांदा आणि पोटाला गुदगुली करत असल्यासारखी डान्स स्टेप,.. हे वाचून हसू थांबवता येत नाहीये! कहर आहात तुम्ही......आणि ती कोण सुंनंदा की कोण ती हिरॉईन!!
बाकी 'रात' पिक्चर ची कास्टिंग
बाकी 'रात' पिक्चर ची कास्टिंग ज्यानं ठरविली तो किती हुशार म्हणावा! या तुळुतुळू गाण्यातून बरोब्बर आपलं भूत शोधून काढलं!>>>> राम गोपाल वर्मा होता रात चा दिग्दर्शक.
कोणाकोणाला सुखाने जगू देत
कोणाकोणाला सुखाने जगू देत नाहीत.सुखी झाले की लगेच अपघातात कटवतात.>>>> त्यान्च्या कान्दबर्या एकता कपुर बाईन्ना वाचायला द्यायला हव्यात.
अप्रियजनांना तर नक्कीच
अप्रियजनांना तर नक्कीच दाखवा
>> मी आमच्या घरी आलेल्या एकांना 'आय टू आय' आणि 'अँजल' बॅक टू बॅक दाखवले होते.
तेही खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेऊन वगैरे.
जीना तेरी गल्ली में हिरोचं
जीना तेरी गल्ली में
हिरोचं जीप्डं बंद पडातं... मंग हिरोचा फ्रेंड टिन्नू, हिरोला लगीच एक डराम देउन पाणी आणायला दामटितो.
जीप्ड, डराम आण टिन्नु सगळं मापात ठरल्यालं.
डोंगरातल्या वाटंत जिप्ड्यातुन टिन्नुला डोंगराखाली असलेला झरना डोंगरावर दिस्तो.
मंग हिरो , झरना, झरन्यात हिरोनी , तिची कपारीत आंघुळ, सगळं बघुन मंग भौ डराम भराय लागतो.
बुडात फुटल्याला डराम घेउन हिरो जीप्ड्याजवळ येतो. टिन्नु बोलता बोलता रेडीटरात पाणी भरीतो..
आण मंग गडी बुंगाट जातेत... तिथं दहा फुटावं ... रस्त्यात .. डरामात आणल्या पेक्शा जास पाणी रहातं.. ते पहुन मला कुठं पळू नि कूट नको झालं ब्वा!!
https://youtu.be/ovK-mOWSmTE?t=304
सिनेमा : बेताज बादशाह सीन :
सिनेमा : बेताज बादशाह
सीन : राजकुमार (जानी वाले) आणि शत्रुघ्न सिन्हा या मध्ये
श.सि उंटा ची शर्यत जिंकलेला असतो त्याचे बक्षिस वितरण समारंभ रा.कु. च्या हस्ते असते. कार्यक्रम सुरु होण्यास थोडा वेळ असल्याने पत्ते खेळायचे ठरवितात.
श.सि. : मै काटने पार विश्वास करता हु इसलिये पत्ते मै काटूगा और तुम सब को बाटते रहते हो तो पत्ते तुम बाटोगे (पत्ते त्याच्या हातात देतो)
रा.कु. : तुमने पत्ते नही बल्की बाजी ही हमे सोप दी. (असे म्हणून पत्ते पिसतो)
अर्धे पत्ते श. सि काढून बाजूला ठेवतो आणि राकू उरलेल्या अर्ध्या पत्त्यातून ३-३ पत्ते दोघाना वाटतो
श. सि. आपले पत्ते दाखवितो त्याला तीन एक्के असतात. खुश होऊन म्हणतो बाजी हमने जीत ली है
राकू : ठहरो अभी हमने पत्ते खोले नही.. पत्ते पहिल्या वर त्याला सुद्धा तेच तीन एक्के असतात जे श. सि असतात
श. सि . ये एक ही कैट मे ६ एक्के कैसे हो सकते है ? (ते पण सारखेच)
राजकुमार : (सरळ उत्तर न देता ) शायद तुम्हे पता नही लेकीन इमानदारी मे बहोत बरकत होती है.. असे म्हणून तिथून सटकतो..
