क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गावसकरने गायलेल्या 'या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला' या गाण्याचे बोल किंवा एमपी३ कोणाकडे आहे का?

>>त्याला खरतर मंडळातर्फ़े हनिमूनची सुट्टी द्यायला पाहीजे होती
हरकत नाही. मॅच फी पेक्षा ते परवडले असते. Happy

>>रिवर्स स्विंग चा जनक वसिम अक्रम्(?) वकार युनूस पैकी आहेत.>>सर्फराझ नवाझ रे.

विकी वर तसं म्हटलय खरं पण आपल्या पिढीसाठी रिवर्स स्विंग ला प्रसिध्धीत आणलं ते अक्रम अन वकार ने:
(source: http://en.wikipedia.org/wiki/Reverse_(cricket))
Former Pakistan international Sarfraz Nawaz was the founder of reverse swing during the late 1970s, and he passed his knowledge on to former team-mate and captain Imran Khan.
In a display of reverse swing in a Test match against Australia in 1979 in Melbourne, Sarfraz Nawaz took nine wickets in an innings. This included a remarkable spell of 33 deliveries in which he captured 7 wickets for 1 run. This is when cricket world noticed this new form of fast bowl

Wasim Akram then brought reverse swing to the public limelight but the man who really put the reverse into swing was Waqar Younis. He bucked the 1980s trend of pitching fast and short by pitching fast and full. Not an obvious recipe for success until the prodigious late inswing is factored in, which was designed to smash into the base of leg stump or the batsman's toes.
*****************************************************
या मालिकेत मलिंगा ला ते जमले नाही. झहीर असता तर कदाचित त्याने जमवले असते.
क्रिकेट मध्ये hawkeye चा वापर आता सर्रास चालतो. पण मला या मालिकेत hawkeye चे पायचित च्या अनुशंगाने दाखवला जाणारा ग्राफ निव्वळ गंडलेला वाटतोय. ऊ.दा. बरेच वेळा फलंदाजाच्या पॅड च्या खाली, गुढघ्याच्याही खाली लागणारा चेंडू यष्टीवरून खूप ऊंचावरून जाताना ग्राफ दाखवतो. फिरकी गोलंदाज विशेषतः मेंडीस, ओझा यांच्या चेंडूचा वेग, ऊंची बघता ते निव्वळ अशक्य आहे. मला जाणवलेली गोष्ट अशी की hawkeye मध्ये, चेंडू पॅड ला कुठे लागलाय यापासून पुढची ट्रॅजेक्टरी न दाखवता त्याआधी चेंडूच्या टप्पा कुठे पडला त्यावरून ती पुढील ट्रॅजेक्टरी दाखवतात की काय? तसे असेल तर निव्वळ वेडेपणा अन तांत्रिक दृष्ट्या चूकीचे आहे.
कुणाला तसे जाणवले का?

>>जसा व्रीरु आपला मेन स्पिनर तस आजपासुन इशांत शर्मा आपला specialist batsman..

ईशांत चं माहीत नाही, मिथून नक्कीच स्पेशालिस्ट शेपूट-फलंदाज आहे. मला तर आज तोच येईल असं वाटलं होतं. ऊद्या पहिल्या एका तासात ईशांत बाद झाला तर मिथून, मिश्रा ला फलंदाजीला पाठवायला हरकत नाही. Happy शेपूट फलंदाजांन्ना सापळा लावून बाद करता येत नाही हे तीनही सामन्यातून स्पष्ट झाले आहे. Happy

हर्शाचा लेखः
http://www.cricinfo.com/magazine/content/story/471100.html

कल्पना छान आहे. गावसकर आणि विरू ओपनिंग ला एकत्र खेळले तर काय होईल, कसे असेल वगैरे. एक कल्पना म्हणून रोचक आहे पण हर्शाने शेवटच्या परिच्छेदात दिलेल्या आकडेवारीतून त्याला जे सुचवायचे आहे ते मात्र पटत नाही:
With Sehwag you have fear and hope, with Gavaskar it was like hitting your head on a rock at the sheer futility of bowling. Gavaskar would never have got stumped on 99, and he wouldn't have tried to hit a six on 195 either. Two different styles you could not hope to see in a lifetime. But at the corresponding points in their career (79 Tests each), a mere 88 runs separate them. The difference in batting average is but 0.68.

