चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनुस्विनी,
मागे वैशाली माडेनी मला सांगितलं कि सलमान खान नी खरच स्व्तः हून डिमान्ड केलं होतं मराठी गाण, हेलननी म्हणे मराठी सारेगमप ची फिनाले कि कुठला एपिसोड पाहिला होता तेंव्हा वैशालीचं 'कोंबडी पळाली' तिला आवडलं होतं .

एकदाचा पाह्यला इन्सेप्शन. नॉट बॅड.
कळण्यासाठी परत बघायला लागावा इतका ट्विस्टेड नाहीये. अनेक ऑब्व्हियस गोष्टी, हॉलिवूड क्लिशे आहेत. पण तरी एकदा बघायला एन्टरटेनिन्ग वाटला.
खरंतर मला कॉन मूव्हीज आवडतात पण परत परत वाली क्वालिटी या कॉन मूव्हीमधे नाही. (माझ्यासाठी तरी)

अरेरे.

यावेळेस एकाही मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेले दिसत नाही. थ्री इडियट्स, पा वगैरे आहेत हिन्दीतील.

सॉरी, मला माहित नव्हते. मला वाटत होते की दोन्ही चित्रपट जवळपास एकाच वेळी प्रदर्शित झाले होते.

काल मी, करिना, सैफ आणि विवेक चा कुर्बान बघितला. करण च्या नेहमीच्या गुडी गुडी कथेपेक्षा बरीच वेगळी कथा. सर्वांचीच कामे उत्तम. करिना बराच काळ, मेकपशिवाय.
ओम पुरी च्या सुटलेल्या पोटाकडे बघून वाईट वाटले. त्याच्यापेक्षा वयस्कर असणारे, हॉलिवुड मधले कलाकार, स्वतःला किती फिट ठेवतात. (उदा. हॅरिसन फोर्ड )

यात एक खटकले, करिनाच्या सोनोग्राफीच्या वेळी, बाळ चांगलेच मोठे दिसते, पण पुढच्याच सीनमधे तिची झिरो फिगर !!

कुर्बान टाईम पास सिनेमा आहे पण. शुकरनल्ला गाण्यात करीनाच्या हातातील सिल्वरच्या भरपूर बांगड्या व ब्लड रेड कलरचे नेलपॉलिश छान आहे. कपडे पण सुरेख आहेत. सैफच्या कॅरेक्टर बद्दल काहीच वाट्त नाही. मरने दो असेच वाट्ते.

काल आएशा पाहिला.
दिल्लीच्या श्रीमंत मुलींची दिनचर्या आणि त्यांची काळजाला पीळ पाडणारी दु:खं बघायची असल्यास जरुर बघावा.

आशायें पाहिला , नागेश कुकनुरचा थोडा वेगळा सिनेमा आहे , जॉन आणि अनिता नायरच काम मस्त झालयं.

इथली मते वाचुन, तेरे बिन लादेन बघितला. मलातरी खुप आवडला. दुष्मन देशाच्या म्हंटल्या तर बर्‍याच कुरापती काढल्यात, म्हंटले तर तिथली सत्य परिस्थिती दाखवलीय. तिथले प्रसंग, तिथली माणसे थेट तिथली वाटतात. अगदी तो ट्रकसुद्धा तिथलाच वाटतो. (उगाच नाही त्या देशात बंदी घातली.)
पण कथानक मस्त. काहि विनोद तर थेट मुसलमानांवर आघात करणारे आहेत !! कलाकार सर्वच नवीन, असले तरी सगळ्यांची कामे छान झालीत.

"क्षणभर विश्रांती" हा मराठी चित्रपट पाहिला, बरा वाटला. चार मित्र (सचित पाटील, सिध्दार्थ जाधव व बाकीचे दोघांची नावे विसरलो) बर्‍याच कालावधी नंतर एकत्र भेटतात व त्यानिमित्त अलीबागला चार दिवस राहायला जातात. तिकडे त्यांच्यापैकी एकाचे (सचित पाटील) फार्म हाउस असते व 'आप्पा' (भरत जाधव) म्हणून एकजण केअरटेकर असतो(मराठी??) असतो. तिकडे गेल्यावर त्यांना फार्म हाउसचे वेगळेच चित्र दिसते. आप्पाने फार्महाउसचा वापर घरगुती खाणावळ व लॉज असा केला असतो. पण ऐनवेळी मालकच आल्याने त्याची तारांबळ उडते, त्याच वेळी चार तरुणींचे तिकडे आगमन होते.
मग ठरल्याप्रमाने हे चार मित्र आपापली प्रिया ठरवून घेतात व मग त्यांच्या नादाने आप्पाचा गुन्हा माफ करतात.
मग उर्वरित चित्रपट ठरल्याप्रमाने या चार अधिक चार जिवांना एकत्र आणन्यात जातो. मध्येच आप्पाची आगतिकता, फार्महाउस विकण्याच सचितचा निर्णय इ.इ. उपकथानके येतात व शेवट सुखांत होतो.

