अमेरिकेतील निवडणुका

Submitted by लालू on 13 May, 2008 - 16:06

अमेरिकेतील निवडणुका.
२००८ अँड बियॉन्ड...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता केनियाला प्रचंड मदत मिळणार. ओबामा जरी Outsourcing च्या विरोधात असला तरी केनियाला भरपूर कामे जाणार. कारण त्याला परत २०१२ मधे जिंकायचे आहे, त्यासाठी पैसे लागतीलच.

२०१६ मधे मात्र बॉबि जिंदाल, मूळचा भारतीय माणूस, निवडून येणार.
तोपर्यंत मी जिवंत नसेन, असलो तरी मला माझी अवस्था फार वाईट असेल. राष्ट्राध्यक्षच काय, लहान मुलाला जसे म्हणतात, सोन्या, तुझे नाक दाखव, असे म्हणतात नि मग आधी डोळे, कान दाखवून झाल्यावर तो जसे बरोब्बर नाक दाखवतो, तसे माझे होईल!

म्हणून लक्षात ठेवा. बॉबि जिंदाल २०१६ मधे. मी हे आत्ताच सांगून ठेवतो आहे.

टण्या, केदार अगदी अगदी.. आमचा मनपा किंवा विधानसभेला सेनेचा बालेकिल्ला.. पण लोकसभेच्यावेळी लयी मारामारी असायची.. आम्ही बूथ टाकून बसायचो रस्त्यावर आणि मग प्रत्येक पक्षातर्फे दुपारि पुरी भाजीचे बॉक्स यायचे.. संध्याकाळी विजयोत्सव.. बहुधा शाखेपासूनच निघायची मिरवणूक.. सगळे फेटे बांधून अगदी.. दे धमाल !!! आम्ही कॉलेजच्या निवडणूकीत सुद्धा नाशिकबाजा आणला होता आणि पोरं पोरी तीन तास नाचलो होतो कॉलेजबाहेर Happy
टण्या, आबा पाटलांचा जोर का रे तुमच्या इथे?
माफ करा पण म्हटलं शेंडे नक्षत्र येईपर्यंत भारतातला निवडणूक रंग उधळावा.. Proud

Happy
>>२०१६ मधे मात्र बॉबि जिंदाल, मूळचा भारतीय माणूस, निवडून येणार
तो आहेच की आत्ता गव्हर्नर. १६ मध्ये कोण म्हणून निवडून येणार? आमचा मार्क वॉर्नर कधी मग? आणि बाईंचे काय? त्यांचा (किंवा कोणत्याही स्त्रीचा) टर्न कधी येणार? Happy

शेंडे नक्षत्र कुठे गायब झाला?>>>
तो आनंदोत्सवात दंग असेल..
--- पेलिनच्या सांत्वना साठी गेला आहे.

ओबामाचे अभिनंदन, आनंदोउत्सव पुरे म्हणा आता कामाला लागा.

२०१६ मधे मात्र बॉबि जिंदाल, मूळचा भारतीय माणूस, निवडून येणार >>

चला, म्हणजे २०१६ मध्ये भारतात एक सुट्टी मिळणार... Happy

टण्या, उपासा मी ही ऐकेकाळी त्यातूनच गेलोय. फरक इतकाच मी जरा थोड्या वरच्या सर्कल मध्ये काम करायचो. तालुका प्रमुख होतो मी तेव्हा.

आपला उमेदवार निवडून आला की काय जबरी फिलींग येत, मग ते वॉल पेटींग, पोस्टर चिटकवने, रात्र रात्र जागून लोकांच्या याद्या तयार करुन निवडनुकीच्या दिवशी त्यांना खास वोटींग करायला भाग पाडने, ( आणि नंतर ४ वाजले की कोण कोण आले नाही याची यादी "त्या" व्होटर्स क्डे सुपुर्त करने Happy ) इ इ कामाचे नंतर काही वाटत नाही. मग त्या वेगवेगळ्या स्ट्रॅटर्ज्या आखायच्या, प्रत्येक जातीतल्या मोठ्या व्यक्तीला पक्डायचे सर्व खेड्यांमधले सरपंच वैगरेची मिटींग घ्यायची, रस्तावर उभे राहुन भाषन ठोकायची वैगरे जाम मजा यायची तेव्हा. आमच्या शेजारी काँग्रेसच्या खासदार राहतात, मग निवडनुकीच्या काळात त्या गल्लीत मोठ्या लोकांकडे कंप्लेन करायच्या की ऐकच घर 'भगव' कसे दिसतीय, काहीतरी करा. Happy पण १९९२ पासुन नांदेड मध्ये भगवाच येतो. ह्यावेळी काय होइल माहीत नाही.

श्या. तू ते वर लिहील्यामूले मी नॉस्ट्ल्जीक की काय ते झालोय. तिथे राहीलो असतो तर ऐव्हाना काहीतरी वेगळ्या लेव्हलवर काम करता आले असते. आता जाम वाईट वाटतेय. त्यामूळे आता चर्चा(च) करन्याशिवाय पर्याय उरला नाही.

