क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रँड्म मॅकलम, व्हेटोरी व जेसी रायडर च्या अनुपस्थितीत सचिन, गंभीर, भज्जी व झहीर नसलेल्या भारताचा न्यूझीलंडने पुरता कचरा केला. दिनेश कार्तिकला सायमन टॉफेलने ढापले. मी बघितलेली टॉफेलची ही पहिलीच चूक. रैना व रोहित शर्मा अत्यंत फालतू चेंडूवर बॅट लावून बाद झाले. अगदीच पुअर शो.

जाउ द्या हो. आधीच श्रीलंकेशी तीन टेस्ट खेळून ते दमले होते. पाच पाच दिवसांच्या टेस्ट हो. किती दमायला होतं! त्यानंतर मालिका बरोबरीत सोडवली म्हणून जरा एक दोन दिवस पार्टी केली. मग इतक्यात परत कसे चांगले खेळणार? त्यातून ते स्टायरिस नि टेलर बादच होत नव्हते. जरा चार दोन फटके, फारतर एखादा षट्कार मारून परत जायचे. म्हणजे क्षेत्ररक्षणाची वेळ येईस्तवर एक बीअर पिऊन ताजे तवाने व्हायला होते! ही स्ट्रॅटेजीच त्यांना माहित नाही!!

बघू पुढच्या सामन्यात. नाहीतरी हरलो, जिंकलो, काय फरक पडतो? जिंकलो तर थोडेसे पैसे जास्त मिळतात का? नि असे किती मिळतात म्हणून धडपड करायची? नि पोरी तर आपली ष्टाईल पाहूनच मरतात आपल्यावर. त्यासाठी जिंकायला कशाला पाहिजे??

लोकांना क्रिकेटमधले महत्वाचे काय ते कळत नाही. आम्ही भारताकडून खेळतो, आम्हाला जास्त समजते की यांना??

<< लोकांना क्रिकेटमधले महत्वाचे काय ते कळत नाही >> कारण, लोकांची व आपली [एकदा भारताच्या संघात स्थान मिळाल्यावर] क्रिकेटची व्याख्याच सर्वस्वी वेगळी असते ! प्रश्न हरल्या-जिंकण्याचा अजिबात नाही; लवकर बाद झाल्याचाही नाही; पण इतकी बेजबाबदारी व बेफिकीरी ? २८ला ३ वरून संघाला २८८ पर्यंत पोचवायला धडपडणारे स्टायरस आणि टेलर काय अधिक प्रतिभावान आहेत ? साहेब, द्रविड व लक्ष्मण यानी इतकी उंची गाठूनही त्यांच "डेडीकेशन" कुठे आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची ही वृत्ती कुठे !
तरी पण .... मी खेळ पहात रहाणारच, चर्चा करत रहाणारच ..... कारण क्रिकेट हे वरदान आहे तसंच एक शापही !

भाऊ,
मला तरी क्रिकेट किंव्वा कुठलाही खेळ वरदानच वाटतं. फक्त त्या खेळाला larger than life केलं की लोचा होतो.

कालच्या सामन्याबद्दल लिहीण्यासारखं काहीच नाही. Happy रांगेचा फायदा सर्वांन्ना म्हणत खेळाडू रांग लावून बाद झाले. मान्य आहे खेळपट्टी विशेषतः आपल्या फलंदाजीच्या वेळी एकदीवसीय ला विशेष पुरक नव्हती. मंदावली होती, पण बाऊंस कायम होता.. झिलंड ची गोलंदाजी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने उत्कृष्ट होती हे मान्य करायलाच हवं. पण "हाराकिरी" च्या बळावर आपण हरलो. (दुपारी खेळपट्टी जास्त वेगवान वाटत होती. स्टायरीस आजोबांन्नी आपल्या पोरांन्ना लय लय धुतलं!).

मला आजकाल असं वाटू लागलं आहे की ipl ने काय केले असेल तर खेळाडूची मानसिकताच बदलून टाकलीये. एक दिवसीय (५० षटके) सामन्यात देखिल सय्यम, ऊभे राहण्याची मानसिकता, चोरट्या एकेरी धावा, दीर्घ खेळी हे सर्व महत्वाचे आहे. पण पाट्या खेळपट्ट्यांवरील झटपट्-फटाफट ipl मूळे या गोष्टींचा विसर पडल्यासारखे आपले लोक खेळतात. एखादे षटक निर्धाव गेले, खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल असेल, प्रेशर आले की खेळाडू हाराकिरी करताना दिसतात. अचानक देहबोली नकारात्मक होते. सामना पुढील ५ षटकात नाही तर ५० षटकानंतर संपणार आहे हे बहुदा विसरतात. त्यातही तीन तीन पॉवरप्ले असूनही आपली फलंदाजी कोसळतेच. झिलंड ३०/३ (९ षटके ) होते तर आपण ४३/२ (९ षटके) होतो तरिही आपण हरलो. यातच काय ते सर्व आले.

