शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विद्वेष ह्या शब्दाचा अर्थ काय?

हा शब्द आणीबाणी वरच्या एका लेखात "इंदिरा विद्वेष" (उरलेलं वाक्य आता आठवत नाहीये, घरी जाऊन बघून लिहीते) असा होता ..

"ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी" या गाण्याच्या शेवटच्या ओळीत जल्म असा शब्द आला आहे...या शब्दाचा अर्थ काय आहे ?

जल्म = जन्म ?

त्या शेवटच्या ओळी अश्या आहेत - ... सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा जल्मासाठी जल्म जल्मलो, जल्मात जमली ना गट्टी

संदर्भ - http://www.aathavanitli-gani.com/Song/Runanubandhanchya_Jithun

जन्म हाच शब्द बरोबर आहे.
पण जुन्या लोकांना जल्म असा उच्चार करायची सवय असते.
विशेष करून काही शास्त्रीय संगीताच्या बंदिशींमध्येही असे वेगळे उच्चार केलेले आढळतात.

चैतन्य.....

जल्म = जन्म हे बरोबर.....आणि केवळ शास्त्रीय संगीतामध्येच 'जल्म' असा प्रयोग होत नसून कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रास नित्याच्या बोलण्यातही "आता काय सांगू बाई, सारा जल्म गेला बघ धुणीभांडी करण्यातच....." किंवा "त्याचं नाव नको घेवूस....आमची उभ्या जल्माची दुश्मनी हाया..." असे प्रयोग कानावर पडतात.

लोकहो, ल वरून आठवलं जप आणि जल्प असे दोन धातू आहेत. अर्थ एकच आहे, तो म्हणजे जप करणे. कुठला खरा? का दोन्ही खरे? इंग्रजीत देखील walk, talk, chalk यांच्यात l अक्षर घुसडल्यासारखे वाटते. म्हणून की काय उच्चार करत नाहीत. Proud
आ.न.,
-गा.पै.

'विकर' (अनेकवचन विकरे) ला इंग्रजीत काय म्हणतात?
वाक्यः त्यामध्ये वाढलेली स्नायु विकरे आणि वाढलेली यकृत विकरांचा समावेश होतो

पण enzyme चा अर्थ वेगळाच दिलाय enzymes are large biological molecules responsible for the thousands of metabolic processes that sustain life : वाढ असा अर्थ नाही कुठे दिसला

pedophilia>>> नकोय.

pedophile ला मराठी प्रतिशब्द हवाय. तो तिथे दिलेला नाही.

वाढ असा अर्थ नाही कुठे दिसला
<<
वाढ इज वन ऑफ द रिझल्ट्स ऑफ थाऊजंड्स ऑफ मेटॅबॉलिक प्रोसेसेस दॅट सस्टेन लाईफ Wink

>>
वाढलेली स्नायु विकरे आणि वाढलेली यकृत विकरांचा समावेश होतो
<<
याच्या संदर्भात बोलत असाल तर या एन्झाईम्सच्या लेव्हल्स वाढल्या आहेत, असा मराठीतून अर्थ आहे.

नंदिनी, pedophile = बालरती.
आ.न.
-गा.पै.
<<
गा.पैं.ना शिंक आली तरी नंतर ते आनगापै म्हणत असावेत Wink

Pages