का???????????????????

lets try to build better India by then... lets try to make better young generation instead of just giving them education. education system is broken, percentage based system is killing the talent. We are pround of breaking rules, instead lets try to bring the nature where one will follow the rules by his/her own will, to make better india.

lot to say, but dont have words...

(was with respect to "चला, म्हणजे २०१६ मध्ये भारतात एक सुट्टी मिळणार...", but can be applied to KJ post)

<<तसे कोणी का येईना मला काय फरक पडतो. माझा देश थोडीच आहे हा.>>

अस काय केदार, आता इराण मधले लहानमोठे अश्राप जीव विनाकारण मरणार नाहित हा काय कमि महत्वाचा फायदा आहे? शिवाय ह्या देशातल पाकिस्तानच अवास्तव स्तोम कमि होइल ते वेगळच.

बाकि काहि असो आपण सगळ्यानि 'इतिहास' घडताना प्रत्यक्ष बघितला हेहि नसे थोडके.

@
झक्कि काका, अस काय करता २०१६ मध्ये तुम्हि मतदान करणार अगदि नक्कि, अहो भारतिय माणसाला निवडुन द्यायच आहे ना तुम्हाला.

देशातल पाकिस्तानच अवास्तव स्तोम कमि होइल ते वेगळच. >>
हो हे मात्र नक्की होइल. ओबामा तसे आधीही म्हणाला होता.
अमेरिकासोडून इतर ठिकानी जन्मलेल्या कोणालाही अमेरिकन प्रेसीडेंट होता येत नाही. बॉबी कुठ जन्मला.

>>अहो भारतिय माणसाला निवडुन द्यायच आहे ना तुम्हाला
झक्की, तुम्ही जिन्दालला निवडून देणार?? Lol

केदार, इथेच जन्मलाय रे तो. मॅकेनच्या रनिन्ग मेट लिस्टमध्ये होता तो सुरुवातीला.

केदार,
बॉबी इथेच अमेरीकेत (Baton Rouge, Louisiana), जन्मलाय १९७१ साली.
-इति विकिपेडीया

बॉबी जिंदल, (नुक्तावाला ज) जिंदाल नाही. ह्याच खर नाव पियूष जिंदल. बॅटनरुजमध्ये जन्मला. तो स्वतःपण उत्तम वक्ता आहे. त्याचे आईवडिल भारतातून आहेत. वडिल इंजिनियर आहेत आणि आई प्रोग्रॅमर होती काही वर्षांपूर्वी. आता माहित नाही काय करते ते.

खूप ब्राईट माणूस आहे हा. Rhode Scholar आणि मला वाटत Brown University graduate आहे. लुईझियानाच्या लोकांचा आवडता आहे. आईकच्या वेळच्या त्याच्या actions मुळे खूपच popular झाला आहे. मक्केनने त्याला घेतल असतं तर मक्केन जिंकलाही असता. पण बॉबी स्मार्ट आहे. नुकतच गव्हर्नरची टर्म सुरु केल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे तो प्रेसिडेन्शिअल एलेक्शनमध्ये नव्हता.

आणि बाईंचे काय? त्यांचा (किंवा कोणत्याही स्त्रीचा) टर्न कधी येणार?
असे पहा, लालू, १९६५ च्या आसपास काळ्या लोकांची गुलामगिरी बंद करून त्यांना मतदानाचे हक्क दिले (फक्त पुरुषांना). त्यानंतर १४७ वर्षांनी काळा माणूस, तो सुद्धा अर्धा काळा, गोर्‍या आ़जी आजोबांनी वाढवलेला, माणूस निवडून आला.

आता बायकांना मतदानाचा हक्क कधीतरी १९१० च्या दशकात मिळाला. त्यानंतर १४७ म्हणजे २०५७ साल उजाडते. तेंव्हा २०५६ ला येईल एखादी बाई निवडून. ती सुद्धा तुमच्या सारखी मूळ भारतीय! (तोपर्यंत अमेरिकेतच जन्म झाला पाहिजे हा कायदा बदलतात येईल). धर्माने हिंदू. म्हणजे परत एकदा आपल्या स्वस्तिकाला अभिमानाने आपण मिरवू शकू. तेंव्हा कळेलच की हे यहुदी खरच सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत की मुसलमानांसारखेच धर्मवेडे आहेत!

झक्की,

१९६५ (किंवा १८६५) आणि १४७ हे आ़कडे टॅली होत नाहीत....आणि यहुदी म्हणजे ज्यू लोक....तुम्हाला ख्रिश्चन म्हणायचे आहे का?

थोडक्यात काय तर आमच्या हयातीत हे होणं कठीणच दिसतंय.. Proud

१९६५ (किंवा १८६५) आणि १४७ हे आ़कडे टॅली होत नाहीत....आणि यहुदी म्हणजे ज्यू लोक....तुम्हाला ख्रिश्चन म्हणायचे आहे का?

