दिवाळी फराळाच्या पाककृतींची यादी आणि नवीन 'जरा हटके' प्रकार

Submitted by लाजो on 16 October, 2010 - 23:50

श्रावण संपला, गणपती झाले. नवरात्र झाले, आज दसरा Happy आता वेध लागतिल ते दिवाळीचे Happy

दिवाळी म्हंटल की आठवतात दिवे, आकाशकंदिल, फटाके, रांगोळ्या अणि भरपुर फराळ आणि मिठाई Happy

दरवर्षी करंज्या, लाडु, शंकरपळे, चिरोटे, चकली, शेव, चिवडा असे फराळाचे पदार्थ आपण बनवतोच.
त्याच्या पाककृतीच्या लिंक्स ही इथे टाका. म्हणजे सगळे पदार्थ एकाच ठिकाणी पहायला मिळतिल. शोधाशोध वाचेल Happy

त्याव्यतिरीक्त, काहितरी नविन, जरा हटके असे फराळाचे पदार्थ किंवा मिठाई कुणी बनवत असेल, किंवा नेहमीचेच पदार्थ पण जरा वेगळ्या स्वरुपात कुणी बनवत असेल तर इथे सुचवा. पाककृती योग्य जागी टाकुन त्याची लिंक इथे द्या Happy

चला तर आज दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर दिवाळीची तयारी सुरु करु Happy

सर्वांना भरपुर शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेक्ड चकलि मी केलीय. थोड्या वेळ चांगल्या लागतत , बरेच दिवस झाले ना(जेम तेम चार दिवस का काय ते) की चामट(चिवट?) लागतात. मला नाही आवडल्या.

आयडीया करुन बघायला हरकत नाही. फार वेळकाढु वाटत नाहियेत Happy

थोड्याच करायच्या २ दिवसात संपतील अश्या, संपल्या की परत करायच्या Happy

माझ्याकडे पण २ दिवसात संपतील. पण मागच्या वर्षी मी चकली या प्रकाराचा धसका घेतला आहे. आधी ट्रायल म्हणुन १ वाटीच्या केल्या. त्या मस्त झाल्या म्हणुन जास्त भिजवलं पीठ तर सगळा पोपट. विरघळायला लागल्या तेलात. त्यामुळे माझी आता हिंमत होत नाहिये या ट्राय करायची.

खारे शंकरपाळे जरा लहान आकारात कापले, की चिजलिंग्ससारखे दिसतात. त्याची चवपण तशीच व्हायला हवी असेल, तर काय करता येईल?

मठरी काल केलेली:--
साहित्यः- २ वाटी मैदा असेल तर, ३ चमचे बरिक रवा, थोडासा ओवा, कसुरी मेथी, मिठ, जिरे पुड, आणि गरम तेलाचे मोहन, सगळे नीट घट्ट मळायचे, ओल्या कपड्यात २०-३० मिनिट बांधुन ठेवायचे. नंतर लाटुन शंकरपाळ्यासारखे (पण थोडेसे लांब स्टिक सारखे) कापुन त्याल टोचे मारायचे म्हणजे ते तळताना फुगणार नहित. मग छान तळायचे.. मस्त खमंग होतात. पुरी सारखा पण आकार देउ शकता.. पण तळायला खुप वेळ लागतो आणि कढइत एका वेळेस कमी बसतात.

मी इथे फोटो लोड करण्याचा try करत आहे पण मला 'upload failed' असा message येत आहे, का बर??? Sad

chakali.jpg
दिवाळीला ह्या बेक केल्या, चांगल्या झाल्या होत्या. रेसीपीत सोडा होता, त्यामुळे तेव्हड्या नाही आवडल्या पुढच्या वेळी बीना सोड्याच्या करुन पाहीन

मिनोतीच्या सात कप बर्फीत गुलकंद टाकुन पुर्वा च्या काजु-मनुकेच्या पणत्यांनी ह्या वड्या केल्या. मस्त झाल्या होत्या.Picture 030.jpg

हाय Happy

बघता बघता दिवाळी आली Happy

तयारीला लागलात की नै???

यंदा कुणी काही नवे, हटके फराळाचे प्रकार करणार असाल तर इथे नक्की लिहा Happy

हॅप्पी फराळ मेकिंग Happy

Pages