चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजनी.. अमीर चे काम मस्तच.. नायिका पण छान. नायिकेच्या एक एक डायलॉग्स वर अमीर च्या वेगवेगळ्या अदा आणि ते पाहुन आपण त्याच्यावर फिदा.. Happy
मोमेंटो ने मला बोर केले होते .. पण इथे जरा मसाला टाकलाय म्हणुन बोर झाले नाही. हिंसक दृश्ये पहायला नको वाटतात पण आमीर असल्याने पाहवतात.
एकुणात ..... जियो अमीर!!!

रब्ब ने >>> माझी वहिनी म्हणाली 'तु चक्क २ दा घोरलीस थेटरात (थोडी अतिशयोक्ती, पण खरच राज चे मा.चाळे सुरु झाल्यावर बर्‍याचदा गाढ झोप लागली मला पाहताना) '.. अजुन काय लिहु?

>> 'तु चक्क २ दा घोरलीस थेटरात >>>> सुनिधी... Lol

अरे चिनुक्स ,गजनी चा अर्थ काय हाय रे भो????भारतावर आक्रमण करणार्‍या गझनीशी काही संबंध आहे का???आणि तमिळ चित्रपटात व्हिलनचे नाव लक्ष्मण आहे.मग त्या चित्रपटाला गजनी नाव का दिले होते??
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

भारतावर आक्रमण करणार्‍या गझनीशी काही संबंध आहे का >>>> माझ्या एका मैत्रिणीच्या नवर्‍याला असेच वाटले होते. ह्या मनुष्याला चित्रपटातले काही कळत नाही आणि आवडही नाही. बायकोने सांगितले म्हणुन तो डी व्ही डी आणायला गेला. तिथे गेल्यावर नक्की नाव आठवेना. मग त्याने दुकानदाराला सांगितले, "भाई, वो इंडिया पे आक्रमण किया था गझनीने. उसके बारे मे कोइ मूव्ही आयी है, उसकी डी व्ही डी चाहिये. आमिर खानने काम किया है उसमे" आमिर खान म्हंटल्यावर दुकानदाराला उलगडा झाला आणि त्याने डी व्ही डी दिली Uhoh

<<
भारतावर आक्रमण करणार्‍या गझनीशी काही संबंध आहे का???आणि तमिळ चित्रपटात व्हिलनचे नाव लक्ष्मण आहे.मग त्या चित्रपटाला गजनी नाव का दिले होते??
>>

कदाचित त्या भारतावर आक्रमण करणार्‍या गझनीने स्वतःच्या अंगावर 'बुतशिकन्' वगैरे काहीतरी गोंदवून घेतले असेल... Proud

अरे वर कोणितरी लिंक दिलिय ना त्यात तसे लिहिलेय की गझनी हा आक्रमक होता आणि नंतर तेच नाव योध्द्यास वगैरे दिले जाउ लागले म्हणुन चिनुक्सला विचारले.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

खरे तर तो गझनीचा मोहम्मद होता. गझनी त्याच्या प्रान्ताचे नाव .त्याची राजधानी गझनी गाव. ते अजूनही अफगाणिस्तानात आहे. आणि तेही नाव गझनी नदीवरून गावाला दिलेले... पाकिस्तानच्या पश्चिम सीमेजवल अफगाणिस्तानच्या पूर्व टोकास गझनी प्रकरण असून ते इस्लामपूर्व बुद्धिस्ट केन्द्र होते.

धन्यवाद रॉबिन्.पण तामिळी चित्रपटात व्हिलनचे नाव गजनी नाही तर लक्ष्मण आहे.मग त्या चित्रपटाला गजनी नाव का दिले?
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

दिल कबड्डी बघितला ..

अजिबात आवडला नाही .. star cast चांगली असल्यामुळे शेवटपर्यंत बघवला तरी ..

नमस्कार लोक्स. काल 'एक डाव्-धोबीपछाड बघीतला. खूप दिवसांनी निखळ मनोरंजन झाले. सगळ्यांची कामे व टायमींग अप्रतिम. अशोक सराफने तर ज्या काही एक्स्प्रेशन्स दिल्या आहेत त्या लाजवाब आहेत. Happy जरुर बघा.

~~~~~~~~~~~~
ज्याचा त्याचा प्रश्न!!
~~~~~~~~~~~~

गझनीने स्वतःच्या अंगावर 'बुतशिकन्' वगैरे काहीतरी गोंदवून घेतले >> Lol
गजनी पाहिला नि आमिरचे जुने दिवस आठवले .. अफसाना प्यार का, दिवाना मुझसा नहि, लव्ह लव्ह लव्ह, परंपरा वाले ..... Happy

कोणी तमिळ घजिनी पहिला आहे क? Happy दोघात कोणता उजवा वाटतो.

