Submitted by लाजो on 16 October, 2010 - 23:50
श्रावण संपला, गणपती झाले. नवरात्र झाले, आज दसरा आता वेध लागतिल ते दिवाळीचे
दिवाळी म्हंटल की आठवतात दिवे, आकाशकंदिल, फटाके, रांगोळ्या अणि भरपुर फराळ आणि मिठाई
दरवर्षी करंज्या, लाडु, शंकरपळे, चिरोटे, चकली, शेव, चिवडा असे फराळाचे पदार्थ आपण बनवतोच.
त्याच्या पाककृतीच्या लिंक्स ही इथे टाका. म्हणजे सगळे पदार्थ एकाच ठिकाणी पहायला मिळतिल. शोधाशोध वाचेल
त्याव्यतिरीक्त, काहितरी नविन, जरा हटके असे फराळाचे पदार्थ किंवा मिठाई कुणी बनवत असेल, किंवा नेहमीचेच पदार्थ पण जरा वेगळ्या स्वरुपात कुणी बनवत असेल तर इथे सुचवा. पाककृती योग्य जागी टाकुन त्याची लिंक इथे द्या
चला तर आज दसर्याच्या शुभमुहुर्तावर दिवाळीची तयारी सुरु करु
सर्वांना भरपुर शुभेच्छा!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान छान रेसिपी आहेत यात.
खूप छान छान रेसिपी आहेत यात. जमेल तेवढ्या करून बघणार
एक सोप्पा चकलीचा प्रकार माझ्याकडूनही :-
शिळ्या पोळ्या (तेल लावलेल्या चपात्या नाही साधे फुलके) आठ ते दहा
(आदल्या रात्री मुद्दाम उरवायच्या किंवा करून ठेवायच्या)
चार टेस्पू तांदळाच पीठ
आलंलसुन पेस्ट, दही, तिखट,मीठ, हळद, तीळ
तळ्नाला तेल
पोळ्या मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यायचे त्यात सर्व जिन्नस एकत्र करायचं नेहेमीपेक्षा जरा कमीच कढत मोहन घालायचं आणि नेहेमीच्या चाकल्यासारखं पीठ भिजवून चकल्या तळून घ्यायच्या.
भाजणीच्या पिठाच्या ह्या चकल्या नाहीत असे ओळखायला सुद्धा येत नाही उलट त्याहूनही जास्त खुसखुशीत अन चविष्ट होतात. विशेष म्हणजे हवे तेवढे टिकतात.
मला चण्याच्या ओल्या डाळीचे
मला चण्याच्या ओल्या डाळीचे लाडू कसे करतात त्याची रेसिपी हवी आहे मिळेल का ? बहुतेक मारवाडी प्रकार आहे हा. अतिशय चविष्ट असतात हे लाडू
@ प्राप्ती : चण्याच्या ओल्या
@ प्राप्ती : चण्याच्या ओल्या डाळीचे लाडू , ही रेसिपी मिपा वरवाचली होती : http://www.misalpav.com/node/24914
जत्रेत मिळते ती गोड शेव कशी
जत्रेत मिळते ती गोड शेव कशी करायची कोणी सांगू शकेल का ?
मायबोली म्हणजे जीवनातला एक
मायबोली म्हणजे जीवनातला एक अविभाज्य घटक आहे.
पुदिन्याची शेव -
पुदिन्याची शेव - http://www.maayboli.com/node/45974
माहिम हलवा - http://www.maayboli.com/node/30714
बदामी हलवा - http://www.maayboli.com/node/46081
खव्याच्या करंज्या - http://www.maayboli.com/node/55491
गुळपापडीच्या वड्या /लाडू ची
गुळपापडीच्या वड्या /लाडू ची रेसिपी आहे का?
<< मायबोली म्हणजे जीवनातला एक
<< मायबोली म्हणजे जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. >>
पुर्न अनुमोदन.
गूळ पापडी हटके पदार्थांत भर
गूळ पापडी
हटके पदार्थांत भर "नमकीन काजू : सुलेखा"
बोरे -
बोरे - http://www.maayboli.com/node/30049
हिरवे मुग व पोह्याचे लाडू - http://www.maayboli.com/node/39830
यावर्षी कोण काय फराळ बनवणार
यावर्षी कोण काय फराळ बनवणार ?
अभारतीय लोकांना आवडणारे प्रकार सांगा.
यावर्षी नेहमीच्या शंकरपाळे, चिवडा , लाडू, बर्फी सोबत अजुन काहीतरी वेगळे हवय.
ह्यातलय एक दोन रेसीपी लिंक
ह्यातलय एक दोन रेसीपी लिंक पाहिलया. बघु काय जमतय ते.
वरती कणकेच्या रेसीपीच्या शंकरपाळी एक दोन पद्धती आहेत, बघुया जमेल तर.
(आधी खूप उत्साह असतो मग वाटते जावु दे, ऑर्डर करुया. तो खटाटोप नकोसा होतो.)
मला देसाईंचा mango pulp
मला देसाईंचा mango pulp वापरून वडी/बर्फी करायची आहे. कुणाला पाककृती माहित असेल तर इथे कृपया लिहीणार का?