Eventually, therefore, it is about doing things as you know best; as two brilliant cricketers 30 years apart have shown.

*****************************************************
सन्नीभाय ची फलंदाजी म्हणजे एखादा ध्यास लागलेला मूर्तीकार जसे तहान भूक विसरून तासन तास एखादे शिल्प त्याच्या सर्व बारकाव्यासकट घडवत बसतो तसे असायचे. ते शिल्प घडताना एक प्रेक्षक म्हणून आपणही तितकेच वेड लागल्यागत बघत बसू.
सेहवाग ची फलंदाजी म्हणजे एखाद्या चटकदार रशियन युवती ने आईस स्केटींग मधे घेतलेल्या लक्षवेधी कमानी, फिरक्या, ट्विस्ट्स, ऊड्या असतात.. वाह, जबरी, भन्नाट, खल्लास असले शब्द नकळत तोंडातून बाहेर पडतात अन ते फटकेही तसेच मोहक, आकर्षक वाटतात- दिवाळीतील 7 color bar सारखे.
गावसकरची फलंदाजी हेच क्रिकेट च एक बायबल्/गीता/ज्ञानेश्वरी म्हणता येईल- त्याच्या पुस्तकानुसार खेळणारा फलंदाज २४ कॅरेट शुध्ध सोन्यासारखा बिनचूक असणार याची खात्री असते.
जे पुस्तकात नाही ते सहेवागच्या फलंदाजीत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही.

एक मोठ्ठा फरक आहे की सन्नीभाय खेळायला ऊतरायचा तो खांद्यावर संघाचा अस्थिकलश घेवूनच, तेही समोर फलंदाजाच्या नरडीचा घोट घ्यायला टपलेले कर्दनकाळ गोलंदाज असताना. विरू पदार्पणापासून, आजतागायत मैदानात ऊतरलाय तो आपल्या पाठीमागे संघाचे किमान चार वाली आहेत (दादा, साहेब, भिंत, लक्षमण) ही निर्धास्त भावना घेवून.
त्यामूळे गावसकर अन विरू च्या बॅटींग अ‍ॅवरेज ची वरील लेखातील तुलना निव्वळ आकडेवारीच्या आधारावर करणे अगदीच अतर्क्य वाटते.
*****************************************************
युनळी वरील हा छोटासा विडीयो सन्नीभाय चं कर्तुत्व स्पष्ट करतो. कपिल च्या ओपनिंग कॉमेंट्स मध्ये नेमके तेच आहे:
http://www.youtube.com/watch?v=We-9umomRSY&feature=channel

झक्की हे खास तुमच्यासाठी तुम्हाला रुचेल पटेल अशा भाषेत: Happy
http://www.youtube.com/watch?v=87UjcMsjamI&feature=related

त्या अख्ख्या मुलाखतीतील सन्नीभाय च एक वाक्य महाभन्नाट आहे.
प्रश्णः अत्यंत वेगवान गोलंदाजी विशेषतः वेस्ट ईंडीज चे गोलंदाज यांन्ना तुम्ही सहजपणे खेळयचात. त्या वेळी त्या काळी वेगवान गोलंदाजी सहजपणे खेळू शकणारे फलंदाज विशेष नव्हते.
सन्नी: खरं सांगायचं तर क्रीकेटच्या इतीहासात जगात आजवर कुठलाच फलंदाज वेगवान गोलंदाजीला संपूर्णपणे सहजपणे खेळू शकणारा आहे असे नाही.
प्रश्णः मग तुम्हाला ते कसं जमल?
सन्नी: बहुदा मी डोळे झाकून खेळलो असेन.... (दोघेही हसतात.)

