चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'दलपती'चे हिंदी डब वर्शन उपलब्ध आहे काय?
>>
बहुतेक मोझरबेअर वर आहे...
क्रॉसवर्ड मधे एकदा ढिगार्‍यात पाहिल्याची स्मरते..

आणि मुळात 'दलपती' हे हिंदी व्हर्जनचंच नाव होतं...
ओरिजिनल 'थलपती' आहे...

मामी Happy

डेट नाईट बर्‍यापैकी टाईमपास आहे. चित्रपट विनोदी आहे म्हणून जरा जास्तच cinematic liberty घेतलेली आहे. पण बघायला हरकत नाही.

वेल डन अब्बा ही मस्त आहे. बोमन इराणी चे काम जबरी झाले आहे. इतर सरकारी नोकरही मस्त. भाषा हैदराबादी अचूक आहे का? मला माहीत नाही.

फक्त ते पकडापकडी वगैरेंचे "अ‍ॅक्शन शॉट" जरा बालनाट्यासारखे झाले आहेत. थोडा हाय बजेट केला असता तर ते "बावडी हमको होना रे" वगैरे गाणी हिट झाली असती. ते चांगले होउ शकणारे गाणे अगदीच पथनाट्य स्टाईल घेतले आहे Happy

मी पोस्टर नीट पाहिलेला नसल्याने वेल डन मधली कोटी मला माहीत नव्हती Happy

: श्री::

आमचे येथे श्री क्रुपेने आमची सुकन्या

चि. सौ.कां सौन्दर्या इचे
चि. अश्विन कुमार

यांच्याशी लग्न बंधन आहे.

जरूर येणेचे करावे.
नवदांपत्यास आपले आशीर्वाद द्यावेत.

दि: ३ सप्टेंबर २०१०
स्थळः राजा मुत्थैया हॉल चेन्नै.

आपले विनम्रः श्री व सौ. रजनीकांत
===============================================
सर्व आमंत्रित पाहुण्यांना रिटर्न गिफ्टः रोबॉट ची सीडी. >>

मामी Rofl
आजच मी रजनीकांत, त्याची ढब्बू बायको लता यांचं भलं मोठं पोस्टर पाहीलं...तमिळ मध्ये काही लिहीलं होतं..तुम्ही वर लिहीलेल्या मजकुराची तमिळ प्रत असावी बहुदा Proud

तुम्ही या हो बिन्दास्त...नल्ली ची साडी आणी १५ फूट गजरा काय इथे प्रेक्षणीय स्थळे बघायला जातांनाही घालता येतात..: Happy

जो मी येते आणि आपण रोबॉट बघुन आणि शुद्ध मराठीत पिक्चर फाडूया व इथे पोस्टूया. मग आपण अन्ना नगर मध्ये तलपकट्टू मध्ये दिंडिगल बिर्यानी खाऊत. जिवाचे चेन्नै करूत.

वेलकम मामी Happy

बाकी रोबॉट ची हिंदी गाणी ओके आहेत...
डायरेक्टर शंकर ने तमिळ चित्रपटाचं डबिंग हिंदीत केल्याने थोडे अजुन पैसे वाचवले असं वाटुन गेलं..नाहितर मणी रत्नम सारखा उगाचचा कॉन्फिडंस दाखवला असता (दोन्ही भाषेत चित्रिकरण करुन) तर अजुन थोडे कोटी वाया गेले असते....

डायरेक्टर शंकर ने तमिळ चित्रपटाचं डबिंग हिंदीत केल्याने थोडे अजुन पैसे वाचवले असं वाटुन गेलं

हे डबींग केलेले चित्रपट पाहताना मला एकदम uncomfortable feeling येते. lip movement आणि संवाद जरी मॅच करायचा प्रयत्न केला असला तरीही मला ते सुट होतच नाही.... आपण फक्त चित्रे पाहतोय आणि संवाद भलत्याच चित्रपटाचे चाललेत अशी काहीशी फिलिंग येते. रोजा ही डब केलेला होता ना??? त्यापेक्षा खाली आलेले संवाद परवडले... (ते वाचताना परत वरच्या चित्रांकडे दुर्लक्ष होते ते वेगळेच Happy )

गेल्या शनिवारी 'गॉडफादर-३' पाहिला. फक्त अल पचिनोच्या कामासाठी पहावा इतकी जबरदस्त अदाकारी आहे. विशेषतः तिन्ही भाग सलग पाहिल्याने एखादे अ‍ॅक्टर एक व्यक्तिरेखा 'जगतो' म्हणजे काय याचा आदर्श पहायला मिळाला. त्याची माफियातून बाहेर पडण्याची वृथा धडपड, त्यातून आलेले नैराश्य आणि एकंदरीतच अशा जीवनाचा फोलपणा त्याने प्रचंड ताकदीने दाखवला आहे. या सिनेमाचा क्लायमॅक्स तर पटकथा आणि संकलनाचा एक अदभुत नमुना आहे. शेवटच्या अर्ध्या तासात संवाद जवळजवळ नाहीत, पण नाट्य इतके आहे की तुम्ही खिळून राहता. आणि पचिनोचा शेवटचा मूक आक्रोश तर अंगावर काटा आणतो.
सिंपली सुपर्ब!

