बोरे (लोकसत्ता-चतुरंग मध्ये आज प्रकाशीत)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 October, 2011 - 01:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मोठी वाटी भरून तांदळाचे पिठ
पाऊण मोठी वाटी गव्हाचे पिठ
१ मोठी वाटी गुळ
२ चमचे तिळ
२ चमचे गोड तेल
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

तांदळाचे पिठ, गव्हाचे पिठ व तिळ एकत्र मिसळून घ्यावे. २ चमचे कच्चे
गोडेतेल (गरम न केलेले) वरून टाकावे. गुळ बारीक चिरून किंवा किसुन
घ्यावा. एका भांड्यात पाणी कोमट करावे. हे कोमट पाणी हळू हळू त्या
मिश्रणात टाकुन पिठ घट्ट मळून घ्यावे. मग लगेच त्या पिठाचे बोरांच्या
आकारा एवढे गोळे वळायचे.

कढईत तेल चांगले कडकडीत तापवायचे आणि मंद आचेवर
मधून मधून हलवत ही बोरे तळायची.

चांगलालालसर रंग येईपर्यंत खरपूस तळायची.

वाढणी/प्रमाण: 
खाऊन तुम्हीच सांगा.
अधिक टिपा: 

दिवाळी जवळ आली की बायकांची फराळ बनवण्याची लगबग चालू होते. ह्या वर्षी
काहीतरी नविन बनवू असा संकल्प सुरुवातीला आपण करतो. काही वेळा नेहमीचे
प्रकार करण्यातच सगळा वेळ निघुन जातो तर कधी कधी एखादा नविन प्रकार केला
जातो. पण हे नविन प्रकार करण्याच्या उत्साहात आपण जुने पदार्थ मात्र
कालबाह्य करतो. अश्याच जुन्या प्रकारातून मला माहीत असलेला एक प्रकार
म्हणजे बोरं.

बोरं हा जुना व हटके प्रकार मी पहिल्यांदा सासरी पाहीला. ह्या बोरांच्या
रेसिपीच्या आमच्या घरातील स्पेशालिस्ट आहेत माझ्या सासूबाई सौ. शालिनी
दत्तात्रेय म्हात्रे. सासूबाईंनी केलेली ही बोरं ज्या घरात आमची दिवाळी
जाईल तिथे जुना व हटके प्रकार म्हणून कौतूकाचे स्थान मिळवतात. मला
पाकशास्त्राची पहिल्या पासूनच आवड आहे. माझी आई सौ. शामला शशिकांत घरत
हिच्या हाताखाली मी सगळे
दिवाळीचे फराळ शिकले. लग्नानंतर दुसर्‍या वर्षापासून मी दिवाळीच्या
फराळांची जबाबदारी स्वीकारली. सासूबाईंनी सगळे प्रकार माझ्या आवडीनुसार
करण्यास परवानगी दिली पण बोर मात्र मिच करणार हे त्यांनी आवर्जुन
सांगितले. अजुनही ही बोरे त्याच करतात. आम्ही फक्त बोरे वळायला मदत करतो.
सासूबाईंच्या मते बोर ही कडकच चांगली लागतात. नरम बोरांना तेवढी चव लागत
नाही. अगदी सासूबाईंनी
केलेली ही बोरे चावत चावत खाताना ह्यांची गोडी अधीक वाढते. तर आता पाहूया
ही बोर कशी करतात.

गुळ कमी वाटल्यास थोड्या कोमट पाण्यात विरघळवून ते पिठात कालवावे.

गॅस मोठा ठेऊ नका त्यामुळे आतून न शिजता बोरे करपतील.

ही बोरांची रेसिपी मी चतुरंग ह्या पुरवणीसाठी दिली होती ती आज प्रकाशीत झाली आहे.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>आज सकाळीच वाचले मी...पण मला माहिती नव्हते ती तू आहेस म्हणून
जागुतै, म्हणजे मला माहीत होतं तुझं नाव.. पण जेव्हा वाचलं तेव्हा क्लिक नाही झालं...
अभिनंदन..

मी पण वाचल लोकसत्तात....
अभिनंदन !!!!!!!
Happy

जागू, अभिनंदन. आज वाचलं Happy

कित्ती मस्त गोड गोड दिस्तायेत बोरं.. अश्शी उचलून घ्यावीशी वाटतायेत!!!>>>>अगदी अगदी Happy

लोकसत्ता-चतुरंग प्रकाशन साठी तुझे अभिनंद्नन जागु....मला ही बोरं आवडतात..पारंपारिक रेसिपी साठी तुला आणि तुझ्या सासुबाईना धन्यवाद..फोटो पाहुन मला छान्,खरपुस तळलेले गुलाबजाम [पाकात पोहायला सज्ज] वाटले होते..

मस्त दिसतायच बोरं .... फोटो पाहून माझ्या आजीची ( आईच्या आईची ) आठवण झाली. अजूनहि ती गावाला दिवाळीला हा पदार्थ न चुकता करते... Happy

कडकच खायला मजा हेते हे मात्र खर... Happy

अभिनंदन जागु.. खुपच मस्त पदार्थ आहे.. आवडला.. नक्कीच करुन बघीन. फोटो बघुन लगेचच तोंडात

घालावीशी वाटली..:)

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद. आज करंजी करत आहे म्हणून बर्‍याच वेळाने आले. आता ब्रेक घेतला आहेत. अर्ध्याच झाल्या आहेत.

जागु
<<<<<<<ही बोरांची रेसिपी मी वास्तुरंग ह्या पुरवणीसाठी दिली होती ती आज प्रकाशीत झाली आहे.>>>>>>
वास्तूरंगच्या तिथे चतुरंग करशील?
परत एकदा अभिनंदन!!!!!

उजु धन्स ग. सकाळी करन्जा करायच्या गडबडीत पटकन टाकुन गेले. मागचा बुलबुलचा लेख वास्तुरन्गमध्ये आला होता त्यामुळे त्याचाच सराव झालेला. बदलते आता.

जाई, उल्हास, दक्षिणा, भरत, सारिका धन्यवाद.

ही गरम गरमच खायची असतात गार गार म्हणजे २/३ दिवसांनी खाल्लेली चालतात... म्हण्जे गावाला घेउन जायला चालतील का ?
मस्त आणि सोप्पी रेसिपी.. करुन बघणार नक्की Happy

अभिनंदन जागू. आमच्या कडे बनवतात बोरे. माझे बाबा लहान असताना शाळेत जाताना खिशात भरून घेऊन जात. Happy

तुमच्या कडे डांबोर्‍या बनवतात का?

Pages