भन्नाट आहे ते वाक्य. त्या हारवर्ड वाल्याला त्यातला सुक्ष्मसंदेश कळला का माहीत नाही पण अवघ्या तमाम क्रिकेट्प्रेमिंन्ना अन आजच्या सर्व फलंदाजांना एक महान संदेश नकळत देवून जातो:
"मी समोर गोलंदाज कोण आहे, कसा आहे ते पाहिलं नाही, फक्त चेंडू कसा आहे ते पाहिलं"

भारतीय (जगभारातील सर्वच) फलंदाजांन्नी हे वाक्य हातावर गोंदवून घ्यावं (दिवार चित्रपटामधिल "मेरा बाप चोर है" स्टाईल), किमान ऊद्याच्या खेळासाठी तरी!!!!!!!

आणि हेही पहा. विरू ९९ वा १९५ वर असताना चौकार वा षटकार मारायला जातो याचं आपल्याला मोठं अप्रूप वाटतं. ईथे संघाला फॉलॉ ऑन टाळायला २४ धावा हव्या आहेत अन ९ गडी बाद झाले आहेत तेव्हा कपिल देव ने काय केले पहा (लागोपाठ ४ षटकार):
http://www.youtube.com/watch?v=1QFOLim2h2Q&feature=related

थोडक्यात, instincts ही रक्तात असावी लागते, बॅट मध्ये नव्हे!!!

रिवर्स स्विंग चा जनक वसिम अक्रम्(?) वकार युनूस पैकी आहेत.>>> वकारचे रिव्हर्स स्विंग अफलातून असायचे यात वादच नाही आणि त्यानेच या कलेला प्रसिद्धीत आणले...

सन्नीभायचा स्ट्रेट ड्राईव्ह आठवतो तसाच त्याचा लेग ग्लान्स आठवा... काय अदाकारी होती.

ईशांत Sad

सन्नीभायबद्दलचा एक किस्सा सांगण्याचा मोह आवरत नाही -
माझे एक मित्र एका वर्तमानपत्रासाठी भारत वि. इंग्लंड दौर्‍यासाठी तिथे गेले होते. प्रेसबॉक्सचा संपर्काधिकारी म्हणून टेड डेक्स्टर [इंग्लंडचा भूतपूर्व फलंदाज व कप्तान] काम पहात होता व सर्व क्रिडाप्रतिनीधींबरोबर त्याची चेष्टा-मस्करी चालू असायची. गावस्कर खेळायला आल्यावर मात्र हा पठ्ठा पुढच्या कठड्यावर हनुवटी टेकून शांत बसला होता. कुणीतरी ओरडून त्याला मस्करीत "झोपलास का रे" म्हटलं. मागे वळून तो गंभीरपणे म्हणाला " फलंदाजानी बॉलवर शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष केंद्रीत करायचं हें माहीत होतं पण नाक त्याच्या जवळ नेवून त्याचा वासही घ्यायचा असतो, हे मला आत्ता कळलं !". गावस्करच्या फलंदाजी तंत्राला उत्स्फुर्तपणे दिलेली जाणकाराची ती दाद होती !!

उपहारापर्यंत ,भारत १४५- ४.
साहेब व लक्ष्मण नेमकं जसं खेळायला हवं तसंच खेळताहेत ! तेंव्हा निकालही हवा तस लागण दाट शक्यतेच्या जवळ येतंय !!

क्लास ऑन शो. सुपर्ब.

क्रिकेट कितीही तंत्र , मंत्र , कला असल तरी आम्ही आमच्या बसण्याच्या पोझीशन वरून निकाल बदलू शकतो. आता लंच नंतर मॅच जिंके पर्यंत एकाच जागी.