हो प्रश्न मुळात तेलुगु, तामीळ, मल्याळम, आंध्रा( त्यात आणि तीन भाग) व कन्नडा यातील लोकांच्या मानसिकता पूर्णपणे वेगवेगळ्या असतात त्यांना जे भावते ते हिंदी पॅन इंडियन प्रेक्षक वर्गाला समजणारच नाही. म्हणून ते प्रयत्न हास्यास्पद होतात. विरासत हा त्यातलया त्यात एक बरा प्रयोग होता सदमा देखील पण ओरिजिनल तामिळ सिनेमे फार उच्च होते ते. मला स्वतःला चांगले क्लासी दक्षिणी सिनेमे फार आवड्तात. ती नारळाची झाडे ते बॅक वाटर्स, राजमंड्रीच्या नदीच्या तीरावर नाचणारी जयाप्रदा, जुने कमल हसन चे सिनेमे, संवेदनशील कथानके व उत्तम संगीत. वेगळाच खास दक्षिणी विनोद. रंबा नल्ला Happy नाकू चाला इष्ट्म.

तिथे एक बिभत्स सिनेमांची लाइन चालू अस्ते ती पूर्णच टाळायची. पण अदूर गोपाल क्रिश्नन वगैरे खूप चांगले काम करतात.

मीही गॉडफादर ३ पाहिला. खरेच अप्रतिम. शेवटचा तो आक्रोशही एकदम अंगावर येतो...

मामी, मी अदुर गो. चे सिनेमे पाहिलेत. दुरदर्शनवर २० वर्षांपुर्वी रविवारी दुपारी २ वाजता प्रादेशिक भाषांमधले राष्ट्रिय पारितोषिकप्राप्त किंवा असेच असे चित्रपट दाखवायचे. त्यात त्याचे काही चित्रपट पाहिलेत. अर्थात नावे मला आता अजिबात आठवत नाहीत Sad एक ओरिया की आसामी भाषेतला चित्रपट पाहिलेला - अग्निदिव्य. त्यातली नायिका केवळ स्वत्:च्या आत्मसन्मानासाठी तिने स्वप्नातही कल्पना केलेली नसेल असे अग्निदिव्य करते. तो चित्रपट मी कधीच विसरु शकणार नाही.

काही क्लासिक सिनेमे खरंच पाहण्यालायक असतात हे मात्र नक्की..
त्यात "मौन रागम"(तमिळ) , "सिंधु भैरवी"(तमिळ) , "गितांजली"(तेलुगु) , "दलपती"(तमिळ),
त्यातला मौन रागम मी पाहीला नाहिये पण बाकी चित्रपट एक्दम सही आहेत..
नवीन पैकी सुर्या चे "पेरअळगन" , "सिल्लुनू ओरु कादल" हे खुप छान चित्रपट आहेत..कधी वेळ मिळाला तर नक्की बघा..

गितांजलीच्या हिंदी रिमेकमधे नागार्जुनच्या जागी आदित्य पांचोली होता, लांब केस याशिवाय त्यांच्यात काय साम्य आढळले देव जाणे!
मौन रागम सारखाच 'स्वाती मुथ्यम' , 'सागर संगमम' आणि शंकराभरणम हे ऑल टाईम ग्रेट तेलूगू सिनेमे आहेत.

शंकराभरणम् चाच हिंदी अवतार म्हणजे सूरसंगम ना? त्यात गिरीश कर्नाड, सचिन, जयाप्रदा, भारती आचरेकर, देवेन वर्मा आहेत तो? त्या पिक्चरमधील गाणी एक से एक आहेत!!!

शंकराभरणम माझा एकदम आवडता.. काय गाणी आहेत एकसोएक..

त्यामानाने हिंदी नाही आवडला. मुळ चित्रपटाची सर नाही आली त्याला हे माझे मत.. Happy
त्यातली गाणीही सुरेख आहेत..

गितांजलीच्या हिंदी रिमेकमधे नागार्जुनच्या जागी आदित्य पांचोली होता, >> म्हणुनच कदाचित सिनेमा आदित्य पांचोलीच्या केसासारखा गायब झाला असावा Proud

"ओ प्रिया प्रिया" दिल मधलं गाणं "गितांजली" मधुन कॉपी केलंय..
सुरसंगम खरंच खुप छान चित्रपट होता..गाणी खरंच मस्तं आहेत...