अम्मी, मी परवाच यूट्यूबावर तामिळ 'गझनी' बघत होते. (इंग्रजी सबटायटल्ससकट उपलब्ध! त्वरा करा!!) काही डावंउजवं नाही बघ. कारण बर्‍यापैकी 'सीन बाय सीन' कॉपी आहे. तामिळपैकी मुख्य खलनायक, नायिका आणि पोलिस इन्स्पेक्टर तसेच्या तसे हिंदीत आणले आहेत.
मला तामिळ सिनेमा सबटायटल्स असल्याखेरीज कळत नाही आणि हिंदी कळतो (आणि आमिर हॅन्डसम दिसतो), म्हणून माझ्यामते हिंदी उजवा. Proud
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...

पुर्ण शेवट बदलला आहे हिंदी मधे,फरक नाही कसा? अभिनयाच्या बाबतीत अर्थातच आमीर जास्त प्रभावी वाटतो.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आगाउ , तामिळ शेवट काय आहे ?
~~~~~~~~~~~~~~~~
फिटे अंधाराचे जाळे .....
~~~~~~~~~~~~~~~~

गझनीचा डबल रोल दाखवला आहे,हिरो हिरवणीच्या सल्याने दोघांनाही मारतो.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

तमीळपेक्षा हिंदि कितीतरी पटीनी चांगला आहे.शिवाय तामिळी चित्रपटात शेवट काहीच्या काही आहे. पण सुर्याचा मेक अप जास्त चांगला आहे.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

'सज्जनपूर' व 'सिंग इज किंग' वगळता इतर सुट्टी-चित्रपट्-रीपोर्टः

Burn after reading - चांगला आहे, पण साधारण पणे critics ज्याला सर्वात विनोदी म्हणतात त्याप्रमाणे. म्हणजे प्रत्यक्ष बघताना तुम्ही लोळत वगैरे नाही पण चित्रपट संपल्यावर थोडेफार स्मितहास्य वगैरे करतो आपण (Sideways म्हणे त्यावर्षीचा सर्वात विनोदी चित्रपट होता. पण आम्ही हाय कम्बख्त तूने पीही नही कॅटेगरीतले असल्याने कळला नसेल कदाचित). बघण्यासारखा आहे तरीही, फक्त विनोदी च्या अपेक्षेने जाउ नका.

Trans siberian - चांगला थ्रिलर. ती हीरॉइन डोक्यात जाते. बाकी चित्रीकरण मस्त आहे. रेल्वेचे दुरून घेतलेले शॉट्स मस्त आहेत. थ्रिलर असल्याने जास्त सांगत नाही पण एक आश्चर्य वाटले की सैबेरियात पूर्ण बर्फातून बरेच अंतर अनवाणी पळाल्यावर हीरो आणि हिरवीण ला बरेच काय काय होत असते पण थंडी मात्र वाजत नाही Happy

Tropic Thunder - अगदी Naked Gun, Hot Shots, Airplane ची लेव्हल नाही पण तरीही विडंबन चांगले आहे. संवाद मात्र शक्य तितक्या घाण शब्दांत आहेत. मी युद्धाचे चित्रपट फार पाहिलेले नाहीत त्यामुळे प्लॅटून मधला तो दोन्ही हात वर केलेला पोस्टर सोडला तर इतर गॅग्ज कळाल्या नाहीत.

फॅशन - प्रियांका चोप्रा व कंगना चे काम मस्त झाले आहे. चांगला चित्रपट आहे. पण कॉर्पोरेट किंवा पेज-३ पेक्षा वेगळा वाटला - कारण नायिका त्या क्षेत्रातील परिस्थितीशी झुंज देउन शेवटी जिंकते हे दाखवले आहे.

Definitely, Maybe - एकदा बघायला ठीक. चोप्रा व जोहर गँग ला आयती कथा तयार आहे, फक्त शाहरूख किंवा सैफ घ्यायचा का हाच प्रश्न आणि तीन हीरॉइन्स पैकी कोणता रोल काजोल, राणी मुखर्जी व प्रीती झिंटाला द्यायचा हाच प्रश्न आहे. एक आगाउ लहान मुलगी ही आहे.

