शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

License to Electrical Contractors संबंधित कागदपत्रावर वरच्या बाजूस कोपर्‍यात असं लिहिलं आहे:
(शा. म. मु.) ईडी (२,०००-९-२०१०)
[शा. नि., सा. बां. वि. क्र. ६४०-२७, ...]

यात,
शा = शासकीय,
म = ?
मु = मुद्रणालय

शा = ? (शासकीय?)
नि = ?
सा = सार्वजनिक
बां = बांधकाम
वि = विभाग
क्र. = क्रमांक

असं असेल तर इतर प्रश्नचिन्हांचे अर्थ कुणी सांगू शकेल का?

धन्यवाद मयेकर.
आणि 'नि' म्हणजे 'निर्णय' (गव्हर्न्मेंट ऑर्डर) हे मुग्धानंदने फोन करुन सांगितल्यामुळे तिलाही धन्यवाद.

>> तसेच 'धाय मोकलुन रडणे' यात 'धाय' म्हणजे काय? 'मोकलणे' म्हणजे काय?

मोल्सवर्थ हे सांगतोय :

धाय (p. 437) [ dhāya ] f or धायमाय f A loud plaint or lamentation; a wild outcry. v मोकल, फोड. घे, घाल. धायधाय रडणें-ओरडणें To cry with loud lamentations.

मला वाटायचं की धाय म्हणजे धरणी आणि मोकलत म्हणजे बडवत - जमिनीवर पडून हात आपटत केलेला शोक (हिंदी सिनेमासारखा :P). पण तसं दिसत नाहीये.

शासन निर्णय म्हणजे जी.आर.
गव्हर्नमेंट रिझोल्यूशन.
जी आर आला, म्हणजे त्याला ऑलमोस्ट कायद्याचे रूप असते.
***
मिपा चालू असेल त्या दिवशी http://www.misalpav.com/node/6332 ही लिंक पाहिली, तर मोकलाया म्हणजे काय हे नीट समजेल Wink

'अभिमान'ला विरुद्धार्थी शब्द कोणता. दुराभिमान? इंग्रजीचा वळसा घेऊन अभिमान =pride X shame = लाज असा अर्थ मला योग्य वाटतोय.
दिंड्या-पताका यातल्या 'पताका'साठी समानार्थी शब्द आहे का?

स्वाती,
धाय हा हृदय चा बोलीभाषेतील अपभ्रंश.
मोकलणे=मोकळे करणे
हृदयाची बंधने तोडून मुक्तपणे केलेला विलाप असा संस्कृतप्रचूर अर्थ. Happy
(जी.डी.खानोलकर यांचा मराठी -इंग्लिश-मराठी शब्दकोश.)

भरतजी, यातच पताकांना ध्वजचिन्ह असा समानार्थी शब्द दिलाय.
अभिमान चं निरभिमान होईल ?अभिमान नसलेला अशा अर्थी..

मला शंका आहे ती शब्दार्थाबद्दल नाही तर विभक्ती प्रत्ययाबद्दल.

चंदन हे जसे झाडाचे नाव आहे तसेच एका पक्ष्याचेही नाव आहे ( चंदन आणि चंदनेश्वर असे दोन पक्षी असतात. )

धामनकरांच्या "ताडोबा" या पुस्तकात " चंदनासारखा " असा शब्द आलाय. संदर्भाने तो पक्ष्याबद्दल आहे ते कळतेच आहे पण जर त्यांनी चंदनसारखा असा शब्द वापरला असता तर योग्य झाले असते का ? चंदनासारखा या शब्दाने मला तो चंदन वृक्षाचा उल्लेख वाटला. दोन्ही विशेषनामेच आहेत, तरीपण काहीतरी खटकतेय.

भारती तुम्ही जे निरभिमान म्हणताय ते अभिमानचे निगेशन (negation ) होइल म्हनजे ती गोष्ट नसणे. इथे आपोझिट अपेक्षित आहे असे मला वाटते. दुराभिमानही अभिमान असण्याचा एक 'हट्टी' किंवा चुकीचा प्रकार. उदा वाईट रूढींचा दुराभिमान वगैरे त्यात कोणत्या का अर्थाने होईना अभिमान '' आहेच ''.

रॉबिनहूड, बरोबर आहे तुमचे, जर सज्जन * दुर्जन अशा प्रचलित अर्थाने पाहिले तर.

सुशांत, विश्रब्ध म्हणजे शांत, निवांत, कशावर तरी विश्वासल्यामुळे निभ्रांत.tranquil.

विश्राब्ध नव्हे विश्रब्ध...

'विश्रब्ध शारदा' हे पुस्तक ह वि मोटेंचे आहे ना?

"दिनांक १ एप्रिल १९८३ पासून निवृत्तीवेतनाचे अधिदान बँकेमार्फतच घेणे सक्तिचे केले आहे."

यात 'अधिदान' म्हणजे पेमेंट्/अमाउंट असेल का?
अधिदानचा अर्थ काय आहे इथे?

अधिदान = disbursement

खरं तर मला मराठी शब्दच आठवत नव्हता, तोच विचारल्याबद्दल धन्स.

मराठी जन्म प्रमाणपत्रावर बारीक अक्षरात 'मुमादामु. (१९२९) ५, ००,०००-१-१३' असं छापलंय.
आता यात मु = मुख्य (?) मु. = मुद्रणालय असलं (हा माझा अंदाज आहे) तर मधल्या दोन अक्षरांचा फुल फॉर्म कुणाला माहित आहे का?

मी मोनियर विल्यम्सच्या संस्कृत डिक्शनरीतपण तपासून बघितलं Happy तुम्हीही तिथे बघू शकता. डिट्टेलवार लिवलंय. उरलेल्या शंका कुणातरी तज्ज्ञ संस्कृत अभ्यासकाला विचारा

Pages