मी १९६५ ऐवजी चुकून १९६५ लिहीले. म्हणून असे झाले.
स्वस्तिक पाहिले की यहुदी लोकांचे टाळकेच सटकते. कारण हिटलर ने ते वापरले. कितीदा समजावून सांगितले की हिंदू लोकांत स्वस्तिक अत्यंत पवित्र मानतात, शिवाय हिटलरने स्वस्तिक उलटे काढले होते वगैरे. पण नाही!

म्हणून असे लिहीले मी. आता तोपर्यंत हिंदू धर्मातील लोकांना आपल्या धर्माची लाज वाटणे बंद झाले असावे अशी आशा आहे.

निवडणुका झाल्या, फोनाफोनी झाली आता हे बघा !!

का हो लालू, तुमच्या बाई म्हणे सेक्रेटरी ऑफ स्टेट होणार? मज्जा आहे नि काय.
सिंड्रेला, धन्यवाद. मी करीन प्रयत्न.
जमले तर चार वर्षांची चंगळ. शिवाय इथे पण सरकारी नोकरांना भारतातल्यासारखेच खूप पैसे खाता येतात. जरा संयम ठेवला तर उगाच बोभाटा होणार नाही.
जे आयुष्यभर जमले नाही ते आता करून बघायला पाहिजे, मरण्या आधी.

आयर्वींग वॅलेसची 'द मॅन' कादंबरी कोणी वाचली आहे काय? काळा माणूस अध्यक्ष होतो हाच प्लॉट आहे.अजुनही रिलेव्हंट वाटते.

*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

12:03
did you listen,.... how much he stumbled while taking the oath. Happy

12:30
अरे बापरे, हिंदुंचे नाव काढले स्पीच मधे.

3:12
"We are a nation of Christians and Muslims. Jews and Hindus... and non-belivers."
- Obama

so are they going to change the dollar bill now? "In God We Trust"?

couple of my american catholic friends dont like that statement. म्हणे ह्या वाक्यमुळे बाकीच्या धर्मातल्या लोकांना अमेरीका एकसारखी वागणूक देत नाही हे सिद्ध होते. आणि atheist चे काय.

म्हणे अमेरीकेत लोकांना freedom नाही. Happy

त्यांना विचारले कधी अमेरीके बाहेर पाऊल ठेवलेय का, freedom नाही म्हणे.

मग? घेतलेच पाहिजे हिंदूंचे नाव! जगातला सर्वात जुना नि अजूनहि 'जस्साच्या तसा' टिकलेला धर्म. त्याचा उल्लेख न करून कसे चालेल? हळू हळू हाच धर्म पुढे येणार. व्हाईट हाऊसमधे श्रीसत्यनारायणाची पूजा, नि श्री गजाननाची मूर्ति दिसेल तो दिवस सोन्याचा!

मग? घेतलेच पाहिजे हिंदूंचे नाव! जगातला सर्वात जुना नि अजूनहि 'जस्साच्या तसा' टिकलेला धर्म. त्याचा उल्लेख न करून कसे चालेल? हळू हळू हाच धर्म पुढे येणार. व्हाईट हाऊसमधे श्रीसत्यनारायणाची पूजा, नि श्री गजाननाची मूर्ति दिसेल तो दिवस सोन्याचा!

काय technology आहे, speech संपुन दोन मिनीट नाही झाले की लगेच text आले पण.

http://www.cnn.com/2009/POLITICS/01/20/obama.politics/index.html

तो दिवस सोन्याचा!>>> माणूस कधिही सुखी रहात नाही. एक झाले की दुसरे पाहीजे Happy

संध्यानंद ची बातमी http://www.theonion.com/content/news_briefs/hillary_clinton_mouthing

ओबामाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्याचे भाषण प्रत्यक्ष ऐकायला मिळाले. परेड मध्ये ओबामा, बायडन यांना अगदी जवळुन बघाता पण आले. ओरडुन ओरडुन घसा पार बसलाय. कडाक्याच्या थंडीत ५ तास सेक्युरीटीच्या लाईन मध्ये उभे रहाण्याचे चीज झाले. Happy

ओबामा नाही अडखळला. नन्तर मी टिप्पणी ऐकत होते तेव्हा ते म्हणाले की जो त्याला शपथ सान्गत होता त्याने शब्दान्ची उलटापालट केली म्हणुन ओबामा थाम्बला.

वाह रुनी! सही!

हो ना, ओबामा मुळीच अडखळला नाही. उलट जस्टीस रॉबर्ट्सने शब्दांची अदलाबदल केल्यावरही बराकने व्यवस्थित शपथ घेतली.

In any case, who cares whether he stumbled or not! History is made! जगात काही काही चांगलेही घडते आहे! Happy

Pages