>>आम्ही आमच्या बसण्याच्या पोझीशन वरून निकाल बदलू शकतो. आता लंच नंतर मॅच जिंके पर्यंत एकाच जागी.
स्टॅचू! Happy

जिन्कलो Happy . पहिला तास खेळून काढला तेव्हाच मॅच फिरली .

युवराज नावाचा एक टेस्ट खेळाडू होता (?) Sad ( पाय जमिनिवर नाही ठेवले की असच होत . Good and Great मधल्या फरकाच तो उत्तम उदा . आहे )

लक्ष्मणच्या पाठीत भरलं आणि साहेबांच लक्ष विचलीत झाल असावं. पॅडल शॉट चुकत असूनही पुन्हा खेळलेच ! असो, लक्ष्मणनं नाव सार्थ केलं, शतक झळकावलं व भारताला जिंकून दिलं !
विक्रमजी, योगजी, आता शांतपणे जेवणावर ताव मारायला तुम्हाला मोकळीक दिलीय धोनी अँड कंपनीने !!

युवराजसिंगचा रवी शास्त्री अथवा सन्दीप पाटील झाला आहे काय? आठवा त्यांचे अखेरचे दिवस. त्यांच्या पार्ट्या आणि बॉलीवूडच्या बायका...

एका फिक्स केलेल्या सिरिजचा शेवट झाला एकदाचा .... >> आयला हे बर आहे . हरलो असतो तर बकवास टीम .

आणी एवढा लक्ष्मणन (आणी इतरानीही ) जीव तोडून जिन्कलो तर फिक्सिन्ग . ???

हुश्श! गड सर केला.
लक्षमणरेखा आज भी पॉवरफूल है. व्ही व्ही एस ची व्ही आर एस आता लांबणीवर.. ऑसी लोक्स नी हा सामना बघितला असेल तर पुन्हा ऑक्टोबर मध्ये लक्षमणशी त्यांची गाठ आहेच. Happy
साहेबांना शतक शक्य होते. असो पण सचिन ही खेळी सुध्धा स्पेशलच असेल. साहेबांचा १८ वर एक अवघड झेल दिलशान ने सोडला, तेव्हडे वगळता आपली फलंदाजी क्लास झाली.
लक्षमण just kept it simple, did the basics right, and played with positive intent.
या अख्ख्या मालिकेतील भारतासाठी गवसलेला हीरा म्हणजे रैना. तसा तो एकदीवसीय मध्ये जवळ जवळ १०० सामने भारतासाठी खेळलाय पण दोन्ही कसोटीमध्ये अवघड प्रसंगी येवून दोन्ही वेळेला त्याने ऊत्कृष्ट खेळ करून भारताला तारले आहे. रैना चे फिरकीविरुध्धचे तंत्र सुध्धा अतीशय संतुलीत अन शुध्ध दिसते. त्याशिवाय कसोटीसाठी लागणारी मानसिकता, अ‍ॅडजस्ट्मेंट, हे त्याच्याकडे आहे हे त्याने दाखवून दिले.
रैना भारताच्या कसोटी मधिल कायमचा चेहेरा ठरणार आहे. द्रविड ला बसवून युवराज ला घ्यायला हरकत नाही. ऑक्टोबर मध्ये घरच्या खेळपट्टीवर ऑसी वि. द्रविड खेळला तरी भविष्याच्या दृष्टीने युवराज ला खेळवणे योग्य ठरेल. (पार्ट्या अन बॉलिवूडच्या बायका हाच युवी चा गुन्हा असेल तर तो काही अक्षम्य गुन्हा नाही... तो माफ केला जावा. बाळराजांना थोडी समज द्यावी हे नक्की!) Happy
आपली गोलंदाजी मात्र अजूनही कमकुवत आहे. खरी चिंता तीच आहे कारण कसोटी सामने निव्वळ फलंदाजी वर जिंकता येत नाहीत- एकदिवसीय सामन्यात हीच गोलंदाजी ईकॉनोमिकल म्हणून खपून जाईल पण कसोटी सामने मात्र २० गडी बाद केल्याशिवाय जिंकता येत नाहीत. मिश्रा, मीथून ने फलंदाजी केली तो बोनस आहे- त्यांचे मुख्ख्य काम विकेट घेणे आहे, ज्यात ते सपशेल अपयशी ठरले. थोडक्यात बेसिक मध्ये लोचा.

