चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

Happy

हिन्दीतही आला होता एवढ्यात, नाव आठवत नाही.>>archives मधे शोध, मी लिहिलेले त्यावर. सीन बाय सीन कॉपी होता.

once upon a time in mumbai वर कोणीच काहि लिहिले नाही? बघावा की नाही ह्या विचारात आहे. गाणी एकून वाटतेय तसे.

once upon a time in mumbai वर कोणीच काहि लिहिले नाही? बघावा की नाही ह्या विचारात आहे. गाणी एकून वाटतेय तसे.

<< गाणी चांगली आहेत पण मुव्ही जस्ट ओके आहे , जितका उदो उदो होतोय तितका अजिबात चांगला नाही ! फार ओव्हरहाइप्ड मुव्ही !
नाविन्य काही नाही.. तेच ते हाजी मस्तान , दाउद स्टोरी !
रा.गो.व चा कंपनी मस्तं घेतला होता .

गाणी चांगली आहेत पण मुव्ही जस्ट ओके आहे , जितका उदो उदो होतोय तितका अजिबात चांगला नाही ! फार ओव्हरहाइप्ड मुव्ही !>> मम ..... Happy

बरा आहे. मी देशात असताना पाहिला. गाणी आवडली आणि इम्रान हश्मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाहिला तो ही बरा वाटला.

थँकू सगळ्यांना, इथे एक मैत्रीण येतेय गणपतीला.. ती म्हणतेय पाहुया का ती आली की. म्हटले थांब इथे विचारते. मनात म्हटले उगाच गणपतीच्या मुहुर्तावर इम्रान हश्मी नको डोक्यात जायला त्याचे माकड प्रकार पाहून. Proud

इम्रान हश्मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाहिला तो ही बरा वाटला.
<< ये क्या हुआ तुझे अमृता Biggrin

आज रेकॉर्ड ब्रेक दिवस आहे. मै ला सकाळी काजोल आणि करीना बर्‍या वाटलेल्या, मला संध्याकाळी हाश्मी बरा वाटला. ये मुझे क्या हुआ?? Proud

इंन्सेप्शन वरच डिस्कशन झालं वाटत आधीच. मी काल बघितला. मस्तच आहे ! एक सेकंदही इकडे तिकडे बघायला वाव नाही आणि बघायची इच्छाही होत नाही. शेवटी तो टोटेम टॉपल होणार की नाही, होणार कि नाही यावरच अंधार होतो. आणी तो डोक्यातच फिरत रहातो.
सिटी रोल अप वाला सिन मस्तच. आणि इन्फाईनाईट स्टेप्स, टाईम मल्टीप्लिकेशन च्या कन्सेप्ट पण सही. कॉब आणि मॉल ५० वर्ष लिंबोमधे एक्त्र घालवतात ते मस्त वाटल अगदी.

अ.मामी मस्त रिव्ह्यु लिहिला आहेत. आणी ते हेलीकॉप्टर मधुन दाखवलेल शहर तोक्यो आहे.

सुरुवातीला व्हॅनिला स्काय आठवला. पण इंन्सेप्शन वरचढ आहे अगदी.

काल 'दबंग' पाहिला. थेटरात पब्लिक मॅड झाले होते, टाळ्या, शिट्ट्या; नुसता धिंगाणा!
सगळ्या आर्टिस्टीक, मल्टीप्लेक्स, क्रॉसओव्हर इ.इ. सिनेमांचा हा अँटीडोट आहे. इट इज बॉलीवूड इन इट्स प्युअरेस्ट फॉर्म, पूर्ण पैसावसूल मनोरंजन! पण तरीही हा फार हुशारीने तयार केलेला मसालापट आहे. कलादिग्दर्शन, कॅमेरावर्क, अ‍ॅक्शन या बाबतीत तो अत्यंत उच्च दर्जा आणि त्याचवेळी संवाद, पटकथा,अभिनय या क्षेत्रात तो टीपीकल बॉलीवूडशी इमान राखून आहे.
सलमान त्याला येतं ते सर्व काही, म्हणजे आचरट चाळे, डायलॉगबाजी, मारामारी आणि उघड्याने फिरणे झकासपणे करतो.
सोनाक्षी सिन्हा चक्क बरे काम करते, नवखी वाटत नाही. माझ्या शेजारच्या सीटवरचा 'गाववाला' तिला पाहून एकदम, 'अशी बाई पाहिजे' म्हणून विव्हळला!
पार्श्वसंगितात 'डेस्परॅडो' स्टाईलने गिटारचा प्रभावी वापर केला आहे त्यामुळे अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस उठून दिसतात.