धन्यवाद,
प्रिया
पोळ्या मिक्सर मधून एकदम बारीक
पोळ्या मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यायचे त्यात सर्व जिन्नस एकत्र करायचं नेहेमीपेक्षा जरा कमीच कढत मोहन घालायचं आणि नेहेमीच्या चाकल्यासारखं पीठ भिजवून चकल्या तळून घ्यायच्या.
भाजणीच्या पिठाच्या ह्या चकल्या नाहीत असे ओळखायला सुद्धा येत नाही उलट त्याहूनही जास्त खुसखुशीत अन चविष्ट होतात. विशेष म्हणजे हवे तेवढे टिकतात.
>>>>> हे वाचून थक्क झालेय. हे असं सुचतं कसं????? लै भारीये. पण आलंलसूण पेस्ट चकलीत??????
यावर्षी गुळाचे शंकरपाळे आणि
यावर्षी गुळाचे शंकरपाळे आणि लाडू करून पहायचे आहेत. पण रेसिपी नीट माहिती नाही. गुळाचे शंकरपाळे आणि लाडूची रेसिपी सांगाल का प्लीज?
इथे आहेत कि लिंका गुळ वापरू ,
इथे आहेत कि लिंका गुळ वापरू , वरतेच बघा.
उत्तर भारतात मठ्ठी
उत्तर भारतात मठ्ठी करतात.
चेंबुर क्याम्पात अमराठी प्रकार भरपुर मिळतात
उत्तर भारतात मठ्ठी करतात.
उत्तर भारतात मठ्ठी करतात. >>> मठरी
चेंबुर क्याम्पात अमराठी
चेंबुर क्याम्पात अमराठी प्रकार भरपुर मिळतात > म्हणजे कुठे???
चेंबुर क्याम्पात झामा मिठाई
चेंबुर क्याम्पात झामा मिठाई दुकान आहे. फर्टिलायझर टाउनशिप जवळ
प्राप्ती, चण्याच्या डाळीच्या
प्राप्ती,
चण्याच्या डाळीच्या लाडवाला, वाटल्या डाळीचे लाडू असेही म्हणतात. चण्याची डाळ भिजवून रवाळ वाटायची आणि ती तूपावर खमंग होईपर्यंत परतायची. हा फार कंटाळवाणा आणि वेळखाऊ प्रकार आहे. पण डाळ खमंग, मोकळी आणि बदामी रंगावर येईस्तो परतायची. मग डाळ जेवढी घेतली त्याच्या पाऊणपट साखर घेऊन त्याचा दोनतारी पाक करायचा त्यात ही परतलेली डाळ व सुका मेवा घालायचा, ती मुरली कि लाडू वळायचे.
पाक न करता, डाळ कोमट असताना त्यात बुरा साखर मिसळली तरी लाडू होतील असे वाटतेय. ( ठिसूळ होतील )
दिवाळी जवळ येते आहे,
दिवाळी जवळ येते आहे, त्यानिमित्ताने ह्या बाफची आठवण झाली आणि शोधायला जरा वेळ लागला, म्हणून बाफ वर आणण्यासाठी हा पोस्टप्रपंच
आली आली आली दिवाळी...
आली आली आली दिवाळी...
मी एकदा केले होते वाटल्या
मी एकदा केले होते वाटल्या डाळीचे लाडू. कष्ट आह्ते खूप पण चवीला खूपच सुंदर लागतात.
यंदा काय काय प्रकार करावेत
यंदा काय काय प्रकार करावेत याची यादी चालू झालीच आहे.
पैकी, बेसन लाडू. शंकरपाळे, चकल्या चिवडा, शेव हे हमखास होणारच. याव्यतिरीक्त सेव्हन कप स्वीट आणि अजून एखादा गोडाचा पदार्थ सुचवा. (सोपा सुटसुटेत आणि टिकाऊ)
करंज्या हा पदार्थ जमला तर करेन कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे.
गुळपापडीच्या वड्या कर नंदिनी.
गुळपापडीच्या वड्या कर नंदिनी. फारसा न चुकणारा आहे.
मीही एका रविवारात जमतील तेवढे करणार .
तेच्यात पाक आहे. आपण पाक
तेच्यात पाक आहे. आपण पाक म्हटलं की लांब पळतो. (म्हणून तर उत्तरेपासून इतक्या लांब चेन्नईला आहोत!!!)
म्या पाक नाहीच घालत . गुळाची
म्या पाक नाहीच घालत . गुळाची पावडर . बेसनाच्या लाडवासारखच. साखरे ऐवजी गुळ.
ह्यावेळी मी मेथीचे शंकरपाळे
ह्यावेळी मी मेथीचे शंकरपाळे करणार आहे. कृती देऊ का केल्यावर? सचित्र?
प्रिया, मँगो-पिस्ता बर्फीतली
प्रिया, मँगो-पिस्ता बर्फीतली फक्त मँगो बर्फी करू शकता. मलई बर्फी पण छान होते पल्प घालून.
http://www.maayboli.com/node/6425 मलई बर्फी
http://www.maayboli.com/node/29392 मँगो-पिस्ता सँडविच बर्फी
Pages