लंकेसाठी सूराज रणदीव ची गोलंदाजी अन मेंडीस, मलींगा ची फलंदाजी हे finds of the series असतील. मेंडीस देखिल गोलंदाज म्हणून सपशेल अपयशी ठरला- त्याची फलंदाजी हा बोनस आहे पण बेसिक पॅकेज मध्येच लोचा असेल तर बोनस वर फार काळ जगता येत नाही. सूराज रणदीव ला दुसर्‍या बाजूने साथ देणारा एखादा जरी गोलंअदाज असता तर वेगळे चित्र बघायला मिळाले असते? असो. या जर तर च्या गोष्टींन्ना सामना संपल्यावर विशेष अर्थ ऊरत नाही. पण तरिही लंकेने एखादा डावखुरा फिरकी गोलंदाज खेळवला असता तर?
*****************************************************
वैयक्तीक माझ्यासाठी कुमार संगकारा हा मालिकावीर आहे. या सामन्यात त्याने लावलेली चूकीची क्षेत्ररक्षण रचना अन स्वताची गमावलेली विकेट सोडता संपूर्ण मालिकेत त्याने संघाला स्वतःच्या बळावर विजयासमीप नेले आहे. कप्तान म्हणून त्याचे श्रेय त्याला द्यावेच लागेल. (पाहुया कुणाला मिळते गाडी) Happy
या ऊलट कप्तान म्हणून धोणी ने संपूर्ण मालिकेत निराशाच केली. शिवाय त्याची फलंदाजी देखिल सामान्य होती. ही चिंतेची बाब आहे.
*****************************************************
आता १० ऑगस्ट पासून मसाला क्रिकेट- एकदीवसीय सामने चालू होईल. लंका, झिलंड, भारत...
नवी विटी नवे राज्य!
*****************************************************
टेन स्पोर्ट्स साठी मी भविष्यातील सर्व सामन्यात फुकटात सामना चर्चा-अ‍ॅनॅलिसीस करायला तयार आहे. पण त्या चारू शर्माला मात्र आवरा/ऊचला/घरी पाठवा/हाकला.

हो ना राव... सेहवागची चंगळ झाली Happy
आणि सचिन साहेब घरी आता अ‍ॅवार्ड्स ठेवायला जागा नसेल तर ईथे मा.बो.च्या क्रिकेट बा.फ. वर पाठवून द्या आम्ही ईमाने ईतबारे, न भांडता, न अनुल्लेख करता, डुप्लिकेट आयडी न घेता, त्याचे ईमाने ईतबारे जतन करू. Happy
अरे तो माय्क्रोमॅक्स मोबाईल दिलाच नाही का कुणाला? मला चालेल. Happy
आमचे पूर्वज म्हणतात व्यक्ती तितक्या प्रकृती, आम्ही म्हणतो माणसे तितके मोबाईल!
*****************************************************
बाकी मला वाटलं बक्षिस्-समारंभादरम्यान टोनी ग्रेग चुकीचे बोलतो आहे की काय? आजकालच्या जमान्यात बक्षिस म्हणून $१५०० अन $२००० चा चेक? काय मस्करी करता राव ?
"रामसेतू" पुन्हा बांधायला परवानगी दिली असती तर सेहवागने लिनीवा लंकेहून थेट दिल्लीपर्यंत चालवत आणली असती ना. असो.