असो. आजकाल आपण टिव्ही वर दिसतो हे माहित असल्याने आपल्या खेळाडूंचे चेहरे अन हावभावच जास्त बोलतात- बॅट बोलली तर बरे होईल!!

जाउ दे हो. अस झाल की एक बर असत. सिलेक्टर सकट सगळे जागे होतात. वर्ल्ड कप च्या आधी असे जागे होण्याचे बरेच गजर वाजू दे.

>>जाउ दे हो. अस झाल की एक बर असत. सिलेक्टर सकट सगळे जागे होतात. वर्ल्ड कप च्या आधी असे जागे होण्याचे बरेच गजर वाजू दे.
lets hope.. Happy

सिलेक्टर जागे झाले तरी करणार काय? कुणाला दोषी ठरवणार? सामना वाचवणे, जिंकणे हे कधीच एकट्या दुकट्याचे, किंवा एका वेळचे काम नसते. सामना चालू असेस्तवर सर्व वेळ सामना जिंकता कसा येईल याचाच विचार नि तसाच आचार ठेवावा लागतो!

३ बाद ३० नंतर ६० धावा झाल्यावरहि तीनच बाद म्हंटल्यावर सगळा संघ हादरला पाहिजे. काहीतरी वाईट घडते आहे नि ते सगळ्यांनी थांबवले पाहिजे अशी भावना व्हायला पाहिजे. कप्तानाने आपले डोके लढवले पाहिजे. चुकांचा आढावा घेतला पाहिजे.

जिंकल्यावर मारे अनेक बक्षिसे देतात, मग असे हरल्यावर त्यांचे पैसे कमी केले पाहिजेत. कमिशनवर जगणारा विक्रेता जर असा बेफिकीर वागला तर त्याला मिळतील का पुरेसे पैसे?

<<मला तरी क्रिकेट किंव्वा कुठलाही खेळ वरदानच वाटतं. फक्त त्या खेळाला larger than life केलं की लोचा होतो.>>योगजी, विविध खेळानी [खेळण्याने व पहाण्याने] मला देखील अमाप आनंद दिला आहे. पण उद्वेगाने क्वचित कधी असा तोलही जातो माझा. केवळ क्षणिक असतं ते. फार गंभीरपणे नका घेऊ माझ्या असल्या प्रतिक्रिया. जीवनाचा "परर्स्पेक्टीव्ह" तसा ठीक असावा माझा असं वाटतंय ... अजून तरी !
<<जाउ दे हो. अस झाल की एक बर असत.>> विक्रमजी, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही , काळ सोकावतो ! सर्वच देशांचे संघ विश्वचषक डोळ्यापुढे ठेवूनच तयारी करताहेत. असं मुद्दाम खेळून त्याना बेसावध ठेवायची आपली व्यूहरचना असली, तर गोष्टच वेगळी !

केवळ क्षणिक असतं >> खरयं क्रिकेट काढलं तर काय उरणार? भाउ तुम्ही घसरगुंडीवर व्यंगचित्र टाका. (आग्रहाची विनंती. Happy )

भारतानं खुप बेकार मॅच हरली हे खरंय, पण टॉस जिंकणारी व पहिली बॅटींग घेणारी टीमच ईकड जिंकतीये (अपवाद, भारत वि पाक, लंका वि भारत, आशिया कप).

तर अशा मैदानांवर डे-नाईट मॅच का घेत आहेत? दुसरी खेळणारी टीम हरणारे हे माहित असुनपण Sad

भारतीय संघ हरवल्यावर आपण हा आधी आणि शेवटी खेळ आहे, युद्ध किंवा जीवनमरणाचा प्रश्न नाही, हे का विसरतो? आपला संघ हरतो तेव्हा आपले खेळाडू आरामात खेळले असे का वाटते? मग आपण जिंकतो तेव्हा समोरचा संघ आरामात खेळला असे का म्हणायचे नाही?
सचिन आणि राहुल लंकेतल्या उन्हात आणि दमट हवेत कशाला घाम गाळा, म्हणून लवकर बाद होऊन आत गेले अशी कमेंट इथे वाचली. चेंडू मागे चेंडू , सामन्यामागून सामने न चुकता तटवायला सचिन देव नाही. त्याची चूक अक्षम्य अपराध?