रजनिकांत वर एक चेन मेल अन्तर्जालात फिरतेय
1. When Rajinikanth does push-ups, he isn't lifting himself up. He is pushing the earth down.
> 2. There is no such thing as evolution, it's just a list of creatures that Rajinikanth allowed to live.
> 3 .Rajnikanth can divide by zero.
> 4. Rajinikanth can judge a book by it's cover.
> 5. Rajinikanth can delete the Recycle Bin.
> 6. Rajinikanth can slam a revolving door.
> 7. Rajinikanth once kicked a horse in the chin. Its descendants are today called giraffes.
> 8. Rajinikanth can make onions cry.
> 9. Rajinikanth destroyed the periodic table, because he only recognizes the element of surprise.
> 10. Rajinikanth once got into a knife-fight. The knife lost.
> 11. Rajinikanth never wet his bed as a child. The bed wet itself in fear.
> 12. Rajinikanth doesn't breathe. Air hides in his lungs for protection.
> 13. Rajinikanth does not own a stove, oven, or microwave, because revenge is a dish best served cold.
> 14. Rajinikanth has already been to Mars, that's why there are no signs of life there.
> 15. Rajinikanth doesn't move at the speed of light. Light moves at the speed of Rajinikanth.
> 16. Rajinikanth knows Victoria's secret.
> 17. Google won't find Rajinikanth because you don't find Rajinikanth; Rajinikanth finds you.
> 18. Rajinikanth leaves messages before the beep.
> 19. Rajinikanth calls Voldemort by his name.
> 20. Rajinikanth’s calendar goes straight from March 31st to April 2nd, no one fools Rajanikanth.
> 21. Rajinikanth once had a heart attack. His heart lost.
> 22. Rajinikant is so fast, he can run around the world and punch himself in the back of the head.
> 23. Rajinikant doesn’t wear a ttwatch. He decides what time it is.
> 24. When you say “no one is perfect”, Rajinikant takes this a personal insult.
> 25. In an average living room there are 1,242 objects Rajinikanth could use to kill you, including the room itself.
> 26. When Rajnikanth is asked to kill some one he doesn't know, he shoots the bullet and directs it the day he finds out.
> 27. Rajinikanth can answer a missed call
Happy Happy

मी पारध बघितला कधी नव्हे ते सिद्धार्थ जाधवने चांगले काम केलय. मकरंद अनासपुरे खुप ओव्हर अ‍ॅक्ट करतो. पण एकंदरीत चांगला सिनेमा

रेव्यु..कै च्या कै..!!
रोबोट हे एक इतकं हाईप्ड प्रकरण आहे कि आता रजनीकांत अतिशय डोक्यात जायला लागला आहे...
काल काय तर म्हणे त्याचे "ट्रेलर्स" रिलिज केले..पुन्हा एकदा सन पिक्चर्स वाल्या कलानिधी मारन + मंडळींचा
नवीन वाक्यात उदो उदो झाला..३ तास पुन्हा. Uhoh
एकदाचा पिक्चर रिलीज करुन का टाकत नाहीत हेच समजत नाही...
त्याचा पिक्चर जपान मध्ये रिलीज करणारे म्हणे...आणि म्हणुन तो आता "सुपरस्टार" नाहीये कै "ग्लोबल सुपरस्टार आहे" Rofl
विषयांतराबद्दल क्षमस्व..

कसे आहे न नवीन चित्रपट म्हटला कि पहिल्यांदा येते ते लाजविणारे दृश ठीक आहे जर आपण मित्रच गेलेलो असू पण जर आपला परिवार असेल तर मग काय
Sad

दबंग

मला सहसा फालतू, आचरट पिक्चर अजिबात आवडत नाहीत, पण हा इतकाही आचरट नाही. उदा गोलमाल ३ किंवा लालू प्रसाद यादव टाईप.

दबंग पाहिला. पहिली १०-१२ मिनिटे गेली. पण फार तोटा झाला नाही. सलमान खान आचरट कामे करतो, पण पिक्चर मध्ये विनोद निर्मिती बर्‍याच ठिकाणी आहे, खूप आवडला (दुसरेंदा बघन्याइतका) असे म्हणणार नाही, पण दबंग बघितला तरी त्रास होणर नाही. सगळी गाणी बरीच सुसह्य आणि दोन चांगली आहेत.