लक्ष्मण, सचिन व रैनाच्या फलंदाजीमुळे भारत जिंकला. लक्ष्मणचे खरंच कौतुक आहे. कोणत्याही वादात नसलेला व अतिशय लो प्रोफाईल असलेला हा शैलीदार फलंदाज अनेकवेळा भारताचा तारणहार ठरलेला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या त्याच्या कामगिरीचा अनेकांना हेवा वाटेल. सामन्याचा मानकरी म्हणून तोच सर्वार्थाने योग्य होता.

या सामन्यात दोन्ही संघातल्या अनेकांनी चांगली कामगिरी केली. सेहवाग (१०९ धावा व दोन्ही डावात मिळून ४ बळी), सचिन (४१ + ५४), रैना (६२ + ४१*), लक्ष्मण (५६ + १०३*), ओझा (दोन डावात मिळून ७ बळी), अमित मिश्रा (दोन डावात मिळून ४ बळी व पहिल्या डावात ४० धावा), समरवीरा (१३७* + ८३), रणदिव (दोन डावात मिळून ९ बळी) . . .

तिकडे पाकड्यांची पुन्हा एकदा वाट लागली आहे. लागोपाठ दुसर्‍या डावात त्यांचा १०० च्या आत खुर्दा झाला. भारताने द. आफ्रिकेविरूद्धच्या एका कसोटी सामन्यात दोनही डावात शंभरी सुद्धा गाठली नव्हती. तो सामना व त्यातील आकडेवारी कोणाला माहित आहे का?

हुश्श ! जिंकले बुवा, नाहीतर सचिनच्या डोक्यावर आणखी एक खापर.
सकाळचे सत्र खेळून काढून त्याने पाया रचला होता. विकेट टिकवणेच जास्त गरजेचे होते.
या सामन्याला सेहवागचा सामना म्हणून ओळखयला हरकत नसावी. त्याच्या मॅजिक टच रादर हॅमर मुळेच जिंकलो. नाहीतर मुरली विजय असताना तो का आला असताना लक्ष्मणसाठी धावा धावायला.

हुश्श ! VVS exorcised demons of Mendis finally. रैना should be permanent fixture in team purely based on his temperament.

man of the series ची निवड एकदम चपखल. सेहवाग हा factor consistent होता पूर्णपणे. अतिशय timely contributions in all 3 matches. (जिंकण्यामधे आणि हरण्यामधेहि). त्याचे scores बाजूला काढून बघितले कि त्यांचे मह्त्व लक्षात येते.

. द्रविड ला बसवून युवराज ला घ्यायला हरकत नाही. ऑक्टोबर मध्ये घरच्या खेळपट्टीवर ऑसी वि. द्रविड खेळला तरी भविष्याच्या दृष्टीने युवराज ला खेळवणे योग्य ठरेल.>> नको रे. करायचेच असेल तर पुजारा किंवा रायडू ला try करून बघायला हवे. देशात खेळण्याचा फायदा युवीला बरेचदा मिळाला आहे. Who knows this may ignite some sparks in him.

भज्जीचे SSc wickets बद्दल वाचून काय बोलायचे कळत नाहि राव Sad

आजच reverse swing वर article आलय http://www.cricinfo.com/magazine/content/story/469995.html

भारताने द. आफ्रिकेविरूद्धच्या एका कसोटी सामन्यात दोनही डावात शंभरी सुद्धा गाठली नव्हती.>>> मास्तुरे ते १०० आणि ६६ होते बहुधा. बघून सांगतो. ९७ ची सिरीज असावी.

जबरी विजय. लक्ष्मण ने ऑसीज ना वॉर्निंग दिली आहे. नाहीतर २००८ च्या घरच्या सिरीज मधे तो फारसा खेळला नव्हता.

