दिवाळी फराळाच्या पाककृतींची यादी आणि नवीन 'जरा हटके' प्रकार

Submitted by लाजो on 16 October, 2010 - 23:50

श्रावण संपला, गणपती झाले. नवरात्र झाले, आज दसरा Happy आता वेध लागतिल ते दिवाळीचे Happy

दिवाळी म्हंटल की आठवतात दिवे, आकाशकंदिल, फटाके, रांगोळ्या अणि भरपुर फराळ आणि मिठाई Happy

दरवर्षी करंज्या, लाडु, शंकरपळे, चिरोटे, चकली, शेव, चिवडा असे फराळाचे पदार्थ आपण बनवतोच.
त्याच्या पाककृतीच्या लिंक्स ही इथे टाका. म्हणजे सगळे पदार्थ एकाच ठिकाणी पहायला मिळतिल. शोधाशोध वाचेल Happy

त्याव्यतिरीक्त, काहितरी नविन, जरा हटके असे फराळाचे पदार्थ किंवा मिठाई कुणी बनवत असेल, किंवा नेहमीचेच पदार्थ पण जरा वेगळ्या स्वरुपात कुणी बनवत असेल तर इथे सुचवा. पाककृती योग्य जागी टाकुन त्याची लिंक इथे द्या Happy

चला तर आज दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर दिवाळीची तयारी सुरु करु Happy

सर्वांना भरपुर शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मँगो पल्प घालून खोबर्‍याचे लाडु अतिशय छान लागतात. कृती अगदी काहीच नाही. कंन्डेन्स मिल्क घालुन लाडु करतो तेव्हा त्यात मॅगो पल्प घालायचा. वेलची वगैरे घालायची नाही. अतिशय छान होतात हे लाडु.

गूळपापडीसाठी पाक करायची गरज नसते. आधी गूळ बारीक चिरून घ्यायचा. सगळी पिठे भाजून झाली कि, कि एकत्र करायची. भांडे खाली उतरून पण ते गरम असतानाच गूळ मिसळायचा. कालथ्याने ढवळायचे. तेवढ्या उष्णतेने गूळ विरघळतो. व सहज वड्या पडतात.

उलट या वड्या खुसखुशीत होतात. पाक करून केलेल्याच चिवट होतात. ( पारंपरीक वड्या तश्याच असतात. लहान बाळांना चघळायला देत असत. )

I am your member but still why I am not give access to certain recipes. It says...He paan pahanyachi tumhala mubha nahi. He paan sarvajanik nahi. Please help. I have been your member for so many years and I am a senior citizen and die hard fan of Maayboli. Kindly solve my problem at the earliest. Thanks. Sanjivani

संजीवनी, त्यासाठी तुम्हाला "पाककृती आणि आहारशास्त्र" या ग्रुपचे सदस्यत्व घ्यायला हवे. याच पानाच्या उजव्या बाजुला "पाककृती आणि आहारशास्त्र" असे लिहिलेले असेल, त्याखाली "Subscribe to group" या लिंकवर क्लिक करा.

Pages