उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)
उकडीसाठी साहित्य :
४ वाट्या तांदुळाची पिठी
३ वाट्या पाणी
१ पळी तेल
१ लहान चमचा साजूक तूप
चवीपुरते मीठ
सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे.
उकड काढण्याची कृती:
प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदुळाची पिठी घाला. नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची. (काळजी म्हणून वाफ येण्यासाठी जी झाकणी/ताटली ठेवली असेल तिच्यावर साधे/थंड पाणी घाला म्हणजे उकड खाली जळणार नाही.) थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्यायची.
मोदक करण्याची कृती:
१. उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.
२. या गोळ्याची वाटी बनवा.
३. दोन्ही हातांचा वापर करून वाटी आणखी खोलगट करा. यासाठी अंगठा आत आणि बाकी सर्व बोटे बाहेरच्या बाजूने घेत दोन्ही हाताने वाटीला गोल आकार देत खोल करायचे आहे.
४. या वाटीमधे मग एक ते दीड चमचा सारण भरा.
५. आता वाटीला एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्या हाताची ३ बोटे (अंगठा, अंगठ्याच्या बाजूचे index finger आणि मधले बोट) वापरून पाकळ्या काढायच्या आहेत. यात index finger वाटीच्या आत आधाराला व अंगठा आणि मधल्या बोटाची सरळ चिमटी करून वाटीच्या खालपासून पाकळी काढावी.
६. एक एक करत सर्व पाकळ्या काढाव्या. जितक्या जवळ आणि सारख्या अंतराने असतील तितका मोदक नंतर चांगला दिसेल.
७. मग मोदक तळव्यावरच ठेवून दुसर्या हाताने पाकळ्या जवळ घेत घेत मोदक बंद करत जावा.
८. मोदक पूर्ण बंद करून वर टोक काढायचे आणि एक एक पाकळी चिमटीत धरून तिला आणखी शेप द्यायचा ज्यामुळे मोदक अधिक उठावदार दिसतील.
या नंतर मोदकपात्रात पाणी घालून ते गरम करायचे. जाळीवर हळदीची/केळीची पाने घालून (त्याने मोदक खाली चिकटणार नाहीत.) त्यावर मोदक ठेवून पंधरा मिनिटे वाफवायचे. झाले मोदक तयार.
-----------------------------------------------------------------------------------
टीप : सराव म्हणून लहान मुलांच्या खेळण्यातली प्ले डो (play dough) वापरून मोदक वळून बघू शकता.
recipe of ukadiche modak in marathi
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख
मस्त... तो.पा.सु
मस्त... तो.पा.सु
काय तरी बायका एक्स्पर्ट असतात
काय तरी बायका एक्स्पर्ट असतात एकेक..मी आताच गाठोडं केलं उकडीचं...
अगदी योग्य वेळेला हहचा लेख वर
अगदी योग्य वेळेला हहचा लेख वर आला. आणि पुन्हा एकदा अप्रतीम मोदक नुस्ते फोटोतच बघून जीव तडफडला.
उकड थंड झाल्यावरही मोदक करता
उकड थंड झाल्यावरही मोदक करता येतात का? की उकड गरम असतानाच करावे लागतात?
प्राची उकड काढल्यानंतर मळून
प्राची उकड काढल्यानंतर मळून घेतल्यावर लगेच करत जा.
मंजुडी +१
मंजुडी +१
हह चे अजरामर मोदक. इतके
हह चे अजरामर मोदक.
इतके सुंदर मोदक खरंच नाही पाहिले कुठे.
आज माझी उकड इतरत्र लक्ष
आज माझी उकड इतरत्र लक्ष द्यावं लागल्याने पुर्ण गार झाली होती. तसाच धीर धरुन थोडा पाण्याचा हात घेऊन एक एक गोळा मळून लगेच वळला. मुळात मला सुबक वळता येत नाहीत, पण गार झाल्यावरची उकडीचा मोदक करता आला.
शतक
शतक
हहच्या मोदकांचे फोटो
हहच्या मोदकांचे फोटो पाह्यल्यावर मी आज उगाचच व्यर्थ इत्यादी उडत होते हे पक्कं कळलं..