दबंगी होउन दबंग पाहिला तर वाईट अजिबात वाटणार नाही, मनोरंजन नक्कीच होईल. अगदी डॅनिअल क्रेग च्या पिक्चरची आठवण येते. मुख्य म्हणजे सन्नी पाजी ष्टाईल मारामारी आहे. पण हिडिस म्हणजे सगळीकडे रक्त रक्त दाखवणारी नाही, त्यामुळे ओके. सलमान गाणे म्हणताना नेहमी व्यवस्थित दिसतो, पण ह्या पिक्चर मध्ये ते गाणं तो म्हणत नाही असा फिल मात्र येत राहतो, तसेही सलमानचा मी फ्यान नसल्यामुळे त्याचे अनेक पिक्चर पाहिले नाहीत, त्यामुळे इथे सहन केले.

मुन्नी बदनाम हुवी डार्लिंग तेरे लिये
ले झंडु बाम हुवी डार्लिंग तेरे लिये

गाणं मला पण बघायला आवडलं. मलाईका काय नाचलीये. त्या व्हिलनने पण पहिल्या कडव्यात लाळ गाळण्याचा अभिनय चांगला केला आहे.

तेरे मस्त मस्त दो नैन गाण पण चांगला झाल आहे, सध्या चार्ट बस्टर आहे म्हणे. इतकही चांगल नाही पण वाईट अजिबात नाही.

सिन्हा बाई सुंदर (हो) दिसतात. ड्रेस डिझायनरची साड्यांची चॉईस खरच चांगली होती म्हणावी लागेल. तिने वजन २० किलो ने कमी केले आहे पण तरीही थोड्या(च) वजनदार वाटतात, पण आमचे दोन मित्र फिदा झाले आहेत. एकंदरीत तिला अभिनयन करायला वाव फार नव्हता पण तिचे नैन मात्र खरच मस्त आहेत. Happy ती शब्दाविन पण अभिनय नक्की करु शकेल.

मोठ मोठ्या नटांचे दर्शन सुखावणारेच आहे. व्हिलनचे काम त्याला शोभले असेच म्हणावे लागेल. ष्टोरी मात्र गंडली आहे, पिक्चर कुठे न्यायचा हेच कळत नाही, पोलिस स्टेशनातले एक दोन टुकार जोक्स सोडले तर ओव्हरऑल नो प्रॉब्लेमो. १० रुपये वाया जात नाहीत. (तसेही मी टिकीट काढलेच नाही त्यामुळे तर अजूनच ओके Happy )

मल अपण दबंग टीपी वाटला :).
बॉलीवुड ला इतक्या उशीरा का होईना स्वतःचा रजनी, आय मीन सलमान' कान्त 'मिळालाय :).
सबकुछ सल्लु, जे रजनीपटाला लागतं, अचात आणि अत्र्क्य अ‍ॅक्शन, थोडा आचरट पणा आणि ह्युमर टायमिंग.. सल्लु नी झक्कास रंगवलाय 'चुलबुल पांडे' !
सोनाक्शी ला काही काम नाहीये पण चांगली दिसते, केस मात्र अत्ता पासूनच टक्कल पडल्या सारखे मागे गेलेत !
तिचे कॉटन चे घागरा चोली ड्रेसेस फार सुन्दर आहेत :).
सोनु सुद, अरबाझ यांनीही अपापले रोल्स चांगले केलेत !
डिंपल ला मात्र तिचा रोल मुळीच शोभत नाही !
अनुपम खेर पण उगीचच आहे, कोणीही किरकोळ अभिनेता चालला असता तिथे !
मलायका नी 'मुन्नी बदनाम हुई' फुल्ल दंगा, एकदम शिट्ट्या घेणारं केलय, छैय्या छैय्या पेक्षाही जास्त तरुण आणि हॉट दिसते मलायका!
सुपरहिट आयटेम साँग करायला सुपरस्टार गेस्ट अपिअरन्स ची काही गरज नाही, बेस्ट आयटेम गर्ल च लागते हे पूर्वी हेलन नी आणि अता तिच्या सुनबाईंनी पुन्हा एकदा सिध्द केलय Proud