२०१० हे वर्ष म्हणजे कसोटी खेळणार्‍या संघांच्या दर्जातला फरक कमी झाला.
नवोदित खेळाडू आणि कर्णधाराने खेळणारे पाकिस्तान ऑस्ट्रेलियाला कसोटीत हरवते, न्युझिलंड एकदिवसीय मानांकनात दुसर्‍या स्थानी येते.
तेव्हा आता वरखाली चालतच राहणार.चढाओढीचा, खेळाचा आनंद घेता आला तर पहावे.

<< भाउ तुम्ही घसरगुंडीवर व्यंगचित्र टाका.>> केदारजी, केवळ तुमची फर्माईश म्हणून हा प्रयत्न.
facial.JPG
अहो, आता तरी रंगीत कपडे वापरा ना जरा ! गल्लीतली पोरं हल्ली "कसोटीवाला" म्हणून चेष्टा करतात तुमची !!

आयला सुपर्ब, भाउसाहेब. लय म्हंजे लईच भारी की वो तुमच व्यंग चित्र कला . आम्हाला माहित नव्हत. तुमची आधिची कला कुठे प्रकाशित केली आहे. जरा लिंक द्या ना प्लिज.बाय द वे आमचा न्येमार ब्राझिलियन टीम मधे आला आणि पहिल्याच मॅच मधे गोलही मारला अमेरिके विरूद्ध.

झक्की, क्रिकेट आणि फूटबॉल कितीही टीम स्पोर्टस असले तरी टीम सिलेक्शन चुकल की सगळच चुकत. ब्राझिलियन २०१० कप टीम हे त्याचे उत्तम उदाहरण.

योग... Happy

फारच महान प्रकार... असे प्रकार सारखेच घडत असतील आपल्याकडे टीम सिलेक्शन मध्ये... त्यातच कोटा सिस्टीम नावाचा फंडा पण आहेच की...

<<आपल्याकडे टीम सिलेक्शन चे फंडे वेगळे असतात>> योगजी, लिअँडर पेजचे वडील भारतीय हॉकी संघाचे उत्कॄष्ट सेंटर फॉरवर्ड होते; पण त्यानी लिअँडरला प्रथमपासूनच हॉकीपासून दूर ठेवलं कारण हॉकी हा सांघिक खेळ आहे व इथल्या संघनिवडीत गुणवत्तेशिवाय इतर घटकच प्रभावी ठरतात, हे त्यानी अनुभवलं होतं. अशी विविध खेळातील अनेक उदाहरणे सापडतील. इस्माईल मुंबई संघातून क्रिकेट खेळला पण मुलाला मात्र त्याने टेनिसची दीक्षा दिली [तो राष्ट्रीय पातळीवर चमकला]. बर्‍याच जणांचं म्हणणं आहे कीं निवड समितीचा त्यावेळी अध्यक्ष लाला अमरनाथ ऐवजी एखादा मुंबईकर असता, तर बेदी ऐवजी पद्माकर शिवलकरचं नाव गाजलं असतं. आपल्या देशाच्या विस्ताराने व प्रांतिक विविधतेने राष्ट्रीय संघनिवड कठीण होतेच पण राजकारण व अर्थकारण यानी तर त्याचा बराच विचका होत आला आहे, हे कटु सत्य आहे ! त्यातूनही जे खेळाडू निखळ गुणवत्तेच्या बळावर संघात स्थान मिळवतात व टिकवतात, त्याना त्रिवार सलाम !

>>> इस्माईल मुंबई संघातून क्रिकेट खेळला पण मुलाला मात्र त्याने टेनिसची दीक्षा दिली [तो राष्ट्रीय पातळीवर चमकला].

तो इस्माईल का? एकनाथ सोळकरने "लोकप्रभा"तील एका लेखमालेत लिहिले होते की क्रिकेटमधल्या राजकारणाला कंटाळून त्याने त्याच्या मुलाला, ब्रिजेशला, टेनिसची रॅकेट घेऊन दिली होती. १९८० च्या आसपास एक वर्ष एकनाथ सोळकर मुम्बई रणजी संघाचा कर्णधार होता. त्यावर्षी मुम्बईने रणजी करंडक २-३ वर्षांच्या खंडानंतर जिंकला होता. पुढील वर्षी मुम्बईच्या पहिल्या रणजी सामन्यात सोळकरला बारावा खेळाडू म्हणून ठेवला होता. आदल्या वर्षी रणजी करंडक जिंकलेल्या संघाचा कर्णधार लगेच पुढच्या सामन्यात राखीव खेळाडू? याचा त्याला खूपच मानसिक धक्का बसला होता.