---
दुसरा चित्रपट 'सॉल्ट' , अँजेलिना जोलीची भूमिका असलेला धमाकेदार अ‍ॅक्शनपट. संपूर्ण चित्रपट जागेवरच खिळवून ठेवतो. प्रचंड वेगवान कथानक, जबरदस्त स्टंट्स, अँजीने केलेल्या हाणामार्‍या, वापरलेली शस्त्रे , मधूनच येणारे ट्विस्ट्स एकदम धमाल आणतात. बर्‍याच दिवसांनी अमेरिका वि. रशिया असा विषय असणारा अ‍ॅक्शनपट (गुप्तहेरपट) पाहिला. एकदम आवडला.

अरे बापरे, क्ष. वि. ची ही कहाणी फारच जुनी आहे. यावर आधीच एक मराठी नाटक, एक मराठी सिनेमा आणि एक मराठी मालिका येऊन गेलीय.

पर्वा एन सी पी ए ला 'पलथडचो मनीस' हा कोकणी सिनेमा पाह्यला. यावर्षी नटरंगला जसं मराठी चित्रपटांमधे उत्कृष्ट चित्रपटासाठीचं रजत कमळ मिळालं तसं या चित्रपटाला याच वर्षी कोकणीचं मिळालेलं आहे.
चांगली फिल्म आहे. ग्रामिण वातावरण खूप साध्या सोप्या पद्धतीने उभे केलेय. बर्‍याचश्या हिंदी आणि मराठी सिनेमांसारखे ग्लॉसी/ खोटे गाव उभे केलेले नाही.
बर्‍याच फेस्टिव्हल्स मधे ही फिल्म नावाजली गेलीये. एन एफ डि सी ची निर्मिती असल्याने रिलीजच्या बाबतीत बोंब असणारे.
पण तरी कधी कुठे पहायला मिळालीच तर चुकवू नका.

साधना, मनावर घेऊ नकोस... अतिशय भंगार सिनेमा आहे. पहिल्या दोन सीन्स मधेच कळतं ते पण मी स्वतःच्या सहनशक्तीची परिक्षा बघण्यासाठी तो पूर्ण पाह्यला.

पण मी स्वतःच्या सहनशक्तीची परिक्षा बघण्यासाठी तो पूर्ण पाह्यला.
>>
तुला तो माझावाला सिंड्रोम झाला का...??? Wink

काल तेरे बिन लादेन पाहिला टीवी वर लै मस्त आहे. हहपुवा. मला ती रघुची बायको खूप आवड्ते छान काम करते.

एन एफ डि सी ची निर्मिती असल्याने रिलीजच्या बाबतीत बोंब असणारे.

मग इथे लिही ना सविस्तर त्याबद्दल.. चित्रपट पाहायला मिळाला नाही तरी निदान वाचायला तरी मिळेल. Happy

मला काल तेरे बिन.. पाहायला मिळाला नाही, पण आधी पाहिलेला. खरेच मस्त आहे. पाकिस्तानचे वातावरण इतके छान जमलेय की मला सुरवातीला कळेना चित्रपट भारतीय आहे की पाकिस्तानी ते. Happy सगळ्यांची कामे एकदम मस्त. बिन लादेन तर बेस्टच.. बडाही लजीज मुर्ग... Proud

मी पण आत्ताच सॉल्ट बघितला. अँजेलिना मस्त दिसलीय. खरे तर ती किती नाजूक आहे, पण तिने केलेले स्टंट्स जबरदस्त तर आहेतच आणि ते विश्वसनीय पण वाटतात. रशियात तर आता काहीच दम उरलेला नाही, पण अमेरिकन लोकांच्या मनात, त्याबद्दल अजून भिती आहे असे वाटते. पहिले अण्वस्त्र तर चक्क मक्केच्या दिशेने सोडणार असतात, पण ते बूट व्हायला जो वेळ लागतो, ते बघून मला जून्या काळी, डिस्क्स फॉर्मॅट कराव्या लागायच्या, त्याची आठवण आली. पण तिच्यासाठी, अवश्य बघण्याजोगा.