प्राची एवढं ३- तीनदा लिहिलसं म्हणजे नक्की तो राखीचा बुढ्ढा मेला असावा
>>>>>>>>>>>>>>>
death at a funeral वरुन हिंदीत ढापलेला शिणुमा म्हणजे डॅडी कूल

दबांगने म्हणे ३ इडियट्स्चे ओपनिंग रेकॉर्ड तोडलेत !!!!! सल्लु की तो निकल पडी.. !! पण एवढं पिक्चरमध्ये काय आहे.. कुछ भी नही.. बस्स सल्लु एके सल्लु ! नि असा रोल म्हटला की हा एक्का बाजी मारुन नेतोच !
मी फर्स्ट डे सेकंड शो पाहिला.. पिक्चरबाबत म्हणायचे तर.. फक्त सल्लू, मुन्नी आणि संवाद रॉक्स... बाकी सगळा बिनडोकपणा आहे.. फायटिंग तर रजनिकांत स्टाईलिश असल्यामूळे सारे काही हास्यास्पद वाटते.. पिक्चरच्या शेवटची फायटिंग म्हणजे तर फालतुगिरीचा कळसच आहे.. ! पण इतके असूनही सिनेमागृहात शिट्ट्या, टाळ्या वाजत होत्या !!!!! टिपीकल बॉलिवुड मसाला वापरुन कसा पिक्चर हिट होतो हे दिग्दर्शकाने दाखवून दिलेय.. हा.. पण त्यासाठी सल्लुसारखाच कलाकार हवा ! एकमात्र या पिक्चरमध्ये बरे वाटले.. एवढा यु. पी. मध्ये संपुर्ण पिक्चर घडुनसुद्धा बलात्काराचे टिपीकल दृश्ये नाहिएत.. याबद्दल दिग्दर्शकाचे अभिनंदन करावेसे वाटते.. काहितरी वेगळे Happy
टिपीसाठी मस्त आहे.. ज्यांना वॉन्टेड आवडला असेल त्यांच्यासाठी नक्कीच मेजवानी आहे.. !

टिपीकल बॉलिवुड मसाला वापरुन कसा पिक्चर हिट होतो हे दिग्दर्शकाने दाखवून दिलेय.. हा.. पण त्यासाठी सल्लुसारखाच कलाकार हवा !
<< यो,
एक दुरुस्ती कर , 'बॉलिवुड' नाही 'मॉलीवुड' मसाला आहे या वेळी Proud
शेवटच्या फाइट मधे चिडलेल्या सलमान खान चे मसल्स शर्ट फाडून बाहेर येतात तो सीन तर Rofl

टिपिकल मसाला हिंदी फिल्म म्हणून मलाही दबंग आवडला. राहतचं गाणं सही.

दबंग चा दिग्दर्शक अभिषेक काश्यप म्हणजे ब्लॅक फ्रायडेवाल्या अनुराग काश्यपचा भाऊ. दोघांच्या सेन्सिबिलिटीजमधे सॉलिडच फरक बाकी.

'मॉलीवुड' मसाला आहे >> हो अगदी Proud

चिडलेल्या सलमान खान चे मसल्स शर्ट फाडून बाहेर येतात तो सीन तर >> च्यामारी तो शॉट लै भारी.. ज्याम हसलो त्यावेळी... Rofl नि एकदाचा तो सल्लु उघडा पडला नि पब्लिक लगेच खुष ! खास त्यांच्यासाठी असला भन्नाट (!!!!) सिन ठेवला असेल.. Lol

दबंग चा दिग्दर्शक अभिषेक काश्यप म्हणजे ब्लॅक फ्रायडेवाल्या अनुराग काश्यपचा भाऊ. दोघांच्या सेन्सिबिलिटीजमधे सॉलिडच फरक बाकी.

>>>

काय सांगतेस? कुठे तो ब्लॅक फ्रायडे, पाच, देव डी, गुलाल, नो स्मोकिंग वाला कश्यप आणि कुठे दबांग. असो.

एवढे सगळं वाचून... दबंग बघयाचा असे ठरवलेय. शनिवारी जायला पायजेल.. Happy
सल्लुचे आचरट चाळे आताच सारेगमप मध्ये पाहिले.

दर वेळा ते मराठी गाणे का लावतात तो सारेगमप मध्ये आला की...

Pages