हो गं साधना, तो ओरिजिनल शंकराभरणम् एकदा दूरदर्शनवर दाखवलेला, तेव्हा सबटायटल्स वाचत वाचत पाहिलेला. नीट आठवत नाहीए आता.... पुन्हा पहावाच लागेल! Happy

आयला एकदम शंकरा भरणम्... जबरीच.. फार मस्त पिक्चर आहे.. पण बघून फार दिवस झाले कुठे मिळतो का ते बघायला पाहिजे... घरी एका ऑडीयो कॅसेट मध्ये काही गाणी आहे त्यातली.. एकदम मस्त आहेत त्या सगळ्या चाली..

मला जयाप्रदा फार्फ्फ्फ्फ्फ्फ्फार आवडायची. त्यामुळे सूरसंगम, खुप आवडता.
एल पी ने उत्तम संगीत दिले होते. राजन साजन मिश्रा पहिल्यांदा या चित्रपटासाठी गायले.
अकु त्यात तबस्सुंम आणि खुशबु किंवा कोमल होती.

आये सूर के पंछी आये
सूर का है सोपान सुरीला
सादा ऐसा गीत लुभावे
मैका पिया बुलावे, अपने मंदिरवा
प्रभू मोरे अवगुण चित ना धरो
धन्य भाग सेवा का अवसर पाया
जाऊ तोरे चरणकमल पर वारी
आयो प्रभात सब मिल गाओ

हि सगळी गाणी त्यातली.
ओरिजिनल शंकराभरणम ची गाणी यू ट्यूब वर आहेत.

मीही शंकराभरणची गाणी मधुन्मधुन पाहात असते युटुबवर. मला त्यातला तो नदीवरचा मुलीला अलंकार शिकवतानाचा सिन खुप आवडतो बघायला. वडिल आणि मुलगी गाताहेत आणि स्वतःच्याही नकळत त्या स्वरांवर नाचणारी मंजु.. खुप छान आहे तो सिन.

http://www.youtube.com/watch?v=Lz_BzyVwoZs

काल गजेंद्र अहिरेंचा "पारध" पाहीला. आवडला.(चित्रपटात एकही गाणं नाहीए म्हणुनही ...) चित्रपट खेड्यातल्या बदलत्या राजकारणावर आहे.

वूडी अ‍ॅलनचा 'हॉलिवूड एंडिंग' पाहिला काल सोनी-पिक्स वर. एकेकाळच्या नावाजलेल्या पण सध्या अडगळीत गेलेल्या दिग्दर्शकाला त्याच्या पूर्वीच्या पत्नी मुळे एक चित्रपट दिग्दर्शित करायची संधी मिळते व मग पुढे मजेदार घटना घडतात. वाक्या-वाक्याल नर्म विनोद, पंचेस यामुळे मजा येते बघायला. चित्रपटाचे कथानक ठरवण्यापासून, कलाकार निवड, वेशभूषा, सेट तसेच तो चिनी कॅमेरामन यांचा गोंधळ सही घेतलाय.

मध्यांतरातच वूडीला 'मानसिक आंधळेपण' येतं आणि मग तो व त्याचा एजंट हुषारीने चित्रपट पूर्ण करतानाचे सगळेच प्रसंग मस्त आहेत.

"बॅटल ऑफ अल्जिर्स" पाहिला. फ्रेंचांनी अल्जिरियामध्ये (अरब-बहुल देश) आपली वसाहत केली होती. फ्रान्सपासून स्वतंत्र व्हायचं यासाठी अल्जिर्स मधील काही तरुण एकत्र येतात व सशस्त्र आक्रमणासाठी एक संघटना बनवतात (FLN). फ्रेंच पोलिसांवर हल्ले करणे, सार्वजनिक स्थळांना इजा करणे इ. कार्ये या संघटने तर्फे केली जातात. तेव्हा याला आळा घालण्यासाठी फ्रेंच पोलीस अरब वस्त्यांमध्ये कर्फ्यू जाहीर करतात व त्यादरम्यान एका रात्री, एका अरब घराला सुरूंग लावून उडवतात, ज्यात निष्पाप अरब पुरुष, स्त्रिया, बालके बळी पडतात.
या घटनेचा सूड म्हणून FLN, फ्रेंच लोकांचा वावर असलेल्या क्लब, एअरफ्रन्सचे ऑफिस व एक कॉफी शॉप येथे बाँबस्फोट घडवून आणतात. या सशस्त्र क्रांतिकारांना आळा घालण्यासाठी फ्रेंच सरकार अर्धसैनिक दलांना पाचारण करते व मग हे अर्धसैनिक दल या कारवाया ज्या क्रूरतेने चिरडते ते पाहणेच योग्य ठरेल.

