शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ioschpe, Elijah, Hayes Lemmerz

ही नावं मला देवनागरीत लिहायची आहेत. कुणी अचूक उच्चार सांगू शकेल का?

मयेकर, परिभाषा म्हणजे विशेष भाषा. म्हणजेच एखाद्या विषयासाठी असलेली भाषा. त्यातले शब्द इतर वेळी उपयोगात आणले जातीलच असे नाही.

उदा. वैज्ञानिक परिभाषा.

तिकडे त्या मंजूडीला स्पष्टीकरण हवे आहे, उत्तेजनार्थ हा शब्द बरोबर आहे की उत्तेजनार्ह हा शब्द बरोबर आहे. इथे कुणाला नक्की माहिती आहे का?

अरे दिलय की तिकडेच.

अर्ह = योग्यता

म्हणून उत्तेजनार्ह = उतेजन देण्याच्या योग्यतेचा
उत्तेजनार्थ = उत्तेजन देण्याकरीता.

वर्षा, अमेरिकेत Elijah चा उच्चार एलायजा ( सॉफ्ट ज ) होतो.

Hayes आडनाव असेल तर त्याचा उच्चार हेज असा करतात

'कलत्र' म्हणजे काय?
गुरुचरित्राच्या १४व्या अध्यायात असं काहीसं आहे.

"कलत्र पुत्र ... भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हां"

१) कलत्र = पत्नी असाच अर्थ असून सूर्योपसानाच्या फळापोटी ज्या काही इच्छा असतात त्या प्रदान केल्या जातात असे ते शास्त्र सांगणारे मानतात त्यामुळे "पुत्र-कलत्र-मित्र-भ्रात्" = अपत्य, सहचारिणी, सखा, बंधू याना आरोग्य लाभो असा त्या वंदनेचा भाव आहे.

२) मावंदे केले = अमुक एक काम झाले म्हणून देवाला नवस बोलला जातो. ते काम यशस्वी झाले की मग त्यापोटी चार आप्तेष्ट मित्रांना बोलावून मिष्टान्न घातले जाते आणि देवाच्या ऋणातून मुक्त झालो असे म्हटले जाते. तेच हे 'मावंदे केले'. कोकणातील ही प्रथा आहे. देशावर 'म्हाई केली' असे म्हणतात.

मावंदे = बोलीभाषेत मामदं असं मला ठाऊक आहे.
पणतू झाल्यावर पणजी-पणजोबांच्या डोक्यावर सोन्याची फुलं उधळतात त्या समारंभाला 'मामदे केले' असं म्हणतात. थोडक्यात, आयुष्याची परीपुर्ती म्हणून हा समारंभ केला जातो.
तेच मावंदे का?

Pages