ZOHAN - धमाल! बोरात सारखा थोडा प्रकार आहे आणि वास्तविक ते ओंगळ पणे दाखवलेले सेक्स बद्दल चे विनोद हसवत ही नाहीत. बाकी चित्रपट मात्र भरपूर हसवतो. काही संवाद धमाल.
Arab guy whose shop is vandalized: "If not you then who will write 'Arabs go back'"?
Israeli guy: "probably 99% of the world"? Happy

मी तमिळ घजिनी फार पूर्वी पाहिला होता. काही दिवसान्पूर्वी हिन्दी, इरानी चाय वर पाहिला. आणि तमिळ पण. तमिळ मधील हिरो.. अमिर पेक्शा जरा शांत वाटला... आणि हो सूर्या(?) चा मेक अप छान जमलाय.
अशोक सराफ चा नवीन मराठी पहिलाय का कोणी..? टॉकीज मधे जाऊन पहाण्यासारखा आहे का? Happy

तामीळ जनी मी पाहीला ना.
मी वेलकम टू सज्जन्पूर पाहीला. टाइमपास एकदम.
श्रेयस एकदम मस्त काम करतो. कमला मस्त केलीय अमृताने. त्यात मला इला अरुणचे कम आवडले नी छक्क्याचे,तशी बरीच पात्रे हसवतात.
टीपी एकदम झाला.

काल रात्री channel surfing करताना दुरदर्शनच्या राष्ट्रीय वाहीनीवर 'नन्हे जैसलमेर' दिसला. सुरेख चित्रपट. द्विज यादव ने मन जिंकले. अवश्य पहा. दिल खुश होवुन जाइल. मागिल आठवड्यात पाहिलेल्या जम्बो पेक्षा हा चित्रपट सरस वाटला.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

मला पण नाही आवडला गजनी.. आमिर खान कडून परफेक्शन आपेक्शित असते, पण इतक्या तृटि, मठ्ठपणा आणि इतका टिपिकल वाटला .. म्हणजे आमिर च्या नावडत्या चित्रपटां मधे मोडणारा..फना, राजा हिंदुस्तानी कॅटेगरी!
व्हिलन च नाव चित्रपटाला मुळात द्लय अक्शाला, इतक काही सॉलिड पात्र नाहीते ते !
(हं, अता शोले ला गब्बर नाव दिल असत तर गोष्ट वेगळी)!
बर नाव दिल ते दिल, तर तो तरी चांगला घयाचा, पण कसला तो व्हिलन, काही ऍक्टिंग नाही कि काही स्ट्राँग कॅरेक्टर नाही , इतके पालतु कुत्यां सारखे गुंड हाताशी असताना स्वतः च मारामार्‍या करायला जाणारा इतका माठ व्हिलन ?
अगदीच टिपिकल हिंदी चित्रपट !
हिरॉइन नी काही सीन चांगले केलेत पण सुरवातीला टिपिकल साउथ स्टाईल ओव्हर ऍक्टिंग केलय !
गाणी पण अजिबात नाही आवडली, एक पण नाही...!
माझ्या कडून दिड स्टारः) !

जंबो बघीतला , मस्त सिनेमा आहे Happy

***************
गोड बोलायला
तिळगूळ कशाला ?

अशोक सराफ चा नवीन मराठी पहिलाय का कोणी..? टॉकीज मधे जाऊन पहाण्यासारखा आहे का?
>> हो मी पाहिलाय. फुल्ल टाईमपास. टॉकीजला तुम्ही किती पैसे घालवता यावर तो तिथे पाहावा का नाही अवलंबून. ५० -७५ रु तिकीटाला पात्र. Happy
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

खरंय आशु, फुल्ल टिपी आहे 'धोबीपछाड'. मी पाहिला टॉकीजला जाऊन. खरंतर नवीन काहीनाही पण कथा छान फुलवली आहे. प्रसाद ओकचा 'अकाउंटंट' सगळ्यात बेस्ट....

आशू, योगी .. धन्यवाद्...आज जायचा विचार चालू आहे. पण नक्कीच ५०-७५ पेक्षा जास्त पैसे लागतील असं दिसतय.. Happy

परवा 'बाप रे बाप - डोक्याला ताप' पाहिला...

'गलगले निघाले' पेक्षा बराच सुसह्य आहे...

मकरंद आनासपुरे २८ वर्षांचा कुठल्याही अँगल नी वाटत नाही...
किमान चाळिशीचा माणूस दिसतो...

गलगले तर स्ट्रेट डोक्याची मंडई करतो...
भरत जाधव ला आवरा...
तो केदार शिंदे मधल्या चांगल्या दिग्दर्शकाला सडवतोय...

बाकी आत्ता चांदनी चौक टू चायना बघणार आहे...
_______
धागे तोड लाओ चाँदनी से नूर के...

Pages