<<तो इस्माईल का?>> मास्तुरेजी, होय. अजित पै व इस्माईल हे दोघे त्यावेळी मुंबईतल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे "टेरर" गोलंदाज समजले जात. दोघानीही मग टेनिस बॉल सोडून देवून मुंबईच्या नेट्सवर सराव केला व संघात स्थान मिळवलं.
विक्रमजी, इंद्रधनुष्य, फारएण्ड व केदार - व्यंगचित्रावरील प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आताच्या आयसीसीच्या साप्ताहिक रेडिओ शोमध्ये सचिनने त्याने मिळालेल्या संधींबद्दल व यशाबद्दल ईश्वराचे आभार मानले व त्याचबरोबर हेही स्पष्ट केले कीं काहीही गृहीत न धरता प्रत्येक गोष्टीकरता त्याने कठोर परिश्रम घेतले आहेत व घेत रहाणार आहे. साहेब, जग तुम्हाला एव्हढं मानतं, तें यामुळेच !

त्याच रेडिओ शोमध्ये आयसीसीचे नवीन उपाध्यक्ष, अ‍ॅलन आयझॅक [न्यूझीलंड], यानीही आपल्या करकिर्दीचं सुरवातीचं आत्यंतिक महत्वाचं काम म्हणजे विविध देशांच्या संघांचे भविष्यातील" टूर्स प्रोग्रॅम "
लवकरात लवकर निश्चित करणे, हे स्पष्ट केलं. त्या कामाला इतका अग्रक्रम देण्याचं त्यांचं कारण - "त्यामुळे त्या देशाना टीव्ही व इतर आर्थिक अधिकार विकणे सोईस्कर होईल !!". अति क्रिकेटचा खेळावर व खेळाडूंवर होणारा परिणाम याबद्दल इतका आरडाओरडा होत असताना, भविष्यातील दौरे ठरवताना आयसीसीला चिंता कसली तर फक्त आर्थिक लाभाची !!

भाऊ,
तसं नाहीये- किंव्वा ती नाण्याची एक बाजू आहे.
दुसरी बाजू अशी की दौरे जर आधीच आखले तर त्याचे नियोजन करायला वाव मिळतो ज्यात बर्‍याच गोष्टी येतात जसे- सामना स्थळ, खेळपट्ट्या, जाहिरात, ईतर लॉजिस्टीक्स आणि हो प्रसारणाचे हक्क वितरण वगैरे. पण भरपूर वेळ असेल तर या गोष्टीत चाल्ढकल न करता शिवाय आयत्या वेळी कुठलिही जोडतोड न करता, कुणावरही विशेष मेहेरबानी (आर्थिक) न करता, पब्लिक टेंडर वगैरे च्या आधारावर सर्व व्यवस्था करता येते. किंबहुना खेळाडूंनाही याचा सर्वात अधिक फायदा होईल कारण पुढील एक दोन वर्षाचे दौरे आधीच माहीत असतील तर त्या अनुशंगाने तयारी, प्रायोरिटीज ठरवता येतील. नाण्याची ही दुसरी बाजू देखिल विचारात घेतली जावी.

>>काहीही गृहीत न धरता प्रत्येक गोष्टीकरता त्याने कठोर परिश्रम घेतले आहेत व घेत रहाणार आहे.
म्हणूनच सचिन एकमेवाद्वीतीय आहे. सनी देखिल एका व्यवस्थापन संबंधीत मुलाखतीत म्हणला होता की ३Ds, Determinataion, Descipline and Dedication हेच त्याच्या अन संघाच्या यशाचे गमक आहेत.

<<तसं नाहीये- किंव्वा ती नाण्याची एक बाजू आहे.>>योगजी, एकदम मान्य. पण नवीन उपाध्यक्षाने पहिल्या मुलाखतीत धोरणात्मक विधान करताना जर इतर महत्वाच्या व बहुचर्चीत क्रिकेटविषयक अंगांचा उल्लेखही न करता, "टूर्स प्रोग्रॅम"च्या अग्रक्रमासाठी केवळ आर्थिक व्यवस्थापनाचाच मुद्दा मांडला, तर त्यातून काय अर्थ ध्वनित होतो ? अर्थात, शक्यता अशीही आहे कीं मी रीडीफ.कॉमवर यावरचा जो रिपोर्ट वाचला त्यात इतर तपशिल कदाचित गाळलाही गेला असावा. किंवा, हल्ली क्रिकेटेतर बाबींचाच गाजावाजा जास्त कानावर येत असल्याने माझी प्रतिक्रिया उगीचच घाईची व अनुचित झाली असेल.
[हल्ली मी नको तेवढा गंभीर व"टची" होतोय का ? खरं तर माझा तो पिंड नाहीय !]

Pages