अश्विनी छान झालेत. पुपुवरचा
अश्विनी छान झालेत. पुपुवरचा जाळीवरच्या मोदकांचा फोटो मस्त दिसतोय.
अप्रतिम, किती देखणे मोदक आहेत
अप्रतिम, किती देखणे मोदक आहेत
हह, माझा १ली फ मधला मोदक
हह, माझा १ली फ मधला मोदक दिसतोय ढब्बाड्या कळ्यावाला तुझ्यासारखा छोट्या पण भरपूर कळ्यावाला करायचा प्रयास करेन आता
केश्वे, तुझा पहिली फ तर मग
केश्वे, तुझा पहिली फ तर मग माझा मोदकाची चेष्टा म्हणावा लागेल.
हह आज तुझ्या कृतीने मोदक
हह
आज तुझ्या कृतीने मोदक करायचा अयशस्वी प्रयत्न केला पण क्र. ५ च्या फोटोत जी पायरी दाखवली आहे तिच्यानंतर माझे डायरेक्ट उकडीचे चेंडूच झाले त्यामुळे फोटो काढलेच नाहीत.
पुढच्यावेळी मी मातीचेच मोदक करणार आहे आणि ते भट्टीत भाजणार आहे म्हणजे परमनंट मोदक होतील, हे उकडीचे मोदक करणं काही खायचे काम नाही.
रुनी
रुनी
माझा झब्बू..
माझा झब्बू..
रैना हसू नकोस तुला माहित नाही
रैना हसू नकोस तुला माहित नाही मी किती दु:खी झाले आहे ते
रूनी दु:खी होऊ नकोस.. माझ्या
रूनी दु:खी होऊ नकोस.. माझ्या मोदकचेष्टेचे फोटु बघ. म्हणजे तुला बरं वाटेल.
रुनी, अगं तू एवढी कलाकार
रुनी, अगं तू एवढी कलाकार आहेस. त्या चेंडूला बाहेरुन कोरायच्यास की कळ्या. मी नुसतं लुडबुडणे मोडात असायचे तेव्हा अशा चेंडूंना बाहेरुन कळ्या कोरायचे
केश्वे तश्या कळ्या कोरल्यावर
केश्वे तश्या कळ्या कोरल्यावर पण ते चेंडूचे चेंडूच राहीले आणि clay is more forgiving हे नव्याने कळले. मग हा का ना का कुठल्याही आकारात केले तरी मोदकाची चव सारखीच असते असे म्हणून खाल्ले.
हह तुझ्या ह्या स्टेप बाय
हह तुझ्या ह्या स्टेप बाय स्टेप मुळे मी काल मोदक करु शकले गं!! खुप खुप धन्यवाद...
मोदक पात्र नसल्यास काय वापरावे. मी इडली पात्र वापरल्याने माझे मोदक चपटे झाले
जो, माझ्याकडे जो चाळणी सेट
जो, माझ्याकडे जो चाळणी सेट आहे त्यात सुट्या जाळ्या आहेत. प्रेशर पॅन मधे लंगडी ठेवली. पॅनमधे आणि लंगडीत दोन्हीकडे थोडं थोडं पाणी त्यावर चाळणीची जाळी वर हळदीची पानं त्यावर मोदक असं ठेवलं. चाललं ते.
करुन बघेन..धन्स नी...
करुन बघेन..धन्स नी...
धन्यवाद HH....
धन्यवाद HH....
रुनी
रुनी
धन्यवाद रुनी जो मी पण
धन्यवाद
रुनी
जो मी पण इडलीपात्रातच वाफवले आहेत. मोदकांचा आकार मोठा होत असल्याने मला ते सेफ वाटते
अश्विनी केच्या फोटोतल्या सारखी जाळी पण चांगली काम करत असणार.
रुनी
रुनी
कित्ती सुंदर! पुढल्या वेळेस
कित्ती सुंदर! पुढल्या वेळेस हे पान उघडून बसेन मोदक करतांना.
अशीच कुणी सुगरण खाजाच्या कानवल्यान्ची स्टेप-बाय-स्टेप, फोटोसहित कृती टाकेल तर काय बहार येइल!
Pages