दुसरा मी एक सिनेमा बघितला तो आय पी मॅन. सिनेमा पुर्णपणे चायनीज. सबटायटल्स पण नव्हती. एखाद दुसरा संवाद इंग्लीशमधे, तरीपण शेवटपर्यंत सिनेमा खिळवून ठेवतो. कथानक बरेचसे, लगान सारखे. पाश्चात्यांचे बॉक्सिंग आणि चिन्यांचे कुंग फू, असा सामना. कथानक १९५० चे. उत्तम वातावरण निर्मिती. आणि अगदी क्लासिक वाटावेत असे स्टंट्स.

शनिवारी रात्री १ ते ४ अशा मस्त वेळात कितव्यांदा तरी 'शिंडलर्स लिस्ट' पाहिला. पहिल्यांदा पाहिला त्यापेक्षा प्रत्येकवेळा जास्तच आवडतो. त्याचा डॉक्यु-ड्रामा न करण्याची फार काळजी स्पिलबर्गने घेतली आहे. शेवटचा -'धिस बटन इज वर्थ ऑफ टू पर्सन्स, मे बी वन' हा प्रसंग किंवा राल्फ फिनेसचा 'आय पार्डन यू' म्हणणारा नाझी, निव्वळ अप्रतिम.

वर्ल्ड टिव्ही प्रीमियरच्या नावाखाली दाखवलेला वन्स अपॉन टाइम इन मुम्बई पाहिला.
उगाचच कुथुन कुथुन बनवलेला पिक्चर वाटतोय.
असलाच एक तो शुट आउट अ‍ॅट लोखंडवाला.
त्याना (फिल्म मेकरना) नेमक काय दाखवायचय हे त्यानाच माहीत नव्हत.

तेरे बिन लादेन हुकला त्या वन्स अपॉन टाइमच्या नादात. लक्षातच राहिल नाही.

युटीवी वर्ल्ड मुविजवर परवा पर्शियन भाषेतला कंदाहार पाहिला. चित्रपट अर्थातच अफगाणिस्थानामध्ये काय हाल चालु होते ते दाखवत जातो.

चित्रपटात पार्श्वसंगित ऐकायला आल्यावर मी उत्सुकतेने त्या देशाचे गाणे कसे आहे हे ऐकायचा प्रयत्न केला तर चक्क आपलेच शास्त्रिय संगित ऐकायला मिळाले. चित्रपटात पार्श्वसंगित म्हणुन एका भारतीय गायकाचे आलाप ब-याच वेळा वापरलेत. आणि (बहुतेक) संस्कृत भाषेतलेही एक गाणे आहे. पुर्णपणे मुस्लिम असलेल्या चित्रपटात संस्कृतमधला श्लोक ऐकुन गंमत वाटली.

कोणाला बघायला मिळाला तर द अंग्रेज हा चित्रपट चुकवू नका. मी नेटवर पाहिला. सॉल्लीड धमाल आहे.. पच्चिस सालासे चारमिनारापे बैठा है.. हा सततचा डायलाग ऐकुन हसुन हसुन पोट दुखले माझे.

असलाच एक तो शुट आउट अ‍ॅट लोखंडवाला.

हा बराच बरा होता.... मला आवडलेला. 'अख्खा मुंबैमे वि आर द भाइज'' म्हणणा-यांचा अंत काय होतो आणि तो समोर दिसायला लागल्यावर सगळ्यांना कशा आपापल्या आया आठवायला लागतात ते चांगले दाखवलेय त्यात.

तो भारतीय गायक म्हणजे उ. रशीद खान

येस्स.. मला तो राग आणि आवाज दोन्ही अगदी ओळखी ओळखीचे वाटत होते, पण नक्की ओळखता आले नाही. राग बहुतेक भुप होता.

Pages