दिवाळी फराळाच्या पाककृतींची यादी आणि नवीन 'जरा हटके' प्रकार

Submitted by लाजो on 16 October, 2010 - 23:50

श्रावण संपला, गणपती झाले. नवरात्र झाले, आज दसरा Happy आता वेध लागतिल ते दिवाळीचे Happy

दिवाळी म्हंटल की आठवतात दिवे, आकाशकंदिल, फटाके, रांगोळ्या अणि भरपुर फराळ आणि मिठाई Happy

दरवर्षी करंज्या, लाडु, शंकरपळे, चिरोटे, चकली, शेव, चिवडा असे फराळाचे पदार्थ आपण बनवतोच.
त्याच्या पाककृतीच्या लिंक्स ही इथे टाका. म्हणजे सगळे पदार्थ एकाच ठिकाणी पहायला मिळतिल. शोधाशोध वाचेल Happy

त्याव्यतिरीक्त, काहितरी नविन, जरा हटके असे फराळाचे पदार्थ किंवा मिठाई कुणी बनवत असेल, किंवा नेहमीचेच पदार्थ पण जरा वेगळ्या स्वरुपात कुणी बनवत असेल तर इथे सुचवा. पाककृती योग्य जागी टाकुन त्याची लिंक इथे द्या Happy

चला तर आज दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर दिवाळीची तयारी सुरु करु Happy

सर्वांना भरपुर शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डायबेटिस लोकांसाठी लाडू, करंज्या इ. च्या रेसिपी आहेत का कुठे? ईथे मधुमेही लोकांचा बीबी आहे पण तिथे काही माहिती नाही. Sad
मला या वर्षी दिवाळी फराळासाठी काही sugarless/low sugar/low carbs रेसिपी हव्या आहेत. मिळतील का इथे?

आश, त्या पणत्यांमध्ये बेदाण्याऐवजी जर क्रॅनबेरी वगैरे लावली तर वड्यांच्या ब्राऊन रंगावर उठून दिसेल.

मला थोडी मदत करा. पाडव्याच्या दिवशी सतिशने ऑफिसमधल्या काही लोकाना घरी बोलावले आहे. (पुढच्या आठवड्यापासून रोज एकाच्या घरी जाणं आहे.) संध्याकाळी नाश्त्याला बोलावलेलं असल्याने दिवाळीचा पारंपारिक मराठी फराळ ठेवणं जास्त योग्य असं मला वाटतय. (बाकीचे कोणच मराठी नाहीत.) मी चिवडा/चकली/शेव्/करंजी/बेसनाचे लाडू/शंकरपाळी इतके पदार्थ करायचं ठरवतेय. (मला इतकंच येतं) पण सोबत अजून एखादा गरम पदार्थ करावा का? आणि करायचा झालाच तर काय करता येइल?

रगडा पॅटिस
भेळ/ शेव पुरी/ दही बटाटा पुरी (शेव, पुर्‍या इत्यादी सामान मिळालं तर, पण हे पदार्थ गरम नव्हेत Wink )

मिसळ! (खरं तर ती दिवाळीनंतर करतात... गोड खाऊन कंटाळा आलेला असतो आणि उरलेला चिवडा, शेव वगैरेंना न्याय द्यायचा असतो!) लोकांच्या आवडीनुसार बुफे स्टाईलमध्ये चिरलेला तिखट मीठ लावलेला कांदा, कोथिंबीर, चिवडा, शेव, पोहे, उकडलेले बटाटे, कोथिंबीर, उसळ व कट असे मांडलेस तर आवडीप्रमाणे घेऊ शकतील. सोबत टोमॅटोच्या चकत्या, लिंबाच्या फोडी, ब्रेड स्लाईस. दही ऑप्शनल.

मिसळ! (खरं तर ती दिवाळीनंतर करतात... गोड खाऊन कंटाळा आलेला असतो आणि उरलेला चिवडा, शेव वगैरेंना न्याय द्यायचा असतो!) >> अगदी अगदी अके.. Happy
उसळ व कट >> कट कसा कराय्चा याची रेसिपी दे ना.. मी कधी वेगळा केला नाहीये..

चमकी, दिलेल्या प्रमाणानुसारच सगळं साहित्य घेतले असाल तर मिश्रण नक्की आळेल. मिश्रण पुन्हा गॅसवर ठेवून आळवा, एकूण मिळून एक तास तरी लागतो त्यासाठी (स्वानुभव!).

मंजूडे, आपण घरी केलेलं अस्लं तर ज्याना माहित नाही, त्याना॑ ते विकतंच वाटू शकेल. इथे चिवडा, चकली शेव वगैरे विकत मिळते म्हणून. Proud गरम म्हणजे एकतरी ताजा पदर्थ ठेवू का असा विचार करत होते. मिसळ ठेवली तर चालेल असं वाटतय. Happy

काल एकाच्या घरी गेलो होतो, त्यानी बर्‍यापैकी नॉन व्हेज मेनू ठेवला होता. आणि ७०टक्के पब्लिक व्हेजवालं. त्या बाईची तारांबळच झाली. मग जवळच्या स्व्वीट मार्टमधे जाऊन समोसे वगैरे आणावे लागले.

वरच्या काही शेवटच्या पोस्ट वाचून प्रश्ण पडला की, लोकं 'बेत काय करावा' टाईप प्रश्ण जसे लोकं घरी येणार काय बनवू असे इथे का विचारतात? दुसरा बीबी आहे ना...

कालच्या म्हणजे २२ ऑक्टोबर २०११ च्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये भरपुर जुने पदार्थ आले आहेत. मीही त्यात बोरांची रेसिपी टाकली आहे. माबोवर आहे.

झटपट, कमी श्रमात लाडू बनवायचे असतील तर पंढरपुरी डाळ्याचे लाडू फार सोपे पडतात. पंढरपुरी डाळे + पीठीसाखर + वेलची पूड मिक्सरमधून काढल्यावर त्यात पातळ केलेले तूप घालायचे व लाडू वळायचे. पटकन होतात व पटकन संपतात.

लाजोला वेळ असेल तर यात आधी उल्लेख झालेले पदार्थ वरच्या मूळ धाग्यात लिंक्स टाकल्या तर जास्त चांगलं रेफर करता येईल.

please mala madat kara, mi chaklichi bhajni tayar karun chaklya banavlya, pan chaklya telat taktach virghaltat. bhajnit telache mohan jara jastach padle vatate, yavar upay suchava

मी rice, gahu,maida,besan सर्व वेगअवेगळे, थोडेथोडे टाकुन बघितले पण काही ऊपयोग नाही झाला. मग नक्की काय केले कि चकल्या तेलात तुट्णार नाहीत.

..

Pages