तसा मी खुप उशीरा, (भारतातून सिडी घेऊन आलो) वेल डन अब्बा पाहिला. मस्त ओरिजिनल कथानक.
अगदी खरी परिस्थिती वाटावी, अशी कथा (अर्थात पहिला अर्धा भाग, दुसरा भाग केवळ स्वप्नरंजन, अशी सध्या तरी परिस्थिती आहे.)
बोमन ने प्रयत्नपुर्वक हैद्राबादी बोली पेललीय. पण नासिर असता तर, आणखी मजा आली असती.
छोट्या छोट्या प्रत्येक भुमिकेतील कलाकार भाव खाऊन जातो, सणसणीत अपवाद, सोनाली कुलकर्णीचा.
तिची मिशन काश्मिर मधली, भुमिका बघितल्यावर, ती मराठी आहे असे मी मित्रांना अभिमानाने सांगितले होते. हि भुमिका बघून मात्र लाज वाटली. इतकी का ती डेस्परेट झालीय ? बरं तो रोल असाही नाही, कि ती म्हणू शकेल, कागदावर छान वाटला, मग कापला. तिच्यापेक्षा सुमार वकुबाची असूनदेखील, मिनिषा लांबाला, महत्वाची भुमिका मिळाली आहे.

बराच उशिरा 'तेरे बिन लादेन' बघितला... जाम आवडला. वेळ मिळाला की पुन्हा बघिन.
** "बडाही लजिज मुर्ग... अम्म्म्म... अजिज मुर्गा था" ** Rofl Biggrin Rofl Biggrin

मध्यंतरी झी स्टुडिओ वर "देथ अ‍ॅट फ्युनरेल" (उच्चार चुकला बहुतेक) पाहिला.
सगळे कॅरेक्टर्स मस्त जमलेत. प्रत्येकाचा त्या शेवटच्या समारंभात येण्याचा अजेंडा वेगवेगळा.
त्यातच होत राहणारे अजुन गोंधळात गोंधळ आणि त्यातुन होणारे विनोद.
मला आवडला पिक्चर. मस्त आहे.
"माय फादर वॉज अ‍ॅन एक्सेप्शनल मॅन" ह्या डायलॉगच टायमिंग जबरी...
बाकी मान्शीक वय १८ च्या आत असेल तर बघु नगा बॉ. Happy

"डेथ अ‍ॅट फ्युनरल" मस्त आहे.
>>"माय फादर वॉज अ‍ॅन एक्सेप्शनल मॅन" ह्या डायलॉगच टायमिंग जबरी...<< खरयं. Happy

झकास तो मुळचा ब्रिटिश आहे आणि आत्ता त्याची हॉलीवूड व्हर्जन सुद्धा आली आहे बहुधा. धमाल पिक्चर आहे (ब्रिटिश).

हिन्दीतही आला होता एवढ्यात, नाव आठवत नाही.

मूवीजवरून आठवले, शंकराभरणम मला सुरसंगम पेक्षा आवडलेला. बाजूला तामिळ मैत्रीण होती ,ती सांगायची.. काही काही डायलॉग्ज, सगळे कळायची गरज न्हवती. मूवी कळण्यासारखा होता. हे आमचे उन्हाळ्यातील सुट्टीचे विडिओ वर मूवी पहाण्याचे प्रताप असायचे.

कोणी we are family पाहिलाय का? आधी तो stepmom पाहूनच डोके फोडावेसे वाटलेले... माझे नाही.. डायरेक्टरचे. Happy त्यावेळी जुलिया आवडती होती म्हणून पाहिलेला पण कायच्याकाय आचरट वाटलेला..
हिंदी ट्रेलर मध्ये करीना म्हातारी का दिसतेय? खूपच मन मारून वजन कंट्रोल करतेय वाटतेय.. Happy

करण जोहरनिर्मित बॉलिवुड छाप स्टेपमॉमचे (वुई आर फॅमिली) सकाळमधे ''रडका'' म्हणून परीक्षण आलेले वाचल्यावर माझा तरी अजून हा पिक्चर थ्येटरात जाऊन पहायचा धीर होत नाही बॉ! कोणी पाहिला असल्यास सांगा! मी म्हणते टीव्हीवर कोणत्या तरी चॅनेलवर दाखवतीलच थोड्याच दिवसांत! Wink

अकु , वुई आर फॅमिली, चांगला वाटला , एकदा बघायला हरकत नाही.
एका प्रसंगात अर्जुन रामपाल त्याच्या मुलाला म्हणतो ( बहुतेक असा डॉयलॉग आहे) , " लडकियाँ होतीही ऐसी है ! हरबातपे झगडती है !"
मुलगा म्हणतो " ३ कम थी इसलिये चौथीको ले आये !"

Pages