हे बर आहे एक तर हातचलाखी करयाची आणि वर तोंड करून "इमानदारी मे बहोत बरकत होती है" असे म्हणायचे..
आत्ताच मम्मीमुळे अक्षयचा
आत्ताच मम्मीमुळे अक्षयचा सबसे बडा खिलाडी बघीतला अख्खा सिनेमाच अचाट आहे.
अक्षय कारचा पाठलाग सायकल ने करतो, कितीसार्या माकडऊड्या अगदी नकोसे झाले.
त्यात सोबत ममता कुळ्कर्णी म्हणजे अगदी आनंदी आनंद
त्यातलं गाणं आठवतं जहर है के
त्यातलं गाणं आठवतं जहर है के प्यार है तेरा चुंमा,आणि एनिग्मा संगीत धापलेलं भरो मांग मेरी भरू.
इथे शिवाजी द बॉस च्या शेवट सीन बद्दल कोणीच बोलत नाही.महाराज जेल मध्ये शॉक बसवून घेऊन हृद्य बंद पाडतात,मग डेड डिक्लेअर होऊन जीप मधून जात असता जीप थांबून त्याच्याशेजारी व्होल्वो थांबते,ब्वॉडी व्होल्वो च्या डिकी काप्प्यात घेतली जाऊन डॉक लोक ट्रीटमेंट करून जिवंत करतात ☺☺☺
mi_anu, खरेच का?
mi_anu, खरेच का?
अनू , अगं शिवाजी द बॉस च्या
अनू ,
अगं शिवाजी द बॉस च्या आयडीया वापरुन 'कॅप्टन अमेरिका - द विंटर सोल्जर' काढलाय ना...
त्यात पन तर निक फ्युरी काहीवेळाकरिता डेड होतो.. हा आता त्याने थोड हॉलिवूड ला जागुन एका गोळीचा वापर केलाय म्हणा तो भाग अलहिदा..
प्राची, शिवाजी द बॉस अवश्य बघ
प्राची, शिवाजी द बॉस अवश्य बघ
फ्लाईंग जाट बघितला, अगदी अ
फ्लाईंग जाट बघितला, अगदी अ आणि अ. फार कंटाळले (का बघितला?
)
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=4q3-TwJu1PY&index=7&list=PLzuzwCUSxGGWrS...
मजकुरात लिंक कशी बरे द्यायची?
वरील मुव्ही काल पाहिला... ज्या पद्धतीने ह्या पठ्ठ्याने ट्रेनला भगदाड पाड्लं, मी तर झिट येऊन पडायचे बाकी होते.
आज मायबोली channel वर 'माझ
आज मायबोली channel वर 'माझ सौभाग्य' लागला होता.
इय्या उव्वा......इय्या
इय्या उव्वा......इय्या उव्वा......
या गाण्यात दिपक देउळकर च्या मसाला भांगडा स्टेप्स मिस करु नका.
आणि मध्येच स्टिल होऊन जोडप्याच्या पोस्टर पोझेस पण.
हे गाणेच अजिबात मिस करु नका.५६ व्या मिनीटाला आहे.सुमती त्याला कुठे जाणार वगैरे विचारते आणि माझं सौभाग्या च्या दोनच सॅड लाईन पांढरी लाल साडी नेसून गाते त्यानंतर.त्याच्याच आधी तो पंचपक्वान्नांना लाथाडून उकीरडे वाला प्रसिद्ध डायलॉग पण आहे.
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=k4VgBvYQc3Q
हे जियाला मधले गाणे, आवाज म्युट केल्यास क्लोजप टूथपेस्ट ची जाहिरात म्हणून पण खापेल.शेवटी हिरोचं हसू पाहून आपल्याच चेहऱ्यावर दात न विचकलेलं हसू येतं.ही जाहिरात रेमंड किंवा ओ सियाराम च्या डबल ब्रेस्ट सूट ची म्हणून पण वापरता येईल.
आईग्गं! कसला खतरनाक माणूस आहे
आईग्गं! कसला खतरनाक माणूस आहे तो
Pages