युवराजने द्रविड ला "बसवण्या" एवढे काहीही केलेले नाही. तो स्वतःहून निवृत्त झाला तर गोष्ट वेगळी. ऑसीज विरूद्ध युवराज चालेल ही शक्यता आहे हे खरे, पण द्रविड ला बसवणे योग्य वाटत नाही. ही सिरीज सोडता मागच्या काही टेस्ट्स मधे तो चांगला खेळलेला आहे. वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे द्रविड चा प्रॉब्लेम मानसिक वाटतो. २००७ च्या मध्यावर कप्तानपद सोडल्यापासून मैदानावर त्याचे आस्तित्त्व फारसे जाणवत नाही. त्याच्याशी अधिकारवाणीने बोलू शकणार्‍या गावस्कर सारख्या कोणीतरी त्याच्याशी बोलले पाहिजे नक्की काय प्रॉब्लेम आहे ते बघायला. गांगुली चा उपकप्तान म्हणून होता ती त्याची कसोटी आणि वन डे मधली बेस्ट फेज होती.

आहाहा काय आठवण करून दिलीत मास्तुरे. ही जुनी स्कोअरकार्डस बघितली की त्यासंबंधीच्या इतर आठवणी येउ लागतात... विक्रम राठोड आणि वुर्केरी रमण! काय ओपनर होते डोनाल्ड आणि कं च्या विरोधात! राठोड ने त्यावेळेस रणजीत १०-१५ हजार रन्स काढले होते. एक उत्तरेचा सिनीयर खेळाडू "सचिन सोडल्यास आत्ताचा तो सर्वोत्कृष्ठ खेळाडू आहे" असे मुलाखतीत म्हंटल्याचे मी बघितले होते Happy त्याखेरीज डेव्हिड जॉन्सन, मग पुढे मागे नोएल डेव्हिड, सुजीत सोमसुंदर ई.ई, काय नग मिळाले होते सचिन ला खेळाडू म्हणून! पण तो ही ठामपणे विरोध का करीत नसे कळत नाही. गुंडाप्पा कमिटीत आल्यावर खुद्द सचिन संघात राहिला हेच नशीब!

<<युवराजने द्रविड ला "बसवण्या" एवढे काहीही केलेले नाही >> खरंय. मर्यादित षटकांच्या सामन्यात युवराजला वगळून द्रविडला घेणं यापेक्षाही कसोटी सामन्यात द्रविडला वगळून युवराजला घेणं कित्येक पटीनी अधिक घातक होईल- विशेषतः ऑसीज विरुद्ध- असं मलाही वाटतं.
<<लक्ष्मण ने ऑसीज ना वॉर्निंग दिली आहे>> लक्ष्मणने आज फिरकी गोलंदाजांच्या "गूड लेंग्थ"चे चेंडू पाय पूर्णपणे पुढे टाकून ज्या तर्‍हेने "कव्हर ड्राईव्ह" केले, त्यावरून तो अप्रतिम फॉर्मात आहे हे स्पष्ट आहे. शिवाय, तो बरोबर असला कीं साहेबांचाही खेळ बहरतो, असंही मला जाणवतं. ऑसीजना त्याचा सार्थ वचक तर आहेच ! या शैलीदार, गुणी, उपयुक्त व "क्लासिक" सज्ञेत चपखल बसणार्‍या खेळाडूचं व्हावं तितकं कौतुक झालं नाही, हे मात्र खरं.
<<वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे द्रविड चा प्रॉब्लेम मानसिक वाटतो.....त्याच्याशी अधिकारवाणीने बोलू शकणार्‍या गावस्कर सारख्या कोणीतरी त्याच्याशी बोलले पाहिजे >> द्रविडला या संघात उपरेपणाच्या भावनेनं पछाडल्यासारखं मला कां वाटतं ? कदाचित, इतर कुणी सल्ला देण्याऐवजी त्याच्या सहकार्‍यानीच
त्याच्यावरचा विश्वास ठामपणे व्यक्त केल्याने पुन्हा आपला पूर्वीचा द्रविड आपल्याला पहायला मिळेल. हा अर्थात माझा एक तर्क.

Pages